Home Blog Page 3222

रॉयल ट्वींकल, सिट्रस तक्रारी आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करणार ​:​ सह पोलीस आयुक्त

0
ट्वींकल’, ‘सिट्रस’ कंपन्यात फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांचा पुण्यात मोर्चा
 
पुणे-​:​राज्यात गुंतवणूकदारांच्या सुमारे 8 हजार कोटी गुंतवणूक गिळंकृत करून गाशा गुंडळणार्‍या ‘रॉयल ट्वींकल’, ‘सिट्रस’ या कंपन्यांच्या विरोधातील पैसे बुडविल्याच्या तक्रारी आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करणार असल्याची माहिती आज सह पोलीस आयुक्त रवींद्र कदम यांनी दिली.
 अधिक व्याजाचे आमिष दाखविणार्‍या ‘रॉयल ट्वींकल’, ‘सिट्रस’ या कंपन्यातील सामान्य गुंतवणूकदारांची 8 हजार कोटी गुंतवणूक बुडवून कंपनीने गाशा गुंडाळला आहे. पुण्यातील गुंतवणूकदारांनी आज मोर्चा काढून पोलीस आयुक्त आणि महसूल आयुक्तांकडे कारवाईची मागणी केली.
 ‘रॉयल ट्वींकल’, ‘सिट्रस इन्व्हेंस्टर्स फोरम’ या नावाने गुंतवणूकदारांनी फोरम स्थापन केली आहे. या फोरमच्या राजश्री गाडगीळ, बापू पोतदार, भालचंद्र कुलकर्णी या निमंत्रकांनी निवेदन दिले. यावेळी आर. पी. गाडगीळ, एस. के. पोतदार, पी. एच. गांधी, वसंत प्रभुणे, धनश्री गाडगीळ, मुग्धा जोशी, संध्या चाफेकर, रुपा जोशी, अनिल प्रभुणे, वैदेही गोखले हे उपस्थित होते.
 सह पोलीस आयुक्त रवींद्र कदम, आर्थिक गुन्हे शाखेचे उपायुक्त सुधीर हिरेमठ यांच्याशी शिष्टमंडळाने चर्चा केली. त्यानुसार संगमवाडी येथील आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात तक्रारी एकत्रित केल्या जाणार आहेत. फसवणूक  झालेल्या गुंतवणूकदारांची, प्रकरणाची व्याप्ती लक्षात घेतली जाणार आहे. दरम्यान, स्वारगेट पोलीस स्थानकात फोरमच्या वतीने पटवर्धन यांनी पहिली तक्रार दाखल केली.
महसूल आयुक्त चंद्रकांत दळवी यांची भेट घेऊन शिष्टमंडहाने कारवाईची मागणी केली. कंपनीच्या 5 जिल्ह्यातील मालमत्ता विकल्या जाऊ नयेत. यासाठी जप्त कराव्यात, कंपनीचे ओमप्रकाश गोएंका यांचा पासपोर्ट जप्त करावा, त्यांनी नादारी जाहीर केल्यास फेटाळली जावी, अशा मागण्या शिष्टमंडळाने केल्या. पोलीस आयुक्तांशी बोलून आपण या प्रकरणातील कारवाईची दिशा निश्चित करू, असे आश्वासन चंद्रकांत दळवी यांनी दिले. 

अमृताचा शाही अंदाज रॅम्पवर

0

 

आपल्या अभिनयाने आणि दिलकश अदेने प्रेक्षकांना दिवाण बनवणारी अभेनेत्री
अमृता खानविलकर सध्या फारच चर्चेत आहे. अमृताचं हिंदी शो मध्ये असलेलं सूत्रसंचालक
तिच्या मराठमोळ्या प्रेक्षकांना फारच आवडत आहे.
ह्याच मराठ मोळी अभेनेत्रीने नुकतेच एक रॅम्पवाक केले. पुणे टाईम्स फॅशन वीक मध्ये
शाही लहंगा-चोली घातलेली अमृता यावेळी फारच खुलून दिसत होती. तिने हे पहिलंच
रॅम्पवॉक केलं. विशेष म्हणजे अभेनेता वैभव तत्ववादीनेही अमृता सोबत रॅम्प वॉक केला. या
जोडीने यावेळी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. ह्या कार्यक्रमाचे फोटो अमृताने सोशल मीडियावर
पोस्ट केले. नववधूचा पेहराव घालून रॅम्पवर उतरलेल्या अमृताचं रॅम्पवॉक सगळ्यांसाठीच
लक्षवेधी ठरलं. रामनवमीवर प्रेरित असलेला हा पेहराव खूपच सुंदर आणि वाखाण्याजोग
होता. तिच्या या अदानी तिने तिच्या चाहत्यांना घायाळ केले आहे.
मला जेव्हा यासाठी विचारणा केली होती तेव्हा मला फारच आनंद झाला होता, तसेच
हा माझा पहिला रॅम्पवॉक असल्यामुळे तो माझ्या कायम लक्षात राहील, असं अमृता सांगते.
रॅम्पवॉक नंतर अमृता अतिशय भावुक झाली होती.
फॅशन डिझायनर श्रुती आणि मंगेशने डिझाईन केलेला अतिशय भरजरी पिवळ्या
रंगाचा घागरा, दपका आणि झर्दोसी ने सजवलेली चोळी आणि दुपट्टा यावेळी अमृताने
परिधान केला होता. तर तिच्या ह्या पेहरवामुळे तिचं सौंदर्य अधिक खुललं होतं.

ख्रिश्चन लिगल असोसिएशनचा “ ख्रिसमस स्नेहमेळावा “ साजरा

0

पुणे-सेंट पॅंट्रीक टाऊन येथील बिशप हाउसमध्ये ख्रिश्चन लिगल असोसिएशन पुणे विभागाच्यावतीने ख्रिसमस स्नेहमेळावा आनंदात साजरा झाला . यावेळी पुणे धर्मप्रांताचे बिशप राईट रेव्ह. थॉमस डाबरे यांनी उपस्थित सर्व वकील बांधवांचा पुष्पगुछ व ख्रिसमस शुभेच्छा कार्ड देउन सत्कार केला .

     यावेळी पुणे धर्मप्रांताचे बिशप राईट रेव्ह. थॉमस डाबरे यांनी सांगितले कि , वकिली व्यवसायासोबतच विधायक कार्य करणे हि काळाची गरज आहे . भारताच्या राज्यघटनेची मार्गदर्शक तत्वे हि सर्वच धर्माना पूरक आहेत परंतु हल्ली त्याची पायमली  होताना दिसत आहे . ख्रिश्चन वकिलांनी भारतीय राजकारणातही सक्रिय व्हावे . पुढे ते म्हणाले मला ख्रिस्ती व्यक्ती नगरपालिकेपासून संसदेपर्यंत प्रतिनिधित्व करताना पाहिलेला आवडेल . सध्या एका विशिष्ट एका राजकीय पक्षाला सर्व समाजाने एक गठ्ठा मतदान करणे हे निकोप लोकशाहीचे लक्षण नाही . राजकारणात सर्व पक्षीय समतोल साधला जावा म्हणून विचार पूर्वक प्रत्येकाने मतदान करावे . आपण जरी अल्पसंख्यांक असलो तरी आपली मते निर्णायक ठरत शकतात . कार्यक्रमात उपस्थित तरुण वकील वर्गाला देखील त्यांनी प्रोत्साहनपर मार्गदर्शन केले . यावेळी उपस्थित सर्व वकिलांनी आपले मनोगत व्यक्त केले .

    यावेळी बिशप डाबरे यांचा सत्कार ऍड. संपत कांबळे यांनी केला . तसेच , रेव्ह. लुईस यांचा सत्कार ऍड. स्टेला मेंडिस यांनी केला . प्रस्तुत कार्यक्रमाचे आयोजन ऍड. जॉन रॉड्रिक्स यांनी केले . यावेळी प्रमुख उपस्थिती ऍड. संजय साळवी , ऍड. बाजीराव दळवी , ऍड. के. व्ही. त्रिभुवन , ऍड. मार्क परमार , ऍड. संगीता फेर्नांडीस , ऍड. दिलीप अमोलिक , ऍड. आर. जे. डिसिल्वा आणि अनेक मान्यवर उपस्थित होते .

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऍड. अनुपमा जोशी यांनी केले . या मेळाव्याकरीता पुणे आणि पिंपरी येथील वकिली व्यवसाय करणारे सर्व ख्रिस्ती वकील मोठ्या संख्येने उपस्थित होते .

सेंट पॅंट्रीक टाऊन येथील बिशप हाउसमध्ये ख्रिश्चन लिगल असोसिएशन पुणे विभागाच्यावतीने ख्रिसमस स्नेहमेळावा आनंदात साजरा झाला . यावेळी पुणे धर्मप्रांताचे बिशप राईट रेव्ह. थॉमस डाबरे यांनी उपस्थित सर्व वकील बांधवांचा पुष्पगुछ व ख्रिसमस शुभेच्छा कार्ड देउन सत्कार केला .

     यावेळी पुणे धर्मप्रांताचे बिशप राईट रेव्ह. थॉमस डाबरे यांनी सांगितले कि , वकिली व्यवसायासोबतच विधायक कार्य करणे हि काळाची गरज आहे . भारताच्या राज्यघटनेची मार्गदर्शक तत्वे हि सर्वच धर्माना पूरक आहेत परंतु हल्ली त्याची पायमली  होताना दिसत आहे . ख्रिश्चन वकिलांनी भारतीय राजकारणातही सक्रिय व्हावे . पुढे ते म्हणाले मला ख्रिस्ती व्यक्ती नगरपालिकेपासून संसदेपर्यंत प्रतिनिधित्व करताना पाहिलेला आवडेल . सध्या एका विशिष्ट एका राजकीय पक्षाला सर्व समाजाने एक गठ्ठा मतदान करणे हे निकोप लोकशाहीचे लक्षण नाही . राजकारणात सर्व पक्षीय समतोल साधला जावा म्हणून विचार पूर्वक प्रत्येकाने मतदान करावे . आपण जरी अल्पसंख्यांक असलो तरी आपली मते निर्णायक ठरत शकतात . कार्यक्रमात उपस्थित तरुण वकील वर्गाला देखील त्यांनी  मार्गदर्शन केले . यावेळी उपस्थित सर्व वकिलांनी आपले मनोगत व्यक्त केले .

    यावेळी बिशप डाबरे यांचा सत्कार ऍड. संपत कांबळे यांनी केला . तसेच , रेव्ह. लुईस यांचा सत्कार ऍड. स्टेला मेंडिस यांनी केला . प्रस्तुत कार्यक्रमाचे आयोजन ऍड. जॉन रॉड्रिक्स यांनी केले . यावेळी प्रमुख उपस्थिती ऍड. संजय साळवी , ऍड. बाजीराव दळवी , ऍड. के. व्ही. त्रिभुवन , ऍड. मार्क परमार , ऍड. संगीता फेर्नांडीस , ऍड. दिलीप अमोलिक , ऍड. आर. जे. डिसिल्वा आणि अनेक मान्यवर उपस्थित होते .

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऍड. अनुपमा जोशी यांनी केले . या मेळाव्याकरीता पुणे आणि पिंपरी येथील वकिली व्यवसाय करणारे सर्व ख्रिस्ती वकील मोठ्या संख्येने उपस्थित होते .

सेंट पॅंट्रीक टाऊन येथील बिशप हाउसमध्ये ख्रिश्चन लिगल असोसिएशन पुणे विभागाच्यावतीने ख्रिसमस स्नेहमेळावा आनंदात साजरा झाला . यावेळी पुणे धर्मप्रांताचे बिशप राईट रेव्ह. थॉमस डाबरे यांनी उपस्थित सर्व वकील बांधवांचा पुष्पगुछ व ख्रिसमस शुभेच्छा कार्ड देउन सत्कार केला .

     यावेळी पुणे धर्मप्रांताचे बिशप राईट रेव्ह. थॉमस डाबरे यांनी सांगितले कि , वकिली व्यवसायासोबतच विधायक कार्य करणे हि काळाची गरज आहे . भारताच्या राज्यघटनेची मार्गदर्शक तत्वे हि सर्वच धर्माना पूरक आहेत परंतु हल्ली त्याची पायमली  होताना दिसत आहे . ख्रिश्चन वकिलांनी भारतीय राजकारणातही सक्रिय व्हावे . पुढे ते म्हणाले मला ख्रिस्ती व्यक्ती नगरपालिकेपासून संसदेपर्यंत प्रतिनिधित्व करताना पाहिलेला आवडेल . सध्या एका विशिष्ट एका राजकीय पक्षाला सर्व समाजाने एक गठ्ठा मतदान करणे हे निकोप लोकशाहीचे लक्षण नाही . राजकारणात सर्व पक्षीय समतोल साधला जावा म्हणून विचार पूर्वक प्रत्येकाने मतदान करावे . आपण जरी अल्पसंख्यांक असलो तरी आपली मते निर्णायक ठरत शकतात . कार्यक्रमात उपस्थित तरुण वकील वर्गाला  मार्गदर्शन केले . .

    यावेळी बिशप डाबरे यांचा सत्कार ऍड. संपत कांबळे यांनी केला . तसेच , रेव्ह. लुईस यांचा सत्कार ऍड. स्टेला मेंडिस यांनी केला . प्रस्तुत कार्यक्रमाचे आयोजन ऍड. जॉन रॉड्रिक्स यांनी केले . यावेळी प्रमुख उपस्थिती ऍड. संजय साळवी , ऍड. बाजीराव दळवी , ऍड. के. व्ही. त्रिभुवन , ऍड. मार्क परमार , ऍड. संगीता फेर्नांडीस , ऍड. दिलीप अमोलिक , ऍड. आर. जे. डिसिल्वा आणि अनेक मान्यवर उपस्थित होते .

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऍड. अनुपमा जोशी यांनी केले .

मुख्य अभियंता एम. जी. शिंदे यांना ‘आदर्श अभियंता’ पुरस्कार

0
पुणे : महावितरणच्या पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री. एम. जी. शिंदे यांना राज्यस्तरीय ‘आदर्श अभियंता’ पुरस्काराने नुकतेच गौरविण्यात आले. कोल्हापूर येथील अविष्कार फाऊंडेशनने वीजक्षेत्रातील गेल्या ३३ वर्षांच्या सेवेची दखल घेत श्री. शिंदे यांना सन्मानित केले आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील जोतिबाच्या डोंगरावर आयोजित कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिक श्री. चंद्रकुमार नलगे यांच्याहस्ते मुख्य अभियंता श्री. एम. जी. शिंदे यांना ‘आदर्श अभियंता’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी महावितरणचे कार्यकारी संचालक श्री. शंकर शिंदे, अविष्कार फाऊंडेशनचे अध्यक्ष श्री. संजय पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी कार्यकारी संचालक श्री. शंकर शिंदे म्हणाले, की सेवाक्षेत्रातील सार्वजनिक संस्थेत आपले कर्तव्य व जबाबदारींचे काम चोखपणे केल्यास त्याचा फ़ायदा सर्वसामान्यांना होतो. मुख्य अभियंता श्री. शिंदे यांनी अभियंता म्हणून विविध पदांवर केलेले काम उल्लेखनीय आहे. ज्येष्ठ साहित्यिक श्री. नलगे म्हणाले, अभियंता हे समाज घडविणारे आहेत. आपल्या कौशल्यातून विकसीत केलेल्या तंत्रज्ञानाने देशाला प्रगतीपथावर नेणारे आहेत. मुख्य अभियंता श्री. एम. जी. शिंदे यांचा गौरव करून अविष्कार फाऊंडेशनने चांगल्या कामाची दखल घेतली आहे.

जयपूर फूटसह कृत्रिम अवयवांचे मोफत वाटप

0

पुणे– भगवान महावीर विकलांग सहायता समिती आणि पर्सिस्‍टंट फौंडेशन यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने दिव्‍यांग जणांसाठी  शिबीर आयोजित करण्‍यात आले आहे. या शिबीरात कृत्रिम अवयव, क्‍लीपर्स मोफत उपलब्‍ध करुन देण्‍यात येणार आहेत. ज्‍या दिव्‍यांग व्‍यक्‍तींना जयपूर फूटची आवश्‍यकता असेल त्‍यांना जागेवरच आवश्‍यक ती  प्रक्रिया पूर्ण करुन जयपूर फूट दिले जातील. शिबीरामध्‍ये सहभागी होण्‍यासाठी कोणतीही फी नसून अधिकाधिक व्‍यक्‍तींनी याचा लाभ घेण्‍याचे आवाहन करण्‍यात आले आहे.  पुण्‍यातील सारस बागेसमोरील जैन मंदिरामध्‍ये हे शिबीर बुधवार दिनांक 20 डिसेंबर ते 22 डिसेंबर असे तीन दिवस सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत होणार आहे. ज्‍या  दिव्‍यांगांना जयपूर फूटची आवश्‍यकता असेल त्‍यांचे मोपमाप घेऊन, जागेवरच त्‍याची चाचणी घेऊन जयपूर फूट तयार करुन वाटप केले जाईल, अशी माहिती आयोजकांनी दिली. ( 9822086485 योगिता आपटे/8605015104 ऋषिकेश )

जिल्हयातील सर्व बालकांना पोलिओ डोस देण्यासाठी सूक्ष्म नियोजन करावे -जिल्हाधिकारी सौरभ राव

0

पुणे : पोलिओचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पुणे जिल्ह्यात 28 जानेवारी आणि  11 मार्च 2018 रोजी पोलिओ मोहीम राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील शून्य ते ५ वर्षे वयोगटातील सर्व बालकांना पल्स पोलिओचा डोस देण्यासाठी सूक्ष्म नियोजन करावे, अशी सूचना जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी केली.

पुणे जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या पोलिओ  लसिकरण मोहिमेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी  जिल्हा पल्स पोलिओ समन्वय समितीची बैठक जिल्हाधिकारी सौरव राव यांच्या अध्यक्षतेखाली  जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात  झाली, त्यावेळी श्री. राव यांनी ही सूचना केली. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने, ‍जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आर.के. शेळके, जागतिक आरोग्य संघटनेचे सल्लागार डॉ. चेतन खाडे आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी राव म्हणाले, जिल्ह्यात 28 जानेवारी आणि 11 मार्च 2018 रोजी पल्स पोलिओ मोहीम राबविली जाणार आहे. जिल्ह्यातील शून्य ते ५ वयोगटातील पाच लाखांहून अधिक बालकांना ही लस देण्यात येणार आहे.  जिल्ह्यात या वयोगटातील  ग्रामीण भागातील 4 लाख 32 हजार 46 तर नागरी भागातील 81 हजार 147 असे एकूण 5 लाख 13 हजार 193 इतक्या बालकांना ही लस देण्यात येणार आहे. त्याकरिता जिल्ह्याच्या ग्रामीण भागात 4 हजार  तसेच शहरी भागामध्ये ३88 असे  एकूण 4 हजार 388 पोलिओ बूथ कार्यान्वित केले जाणार आहेत. तसेच ट्रान्जिट बूथ (चार दिवसांसाठी) 398 तर मोबाईल बूथ (एका दिवसांसाठी) 419 असणार आहेत. या बूथसाठी एकूण 10 हजार 887 कर्मचारी तर 879 पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. ऊसतोड  कामगार, वीट भट्टी कामगार,  रस्त्यांची कामे करणाऱ्या मजूरांची बालके तसेच झोपडपट्टी भागातील बालकांना लसीकरण  करण्यासाठी  विशेष लक्ष  दिले जाणार आहे.

 ही मोहीम झाल्यानंतर ग्रामीण भागात तसेच शहरी भागात घरी जाऊन लसीकरण केल्याची खात्री केली जाणार आहे. एकही  बालक लसीकरणापासून वंचित राहू नये, यासाठी दक्षता घेण्यात येणार असल्याचे  यावेळी  डॉ.माने यांनी सांगितले. जागतिक आरोग्य संघटनेचे सल्लागार डॉ. चेतन खाडे  यांनी सादरीकरण केले.

पिफमध्ये 91 देशातील हजारहून अधिक चित्रपट पाहण्याची संधी

0

पुणे-यंदाचा पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ‘पिफ’ 11 ते 18 जानेवारी दरम्यान होणार असून पुणे आणि पिंपरी-चिंचवड मधील 10 स्क्रीनवर यातील चित्रपट रसिकांना पाहता येणार आहेत. यंदाच्या महोत्सवाची प्रमुख थीम तरुणाई अशी निवडण्यात आली आहे. याबाबतची माहिती आज या महोत्सवाचे अध्यक्ष आणि संचालक डॉ जब्बार पटेल यांनी पत्रकार परिषदेत दिली.

जब्बार पटेल म्हणाले की, उत्साहाने सळसळणाऱ्या आणि स्वतःचा वेगळा विचार असलेल्या तरुणाईची भाषा चित्रपटांमधून वेगवेगवेगळ्या प्रकारे समर्थपणे व्यक्त होत आहे. हे लक्षात घेऊनच यावर्षी महोत्सवाची प्रमुख थीम तरुणाई अशी निवडण्यात आली आहे. तरुणाईचे भावविश्व उलगडणारे काही जागतिक दर्जाचे निवडक चित्रपट या महोत्सवात दाखवण्यात येणार आहेत.

या महोत्सवात सहभागी होण्यासाठी नोंदणी प्रक्रियेची माहिती www.piffindia.com या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली असून 11 डिसेंबर पासून ही नोंदणी प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. इच्छुकांना ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे. संकेतस्थळावर नोंदणी झाल्यानंतर मिळालेल्या नोंदणी क्रमांकासह त्यांना सिटी प्राईड- कोथरूड, सिटी प्राईड- सातारा रस्ता किंवा मंगला चित्रपटगृह यांपैकी कोठेही जाऊन ‘स्पॉट रजिस्ट्रेशन’ करावे लागणार आहे. पिंपरी-चिंचवडमध्येही स्पॉट रजिस्ट्रेशनची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

विद्यार्थी, ‘फिल्म क्लब’चे सभासद व ज्येष्ठ नागरिक (60 वर्षांपुढील ) यांना ओळखपत्र दाखवून रुपये 600 मध्ये नोंदणी करता येणार आहे, तर इतर इच्छुकांसाठी नोंदणी शुल्क रुपये 800 असणार आहे.

सिताऱ्यांच्या उपस्थितीत निकलोडियन किड्स चॉईस अॅवॉर्ड्स

0
पुणे  –  भारतातील मुलांसाठी असलेल्या एकमात्र अशा आणि मुलांसाठी असलेल्या अशा डाबर रेड पेस्ट प्रस्तूत निकलोडियन किड्स चॉईस अॅवॉर्ड्स २०१७ चे फिल्म आणि टेलिव्हिजन क्षेत्रातील पुरस्कारांचे वितरण आज करण्यात आले.  यावेळी बॉलिवूड आणि टेलिव्हिजन क्षेत्रातील विविध सिताऱ्यांनी आपली हजेरी लावलीयामध्ये आलिया भट्ट, रणविर सिंग, वरूण धवन, किर्ती सॅनोन, बादशहा, शंतनू महेश्वरी, धर्मेश सर आणि अशा अनेक व्यक्तिंनी प्रसिध्द अशा ऑरेंज कार्पेट वरून प्रवेश केला.  विविध तारे तारकांनी भरलेल्या या संध्याकाळी अनोखे कार्यक्रम तसेच जादुई प्रसंग पाहिले जे आता लोकांसाठी अविस्मरणीय ठरतील.    

दि निकलोडियन किड्स चॉईस अॅवॉर्ड्स हा देशातील एकमात्र असा पुरस्कार सोहळा आहे ज्यामध्ये ऑरेंज निकलोडियन ब्लिम्प साठी मुलांनी मतदान करून ताऱ्यांची निवड केली आहे.  जवळजवळ २.५ लाख मुलांनी आपल्या आवडत्या कलाकारासाठी मतदान करून आपल्या आवडीच्या कलाकाराला निवडून दिले आहे. गोलमाल अगेन ला बेस्ट फिल्म विभगाचा पुरस्कार मिळाला असून रणवीर सिंग ला सर्वोत्कृष्ट अॅक्टर (पुरूष) चा पुरस्कार मिळाला.  आलिया भट्ट ला सर्वोत्कृष्ट अॅक्ट्रेस (महिला) पुरस्कार तिच्या बदरी की दुल्हनिया गाण्यातील अभिनयासाठी तर या गाण्याला देशभरांतील प्रसिध्दी नंतर सर्वोत्कृष्ट गाण्याचा पुरस्कार मिळाला.  वरूण धवनला मुलांनी बेस्ट डान्सिंग स्टार व बेस्ट एन्टरटेनर ऑफ दी इयर पुरस्कार देण्यात आले.  मोटू पतलू या शोला मुलांची सर्वाधिक मते मिळाल्याने या कार्यक्रमाला बेस्ट शो ऑन किड्स चॅनलचा पुरस्कार देण्यात आला.  मोटू पतलू ला बेस्ट इंडियन कार्टुन कॅरेक्टर ऑफ दी इयर पुरस्कारही देण्यात आला.

किओकुशन कराटे ऑर्गनायझेशन इंडियाच्या आठव्या कराटे स्पर्धा उत्साहात

0

पुणे-किओकुशन कराटे ऑर्गनायझेशन इंडियाच्यावतीने आठव्या कराटे स्पर्धा करण्यात आली . ढोलेपाटील रोडवरील महात्मा ज्योतिबा शाळेमध्ये झालेल्या या स्पर्धेमध्ये काता व फाईट हा प्रकारामध्ये या स्पर्धा घेण्यात आल्या . या स्पर्धेमध्ये कोरेगाव पार्क व ताडीवाला रोडमधील विविध शाळांमधील १५० विद्यार्थी सहभागी झाले होते . या स्पर्धांचे संयोजन किओकुशन कराटे ऑर्गनायझेशन इंडियाचे संस्थापक अध्यक्ष सोहन परदेशी यांनी केले .

 या स्पर्धेस प्रमुख पाहुणे नगरसेविका लता राजगुरू , नगरसेवक प्रदीप गायकवाड , नगरसेविका हिमाली कांबळे , स्वीकृत नगरसवेक सुजित यादव , महिपाल वाघमारे , प्रा. मयूर गायकवाड , राहुल तायडे , सोनू निकाळजे , प्रकाश साळवे , शाम गायकवाड , उमेश गायकवाड , प्रदीप ओव्हाळ आदी मान्यवर उपस्थित होते . या स्पर्धेचे पंच म्हणून असिफ शेख व अर्जुन बहाद्दूर यांनी काम पाहिले . तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल तायडे यांनी केले .

काता प्रकारामध्ये विजेत्या खेळाडूंची नावे  —

सुवर्णपदक – प्रथम – अविनाश जाधव ,रौप्यपदक – व्दितीय –  वेदिका कुलाल , कांस्यपदक – तृतीय – आदिती कोलार

सुवर्णपदक – प्रथम – जुलियस परेरा  ,रौप्यपदक – व्दितीय –  आदित्य कदम  , कांस्यपदक – तृतीय – आदित्य श्रीनिवासन

सुवर्णपदक – प्रथम – देवराज  ,रौप्यपदक – व्दितीय –  सुमित बलीकर  , कांस्यपदक – तृतीय – विवेक प्रजापती

सुवर्णपदक – प्रथम – जान्हवी नायर  ,रौप्यपदक – व्दितीय –  कीर्ती गुप्ता  , कांस्यपदक – तृतीय – देवयानी रेड्डी

सुवर्णपदक – प्रथम – इशिता सिंह   ,व्दितीय – रौप्यपदक – पृथा कुलाल ,   कांस्यपदक – तृतीय – आदिश्री आसरापुरे 

सुवर्णपदक – प्रथम –  अमान सय्यद  ,रौप्यपदक – व्दितीय –  विनय बडीपली , कांस्यपदक – तृतीय –  सोहम लढ्ढा

सुवर्णपदक – प्रथम – विराज जाधव  ,रौप्यपदक – व्दितीय –  रोहित गोरे 

सुवर्णपदक – प्रथम – मितेश परदेशी ,रौप्यपदक – व्दितीय –  हरीश कुमार  , कांस्यपदक – तृतीय – तनिष्का सिंह व वैभव रिकिबे

फाईट  प्रकारामध्ये विजेत्या खेळाडूंची नावे  —

सुवर्णपदक – प्रथम – वेदिका कुलाल  ,रौप्यपदक – व्दितीय –  हशिका कौर  , कांस्यपदक – तृतीय – आदिती कोलार

सुवर्णपदक – प्रथम – सोमीथ बुराने  ,रौप्यपदक – व्दितीय –  अविनाश जाधव

सुवर्णपदक – प्रथम – अनुष्का ओव्हाळ ,रौप्यपदक – व्दितीय –  जानवी नायर  , कांस्यपदक – तृतीय – देवयानी रेड्डी

सुवर्णपदक – प्रथम – साक्षी गोरे  ,रौप्यपदक – व्दितीय – वैभवी राऊत , कांस्यपदक – तृतीय – साक्षी ओव्हाळ

सुवर्णपदक – प्रथम – सुरज राऊत  ,रौप्यपदक – व्दितीय –  सुमित परदेशी   , कांस्यपदक – तृतीय – अल्विन खान

सुवर्णपदक – प्रथम – दिनकेश ओव्हाळ  ,रौप्यपदक – व्दितीय – सार्थक रिकीबे  , कांस्यपदक – तृतीय – करण गुप्ता

सुवर्णपदक – प्रथम – अतुल मिश्रा  ,रौप्यपदक – व्दितीय – योगीराज देवकर  ,   कांस्यपदक – तृतीय – श्रेयस बरडी

सुवर्णपदक – प्रथम – सुभोत गायकवाड  ,रौप्यपदक – व्दितीय –  मितेश परदेशी  , कांस्यपदक – तृतीय – राकेश दोडमनी

सुवर्णपदक – प्रथम -प्रतीक गायकवाड  ,रौप्यपदक – व्दितीय –  तेजस लोंढे , कांस्यपदक – तृतीय – वैभव रिकिबे

सुवर्णपदक – प्रथम – अयान शेख  ,रौप्यपदक – व्दितीय –  तनिका सिंह  , कांस्यपदक – तृतीय – अंची गायकवाड

भाजप कार्यकर्त्यांचा पुण्यात जल्लोष (पहा फोटो )

0

पुणे – गुजरात व हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीतील भाजपच्या विजयानंतर शहर कार्यालयात जल्लोष केला.

शहर कार्यालय फुलांच्या माळांनी सजविण्यात आले होते. समर्थ नेतृत्व, सार्थ विश्‍वास या आशयाचे मोदी व शाह यांच्या छबी असणारे फलक लावण्यात आले होते. येणार्‍या प्रत्येकाला इंभरूती, चंद्रकला, बालुशाही अशी अस्सल गुजराती मिठाई देऊन अभिनंदन करण्यात येत होते. ध्वनिवर्धकावर राष्ट्रभक्तीपर गाणी लावण्यात आली होती. बँड आणि ढोल पथकाच्या तालावर कार्यकर्ते आनंदाने नाचत होते. शहराच्या विविध भागांतून मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते शहर कार्यालयात येत होते. शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी सर्वांच्या शुभेच्छा स्वीकारल्या. महापालिकेतील सभागृह नेते श्रीनाथ भीमाले, स्थायी समिती अध्यक्ष मुरली मोहोळ, शहर सुधारणा समितीचे अध्यक्ष महेश लडकत, महिला बालकल्याण समितीच्या अध्यक्षा राणी भोसले, विधी समितीच्या अध्यक्षा गायत्री खडके यांच्यासह मोठ्या सं‘येने नगरसेवक उपस्थित होते. युवा मोर्चाचे अध्यक्ष दीपक पोटे, महिला आघाडीच्या अध्यक्षा शशिकला मेंगडे, पक्षाचे सरचिटणीस दीपक मिसाळ, गणेश घोष, उपाध्यक्ष शाम सातपुते, दत्ता खाडे, सुनील कांबळे, डॉ. संदीप बुटाला, कार्यालय मंत्री उदय जोशी, कोषाध्यक्ष प्रा. विनायक आंबेकर, गिरीश खत्री, रफीक शेख यांची प्रमुख उपस्थिती होती.

शहराध्यक्ष योगेश गोगावले यांची प्रतिकिया


भारतीय जनता पार्टी गुजरात आणि हिमाचल प्रदेश या ठिकाणी विजयी झाली याबद्दल या ठिकाणच्या मतदारांना धन्यवाद दिले पाहिजेत. हा विजय भारतीय जनता पार्टीचे नेतृत्व आदरणीय नरेंद्र मोदी, संघटनेचा चेहरा अमितभाई शहा आणि हजारो हजार कार्यकर्त्यांच्या परिश्रमातून मिळालेला आहे. विरोधकांनी आणि विशेष करून कॉंग्रेसने जातीयवादी आणि धार्मिक भावनांना नेहमीच खतपाणी घालणार्‍या नेत्यांच्या सहकार्याने प्रचाराची आघाडी उघडली होती. त्यामुळेच विकासरथाला, विकासाच्या कल्पनांना वेडपट म्हणण्याइतकी त्यांची मजल होती. या पार्श्‍वभूमीवर दोन्ही राज्यातील जनतेने दिलेली चपराक पुरेशी बोलकी आहे. स्थानिक आणि केंद्रीय पातळीवर जातीय विषयांना खतपाणी घालणार्‍या प्रयत्नांना भविष्यकाळामध्ये देशाच्या विकासाचा अडथळा म्हणूनच आपल्याला पाहावे लागेल हा या निवडणुकीचा बोध आहे असे आम्ही मानतो. ‘सब का साथ सब का विकास’ यातील एकात्मतेची भावना आपल्याला भविष्यामध्ये अधिक वेगाने शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवली पाहिजे.

खा. अनिल शिरोळे

गुजरातमध्ये भाजप आणि मोदीजींच्या नेतृत्वाखाली २२ वर्षापासून होत असलेला विकास अनुभवून जनतेने दिलेला हा कौल आहे. आर्थिक शिस्तीसाठी अत्यावश्यक अशा जीएसटी आणि निश्चलीकरण ह्या निर्णयाला जनतेने पुन्हा एकदा पाठिंबा दिल्याचे देखील ह्या निकालातून सिद्ध झाले आहे. हिमाचलचा विजय हा मोदीजी हिमाचलचा सर्वांगीण विकास करतील हा  जनतेचा अपार विश्वास, त्यांचे नेतृत्व,कर्तृत्वावर ठेवलेला विश्वासाचा परिणाम आहे.

विकासाला दाद :  गिरीश बापट (पालकमंत्री पुणे)

गुजरात आणि हिमाचल प्रदेश येथील विधानसभा निवडणुकीत जनतेने पुन्हा भारतीय जनता पक्षाला कौल दिला आहे.
या निकालाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील लोकांचा विश्वास आणखी दृढ झाला आहे. गुजरात व हिमाचल प्रदेश पिंजून काढून भरघोस यश मिळवून देणार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या नेतृत्वावर या निकालाने शिक्कामोर्तब झाले आहे. या निवडणुकीच्या प्रचारात विरोधकांनी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका केली. भाजपाने मात्र सभ्यतेला प्राधान्य दिले. प्रचाराची पातळी खालाऊ दिली नाही. विरोधकांच्या भूलथापांना न बळी पडता जनतेने पुन्हा एकदा विकासाला साथ दिली आहे.
गुजरात आणि हिमाचल प्रदेशातील जनतेचे अभिनंदन.मतदारांचे आभार. नवनिर्वाचित आमदारांना शुभेच्छा.

राज्यात एक कोटी रुपये किंमतीचा गुटखा जप्त- गिरीश बापट

0

नागपूर- राज्यात छूप्या मार्गाने विक्रीस उपलब्ध होत असलेल्या गुटख्यावर अन्न व औषध प्रशासन विभागाकडून वेळोवेळी कारवाई केली जात आहे. राज्यात केलेल्या कारवाईत आतापर्यंत एक कोटी रुपये किंमतीचा गुटखा जप्त करण्यात आल्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांनी प्रश्नाच्या लेखी उत्तरात सांगितले आहे.

            यासंदर्भात डॉ. संतोष टारफे, श्रीमती निर्मला गावीत, कुणाल पाटील, अमिन पटेल, डी. पी. सावंत, मंगलप्रभात लोढा यांच्यासह अन्य सदस्यांनी मुंबईसह राज्यात गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होत असल्याबाबतचा प्रश्न विचारला होता. त्याला दिलेल्या लेखी उत्तरात श्री.बापट यांनी म्हटले आहे की, अन्न व औषध प्रशासनाकडून वेळोवेळी यासंदर्भात कारवाई केली जाते.

            सी.बी.कंट्रोल आर्थिक गुन्हे विभाग, मुंबई यांच्यामार्फत कारवाई करण्यात आली असून, दि. 3 ऑक्टोबर, 2017 रोजी 28 लाख 87 हजार 150 रुपये किंमतीचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. तर 4 ऑक्टोबर व 10 ऑक्टोबर रोजी केलेल्या कारवाईत अनुक्रमे 12 लाख 65 हजार आणि 9 लाख 31 हजार 460 रुपये किंमतीचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या लातूर कार्यालयाने 27 ऑक्टोबर रोजी केलेल्या कारवाईत 42 लाख 12 हजारांचा प्रतिबंधीत अन्नसाठा जप्त केला आहे. मंगळवेढा जिल्हा सोलापूर येथे 10 लाख रुपये किंमतीचा परराज्यातून विक्रीस येणारा गुटखा जप्त करण्यात आला आहे.अशा प्रकारे सुमारे एक कोटी दोन लाख 96 हजार 210 रुपये किंमतीचा गुटखा जप्त करण्यात आला आहे.

हाफकिन महामंडळ फार्मा कंपनी म्हणून चालविण्यासाठी राज्य शासन प्रयत्न करणार

पोलिओ लस निर्मितीच्या बाबतीत जागतिक स्तरावर अग्रेसर असलेली हाफकिन इन्स्टिट्यूट ही फार्मा कंपनी म्हणून चालविण्यासाठी राज्य शासन प्रयत्न करणार आहे. या इन्स्टिट्यूटमध्ये संशोधनासाठी अधिकचा निधी देऊन जागतिक स्तरावर क्रमांक एकची कंपनी बनविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.

            सदस्य पृथ्वीराज चव्हाण यांनी हाफकिन महामंडळात पोलिओ बल्क खरेदीच्या निविदा प्रक्रियेबाबत प्रश्न विचारला होता. त्याला उत्तर देताना श्री. बापट म्हणाले की, पोलिओ निर्मूलनासाठी लस निर्मितीच्या कामात हाफकिनचे मोठे कार्य आहे. पोलिओ बल्क खरेदीच्या निविदा प्रक्रियेत तांत्रिक मुद्यांची चौकशी करण्यासाठी मुख्य सचिवांची समिती नेमण्यात आली असून तीन महिन्यात या समितीचा अहवाल शासनाला प्राप्त होईल. यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री एकनाथ खडसे, गणपतराव देशमुख, डॉ.जयप्रकाश मुंदडा यांनी भाग घेतला.

29 जिल्ह्यांमध्ये जीपीएस तंत्रज्ञानाचा वापर

 राज्याच्या 29 जिल्ह्यांमध्ये जीपीएस तंत्रज्ञानाचा वापर करुन द्वारपोच धान्य योजना सुरु आहे. वाई येथे खासगी गोदामात सार्वजनिक वितरणाचे धान्य छापा टाकून जप्त केल्या प्रकरणाची पोलिस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांकडून चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल, अशी माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

            वाई, जिल्हा सातारा येथे अवैध विक्रीकरिता पाठविण्यात येत असलेले धान्य जप्त केल्याबाबत सदस्य शंभूराजे देसाई यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना श्री. बापट म्हणाले की, वाई येथील औद्योगिक विकास महामंडळालगतच्या खासगी जागेतील पत्र्यांच्या शेडमधून 9 हजार 300 किलो गहू व 2 हजार 150 किलो तांदूळ असा माल संयुक्त कारवाईत पकडण्यात आला आहे.  या प्रकरणाची पोलिस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करुन त्यामध्ये दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई केली जाईल.

            शिधापत्रिकांना आधार जोडणीच्या कामात सातारा जिल्हा पूढे आहे, असे सांगत श्री. बापट पुढे म्हणाले की 29 जिल्ह्यांमध्ये जीपीएस यंत्रणेचा वापर करीत धान्य पुरवठा केला जात आहे.

            यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री गणपतराव देशमुख, अजित पवार, भिमराव धोंडे यांनी भाग घेतला.

शालेय पोषण आहार पुरवठ्यातील दर तफावतीची चौकशी करु – शिक्षण मंत्री विनोद तावडे

0

नागपूर, दि. 18 : शालेय पोषण आहारासाठी पुरवठा केल्या जाणाऱ्या धान्याचे बाजारातील दर व प्रत्यक्ष होणाऱ्या पुरवठ्यातील दर यामध्ये तफावत असेल तर त्याची चौकशी केली जाईल, असे शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज विधानसभेत सांगितले.

आमदार सर्वश्री शरद सोनावणे, सुनिल प्रभू, सरदार तारासिंह, सुनिल केदार, ॲड. राहूल कुल यांनी रायगड जिल्ह्यातील शालेय पोषण आहार पुरवठ्यासंदर्भात मांडलेल्या लक्षवेधी सुचनेला उत्तर देताना ते बोलत होते.

मंत्री श्री. तावडे म्हणाले की, रायगड जिल्ह्यामध्ये आहार शिजवण्यासाठी बचतगटामार्फत धान्य आणि इतर मालाची खरेदी करण्यासाठी ऑगस्ट २०१७ पर्यंत अनुदान जिल्हास्तरावर वितरीत करण्यात आले आहे. इंधन व भाजीपाला यासाठी लागणारे ऑक्टोबर २०१७ पर्यंतचे अनुदान वितरीत करण्यात आले आहे. तसेच शाळांमध्ये आहार शिजविणाऱ्या स्वयंपाकी तथा मदतनीस यांच्या मानधनासाठी डिसेंबर २०१७ पर्यंत लागणारा निधी वितरीत करण्यात आला आहे. रायगड जिल्ह्यातील काही शाळांना तांदूळ पुरवठा उशीरा झाल्याने संबंधित पुरवठादाराकडून दंड आकारण्यात आला आहे. नोव्हेंबर २०१७ पासून निविदा प्रक्रियेतून नियुक्त पुरवठादारामार्फत तांदूळ व धान्यादी मालाचा पुरवठा नियमीतपणे करण्यात येत आहे, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

या चर्चेत आमदार सर्वश्री एकनाथराव खडसे, शरद सोनावणे, प्रकाश आबीटकर, सुनिल केदार आदींनी सहभाग घेतला.    

अन्नपूर्णा परिवाराचा बालदिन उत्साहात साजरा

0

पुणे-अन्नपूर्णा परिवाराने नुकताच पुण्यातील वस्तीतील मुलांबरोबर बालदिन साजरा केला. झोपडपट्टीतील मुलांचे जीवन सुधारावे व बाल हक्कांबद्दल जागरुकता निर्माण व्हावी यासाठी दरवर्षी डिसेंबरमध्ये अन्नपूर्णा परिवार बालदिन साजरा करतात.

मुलांना त्यांच्या कौशल्यांचे प्रदर्शन करण्यासाठी आणि गायन व नाच करून आनंद घेण्यासाठी अनेक मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित केले गेले. अन्नपूर्णा च्या वास्तल्यापूर्ण या योजनेत बाल हक्क व महिलांच्या सशक्तीकरणा वर भर दिला जातो. यात एकून ६०० मुलांचा समावेश आहे. या मध्ये वस्तीतील बाहेर काम करणाऱ्या महिलांच्या मुलांसाठी पाळणाघर सुरु आहेत. अन्नपूर्णा परिवार गेल्या तीन दशकांपासून झोपडपट्टीतील महिलांच्या सशक्तीकरणासाठी काम करत आहे.अशा अन्नपूर्णा च्या अनेक योजनां मधुन महिलांच्या सशक्तीकरणासाठी काम केले जाते.

गेल्या १४ वर्षात पुण्यातील १४ वस्तीन मध्ये सोळा केअर सेंटर तर मुंबई मध्ये ४ केअर सेंटर उभारून अनेक महिलांना स्वयंरोजगारा साठी मदत करण्यात आली आहे. तसेच 600 हून अधिक झोपडपट्टीतील मुलांची काळजी घेण्याचे कामहि हे केअर सेंटर करत आहे.

अन्नपूर्णचा व्यवस्थापकीय संचालक डॉ. मेधा पुरव-सामंत म्हणतात की “झोपडपट्टीतील लहान मुलांकडे नेहमीच दुर्लक्षित होत असते.गरिबीमुळे मुलांच्या बालपणावर परिणाम होऊ नये यासाठी त्यांचा जगण्याकडे व विकासकडे कायम लक्ष देणे आवश्यक असते.” त्या पुढे असेही म्हणतात की “जगभरातील, गरीब मुली आणि मुले लैंगिक शोषणाचे बळी आहेत आणि शिक्षणापासून वंचित आहेत.म्हणूनच मुलांच्या जीवनात दीर्घकालीन व सकारात्मक बदल घडवण्यासाठी तसेच मुलांवर होणारी हिंसा थांबवण्यसाठी व शिक्षणाचा अधिकार प्रदान करण्यासाठी आम्ही दररोज काम करत आहोत.”

डॉ बाळकृष्ण दामले यांच्या ‘लर्निंग डिझाईन ऑफ ई -कन्टेन्ट ‘ प्रकल्पाची अमेरिकन कॉन्स्युलेटकडून निवड

0

पुणे :

सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या एज्युकेशन मल्टिमीडिया रिसर्च सेंटर (ईएमआरसी )चे प्राध्यापक डॉ बाळकृष्ण दामले यांच्या ‘लर्निंग डिझाईन ऑफ ई -कन्टेन्ट ‘ या प्रकल्पाची युनायटेड स्टेट्स कॉन्स्युलेटकडून निवड झाली आहे .

युनायटेड स्टेट्स कॉन्सुलेट च्या ‘एक्स्चेंज एम्बॅसेडर प्रोग्रॅम ‘ अंतर्गत ही निवड झाली आहे . त्यानुसार डॉ दामले हे भारतातील महाविद्यालये ,विद्यापीठातील प्राद्यापक ,शिक्षकांना अध्ययन आणि अध्यापनात दृक -श्राव्य माध्यमांच्या उपयोगाबाबत मार्गदर्शन करतील .भारतात विविध ठिकाणी याबाबत प्रशिक्षण आयोजित केले जाणार आहे .

डॉ दामले हे फुलब्राईट स्कॉलर असून ई -कन्टेन्ट निर्मितीसाठी त्यांना विद्यापीठ अनुदान आयोगामार्फत ४ वेळा राष्ट्रीय पारितोषिके मिळाली आहेत . ‘अध्यापनात नाट्य आणि चित्रफितींचा वापर ‘ या संशोधन निबंधाला हार्वर्ड युनिव्हर्सिटीने गौरविले आहे

‘त्या ‘ सहायक पोलीस आयुक्तावर कारवाई करा ..(व्हिडीओ)

0

पुणे-सांगलीतील पोलिसांचे कृत्य चव्हाट्यावर आले असताना .. पुण्यात पत्रकारांना सहायक पोलीस आयुक्ताच्या दडपशाही विरोधात आज पोलीस आयुक्तालयात थेट धडक मारावी लागली .
लोकसत्ताच्या वार्ताहराला  दमदाटी करून धक्काबुक्की करत  जबरदस्तीने माफीनामा लिहून घेतल्याबाबत तातडीने संबधित अधिकाऱ्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी  पुणे श्रमिक पत्रकार संघ , तसेच मराठी पत्रकार परिषद आणि राज्य मराठी पत्रकार संघ यांचे पदाधिकारी आणि पत्रकार यांनी पोलीस आयुक्तालयात जावून पोलीस आयुक्त  रश्मी शुक्ला यांच्याकडे केली .
श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष शैलेश काळे, तसेच विनायक करमरकर ,अविनाश कवठेकर ,विद्याधर जोशी, प्रशांत आहेर ,लक्ष्मण मोरे,दिगंबर दराडे ,नितीन पाटील ,अनिल मोरे आदी शंभरावर पत्रकारांनी आज सकाळी पोलीस आयुक्तालयावर गर्दी केली होती . आयुक्तांच्या भेटीला गेलेल्या शिष्टमंडळाने यावेळी कडक कारवाईची मागणी केली … पहा आणि ऐका हा व्हिडीओ रिपोर्ट