भाजपने आप चे प्रवक्ते मुकुंद किर्दत यांचेही इंस्टाग्राम अकाउंट बंद केल्याचा आरोप

Date:

भाजप सरकार आम आदमी पार्टीला एवढे का घाबरते? इंस्टाग्राम अकाउंट बंद करणे ही तर आमच्या मूलभूत हक्कांवर गदा!
सोशल मीडिया वरून मोदींना विरोध चालू राहील, जनतेच्या हक्कासाठी लढत राहू: आम आदमी पार्टी

पुणे-मध्यंतरी आम आदमी पार्टीने गुजरात मधील फेसबुक आणि इंस्टाग्राम अकाउंट भाजप सरकारने बंद केल्याचा आरोप केला होता.आता महाराष्ट्रातील आप चे प्रवक्ते मुकुंद किर्दत यांचेही इंस्टाग्राम अकाउंट बंद केल्याचा गंभीर आरोप आम आदमी पार्टीने केला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये महिला आरक्षण दुरुस्ती बिल विषयी तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांची निंदानालस्ती करणारी काही विधाने आणि आम आदमी पार्टी सोडणारे खासदार राघू चड्डा यांच्यावरती आपचे प्रवक्ते मुकुंद यांनी जोरदार टीका केली होती. त्यांच्या पोस्ट अनेक ठिकाणी शेअर केल्या गेल्या होत्या. त्यामधूनच केंद्र सरकारने 25 एप्रिल रोजी तातडीने इंस्टाग्राम अकाउंट भारतामध्ये बंद केल्याचे समोर आले आहे. याबाबत मेटा प्लॅटफॉर्म ने हे अकाउंट भारत सरकारच्या नोटीस मुळे बंद केल्याची माहिती या अकाउंट वर दिसते. याबाबत माहिती तंत्रज्ञान कलम 79 ( 3) ब चा वापर करून सरकारने हे अकाउंट भारतात बंद केले आहे.

यावर आम आदमी पार्टी व मुकुंद किर्दत यांनी जोरदार टीका केली असून जनतेचे प्रश्नांना मांडल्यामुळे आणि सरकारविरोधी भूमिका घेतल्यामुळे ही दडपशाही केली जात असल्याचा आरोप केला आहे. तसेच या इंस्टाग्रामवर संविधानाच्या चौकटीमध्येच हक्क बजावत पोस्ट केल्या गेल्या होत्या. इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियामध्ये भाजप सरकार चे नियंत्रण आहेत परंतु आता सोशल मीडियावर सुद्धा आम आदमी पार्टीचा विचार प्रसार होऊ नये यासाठी या सरकारी यंत्रणा सक्रिय झाल्याचे दिसते आहे. परंतु या दडपशाही विरोधात जाऊन आम आदमी पार्टी गुजरात, महाराष्ट्र व देशभर ही लढाई चालूच ठेवेल असे त्यांनी म्हटले आहे.

याबाबत मुकुंद किर्दत यांनी सुप्रसिद्ध वकील असीम सरोदे यांच्याशी संपर्क साधून सरकारला नोटीस पाठवली आहे. सरकारने या कलमाचा वापर करण्याआधी आप चे मुकुंद किर्दत यांना नोटीस पाठवून प्रसिद्ध केलेल्या मजकुरा विषयी खुलासा मागवायला हवा होता. सरकारने ही बेकायदेशीर बंदी न हटवल्यास उच्च न्यायालयात जाण्याचा मार्ग मोकळा असेल असे अँड असीम सरोदे यांनी म्हटले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

मौजमजा करण्यासाठी नागरिकांचे मोबाईल हिसकावणा-या आरोपींना ठोकल्या बेडया

पुणे-मौजमजा करण्यासाठी नागरिकांचे मोबाईल हिसकावणा-या १८ आणि १९ वर्षे...

संवादभूषण” प्रकाशित

पुणे - निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ लिखित "संवादभूषण" पुस्तकाचे...

वाद्य वादनातून लता मंगेशकर-आशा भोसले यांना ‘स्वरांजली’

गांधर्व महाविद्यालय, पुणेतर्फे दि. ६ ते दि. ८ मे...

दिवसाच्या वीजवापरात ७० लाख ग्राहकांना २२३५ कोटी रुपयांचा लाभ

मुंबई, दि. ०३ मे २०२६: राज्यातील वीज ग्राहकांना सकाळी ९...