Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

भाजप कार्यकर्त्यांचा पुण्यात जल्लोष (पहा फोटो )

Date:

पुणे – गुजरात व हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीतील भाजपच्या विजयानंतर शहर कार्यालयात जल्लोष केला.

शहर कार्यालय फुलांच्या माळांनी सजविण्यात आले होते. समर्थ नेतृत्व, सार्थ विश्‍वास या आशयाचे मोदी व शाह यांच्या छबी असणारे फलक लावण्यात आले होते. येणार्‍या प्रत्येकाला इंभरूती, चंद्रकला, बालुशाही अशी अस्सल गुजराती मिठाई देऊन अभिनंदन करण्यात येत होते. ध्वनिवर्धकावर राष्ट्रभक्तीपर गाणी लावण्यात आली होती. बँड आणि ढोल पथकाच्या तालावर कार्यकर्ते आनंदाने नाचत होते. शहराच्या विविध भागांतून मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते शहर कार्यालयात येत होते. शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी सर्वांच्या शुभेच्छा स्वीकारल्या. महापालिकेतील सभागृह नेते श्रीनाथ भीमाले, स्थायी समिती अध्यक्ष मुरली मोहोळ, शहर सुधारणा समितीचे अध्यक्ष महेश लडकत, महिला बालकल्याण समितीच्या अध्यक्षा राणी भोसले, विधी समितीच्या अध्यक्षा गायत्री खडके यांच्यासह मोठ्या सं‘येने नगरसेवक उपस्थित होते. युवा मोर्चाचे अध्यक्ष दीपक पोटे, महिला आघाडीच्या अध्यक्षा शशिकला मेंगडे, पक्षाचे सरचिटणीस दीपक मिसाळ, गणेश घोष, उपाध्यक्ष शाम सातपुते, दत्ता खाडे, सुनील कांबळे, डॉ. संदीप बुटाला, कार्यालय मंत्री उदय जोशी, कोषाध्यक्ष प्रा. विनायक आंबेकर, गिरीश खत्री, रफीक शेख यांची प्रमुख उपस्थिती होती.

शहराध्यक्ष योगेश गोगावले यांची प्रतिकिया


भारतीय जनता पार्टी गुजरात आणि हिमाचल प्रदेश या ठिकाणी विजयी झाली याबद्दल या ठिकाणच्या मतदारांना धन्यवाद दिले पाहिजेत. हा विजय भारतीय जनता पार्टीचे नेतृत्व आदरणीय नरेंद्र मोदी, संघटनेचा चेहरा अमितभाई शहा आणि हजारो हजार कार्यकर्त्यांच्या परिश्रमातून मिळालेला आहे. विरोधकांनी आणि विशेष करून कॉंग्रेसने जातीयवादी आणि धार्मिक भावनांना नेहमीच खतपाणी घालणार्‍या नेत्यांच्या सहकार्याने प्रचाराची आघाडी उघडली होती. त्यामुळेच विकासरथाला, विकासाच्या कल्पनांना वेडपट म्हणण्याइतकी त्यांची मजल होती. या पार्श्‍वभूमीवर दोन्ही राज्यातील जनतेने दिलेली चपराक पुरेशी बोलकी आहे. स्थानिक आणि केंद्रीय पातळीवर जातीय विषयांना खतपाणी घालणार्‍या प्रयत्नांना भविष्यकाळामध्ये देशाच्या विकासाचा अडथळा म्हणूनच आपल्याला पाहावे लागेल हा या निवडणुकीचा बोध आहे असे आम्ही मानतो. ‘सब का साथ सब का विकास’ यातील एकात्मतेची भावना आपल्याला भविष्यामध्ये अधिक वेगाने शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवली पाहिजे.

खा. अनिल शिरोळे

गुजरातमध्ये भाजप आणि मोदीजींच्या नेतृत्वाखाली २२ वर्षापासून होत असलेला विकास अनुभवून जनतेने दिलेला हा कौल आहे. आर्थिक शिस्तीसाठी अत्यावश्यक अशा जीएसटी आणि निश्चलीकरण ह्या निर्णयाला जनतेने पुन्हा एकदा पाठिंबा दिल्याचे देखील ह्या निकालातून सिद्ध झाले आहे. हिमाचलचा विजय हा मोदीजी हिमाचलचा सर्वांगीण विकास करतील हा  जनतेचा अपार विश्वास, त्यांचे नेतृत्व,कर्तृत्वावर ठेवलेला विश्वासाचा परिणाम आहे.

विकासाला दाद :  गिरीश बापट (पालकमंत्री पुणे)

गुजरात आणि हिमाचल प्रदेश येथील विधानसभा निवडणुकीत जनतेने पुन्हा भारतीय जनता पक्षाला कौल दिला आहे.
या निकालाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील लोकांचा विश्वास आणखी दृढ झाला आहे. गुजरात व हिमाचल प्रदेश पिंजून काढून भरघोस यश मिळवून देणार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या नेतृत्वावर या निकालाने शिक्कामोर्तब झाले आहे. या निवडणुकीच्या प्रचारात विरोधकांनी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका केली. भाजपाने मात्र सभ्यतेला प्राधान्य दिले. प्रचाराची पातळी खालाऊ दिली नाही. विरोधकांच्या भूलथापांना न बळी पडता जनतेने पुन्हा एकदा विकासाला साथ दिली आहे.
गुजरात आणि हिमाचल प्रदेशातील जनतेचे अभिनंदन.मतदारांचे आभार. नवनिर्वाचित आमदारांना शुभेच्छा.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

गायन-वादनाचा सुरेल संगम-पुणेकर रसिकांची भरभरून दाद

श्रीराम पुजारी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त सांगीतिक कार्यक्रमपुणे : युवा कलाकार...

अजित पवारांच्या खात्याकडे लक्ष ठेवा:निधी कुठे वितरित होतो याची माहिती घ्या, एकनाथ शिंदेंचे शिवसेनेच्या मंत्र्यांना आदेश

शिंदेंच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती तक्रार,निधी वाटपावर भाजपचे आमदारही...

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानातर्गंत अर्ज करण्याचे आवाहन

पुणे, : एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत सन 2025-26 अंतर्गत...

रस्ते अपघातातील मृत्यूंचे प्रमाण कमी करण्याकरीता उपाययोजना करा-जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी

पुणे: रस्ते अपघातातील मृत्यूंचे प्रमाण लक्षात घेता अपघाताचे प्रमाण...