तसेच त्यांनी आपल्या उद्योगजगत व शिक्षण क्षेत्रातील कामाबाबतचे अनुभवही विद्यार्थिनींना सांगितले.
एनआयपीएमच्या विद्यार्थी विभागाचे साधू वासवानी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजमध्ये उद्घाटन संपन्न
तसेच त्यांनी आपल्या उद्योगजगत व शिक्षण क्षेत्रातील कामाबाबतचे अनुभवही विद्यार्थिनींना सांगितले.
भाजपच्या राजवटीत महापुरूषांच्या पुतळ्यांची विटंबना – रमेश बागवे (व्हिडीओ)
इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी (डिप्लोमा) ला ५६ व्या नॅशनल फार्मसी वीक मध्ये जेतेपद आणि ‘स्पोर्टिंग एन्काऊंटर-२०१८ ’मध्ये उपविजेतेपद
संगीता अहिर यांची महिला टाटा मिलवर्कर्सना भेट
मुंबई-महिला दिनाचं औचित्य साधून मैत्री चॅरिटेबल ट्रस्टच्या संचालिका, सौ. संगीता सचिन अहिर यांनी
महिला कामगारांना, आजच्या दिवशीही सुट्टी नसल्यामुळे त्यांचा हा दिवस खास करण्यासाठी त्यांच्या
कार्यस्थळी त्यांना भेट देऊन हा महिला दिन साजरा केला. यावेळी बोलत असताना आपल्या
स्वप्नांसाठी लढत एकमेकांच्या साथीनं पुढे जाण्याचं आवाहन त्यांनी या महिलांना केलं. तर “संसाराचा
गाडा हाकताना स्वत:कडे दुर्लक्ष न करता आपल्या तब्येतीची काळजी घेणं ही तितकंच गरजेच
असल्याची जाणीवही” संगीता अहिर यांनी महिला मिलवर्कर्सना करून दिली. यावेळी पुढे बोलताना,
“स्त्रीच्या कर्तृत्त्वाला सलाम करण्यासाठी केवळ एक दिवस पुरेसा नसून 365 दिवस राबणाऱ्या ‘तिचा’
आदर नेहमीच आपल्या मनात असणं गरजेचं आहे, असं त्या म्हणाल्या.
200 महिला मिलवर्कर्स यावेळी दादरच्या टाटा मिल्समध्ये उपस्थित होत्या. त्यांच्या कामाची
पोचपावती म्हणून संगीता अहिर यांनी आपल्या प्रोत्साहनपर भाषणानंतर प्रेमाची भेटवस्तू देऊन या
सगळ्यांचा सत्कार केला.
मैत्री चॅरिटेबल ट्रस्टच्या संचालिकेबरोबरच मंगलमूर्ती फिल्म्सची घोडदौड पाहणाऱ्या संगीता अहिर
यांनी वाह! लाईफ हो तो ऐसी, गुड्डू रंगीला, सिंह साहब द ग्रेट, गली गली चोर है या सिनेमांची निर्मितीकेली तर चित्रपट वितरण क्षेत्रातही त्यांनी आपलं एक वेगळं अस्तित्त्व निर्माण केलं आहे. नुकत्याच
प्रदर्शित झालेल्या गोलमाल अगेन या सिनेमाची सहनिर्मितीही त्यांनी केली होती.
‘यशस्वी’ संस्थेच्यावतीने जागतिक महिला दिन उत्साहात साजरा.
संस्थेच्या वतीने राबविल्या जाणाऱ्या विविध कौशल्य विकास प्रशिक्षण करणाऱ्या विद्यार्थिनींना स्वयंरोजगार कसा करावा, व्यवसायासाठी भांडवल उभारणी कशी करावी याबाबत दे आसरा फाउंडेशन कशा पद्धतीने नवउद्योजकांना मदत करते याविषयी दे आसरा फाउंडेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रज्ञा गोडबोले यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
तर नवा उद्योग व्यवसाय सुरु करताना बँकेद्वारे अर्थसाहाय्य करणाऱ्या कोणकोणत्या योजना आहेत. तसेच व्यवसाय सुरु केल्यानंतर बँकेतील व्यवहार कशा पद्धतीने हाताळले पाहिजेत. याबाबत भगिनी निवेदिता सहकारी बँक लि. च्या मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता देशपांडे यांनी मार्गदर्शन केले.
तर एकटीनेच व्यवसाय सुरु करण्याऐवजी चार पाच महिलांनी एकत्र येऊन व्यवसाय उभारल्यास कमी वेळात अधिक यश संपादन करता येईल असे मत किशोर पंप्स कमानीच्या व्यवस्थापकीय संचालिका अमृता देसाई यांनी व्यक्त केले. तर हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्रातील छोटे छोटे अभ्यासक्रम केल्यानंतरसुद्धा महिलांसाठी कशा प्रकारच्या संधी उपलब्ध आहेत याबाबत महाराष्ट्र स्टेट इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट केटरिंग टेक्नॉलॉजीच्या प्राचार्य डॉ.अनिता मुदलियार यांनी विद्यार्थिनींना सविस्तर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक यशस्वी एकेडमी फॉर स्किल्सच्या संचालिका स्मिता धुमाळ यांनी केले, तर सूत्रसंचालन प्राची राऊत यांनी केले. या कार्यक्रमासाठी सचिन मोरे, मीनाक्षी हिरेमठ, प्रतिमा सातारकर, केंद्र प्रमुख संजय तांबोळकर आदींनी विशेष सहकार्य केले.
आयआयएमएस मध्ये जागतिक महिला दिन उत्साहात साजरा.
‘परीकथेतील राजकुमारी’ कार्यक्रमाद्वारे उलगडला मूकपटापासून ते सुवर्णयुगापर्यंतच्या अभिनेत्रींचा प्रवास
पुणे- भारतीय चित्रपट सृष्टीमध्ये अगदी मूकपटापासून ते सुवर्णयुगापर्यंत आपल्या अभिनयाने ,
अदाकारीने, नृत्याने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या पन्नासहून अधिक अभिनेत्रींचा चित्रपट
सृष्टीतील प्रवास ‘परीकथेतील राजकुमारी’ या कार्यक्रमाद्वारे उलगडला गेला. या अभिनेत्रींचा चित्रपट
सृष्टीतील पदार्पण, त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी, चित्रपट क्षेत्रातील झालेली स्थित्यंतरे …..त्यांची काम
करण्याची पद्धत व स्वभाव वैशिष्ट्ये….आणि त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत गाजलेल्या त्यांच्या गाण्यांच्या
चित्रफितीच्या माध्यमातून केलेल्या सादरीकरणाने रसिकांना तृप्त केले.
जागतिक महिला दिनानिमित्त राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय आणि बियोंड एंटरटेनमेंट पुणे प्रस्तुत
‘परिकथेतील राजकुमारी’ हा पडद्यावरील स्त्री कलावंतांना समर्पित दृक्श्राव्य कार्यक्रम सादर करण्यात आला.
मूकपटापासून ते सुवर्णयुगापर्यंतच्या गुणी नृत्यकुशल अभिनयसंपन्न अभिनेत्री यांचे जीवन आणि कला
यांचे दर्शन घडवणाऱ्या या कार्यक्रमाला रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली.
या कार्यक्रमाच्या संयोजिका सुलभा तेरणीकर यांच्या कल्पनेतून हा कार्यक्रम सादर करण्यात आला. त्यांनी
मूकपटातील नायिकांच्या चित्रओळखीपासून ते आतापर्यंतच्या स्री-पर्वापर्यंतच्या युगाचा पट उलगडत जुन्या
आठवनींना उजाळा दिला. मूकपट, बोलपट, गायक गायिका, पार्श्वगायिका आणि अभिनेत्री असा हा प्रवास
उलगडत गेला. उस्मान शेख व वंदना कुलकर्णी यांनी त्यांना साथ दिली. आठवणींबरोबरच या अभिनेत्रींवर
चित्रित करण्यात आलेली प्रेक्षणीय गाणी, काही मजेदार किस्से व आठवणींनी कार्यक्रमाला रंगत आली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी बियोंड एंटरटेनमेंट यांच्या वतीने जेष्ठ अभिनेत्री लीला गांधी तसेच ‘नॅशनल फिल्म
अर्काइव्ह’ (एनएफआय) या संस्थेच्या आजी व माजी महिला कर्मचार्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला.
भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले, एनएफआयचे संचालक प्रकाश मगदूम, उपसंचालिका कीर्ती तिवारी हे
यावेळी उपस्थित होते. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने अशा वाशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन
करणे हा स्तुत्य उपक्रम असून अशा कार्यक्रमांना सर्वोतोपरी मदत करण्यात येईल असे आश्वासन त्यांनी
दिले.
नादिया, दुर्गा खोटे, नर्गिस, मधुबाला, मीनाकुमारी यांच्या जीवनप्रवासाचे, त्यांच्या चित्रपट सृष्टीतील
अभिनयाचे वर्णन ऐकतानाच चित्रफितीद्वारे त्यांच्या अभिनयाचे, नृत्याचे, सौंदर्याचे प्रत्यक्ष दर्शन रसिकांना
जुन्या काळात घेऊन गेले.
सुलभ तेरणीकर म्हणाल्या, पडद्यावर त्या काळात कोणतीही स्री काम करण्यास तयार होत नव्हती. कृष्णा
हरी उर्फ अण्णा साळुंके ही मूक चित्रपटातील पहिली अभिनेत्री. दादासाहेब फाळके यांना ‘राजा हरिश्चंद्र’
चित्रपटासाठी तारामातीची भूमिका करण्यासाठी कोणी अभिनेत्री मिळेना त्यामुळे त्यांनी कृष्णाला
तारामतीच्या भूमिकेसाठी तयार केले. उस्मान शेख व वंदना कुलकर्णी यांनी काळानुसार विविध अभिनेत्रीचा
प्रवास उलगडला. कमला गोखले, पेशन्स कुपर बिब्बो, सितारादेवी, झेब्बुन्निसा, रुबी मायर्स, देविका राणी,
ललिता पवार, सुलोचना गीता बाली, शामाजी, निमी, बिना रॉय, शकिला, शशिकला, संध्या, अशा ५० हून
अधिक अभिनेत्रीच्या जीवनातील मनला चटका लावणाऱ्या घटना, त्यांचा अभिनय, नृत्य, सौंदर्य प्रेक्षकांनी
‘परीकथेतील राजकुमारी’ या कार्यक्रमाद्वारे अनुभवले.
विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या उद्योजिकांचा हुजूरपागा महाविद्यालयात सत्कार
पुणे: राष्ट्रीय सेवा योजना आणि नेहरू युवा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने, हुजूरपागा महिला वाणिज्य महाविद्यालय येथे महिला उद्योजिका मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. जागतिक महिला दिनाच्या औचित्याने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या ३० यशस्वी उद्योजिकांचा सत्कार करण्यात आला. तरचाकोरी बाहेरील क्षेत्र निवडून त्या क्षेत्रात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या बाग्यश्री आपटे (कॅनिंग), सायली भिडे (डायमंड), मेघना हल्लभावी (पेपर ट्यूब कारखाना) यांना शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन यावेळी गौरविण्यात आले. तर महाविद्यालाच्या आजी व माजी उद्योजिकांचा अमृता दातीर, रुपाली कडू, वृत्तीका जोशी आणि धनश्री देशपांडे यांनाही सन्मानित करण्यात आले. रश्मी कुलकर्णी आणि श्यामाताई जाधव यांच्या हस्ते या सर्व पुरस्कारांचे वितरण झाले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य के. पी बैरागी, संस्थेचे सुभाष महाजन, देवस्थळी, सोनावणी आदी मान्यवरही उपस्थित होते.
तुम्हांला जन्मत:च लागलेली ओळख बाजूला ठेवून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्याचे ध्येय बाळगा. अशक्य असे या जगात काहीच नाही फक्त मी हे करू शकते असा सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. निरर्थक गोष्टीत वेळ वाया दडवू नका” असे विद्यार्थींनींना मार्गदर्शन करताना हल्लभावी यांनी सांगितले.
तर “आपल्यातील कलागुणांना ओळखा. नावीन्यपूर्ण आणि सृजनशील दृष्टीकोनातून आपल्या कलेस व्यावसायिक रूप कसे देता येईल याचा विचार करा. चूल आणि मूल एवढेच आपले आयुष्य मर्यादित ठेऊ नका,” असा मार्मिक सल्ला रश्मी कुलकर्णी यांनी विद्यार्थींनींना दिला. सायली भिडे, बाग्यश्री आपटे यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.
उद्योजक व महाविद्यालय यांच्यात सुसंवाद साधणे, विद्यार्थींनींपुढे यशस्वी उद्योजिकतेचा आदर्श निर्माण करणे करून त्यांना उद्योजिका होण्यासाठी प्रोत्साहन देणे या प्रमुख उद्देशाने हा मेळावा भरविण्यात आला असल्याचे के. पी बैरागी यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमाचे संयोजन प्रा. रूपाली शेठ तर सूत्रसंचालन प्रा. वैजयंती चिपळूणकर यांनी केले. प्रा. अस्मिता कुलकर्णी यांनी आभार मानले.
काँग्रेसचे ज्येेष्ठ नेते डाॅ. पतंगराव कदम यांचे दीर्घ आजाराने निधन,महाराष्ट्र हळहळला (मान्यवरांच्या प्रतिक्रिया )
मुंबई-काँग्रेसचे ज्येेष्ठ नेते, माजी मंत्री व भारती विद्यापीठाचे कुलपती डाॅ. पतंगराव कदम (७२) यांचे शुक्रवारी रात्री निधन झाले. मूत्रपिंडाच्या अाजारामुळे त्यांच्यावर ३ मार्चपासून लीलावती रुग्णालयात उपचार सुरू हाेते. त्यांना अमेरिकेला हलवण्याचेही प्रयत्न सुरू हाेते. काँग्रेसच्या माजी अध्यक्षा साेनिया गांधी यांनी गुरुवारी रुग्णालयात येऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली हाेती. पतंगरावांच्या पश्चात पत्नी विजयमाला, मुलगा युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम, ज्येष्ठ बंधू आमदार मोहनराव कदम यांच्यासह माेठा परिवार अाहे. कदम चार वेळा आमदार म्हणून निवडून आले हाेते. शनिवारी सकाळी १० वाजता पुण्याच्या भारती विद्यापीठात पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल तर सायंकाळी सांगली जिल्ह्यातील वांगी येथील साेनहिरा कारखान्याच्या परिसरात अंत्यसंस्कार करण्यात येतील.
वयाच्या 19 व्या वर्षी भारती विद्यापीठाची स्थापना-
– पतंगराव कदम यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील सोनसळ या गावी झाला. गावात प्राथमिक शिक्षण व कुंडलमध्ये माध्यमिक शिक्षण घेतले.
– पुढे 1961 साली पुण्यात आले. शिक्षक म्हणून काम करताना काहीतरी वेगळं करण्याची जिद्द मनात बाळगत 1964 साली वयाच्या 19 व्या वर्षी भारती विद्यापीठाची स्थापना केली.
– यानंतर समाजकारण व राजकारणात जाण्याचा निर्णय घेतला.
– 1964 साली वसंतदादा पाटील यांनी त्यांना एसटी महामंडळाचे सदस्य म्हणून नियुक्त केले. सोबतच त्या काळात त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात काम करत भारती विद्यापीठाचे रोपटे वाढवले.
– 1980 साली काँग्रेसने तिकीट नाकारले म्हणून ते अपक्ष उभा राहिले मात्र केवळ अडीचशे-तीनशे मतांनी पराभूत झाले.
– मात्र, त्यांनी हार मानली नाही. पुन्हा जोमाने काम करू लागले. अखेर तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी त्यांना 1985 च्या निवडणुकीत तिकीट दिले व ते निवडून आले. तेव्हापासून सलग सात वेळा पतंगराव कदम विधानसभेत निवडून गेले.
राजकीय करियर-
– 1985 ते 2018 (मृत्यूपर्यंत) ते भिलवडी वांगी आणि पलूस-कडेगाव या दोन विधानसभा मतदारसंघातून सलग सात वेळा आमदार म्हणून निवडून आले.
– जून 1991 ते मे 1992 – शिक्षण राज्यमंत्री
– मे 1992 ते 1995 – शिक्षणमंत्री (स्वतंत्र खाते)
– ऑक्टोबर 1999 ते ऑक्टोबर 2004 – उद्योग, व्यापार, वाणिज्य आणि संसदीय कामकाज खात्यांचे कॅबिनेट मंत्री
– नोव्हेंबर 2004 पासून पुढे – पुनर्वसन आणि मदतकार्ये या खात्यांचे मंत्री
प्रभारी अध्यक्ष – महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी
– डिसेंबर 2008 पासून – महसूल, पुनर्वसन आणि मदतकार्ये, भूकंप पुनर्वसन आणि शालेय शिक्षण मंत्री
– मार्च 2009 पासून – कॅबिनेट मंत्री, महसूल मंत्री
– नोव्हेंबर 2009 पासून- वन मंत्री
– 19 नोव्हेंबर 2010 ते 2014 – वन मंत्री, पुनर्वसन आणि मदतकार्ये, भूकंप पुनर्वसन
– ऑक्टोबर 2014 पासून आमदार. पतंगराव कदम यांची मुख्यमंत्री होण्याची इच्छा होती. त्यांना दोन-तीन संधी मिळाली होती मात्र प्रत्येकी वेळी त्यांची संधी हुकली.
त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्रातील राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्राला धक्का बसला आहे. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अशोक चव्हाण, यांच्यासह विविध मान्यवरांनी श्रद्धांजली वाहिली आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पतंगराव कदम यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकीय व सामाजिक जीवनाची झालेली हानी भरून निघणारी नाही. पतंगराव कदम हे जवळपास पन्नास वर्षे सार्वजनिक जीवनात कार्यरत होते. त्यांनी आपल्या सार्वजनिक जीवनाची सुरुवात हडपसर येथील रयत शिक्षण संस्थेमध्ये एक शिक्षक या नात्याने केली होती. शिक्षणसंस्था निर्माण करणे हे त्यांचे स्वप्न होते आणि भारतीय विद्यापीठ या नावाने त्यांनी एक अभूतपूर्व शिक्षणसंस्था निर्माण केली. त्यात जवळपास चार लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आणि व्यक्तिगत स्वरूपात मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो,
– शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पतंगराव कदम यांच्या निधनामुळे मला तीव्र दु:ख झाले आहे. त्यांच्या निधनामुळे पक्षाची कधीही भरून न येणारी हानी झाली आहे. या दु:खद प्रसंगी माझ्या संवेदन त्यांच्या कुटुंबीयांसमवेत आहेत
– राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष
पतंगराव कदम यांच्या जाणामुळे आम्ही एका अजातशत्रू व्यक्तिमत्त्वाला मुकलो आहोत. ते ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ आणि समाजसेवक होते. त्यांनी राज्य सरकारमधील मंत्री म्हणून आपल्या कामगिरीचा ठसा उमटवला होता.
– देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री, महाराष्ट्र
ज्येष्ठ काँग्रेस नेते पतंगराव कदम यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रातील समर्पित नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले. त्यांच्या निधनाने काँग्रेस पक्षाची मोठी हानी झाली आहे. काँग्रेस पक्ष कदम कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे.
भावपूर्ण श्रद्धांजली!
अशोकराव चव्हाण (माजी मुख्यमंत्री -प्रदेशाध्यक्ष – कॉंग्रेस )
पतंगरावांसह आमचे व्यक्तिगत संबंध होते महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या अनेक वर्षापासून ते कार्यरत होते, महाराष्ट्रामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांचे मोठे योगदान आहे तसेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणात समाजकारण आणि राजकारण केले , पतंगराव कदम यांच्या अकस्मात मृत्यूने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणार नाही
रमेश बागवे (माजी गृहराज्यमंत्री,शहराध्यक्ष -कॉंग्रेस)
-डॉक्टर पतंगराव कदम ह्यांच्या मृत्युने महाराष्ट्र एका जाणकार आणि अभ्यासु, कर्तृत्ववान नेत्याला मुकला आहे. लहाणपणापासुनच जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर अत्यंत सामान्य परिस्थितीतून ते मोठे झाले. शिक्षण, राजकारण आणि समाजकारण अशा सर्व क्षेत्रात ते यशस्वी झाले. भारती विद्यापीठाच्या माध्यमातून त्यांनी हजारो विद्यार्थी घडविले...खा अनिल शिरोळे
पंतगरावांचा आणि माझा परिचय होता. त्यांनी शून्यातून विश्व निर्माण केले. अथक प्रयत्न, चिकाटी, शिक्षणाबदद्ल कमालीची ओढ, यातून त्यांनी भारती विद्यापीठाची स्थापना करीत त्यांनी शिक्षण तळागाळापर्यंत पोहचवले. मिनमिळावू, सर्वांशी संपर्क असणारे, हसतमुख असा हा नेता होता. त्यांना मी कधीही चिडलेले पाहिलेले नाही. ग्रामीण भागात शिक्षणाचा प्रसार करणाऱ्या एका थोर नेत्याला आपण मुकलो आहोत. त्यांना माझी भावपूर्ण श्रध्दांजली.
दीपक मानकर (माजी उपमहापौर -पुणे )
अत्यंत दुर्दैैवी अशी घटना आज घडली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पतंगराव कदम यांच्या निधनामुळे काँग्रेस पक्षात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते म्हणून त्यांचा शैैक्षणिक, सहकार क्षेत्रात खोल अभ्यास होता. शून्यातून विश्व कसे निर्माण करायचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे पतंगराव. एक मनमोकळा, दिलदार नेता आणि आमचे ज्येष्ठ सहकारी गमावल्याने काँग्रेसचे फार मोठे नुकसान झाले आहे.
– हर्षवर्धन पाटील, माजी मंत्री
पतंगराव कदम यांच्या निधनाने राज्याच्या राजकारणातील एक ज्येष्ठ , उमदे, दिलखुलास व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. राज्याच्या राजकारणाला , समाजकारणाला, सहकार व शैक्षणीक क्षेत्राला वेगळी ओळख करून देण्यात त्यांचा महत्वाचा वाटा होता. कधी काळी 2 खोल्यात सुरु झालेले भारती विद्यापीठ आणि आजचा त्याचा झालेला वटवृक्ष त्यांच्या कार्याची ओळख करून देते. त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली
– धनंजय मुंडे, विरोधी पक्षनेते विधान परिषद
कृषी महोत्सवातून होणार वाटचाल प्रगतीची, शेतकऱ्यांच्या उन्नतीची…
कृषि महोत्सव नव्हे हा तर शासनाचा शेतकऱ्यांशी थेट संवाद असून वाटचाल प्रगतीची, शेतकऱ्यांच्या उन्न्तीची… ओळख करुन घेऊया नव तंत्रज्ञानाची, शासकीय योजनांची.. करा शेती निरंतर फायद्याची. सहकार महर्षी कै. शंकरराव मोहिते पाटील जन्म शताब्दी वर्षानिमित्त कृषि महोत्सव 2018 पुणे या कार्यक्रमाचे आयोजन दि. 9 ते 13 मार्च 2018 या कालावधीत ॲग्रिकल्चर कॉलेज ग्राऊंड, सिंचन नगर, पुणे येथे करण्यात आले आहे.
महोत्सवाचा उद्देश
कृषि विषयक विकसीत तंत्रज्ञान व शासकीय योजनांची माहिती शेतक-यांपर्यत पोहोचविणे. शेतकरी-शास्त्रज्ञ आणि संशोधन-विस्तार-शेतकरी-विपणन साखळी सक्षमीकरण करणे, समुह/गट संघटीत करुन स्थापित शेतकरी उत्पादक कंपन्यांची क्षमता बांधणी करणे, शेतक-यांच्या उत्पादनास योग्य भाव मिळावा तसेच ग्राहकांना उच्च दर्जाचा माल मिळावा याकरिता शेतकरी ते ग्राहक थेट विक्री श्रृंखला विकसीत करणे, कृषि विषयक परिसंवाद/व्याख्याने यांच्या माध्यमातून विचारांच्या देवाण-घेवाणीव्दारे शेतक-यांच्या समस्यांचे निराकरण करणे, खरेदीदार-विक्रेता संमेलनाच्या माध्यमातून बाजाराभिमुख कृषि उत्पादनास आणि विपणनास चालना देणे हा या महोत्सवाचा मुख्य उद्देश आहे.
कृषि महोत्सवातील आकर्षणे
कृषि प्रदर्शन, परिसंवाद, चर्चासत्रे, विक्रेता- खरेदीदार सम्मेलन, सहकार परिषद, 250 हून अधिक नामवंत कंपन्यांचा सहभाग, कृषि महाविद्यालयाच्या प्रक्षेत्रावर सदृश्य प्रात्यक्षिके या कार्यक्रमाचा समावेश आहे.
कृषि महोत्सवातील घटक
कृषी महोत्सवातील कृषी प्रदर्शन हा महत्वाचा घटक असून यामध्ये शासकीय दालने, विविध कंपन्यांचे स्टॉल्स, खादय पदार्थांचे स्टॉल्स, प्रात्यक्षिके यांचा समावेश आहे. यामध्ये कृषि व कृषि संबंधित विभाग, कृषि विदयापीठे, कृषि विज्ञान केंद्र, संबधित विविध कृषि महामंडळे यांचा सक्रिय सहभाग राहणार आहे. शासकीय यंत्रणा बरोबरच खाजगी कंपन्या, उद्योजक, बचत गट, शेतकरी उत्पादक कंपन्या यांचा सहभाग असणार आहे.
शेतकरी सन्मान समारंभ
शेतकरी सन्मान समारंभ कार्यक्रमामध्ये जिल्हयातील कृषि व संलग्न क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या शेतकरी तसेच पिक स्पर्धा विजेते शेतकरी यांचा प्रशस्तीपत्रक व स्मृती चिन्ह देऊन सन्मान करण्यात येणार आहे.
स्टॉल्स व खाद्य महोत्सव
खते, बी-बीयाणे, औषधे, यंत्रे व औजारे, सिंचन, बायोटेक्नॉजी, हरितगृह, नर्सरी, दुग्ध व्यवसाय व डेअरी, अपारंपारिक उर्जा, प्रक्रिया व पॅकेजींग, सेंद्रिय शेती, सुक्ष्म सिंचन, हॉर्टिकल्चर, पशु संवर्धन इ. बाबींचे विविध कंपन्यांचे 72 स्टॉल्स आहेत. महिला बचत गटांची उत्पादने, गृहपयोगी वस्तु यांचे 40 स्टॉल्स बरोबरच खाद्य महोत्सवाचे पण आयोजन करण्यात आलेले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क कार्यालयाचे नाव
प्रकल्प संचालक, आत्मा पुणे. (दुरध्वनी क्र. -020-25530431, 9820140996, 9960561454)
–विशाल कार्लेकर
सर्वसाधारण सहायक
जिल्हा माहिती कार्यालय,पुणे
महिला अत्याचार कधी थांबणार : महिला कार्यकर्त्यांचा प्रश्न
कदाचित आक्रोश करण्यापेक्षा या सरकारला हा आमचा “आवाज”लवकर पोहचेल.जेणेकरून महिलांसाठी असलेल्या कायद्याची अंमलबजावणी होऊन अत्याचाराला आळा बसेल, असे देखील त्या यावेळी बोलताना म्हणाल्या.
कर्वे समाज सेवा संस्था व बापू ट्रस्टचा महिला मानसिक आरोग्याचा जागर
पुणे-येथील कर्वे समाज सेवा संस्था व बापू ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने कोथरूड परिसरातील जयभवानी नगर वस्तीमध्ये महिला आरोग्याबाबत जनजागृती रँली व ठिकठिकाणी पथनाट्याचे सादरीकरण करून जागतिक आरोग्य दिनानिमित्त महिला आरोग्याचा जागर करण्यात आला.
बापू ट्रस्ट च्या संचालिका भार्गवी दवर व कर्वे समाज सेवा संस्थेचे संचालक डॉ दीपक वलोकर तसेच धर्मेंद्र पडळकर, प्रा. चेतन दिवाण, प्रा दादा दडस, केतकी केळकर व अल्मास मोमीन यांच्या मार्गदर्शनाखाली या विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
सकाळी १० वाजता कोथरूड येथील सुतार दवाखाना येथून बापू ट्रस्ट चे कर्मचारी व कर्वे समाज सेवा संस्थेच्या विद्यार्थ्यांनी महिला आरोग्य व मानसिक आरोग्याबाबत जनजागृती करणाऱ्या पोस्टर्स सह रँलीस सुरुवात करून दिवसभर जयभवानी नगर वस्ती परिसरामध्ये ठिकठिकाणी पथनाट्याचे सादरीकरण केले. परिसरातील महिला व नागरिकांनी या कार्यक्रमास भरभरून दाद दिली व बापू ट्रस्ट आणि कर्वे समाजसेवा संस्थेच्या सह्भागींचे कौतुक केले.
स्वच्छता कर्मचारी महिला स्वच्छता मोहिमेच्या ‘स्वच्छता दूत’! – अमोल बालवडकर
पुणे : आपला परिसर, प्रभाग व पर्यायाने शहर दररोज स्वच्छ ठेवणाऱ्या महिला कर्मचारी या स्वच्छता मोहिमेच्या ‘स्वच्छता दूत‘ आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या स्वप्नातील स्वच्छ भारत अभियान साकारण्यासाठी त्या काम करीत आहेत. त्यांच्यामुळेच शहराचे आरोग्य व पर्यावरण चांगले राहात आहे. त्यामुळे त्यांचा सन्मान करणे आपले कर्तव्य बनते, असे मत शहर भाजप युवा मोर्चाचे सरचिटणीस व नगरसेवक अमोल बालवडकर यांनी आज व्यक्त केले.
प्रभाग व परिसर स्वच्छ करण्याचे काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांचा महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते साडी वाटप करुन सन्मान करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी बाणेर-बालेवाडी-पाषाण-सुतारवाडी
याप्रसंगी स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र जगताप, नगरसेवक अमोल बालवडकर, औंध-बाणेर प्रभाग समितीचे अध्यक्ष विजय शेवाळे, नगरसेविका स्वप्नाली सायकर, नगरसेविका ज्योती कळमकर, औंध-बाणेर क्षेत्रीय अधिकारी संदीप कदम, राहुल बालवडकर, आत्माराम बालवडकर, शशिकांत बालवडकर, औंध बाणेर प्रभागातील महापालिका कर्मचारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आर्थिकदृष्टया महिला सक्षम होण्यासाठी शहरात लवकरच फिरते उपाहारगृहे: आबा बागुल
बाल किर्तनकार कु. ओवी काळे हिच्या किर्तनाने महिला दिन साजरा.’
पुणे-कर्तृत्वशालिनी, रणरागिनी, यशोदामिनी अशा स्त्रीत्वाचा सन्मान करणारा महिला दिनाचा कार्यक्रम डे.ए.सो. च्या नवीन मराठी शाळेत उत्साहाने साजरा करण्यात आला. यानिमित्ताने शाळेतील विद्यार्थिनींनी कर्तृत्ववान महिलांची वेषभूषा केली होती.
सरस्वतीपूजन व दीपप्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करुन कार्यक‘माला सुरुवात झाली. आंतरराष्ट्रीय हॉकीपटू ऑलिंपिक महिला हॉकी संघाच्या कर्णधार, अर्जुन पुरस्कार प्राप्त मा. सौ. रेखा भिडे व बालकिर्तनकार कु. ओवी काळे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून लाभल्या होत्या.
शाळेतील विद्यार्थिनींनी संत मुक्ताबाई, जनाबाई, अहिल्यादेवी होळकर, इंदिरा गांधी, लता मंगेशकर, पी. टी. उषा सिंधुताई सपकाळ, साईना नेहवाल, किरण बेदी, पी. व्ही. सिंधू, कल्पना चावला, सानिया मिर्झा, मिताली राज अशा सुप्रसिद्ध भारतीय कर्तृत्ववान महिलांच्या वेशभूषा करुन स्वागत सादर केले.
प्रमुख पाहुण्या सौ. रेखा भिडे यांनी आपल्या भाषणात ध्येयाकडे लक्ष केंद्रित करा. खेळामुळे निर्णयक्षमता वाढते. ग्रासपिंग पॉवर वाढते. मेहनतीला पर्याय नाही, महिलांनी आत्मसंरक्षण करण्यास शिकायलाच पाहिजे असे सांगितले. शाळेतील मुलांनी प्रश्न विचारुन सौ. भिडे यांची मुलाखतही घेतली.
बालकिर्तनकार ओवी काळे हिने आपल्या किर्तनातून संत मुक्ताबाईंच्या जीवनातील छोटे छोटे प्रसंग व श्लोक यांची सांगड घालून छान किर्तन केले. शाळेतील विद्यार्थी किर्तनात छान रममाण झाले होते.
याच वेळी शाळेतील ‘मेक इन इंडिया’ या अभियानातील विजेत्या विद्यार्थ्यांचा व शिक्षकांचा बक्षीस देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या ठिकाणी बालगटातील मुलांच्या आवडत्या खेळाचे म्हणजेच भातुकलीचे प्रदर्शन पालक श्री. कोटा यांच्या सहकार्याने माडण्यात आले.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक मा. मुख्याध्यापिका सौ. कल्पना वाघ यांनी केले. तर उपस्थितांचे आभार सौ. योगिता भावकर यांनी मानले. यावेळी संस्थेचे पदाधिकारी मा. डॉ. श्री. सुनिल भंडगे, मा. डॉ. सविता केळकर, मा. डॉ. स्वाती जोगळेकर हे आवर्जुन उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. अर्चना देव यांनी केले. तर महिला दिनाची माहिती सौ. मीनल कचरे यांनी सांगितली.
शाळेतील ज्येष्ठ शिक्षक श्री. धनंजय तळपे, सौ. जयश्री खाडे व माता पालक संघाच्या उपाध्यक्षा सौ. गौरी दाते व अनेक महिला पालक उपस्थित होत्या.
अशा प्रकारे अतिशय उत्साहाने नवीन मराठी शाळेत आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यात आला.









