इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी (डिप्लोमा) ला ५६ व्या नॅशनल फार्मसी वीक मध्ये जेतेपद आणि ‘स्पोर्टिंग एन्काऊंटर-२०१८ ’मध्ये उपविजेतेपद
पुणे ः ‘महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’च्या ‘इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी’ (डिप्लोमा) महाविद्यालयाने ‘
५६व्या नॅशनल फार्मसी वीक’ मध्ये विजेतेपदाचा करंडक पटकाविला. तसेच ‘स्पोर्टिंग एन्काऊंटर-
२०१८’ साठी उपविजेतेपदाचा मान मिळविला आहे.
अजित सिंग (अध्यक्ष, एसीजी वर्ल्ड वाईल्ड, पुणे) यांच्या हस्ते विजेत्यांना करंडक देण्यात आला. एम.सी.ई. सोसायटीचे अध्यक्ष डॉ. पी.ए.इनामदार, सचिव लतिफ मगदूम, सहसचिव इरफान शेख, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. एन. जगताप हे उपस्थित होते.
याप्रसंगी ‘आयपीए पुणे फार्मसीस्ट मित्र पुरस्कार’ प्रदान करण्यात आले.
‘इंडियन फार्मास्युटीकल असोसिएशन’ (आयपीए), पुणे शाखा आणि विविध फार्मसी महाविद्यालयाच्या संयुक्तविद्यमाने हा ‘५६वा नॅशनल फार्मसी वीक’ आयोजित करण्यात आला होता.
१५विविध प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये प्रश्नमंजुषा, परिचर्चा, पेपर प्रेझेन्टेशन, रेखांकन, रुग्ण सल्लागार आदी कार्यक्रम होते. ८स्पर्धांमध्ये ‘इन्स्टिट्यूट ऑफफार्मसी’ (डिप्लोमा)विजयी झाले. एकूण
१२५०विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला होता.
आयपीए संघटनेच्या पुणे विभागाच्या फार्मसी महाविद्यालयाच्या वतीने स्पोर्टिंग एन्काऊंटर-२०१८’आयोजित करण्यात आले होते. यामध्ये बॅडमिंटन, अॅथलेटिक्स, बुद्धीबळ, कॅरम, टग ऑफ युवर या स्पर्धांचा समावेश होता. तीन स्पर्धांमध्ये इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी’ (डिप्लोमा) ला उपविजेतेपद मिळाले.