पुणे-सांगलीतील पोलिसांचे कृत्य चव्हाट्यावर आले असताना .. पुण्यात पत्रकारांना सहायक पोलीस आयुक्ताच्या दडपशाही विरोधात आज पोलीस आयुक्तालयात थेट धडक मारावी लागली .
लोकसत्ताच्या वार्ताहराला दमदाटी करून धक्काबुक्की करत जबरदस्तीने माफीनामा लिहून घेतल्याबाबत तातडीने संबधित अधिकाऱ्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी पुणे श्रमिक पत्रकार संघ , तसेच मराठी पत्रकार परिषद आणि राज्य मराठी पत्रकार संघ यांचे पदाधिकारी आणि पत्रकार यांनी पोलीस आयुक्तालयात जावून पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्याकडे केली .
श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष शैलेश काळे, तसेच विनायक करमरकर ,अविनाश कवठेकर ,विद्याधर जोशी, प्रशांत आहेर ,लक्ष्मण मोरे,दिगंबर दराडे ,नितीन पाटील ,अनिल मोरे आदी शंभरावर पत्रकारांनी आज सकाळी पोलीस आयुक्तालयावर गर्दी केली होती . आयुक्तांच्या भेटीला गेलेल्या शिष्टमंडळाने यावेळी कडक कारवाईची मागणी केली … पहा आणि ऐका हा व्हिडीओ रिपोर्ट