तसेच त्यांनी आपल्या उद्योगजगत व शिक्षण क्षेत्रातील कामाबाबतचे अनुभवही विद्यार्थिनींना सांगितले.
एनआयपीएमच्या विद्यार्थी विभागाचे साधू वासवानी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजमध्ये उद्घाटन संपन्न
पुणे : नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पर्सोनेल मॅनेजमेंट अर्थात एनआयपीएमच्या विद्यार्थी विभागाचे साधू वासवानी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज फॉर गर्ल्स मध्ये उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून बोलताना ऑग्निबेन इंडिया लि.च्या संचालिका कविता कालीकर यांनी उद्योगजगतातील त्यांच्या प्रवासाबद्दल सांगितले.
तर एनआयपीएमचे उपाध्यक्ष डॉ. कॅप्टन चंद्रशेखर चितळे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, विद्यार्थीदशेतच एनआयपीएम सारख्या व्यवस्थापनक्षेत्रातील राष्ट्रव्यापी व अनुभवी जाणकार मनुष्यबळ व्यवस्थापकांच्या संस्थेसोबत काम करताना विद्यार्थिनींचे स्वतःचे अनुभवविश्वसुद्धा समृद्ध होण्यास निश्चित मोठी मदत होईल.
तसेच त्यांनी आपल्या उद्योगजगत व शिक्षण क्षेत्रातील कामाबाबतचे अनुभवही विद्यार्थिनींना सांगितले.
तसेच त्यांनी आपल्या उद्योगजगत व शिक्षण क्षेत्रातील कामाबाबतचे अनुभवही विद्यार्थिनींना सांगितले.
तसेच यावेळी आपल्या मनोगतात साधू वासवानी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज फॉर गर्ल्स च्या संचालिका डॉ. बी. एच. ननवानी यांनी साधू वासवानी मिशनच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रात सुरु असलेल्या कार्याबद्दल सविस्तर माहिती दिली.
एनआयपीएमचे खजिनदार डॉ. अमित गिरी यांनीही आपल्या प्रेरणादायी व्याख्यानातून विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. तर एनआयपीएमचे सदस्य सुनील नेवे यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थी विभागाद्वारे आयोजित करण्यातयेणार्या उपक्रमांची थोडक्यात माहिती दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हंसिका पंजाबी या विद्यार्थिनीने केले. तर या कार्यक्रमासाठी यशस्वी संस्थेचे पवन शर्मा, अमृता तेंडुलकर व प्रशांत कुलकर्णी आदींनी विशेष सहकार्य केले.