पुणे-अन्नपूर्णा परिवाराने नुकताच पुण्यातील वस्तीतील मुलांबरोबर बालदिन साजरा केला. झोपडपट्टीतील मुलांचे जीवन सुधारावे व बाल हक्कांबद्दल जागरुकता निर्माण व्हावी यासाठी दरवर्षी डिसेंबरमध्ये अन्नपूर्णा परिवार बालदिन साजरा करतात.
मुलांना त्यांच्या कौशल्यांचे प्रदर्शन करण्यासाठी आणि गायन व नाच करून आनंद घेण्यासाठी अनेक मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित केले गेले. अन्नपूर्णा च्या वास्तल्यापूर्ण या योजनेत बाल हक्क व महिलांच्या सशक्तीकरणा वर भर दिला जातो. यात एकून ६०० मुलांचा समावेश आहे. या मध्ये वस्तीतील बाहेर काम करणाऱ्या महिलांच्या मुलांसाठी पाळणाघर सुरु आहेत. अन्नपूर्णा परिवार गेल्या तीन दशकांपासून झोपडपट्टीतील महिलांच्या सशक्तीकरणासाठी काम करत आहे.अशा अन्नपूर्णा च्या अनेक योजनां मधुन महिलांच्या सशक्तीकरणासाठी काम केले जाते.
गेल्या १४ वर्षात पुण्यातील १४ वस्तीन मध्ये सोळा केअर सेंटर तर मुंबई मध्ये ४ केअर सेंटर उभारून अनेक महिलांना स्वयंरोजगारा साठी मदत करण्यात आली आहे. तसेच 600 हून अधिक झोपडपट्टीतील मुलांची काळजी घेण्याचे कामहि हे केअर सेंटर करत आहे.
अन्नपूर्णचा व्यवस्थापकीय संचालक डॉ. मेधा पुरव-सामंत म्हणतात की “झोपडपट्टीतील लहान मुलांकडे नेहमीच दुर्लक्षित होत असते.गरिबीमुळे मुलांच्या बालपणावर परिणाम होऊ नये यासाठी त्यांचा जगण्याकडे व विकासकडे कायम लक्ष देणे आवश्यक असते.” त्या पुढे असेही म्हणतात की “जगभरातील, गरीब मुली आणि मुले लैंगिक शोषणाचे बळी आहेत आणि शिक्षणापासून वंचित आहेत.म्हणूनच मुलांच्या जीवनात दीर्घकालीन व सकारात्मक बदल घडवण्यासाठी तसेच मुलांवर होणारी हिंसा थांबवण्यसाठी व शिक्षणाचा अधिकार प्रदान करण्यासाठी आम्ही दररोज काम करत आहोत.”