पुणे :यशस्वी एकेडमी फॉर स्किल्सच्या वतीने जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी आयोजित कार्यक्रमात दे आसरा फाउंडेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रज्ञा गोडबोले, किशोर पंप्स कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालिका अमृता देसाई, भगिनी निवेदिता सहकारी बँक लि. च्या मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता देशपांडे, महाराष्ट्र स्टेट इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट केटरिंग टेक्नॉलॉजीच्या प्राचार्य डॉ.अनिता मुदलियार यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले.
संस्थेच्या वतीने राबविल्या जाणाऱ्या विविध कौशल्य विकास प्रशिक्षण करणाऱ्या विद्यार्थिनींना स्वयंरोजगार कसा करावा, व्यवसायासाठी भांडवल उभारणी कशी करावी याबाबत दे आसरा फाउंडेशन कशा पद्धतीने नवउद्योजकांना मदत करते याविषयी दे आसरा फाउंडेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रज्ञा गोडबोले यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
तर नवा उद्योग व्यवसाय सुरु करताना बँकेद्वारे अर्थसाहाय्य करणाऱ्या कोणकोणत्या योजना आहेत. तसेच व्यवसाय सुरु केल्यानंतर बँकेतील व्यवहार कशा पद्धतीने हाताळले पाहिजेत. याबाबत भगिनी निवेदिता सहकारी बँक लि. च्या मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता देशपांडे यांनी मार्गदर्शन केले.
तर एकटीनेच व्यवसाय सुरु करण्याऐवजी चार पाच महिलांनी एकत्र येऊन व्यवसाय उभारल्यास कमी वेळात अधिक यश संपादन करता येईल असे मत किशोर पंप्स कमानीच्या व्यवस्थापकीय संचालिका अमृता देसाई यांनी व्यक्त केले. तर हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्रातील छोटे छोटे अभ्यासक्रम केल्यानंतरसुद्धा महिलांसाठी कशा प्रकारच्या संधी उपलब्ध आहेत याबाबत महाराष्ट्र स्टेट इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट केटरिंग टेक्नॉलॉजीच्या प्राचार्य डॉ.अनिता मुदलियार यांनी विद्यार्थिनींना सविस्तर मार्गदर्शन केले.

तर ब्युटी पार्लर व स्पा क्षेत्रातील संधींमधूनही महिलांना कशा प्रकारे करिअर करता येऊ शकते, याबद्दल सेन्सेस स्पॅलोनच्या संस्थापिका शोभा कुलकर्णी यांनी विवेचन केले.
यावेळी यशस्वी एकेडमी फॉर स्किल्स व सेवा सहयोग संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेल्या विविध कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रमात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थिनींना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच याप्रसंगी विद्यार्थिनीचे विविध नृत्याविष्कारही सादर करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक यशस्वी एकेडमी फॉर स्किल्सच्या संचालिका स्मिता धुमाळ यांनी केले, तर सूत्रसंचालन प्राची राऊत यांनी केले. या कार्यक्रमासाठी सचिन मोरे, मीनाक्षी हिरेमठ, प्रतिमा सातारकर, केंद्र प्रमुख संजय तांबोळकर आदींनी विशेष सहकार्य केले.