आर्थिकदृष्टया महिला सक्षम होण्यासाठी शहरात लवकरच फिरते उपाहारगृहे: आबा बागुल

Date:

पुणे – केवळ एक दिवस नाहीतर प्रत्येक दिवस हा स्वातंत्र्याचा, सन्मानाचा, सुरक्षिततेचा ,समानतेचा आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम असावा असा गजर करीत हजारो महिलांनी स्त्रीशक्तीचा जागर करीत प्रत्येक दिवशी ‘मी सक्षम ‘ राहणारच असा विश्वास व्यक्त केला.
निमित्त होते, माजी उपमहापौर आबा बागुल यांनी आयोजित केलेल्या ‘मी’ सक्षम अंतर्गत व्यवसायाभिमुख रोजगार प्रशिक्षण शिबीर शुभारंभ,मोफत आरोग्य तपासणी शिबीर , स्मार्ट फॅमिली कार्ड वितरण आणि स्नेहमेळाव्याचे.
यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या महिलांचा सन्मान करण्यात आला याप्रसंगी माजी उपमहापौर आबा  बागुल,माजी आमदार उल्हास पवार,  शहर काँग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे, पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाच्या अध्यक्षा जयश्री बागुल,पुणे शहर काँग्रेसचे सरचिटणीस अमित बागुल, ऍड चंद्रशेखर पिंगळे, प्रकाश आरणे, डॉ. कल्पेश पाटील, दीपा बागुल, निशा गायकवाड,  डॉ. मधुबाला लोढा, ज्योती अरविंद, शुभांगी चव्हाण, प्रियांका गणपुले ,, सीमा लाड, दीपाली सिन्नरकर, डॉ. मनीषा निंबाळकर, शकुंतला रांजणे, हेमन मिरजकर, रजिया बल्लारी, गोरख मरळ आदींसह मान्यवर उपस्थित होते. यावेळी शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त तेजश्री नाईक,   डॉ. मधुबाला लोढा,  प्राजक्ता कोळपकर यांचा विशेष गौरव करण्यात आला.तसेच  तसेच राजीव गांधी ई -लर्निंग स्कुलमधील शिक्षिकांचाही सन्मान करण्यात आला.
यावेळी माजी उपमहापौर आबा बागुल म्हणाले की, महिला सक्षमीकरण होत आहे मात्र आर्थिकदृष्टया प्रत्येक महिला सक्षम होणे ही  काळाची गरज आहे. महिलांप्रती समाजामध्ये सकारात्मक दृष्टिकोनाची व्याप्ती वाढणेही आवश्यक आहे, आज प्रत्येक क्षेत्रात महिला अग्रेसर आहेत. बचतगटाच्या माध्यमातून महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याचा प्रयत्न करीत आहेत मात्र उत्पादित मालाला बाजारपेठ नाही हे वास्तव आहे त्यामुळे अन्नपूर्णा असलेल्या महिलांसाठी महापालिकेच्या माध्यमातून फिरते उपहारगृह लवकरच सुरु केले जाईल. इतकेच नाही तर आरोग्य विमा असो किंवा अन्य विविध कल्याणकारी योजनांसाठी पाठपुरावा करून त्या मार्गी लावल्या जातील आणि महिला खऱ्या अर्थाने सक्षम कशा होतील यासाठीच कटिबद्ध आहे अशी ग्वाहीही आबा बागुल यांनी यावेळी दिली.
पुणे शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे म्हणाले, महिलांचे प्रयत्न पूर्णपणे सोडविणे ही काळाची गरज आहे. आबा बागुल यांचे कार्य हे समाजाला ,शहराला दिशादर्शक आहे. ते जे संकल्प करतात तो पूर्णही करतात यामुळेच ते लोकप्रिय आहेत. आता महिलांच्या आर्थिक सक्षमतेसाठी फिरते उपाहारगृहे , विविध योजना ते नक्कीच मार्गी लावतील यात शंका नाही मात्र आबा बागुल यांच्यासारखी व्यक्तिमत्वे राज्याच्या राजकारणात समाजकारणासाठी आवश्यक आहेत. त्यामुळे आपण त्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे असे आवाहनही त्यांनी केले. कार्यक्रमाचे संयोजन अमित बागुल मित्र परिवाराने केले.
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

राहुल गांधींसह सर्व नेत्यांना सोडण्यात आले.

पोलीस ठाण्यातून बाहेर पडल्यावर प्रियंका गांधी म्हणाल्या- धर्मेंद्र प्रधान...

महिंद्रा फायनान्सचा तिमाहीतील करोत्तर नफा ₹८९९ कोटी; वार्षिक आधारावर ७०% वाढ

मुंबई, २१ जुलै २०२६: भारतासाठी विश्वासार्ह वित्तीय सेवा पुरवठादार असलेल्या महिंद्रा फायनान्सने ३० जून २०२६ रोजी संपलेल्या तिमाहीचे अलेखापरीक्षित आर्थिक निकाल जाहीर केले. कंपनीने स्वतंत्र आधारावर ₹८९९ कोटींचा करोत्तर नफा  नोंदवला असून, तो वार्षिक आधारावर ७०% वाढला आहे. याच काळात एकूण उत्पन्न वार्षिक आधारावर १२% वाढून ₹४,९७४ कोटींवर पोहोचले. व्यवस्थापनाखालील मालमत्ता वार्षिक आधारावर १३% वाढून ₹१,३७,४४९ कोटी झाली, ज्याला ₹१५,५६४ कोटींच्या विक्रमी पहिल्या तिमाही वितरणाचा आधार मिळाला — हे वितरण वार्षिक आधारावर २२% अधिक आहे. एकत्रित  आधारावर एकूण उत्पन्न वार्षिक आधारावर १४% वाढून ₹५,७२५ कोटी झाले, तर करोत्तर नफा ७५% वाढून ₹९२७ कोटींवर पोहोचला. निकालांवर भाष्य करताना महिंद्रा फायनान्सचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. राऊल रेबेलो म्हणाले, "या तिमाहीतील आमची कामगिरी आमच्या फ्रँचायझीची ताकद अधोरेखित करते — नफाक्षमतेतील सातत्यपूर्ण विस्तार, लवचिक मालमत्ता गुणवत्ता आणि आमच्या वृद्धीकेंद्रित धोरणांच्या दिशेने केलेली प्रगती यातून हे स्पष्ट होते. आमच्या मूळ वाहन फ्रँचायझी, नवीन वृद्धी इंजिने आणि तंत्रज्ञानातील केंद्रित गुंतवणुका नफादायी व शिस्तबद्ध वाढीला पाठबळ देत आहेत." कंपनीने नफादायी व शिस्तबद्ध वाढ कायम राखली असून, निव्वळ व्याज मार्जिन ७.३% पर्यंत विस्तारले, पत खर्च सुधारून १.५% झाला, तर मालमत्तेवरील परतावा मजबूत होऊन २.४% झाला. मालमत्तेची गुणवत्ता सुदृढ राहिली असून, स्टेज ३ मालमत्ता गतवर्षीच्या ३.८% वरून सुधारून ३.५% झाल्या. त्याचबरोबर डिजिटल व एआय (AI) क्षमतांमुळे ग्राहक संपादन, कार्यचालनातील लवचिकता आणि वसुली कार्यक्षमता अधिक बळकट होत राहिली. महिंद्रा फायनान्सने आपल्या वाहनेतर वित्त व्यवसायातही (non-vehicle finance) जोरदार गती अनुभवली असून, MHRFL वगळता या विभागातील वितरण वार्षिक आधारावर ७९% वाढले.