पुणे -माजी महापौर चंचला कोद्रे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने आज (सोमवार) दुपारी निधन झाले. त्रास होऊ लागल्याने त्यांना रविवारी रात्री रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सकाळीपासून उपचारांना चांगला प्रतिसाद देत होत्या मात्र अचानक त्यांची प्रकृती ढासळली आणि अखेर त्यांचे निधन झाले.
कोद्रे या प्रभाग क्रमांक २२ मधून दुसऱ्यांदा विजयी झाल्या होत्या. पहिल्याच वेळी निवडून आल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसने महापौरपदावर काम करण्याची संधी दिली. सतत हसतमुख व सभागृहात नेहमी बोलण्यासाठी त्या पुढाकार घेत असत. महिला नगरसेवकांचे चांगले संघटन त्यांनी केले होते. खराडी येथील एका खासगी रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.