मौजमजा करण्यासाठी नागरिकांचे मोबाईल हिसकावणा-या आरोपींना ठोकल्या बेडया

Date:

पुणे-मौजमजा करण्यासाठी नागरिकांचे मोबाईल हिसकावणा-या १८ आणि १९ वर्षे वयाच्या दोघांना पोलिसांनी पकडले आहे .त्यांच्याकडून ४३ मोबाईल फोन जप्त केले असून वयोवृध्द इसम तसेच महिला या निर्जन स्थळी असताना पाळत ठेऊन ते बेसावध असताना त्यांचे हातातुन मोबाईल फोन हिसकावुन घेऊन पळुन जात .

यासंदर्भात पोलिसांनी सांगितलेकी ,’
येरवडा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये सह्याद्री हॉस्पिटल समोर गल्लीमध्ये एक इसम रात्रीचे जेवण झाल्यानंतर शतपावली करुन मोबाईल फोन पहात असताना दोन अज्ञात इसमांनी मागुन येऊन त्यांचे हातातील मोबाईल फोन हिसकावुन चोरी करुन पळून गेले या बाबत दि.२९/०४/२०२६ रोजी येरवडा पोलीस स्टेशन येथे गुरनं. २१३/२०२६ भारतीय न्याय संहिता कलम ३०४, ३(५) अन्वये गुन्हा दाखल झाला होता.
या अनुषंगाने पोलीस उपायुक्त, परिमंडळ ०४, चिलुमूला रजनिकांत, सहा. पोलीस आयुक्त, येरवडा विभाग र श्री. सुनिल जैतापुरकर, यांनी देखील सुचना केल्या. त्यानुसार वरीष्ठ पोलीस निरीक्षक अंजुम बागवान यांचे मार्गदर्शनाखाली येरवडा पोलीस स्टेशन हद्दीत तपास पथकाचे पोलीस अंमलदार साईनाथ म्हस्के यांना गुन्हा दाखल झालेनंतर अवघ्या काही तासातच त्यांच्या खास बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, दाखल झालेल्या गुन्ह्यातील आरोपी हे चोरी केलेले मोबाईल फोन विक्री करीता येणार असल्या बाबतची खात्रीलायक माहिती प्राप्त झाल्याने सहायक पोलीस निरीक्षक प्रसन्न जराड, पोलीस अंमलदार राहुल ठोंबरे, किरण गंभीरे यांनी मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी जाऊन सापळा रचुन बातमीदाराने आरोपीने परीधान केलेल्या वेशभुषा वर्णनावरुन संशयित इसमांवर पाळत ठेऊन संशयित इसम यांना पोलीस आल्याची चाहुन लागताच पळून जाण्याचे तयारीत असताना त्यास शिताफीने ताब्यात घेतले त्यांना त्यांचे नाव पत्ता विचारले असता त्यांनी त्यांची नावे १. राजकुमार सोनु पाटील, वय-१९, रा-राजगुरु चौक, गणपती मंदिरा मागे ताडीवाला रोड, बंडगार्डन, पुणे २. गौरव वाळु खुडे, वय-१८, रा-सी विल्डींग आठवा माळा, अपर व्हिआयटी, बिबवेवाडी, पुणे असे असल्याचे सांगितले. त्यांचे कडे पांढ-या रंगाच्या पिशवी मध्ये असलेल्या एकुन १९ मोबाईल फोन बाबत विचारले असता त्यांनी पुणे शहर व परीसरातुन अनेक मोबाईल फोन चोरल्याची कबुली दिली. मोबाईल चोरी करण्यासाठी वयोवृध्द इसम तसेच महिला या निर्जन स्थळी असताना पाळत ठेऊन ते बेसावध असताना त्यांचे हातातुन मोबाईल फोन हिसकावुन घेऊन पळुन जात होते. तसेच पुणे स्टेशन, रेल्वे स्टेशन अशा गर्दीच्या ठिकाणी गर्दीचा फायदा घेऊन अनेक प्रवाशांच्या खिशातुन मोबाईल फोन चोरी केल्याचे चौकशी दरम्यान सांगितले आहे. या आरोपींकडुन ४३ मोबाईल फोन जप्त करण्यात आले असुन एकुण २,६५,५००/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. पुढील तपास पो. उपनिरी. किशोर बेरड हे करत आहेत.
हि कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग मनोज पाटील, पोलीस उपायुक्त, परिमंडळ ०४, चिलुमूला रजनिकांत, सहा. पोलीस आयुक्त, येरवडा विभाग सुनिल जैतापुरकर, वरीष्ठ पोलीस निरीक्षक, येरवडा पोलीस स्टेशन अंजुम बागवान, पोनि (गुन्हे), विजय ठाकर, यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक प्रसन्न जराड, तपास पथक प्रभारी अधिकारी पोलीस उप निरीक्षक किशोर बेरड, पोलीस अंमलदार शैलेश वाबळे, मुकुंद कोकणे, संदिप जायभाय, साईनाथ म्हस्के, नटराज सुतार, बालाजी सोगे, गणेश पालवे, अनिल मन्हाळकर, राहुल ठोंबरे, किरण गंभीरे यांनी केली आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

लोकांचा रोष स्वाभाविक, पण काही जणांकडून घटनेला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न – CM

नसरापूर पीडितेच्या वडिलांशी दोनदा संवाद साधला-लोकशाहीत भर चौकात फाशी...

भाजपने आप चे प्रवक्ते मुकुंद किर्दत यांचेही इंस्टाग्राम अकाउंट बंद केल्याचा आरोप

भाजप सरकार आम आदमी पार्टीला एवढे का घाबरते? इंस्टाग्राम...

संवादभूषण” प्रकाशित

पुणे - निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ लिखित "संवादभूषण" पुस्तकाचे...

वाद्य वादनातून लता मंगेशकर-आशा भोसले यांना ‘स्वरांजली’

गांधर्व महाविद्यालय, पुणेतर्फे दि. ६ ते दि. ८ मे...