Home Blog Page 3173

सलमान खान ने “रेस 3” से डेज़ी शाह का हॉट पोस्टर किया रिलीज!

सुपरस्टार सलमान खान ने “रेस 3” से सबसे पहले खुद का सिकंदर के रूप में परिचय दिया था, जिसके बाद अभिनेता ने जैकलीन फ़र्नान्डिस को जेसिका के रूप में और बॉबी देओल को यश के किरदार में देश की जनता के सामने पेश किया और अब सलमान ने संजना यानी डेज़ी शाह को इंट्रोड्यूस कर दिया है।
सुपरस्टार सलमान खान ने वादा किया था कि बह इस हफ्ते एक एक कर रेस 3 परिवार के सदस्यों से जनता को रूबरू करवाएंगे और वादे के अनुसार सलमान ने आज सोशल मीडिया पर डेज़ी शाह के किरदार संजना को जनता के सामने पेश किया है।
सलमान ने पोस्टर शेयर करते हुए लिखा, “Sizzling Sanjana waiting to explode . #Race3 #Race3ThisEid @ShahDaisy25 @SKFilmsOfficial @TipsOfficial”
अभिनेत्री डेज़ी शाह ने सलमान के ट्वीट को रीट्वीट करते हुए लिखा, “It’s time to get dangerous! You think you can handle it? #Race3 #Race3ThisEid”
को-स्टार बॉबी देओल ने पोस्टर साझा करते हुए लिखा, “The perfect combination of strength and beauty! @ShahDaisy25 #Race3 #Race3ThisEid”
अभिनेत्री जैकलिन फर्नांडीज और डेज़ी शाह ने अपने स्क्वाश सेशन से बहुत सी तस्वीरें अपने फैंस के साथ शेयर की है और दोनो ही अभिनेत्री फ़िल्म के लिए कड़ी मेहनत कर रही है।
फिलहाल अबू धाबी में एक्शन सीन की शूटिंग चल रही है जहाँ फ़िल्म की संपूर्ण कास्ट रेस में शामिल होने के लिए कड़ी मेहनत कर रही है।
“रेस 3” में सुपरस्टार सलमान खान, जैकलिन फर्नांडीज, अनिल कपूर, डेज़ी शाह, बॉबी देओल और साकिब सलीम जैसे बेहतरीन कलाकारो की टोली शामिल है।
सलमान खान फिल्म्स और रमेश तौरानी द्वारा निर्मित इस फ़िल्म को टिप्स फिल्म्स के बैनर तहत बनाया जाएगा। रेमो डिसूजा द्वारा निर्देशित “रेस 3” 2018 की ईद के मौके पर रिलीज होगी।

खासदार निधीतून दिव्यांगांना स्कूटर भेट

0
पुणे-खासदार अनिल शिरोळे ह्यांच्या स्थानिक विकास निधीतून नुकतेच  दिव्यांग व्यक्तींना बॅटरी स्कुटरचे वाटप करण्यात आले. खासदार अनिल शिरोळे ह्यांच्या हस्ते दत्ता मिरगणे आणि युवराज नवले ह्या दिव्यांगांना ह्या स्कुटरचे वाटप करताना दिव्यांग संघाचे अध्यक्ष दादा आल्हाट, मारुती गिरमे, मोमीन नवले, धनंजय देशमुख, रघुनाथ तिखे आदी उपस्थित होते.

जागतिक काचबिंदू सप्ताहानिमित्त मुलानी आय केअर सेंटरतर्फे आयोजन

0
पुणे-जागतिक काचबिंदू सप्ताहानिमित्त पुण्यातील मूलानी आय केअर सेंटरच्या वतीने दि. १६ व १७ मार्च रोजी सकाळी ९ ते २ या वेळेत मोफत नेत्र तपासणी आयोजिली होती. दोन दिवस चाललेल्या या तपासणीमध्ये एकूण २०० पेक्षा अधिक जास्त नागरिकांनी डोळे तपासून घेतले. तसेच या सप्ताहामध्ये काचबिंदू बाबत जनजागृती करण्यासाठी सायकल रॅली काढण्यात आली होती. एमजी रस्त्यावरील मूलानी आय केअर सेंटर येथे ही तपासणी करण्यात आली. या सप्ताहादरम्यान विविध जनजागृतीपर विविध कार्यक्रम आयोजिले होते. यावेळी ज्येष्ठ नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. अशोक मूलानी, अरुणा कटारा, अमित कटारा आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना सेंटरच्या प्रमुख आणि नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. समिता मूलानी-कटारा म्हणाल्या, “यंदा ११ ते १७ मार्च या कालावधीत जागतिक काचबिंदू सप्ताह राबविण्यात येत असून, मूलानी आय केअर सेंटरच्या वतीने काचबिंदू तपासणी आणि जनजागृती करण्यासाठी सायकल रॅली काढण्यात आली. त्यानंतर दोन दिवसांचे तपासणी शिबीर घेण्यात आले. आज काचबिंदूमुळे अनेक लोकांना अंधत्व आले आहे. भारतात जवळपास सव्वा कोटी लोक काचबिंदूने ग्रासलेले आहेत. पण योग्य काळजी आणि उपचार घेतले तर काचबिंदू सारख्या आजारांना आपण दूर ठेवू शकतो. काचबिंदूची तपासणी नेत्ररोग तज्ज्ञांच्या निगराणी खाली व्हायला हवी.

अँड. सचिन झालटे (पाटील) यांची नियुक्ती.

0
     पुणे- मानवी हक्क संरक्षण व जागृती संस्था गेली अनेक वर्ष मानवी हक्क कायद्याची जनजागृती करीत असुन संस्थेच्या माध्यमातून अन्याय , अत्याचारीत पिडीतांना मोफत  विधीतज्ञामार्फत कायदेशीर सल्ला व मार्गदर्शन करण्याबरोबरच त्यांच्या संविधाननीक मुलभूत हक्का विषयी जागृतीचे कार्य करीत आहेत. या संस्थेच्या कायदेशीर सल्लागार समितीच्या महाराष्ट्र अध्यक्षपदी सचिन झालटे (पाटील)B.sc, LLm यांची नियुक्ती करण्यात आली. नियुक्ती पत्र संस्थेचे अध्यक्ष विकास कुचेकर व डॉ.अभिषेक यांच्या हस्ते देण्यात आले.

ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे यांना यंदाचा पुण्यभूषण पुरस्कार

0
पुणे: ‘ पुण्यभूषण फाऊंडेशन’(त्रिदल, पुणे) आणि पुणेकरांच्या वतीने दिला जाणारा ‘ पुण्यभूषण पुरस्कार’ 2018 ज्येष्ठ गायिका डॉ.प्रभा अत्रे यांना देण्यात  येणार आहे. हा पुरस्कार त्यांच्या गायन क्षेत्रातील अतुलनीय योगदानासाठी देण्यात येत आहे, अशी माहिती ‘ पुण्यभूषण फाऊंडेशन’चे अध्यक्ष डॉ. सतीश देसाई यांनी पत्रकाद्वारे दिली.
एक लाख रूपये रोख आणि बालशिवाजींची सोन्याच्या फाळाने पुण्याची भूमी नांगरित असलेली प्रतिमा, पुण्याच्या ग्राम देवतांसह असलेल्या या वैशिष्ठपूर्ण स्मृतिचिन्हाने या वर्षीच्या पुण्यभूषण पुरस्कार्थी प्रभा अत्रे रांना गौरविण्यात येणार आहे. हा पुरस्कार पद्मविभूषण डॉ.रघुनाथ माशेलकर यांच्या  अध्यक्षतेखालील निवड समितीने देण्याचे ठरविले आहे.
लवकरच हा पुरस्कार पंडीत हरिप्रसाद चौरसिया, पंडीत अमजद अलीखान, पंडीत जसराजजी, पंडीत शिवकुमार शर्मा ह्यांसारख्या त्याच क्षेत्रातील दिग्गजांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.
पुरस्काराचे यंदाचे 30 वे वर्ष आहे. या पुरस्काराबरोबर सहा स्वातंत्र्यसैनिकांनाही गौरविण्यात येणार आहे. यामध्ये रघुनाथ गंगाराम लकेश्री, बलबीर सिंग, संदीप बाजीराव उकिरडे, श्रीमती विनीता अशोक कामटे (कै.अशोक कामटे यांच्या वीरपत्नी), दिनदयाळ वर्मा, प्रल्हाद कृष्णराव रेभे यांचा समावेश आहे.
पुण्यभूषण पुरस्कार इतिहास 
यापूर्वी ज्येष्ठ गायक पं.भीमसेन जोशी, राजा दिनकर संग्रहालयाचे कै. काका केळकर, शंतनुराव किर्लोस्कर, डॉ. बानुबाई कोयाजी, सुप्रसिद्ध साहित्यिक पु. ल. देशपांडे, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, योगाचार्य बी. के. एस.अय्यंगार, डॉ. रा. ना. दांडेकर, डॉ. मोहन धारिया, डॉ. जयंत नारळीकर,  प्रतापराव उर्फ तात्या गोडसे, ज्येष्ठ क्रिकेटपटू चंदु बोर्डे, कै. जयंतराव टिळक, डॉ. जब्बार पटेल, श्री. राहुलकुमार बजाज, डॉ. के. बी. ग्रँट, विख्यात नृत्यसाधिका डॉ. रोहिणी भाटे, डॉ. बाबा आढाव, ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू, विख्यात शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, डॉ. शां. ब. मुजुमदार, डॉ. रा. चिं.ढेरे, डॉ. ह. वि. सरदेसाई, श्रीमती निर्मलाताई पुरंदरे, श्री. सुधीर गाडगीळ,  डॉ. सायरस पूनावाला, श्री. प्रतापराव पवार, श्री. भाई वैद्य आणि गेल्या वर्षी डॉ. के. एच. संचेती यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
 राष्ट्रपती श्री. प्रणब मुखर्जी, माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम, उपराष्ट्रपती मा. श्री.हमीद अन्सारी, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, माजी सभापती श्री.सोमनाथ चटर्जी, श्री. मनोहर जोशी, श्री. शरद पवार, स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर, क्रिकेटपटू कपिलदेव व सचिन तेंडूलकर, परमपूज्य पांडुरंगशास्त्री आठवले, माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार, मा. वसंतराव साठे, कै. नानासाहेब गोरे, तत्कालीन राज्यपाल सी.सुब्रह्मण्यम्, कै. मधु दंडवते, दि हिंदू चे संस्थापक-संपादक एन.राम, न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी, श्री. सुशिलकुमार शिंदे, सी.पी.आय.(एम)जनरल सेक्रेटरी मा.श्री.सिताराम येचुरी, नाट्यदिग्दर्शक श्री.गिरीश कर्नाड, ज्येष्ठ साहित्यिक डॉ.एस.एल.भैरप्पा, प्रसिद्ध नाटककार श्री. महेश एलकुंचवार, मा. श्री. पृथ्वीराज चव्हाण, डॉ. विकास आमटे, आशा भोसले, श्री. नारायणमूर्ती,  श्री. शरद यादव, केंद्रिय मंत्री श्री. नितीन गडकरी आदि मान्यवरांनी पुण्यभूषण पुरस्कार प्रदान करून नामांकित पुणेकरांचा सन्मान केला आहे.

ग्राहक जनजागृती शिबीर संपन्न

0

पुणे – कन्झ्युमर गायडन्स सोसायटी ऑफ इंडिया मुंबई तर्फे पुना मर्चंट हॉल, मार्केट यार्ड पुणे येथे ग्राहक जनजागृती विषयक शिबिर घेण्यात आले. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी दिनेश भालेदार, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल कारंडे, सहायक अन्न धान्य वितरण अधिकारी विश्वनाथ विरनक, नायब तहसिलदार उत्तम बडे, नायब तहसिलदार अंकुश कांबळे, कन्झ्युमर गायडन्स सोसायटी ऑफ इंडियाच्या सदस्य आनंदिता कवूर उपस्थित होते.

शिबीरामध्ये कन्झ्युमर गायडन्स सोसायटी ऑफ इंडियाच्या आर्थिक सल्लागार प्राची मयेकर यांनी आर्थिक गुंतवणुक करतांना होणारी फसवणूक तसेच योग्य गुंतवणूक पद्धती बाबत मार्गदर्शन केले.

विविध वस्तुंच्या जहिरातीं मधून ग्राहकांची फसवणूक होते. यावेळी कोणती दक्षता घ्यावी तसेच फसवणूक टाळण्यासाठीच्या खबरदारी विषयी सोसायटीचे संयुक्त्त सचिव दिनेश भंडारे यांनी उपस्थित ग्राहकांना माहिती दिली. शिबीराला मोठ्या संख्येने ग्राहक उपस्थित होते.

पार्किंग पाॅलीसीवरून भाजपच्या नगरसेवकांमध्ये असंतोष

पुणे- पार्किंग पाॅलीसीवरून भाजपच्या काही स्थानिक आमदारांसह असंख्य नगरसेवकांमध्ये देखील असंतोष पसरला असून ही पाॅलीसी प्रत्यक्षात राबवायला सुरुवात केली तर पुढची निवडणूक आम्हाला कठीण जाईल असा रोष त्यांनी खाजगीत व्यक्त करायला सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर उद्याच्या महापालिका सभेत हि पाॅलीसी  बहुमताने मंजूर केली तरी , ती राबविणे शक्य होणारे नाही असा दिलासा देत दुसरीकडे उद्याच्या सभेत उपस्थित राहून पार्किंग पाॅलीसी  च्या बाजूने मतदान करण्याबाबत व्हीप बजावण्यात येत आहे .
पार्किंग बाबतचे झोन ठरविण्याचा अधिकार महापालिकेला नाही , ते पोलिसांना ठरवावे लागतील आणि असे झोन ठरविण्यासाठी सूचना हरकती आदी प्रोसिजरचा  पोलिसांना सामना करावा लागेल .त्यामुळे गल्लीबोळात हे झोन ठरविणे मुश्कील आहे. या निमित्ताने एकच होईल कि वाहनतळे झपाट्याने उभारली जातील .विरोधकांच्या प्रचाराला बळी पडू नका असे काही नेते या पाॅलीसी  वर खुलासा करीत आहेत .
भाजप कडून निवडून आलेल्या आठ हि आमदारांना येत्या ८/९ महिन्यातच पुन्हा विधानसभा निवडणुकीचा सामना करायचा आहे . तर याबरोबर लोकसभा हि लागण्याची शक्यता आहे . अशा परिस्थितीत ही  पाॅलीसी पुढे पुढे ढकलत राहावी तातडीने  मंजूर करू नये अशी भाजपमधील सर्वाधिक लोकप्रतिनिधींची भावना आहे. मात्र अन्य मार्ग किंवा पर्याय नसल्याने पक्षाच्या आदेशापुढे मान तुकाविण्याची नामुष्कीजनक परिस्थिती त्यांच्यावर ओढविली आहे .
पार्किंग ची समस्या , वाढत्या वाहनांची संख्या , प्रदूषण अशी कारणे सत्य असली तरी ती अजगराप्रमाणे वाढत्या शहराला निश्चितच भेडसावतात . असे असताना वाढत्या शहराला मर्यादा घालणे हेच गरजेचे असताना , वारंवार शहरात अनेक गावे समाविष्ट करून शहराचा विस्तार आणखी वाढविला जातो आहे . पर्यायाने अजगरासारखे फुगणारे शहर , वाढती बेकायदा बांधकामे , वाढती खाजगी वाहने यांचा सामना करावा लागतो आहे . पे अँड पार्किंग करून लोकांच्या आर्थिक समस्येत भर टाकून भाजपा रोष ओढवून घेत आहे . असे म्हणणे मांडण्याचा सातत्याने प्रयत्न होतो आहे . आणि अशी पाॅलीसी  मंजूर केल्यास ते कॉंग्रेस राष्ट्रवादी सह सर्व विरोधी पक्षांच्या पथ्यावर पडणार आहे म्हणूनच त्यांनी ही पाॅलीसी  सातत्याने प्रलंबित ठेवली होती . त्यास बळी पडून पक्षाचे नुकसान होईल याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न होतो आहे .
या सर्व पार्श्वभूमीवर जर कोणी अन्य विरोधी पक्षांच्या एखाद्या नेत्याने यदाकदाचित ऑफर टाकली तर या पाॅलीसी   वरून भाजपचे ३० हून अधिक नगरसेवक फुटू देखील शकतात आणि महापालिकेतील सत्तेला ग्रहण देखील लागू शकते याची ही चर्चा आज होत होती .

पार्किंग पॉलीसी विरोधात महापौरांसह पदाधिकाऱ्यांच्या मोटारींना मनसे धडक

0

पुणे- महापालिकेच्या पार्किंग पॉलिसीला विरोध करीत आज मनसेने महापौरांच्या गाडीला पे अँड पार्कचा स्टिकर लावून अनोख्या पद्धतीने आंदोलन केले.तर आंदोलकांची तोंडे वळताच भाजपच्या 2 नगरसेवकांनी महापौरांच्या आणि उपमहापौरांच्या मोटारीवरील हे  पोस्टर्स काढून टाकले .

शहरातील खासगी वाहनांना रोखण्यासाठी आणि वाहतूक कोंडीचा तिढा सोडविण्यासाठी महापालिकेने संपूर्ण शहरभर पे अ‍ॅन्ड पार्क योजना आणण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला विरोध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सह्यांची मोहीम राबविण्यात आली. त्यानंतर आज मनसेने महापौर मुक्ता टिळक यांच्या गाडीला पे अँड पार्कचा स्टिकर लावून या योजनेला विरोध प्रकट केला. यावेळी मनसे नगरसेवक वसंत मोरे, माजी नगरसेविका रुपाली पाटील ठोंबरे तसेच मनसे कार्यकर्ते उपस्थित होते.

उपायुक्त सतीश कुलकर्णी सस्पेंड -आज मुख्य सभेत पर्दाफाश

0

पुणे-  महापालिकेचे उपायुक्त सतीश कुलकर्णी यांना सुमारे १५ दिवसांपूर्वीच शासनाने सस्पेंड केल्याचे आज अखेरीस पालिकेच्या मुख्य  सभेत स्पष्ट झाले . माजी उपमहापौर दीपक मानकर यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यामुळे आज त्यांच्या निलंबनाची बाब उघड झाली . दरम्यान त्यांची शासनाने  बदली केली होती मात्र पुण्यातील चांदणी चौकाच्या महत्वाच्या प्रकल्पासाठी आपण त्यांना थांबवून ठेवले होते .आणि त्यांची बदली काहीकाळ स्थगित करण्याची विनंती शासनाला केली होती. मात्र शासनाने त्यावर काही निर्णय घेतला नाही . आणि अखेर  शासनाच्या आदेशाला न जुमानल्यामुळे त्यांचे निलंबन शासनाने केले असा खुलासा आज महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी मुख्य सभेत केला . यावेळी जर त्यांची पुण्याला गरज असल्यामुळे थांबवून ठेवले होते तर त्यांचे निलंबन मागे घ्यावे असे शासनाला कळवावे , तसा ठराव करावा असे वक्तव्य यावेळी कॉंग्रेस आणि भाजपच्या नेत्यांनी केले . यावर असे करायचे असेल तर कुणाल कुमार यांची हि बदली याच मार्गाने थांबवा असा टोला राष्ट्रवादीच्या  नेत्यांनी लगावला .
यासंदर्भात  आज …. पहा नेमके काय झाले मुख्य सभेत ….

पुण्याच्या तोंडचे पाणी पळण्याची भीती :डॉ . श्रीकांत गबाले

0
‘रोटरी वॉटर फेस्टिव्हल’ च्या व्याख्यानांना चांगला प्रतिसाद 
पुणे :
जवळपास १ कोटी पर्यंत  जाणारी लोकसंख्या ,वाढत्या  नागरीकरणाने  उध्वस्त झालेली पाणलोट क्षेत्रे  ,नदी -ओढ्यांचे  अडवलेले  प्रवाह आणि जमिनीखालील पाण्याची पातळी वाढविण्यासाठी अजिबात होत नसलेले प्रयत्न यामुळे पुणेकरांच्या तोंडचे पाणी भविष्यात पळवले जाऊ शकते अशी भीती जिओमॉर्फोलॉजी संशोधक  डॉ . श्रीकांत  गबाले यांनी व्यक्त केली .
रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ आयोजित ‘रोटरी वॉटर फेस्टिव्हल ‘(जलोत्सव २०१८ ‘मध्ये बुधवारी दुसऱ्या दिवशी बोलताना त्यांनी ही भीती व्यक्त केली . हे व्याख्यान नेहरू सभागृह ,घोले रस्ता येथे झाले . यावेळी माजी प्रांतपाल मोहन पालेशा यांच्या हस्ते गबाले ,तसेच पाटबंधारे खात्यातील कर्मचारी भारत व्हनमाने ,लक्ष्मण केंगार यांचा उल्लेखनीय कामगिरीबद्दल सत्कार करण्यात आला .
 डॉ . श्रीकांत  गबाले म्हणाले ,’पुण्याला स्वतः:चे पाणी नाही ,शेजारच्या धरणातून ते मिळवावे लागते . वाढत्या नागरीकरणामुळे पुणे परिसराची लोकसंख्या १ कोटीवर जाणार आहे . वाढत्या बांधकामांमुळे लगतची पाणलोट क्षेत्रे आणि पाण्याचे प्रवाह उध्वस्त होत आहेत . निम्मे प्रवाह संपले आहेत . नद्या आणि ओढे यांना अडवले किंवा वळवले जात आहे .टेकड्या उभ्या चिरल्या जात आहेत .  त्यामुळे चेन्नई सारखा पूर एक दिवस पुण्यात येणार हे निश्चित आहे . शिंदेवाडी ने त्याची चुणूक दाखवली आहे . पुण्यात पावसाचे फक्त २ टक्के पाणी साठवले जाते ,बाकी वाहून जाते . दुसरीकडे जमिनीखालील पाण्याची पातळी वाढविण्यासाठी शहरात काहीही प्रयत्न होत नाहीत . उलट सिमेंटचे भरमसाट रस्ते बांधले जात आहेत . पुढील काळात जमिनीखालील पाण्याची पातळी निम्म्याने खाली जाऊ शकते . ही स्थिती भयावह असून पुढील काळात पुणेकरांच्या तोंडचे पाणी पळवले जाणार आहे .
पाटबंधारे खात्याचे कर्मचारी भारत व्हनमाने,लक्ष्मण केंगार  यांनी सांगोला तालुक्यातील जुनावणे गावातील लघु पाटबंधारे तलावावर शेतकऱ्यांना ठिबक सिंचनाची सवय लावून ५६ हेक्टर चे सिंचन क्षेत्र ६५० हेक्टरवर  कसे नेले याची यशकथा सांगितली. कालव्याला पाणी सोडण्याऐवजी पंपाने शेतकऱ्यांना देऊन मीटरद्वारे ठिबक केले पाहिजे असे मत त्यांनी मांडले . अभियंता दिगंबर डुबल यांनी गुंजवणी धरणाला कालवे न काढता थेट शेतात ठिबक सिंचन कसे केले जाणार आहे ,याची माहिती दिली . अशा स्वरूपाचा हा देशातील पहिला प्रयोग ठरणार आहे .
फेस्टिव्हल चे संयोजक सतीश खाडे यांनी प्रास्ताविक केले . यावेळी डॉ दीपक पोफळे ,अनघा रत्नपारखी ,हेमंत कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते

शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणेच आता वीज मंडळ कर्मचाऱ्यांना संरक्षण विद्युत विधेयक विधानसभेत मंजुर

0
मुंबई,-
शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणेच आता वीज मंडळाच्या तीनही कर्मचाऱ्यांना संरक्षण देणारे विद्युत विधेयक मंगळवारी विधानसभेने मंजूर केले. हे विधेयक ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत मांडले.
केंद्र शासनाच्या विद्युत अधिनियम 2003 मध्ये सुधारणा करणारे हे विधेयक आहे. वीज उपकेंद्र, निर्मिती केंद्र, विजेचे खांब उभारणे, मनोऱ्यांसाठी जमीन संपादन करणे, याशिवाय महावितरणचे कर्मचारी मीटर रिडिंग करतात, भारनियमन वीज चोरी पकडतात, थकबाकी वसुली ही कामे करताना थेट ग्राहकांशी कर्मचाऱ्यांचासंबंध येतो. अशावेळी लोंकाकडून अधिकारी कर्मचाऱ्यांवर हल्ल्याच्या घटना घडल्या आहेत. अधिकारी कर्मचाऱ्यांविरूध्द खोट्या केसेस दाखल होतात व कर्मचारी नाहक अडकतात. अशावेळी वीज मंडळ कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करताना प्राधिकृत अधिकाऱ्याच्या परवानगी शिवाय आरोपपत्र दाखल करता येणार नाही ही दुरूस्ती विद्युत नियमात करण्यासाठी हे विधेयक सादर करण्यात आले.
वीज कायदा 2003 मध्ये आरोपपत्र दाखल करताना प्रधिकृत अधिकाऱ्याची परवानगी घेण्याची तरतूद नसल्याने ही दुरूस्ती करण्यात आली. शासनाच्या कर्मचाऱ्यांवर आरोपपत्र दाखल करण्यासाठी त्या कर्मचाऱ्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याची परवानगी घ्यावी लागते. तोच नियम वीज मंडळाच्या कर्मचाऱ्यांना लावण्यासाठी हे विधेयक अणण्यात आले. 90 दिवसपर्यंत आरोपपत्र दाखल करण्यास प्राधिकृत अधिकाऱ्याने परवानगी दिली नाही तर नंतर आरोपपत्र दाखल करण्यासाठी परवानगी घेण्याची गरज राहणार नाही.
विद्युत अधिनियम 2003 येण्यापूर्वी भारतीय विद्युत कायादा 1910 अमलात होता. त्यातील कलम 56 नुसार लोक सेवकास गुन्ह्यामध्ये अटक करण्यापूर्वी राज्य शासनाच्या पूर्वपरवानगीची तरतूद होती. वीज कायदा 2003 मध्ये ही तरतूद नव्हती म्हणून ही तरतूद आता या कायद्यात विधेयकाद्वारे करण्यात आली आहे. या विधेयकावर आ. वीरेंद्र जगताप, आ. धैर्यशील पाटील, आ. बच्चू कडू, आ. शरद सोनेवणे, आ.हर्षवर्धन सकपाळ, आ. योगेश सागर यांनी आपली मते मांडली.

महावितरणच्या दोन महिला विद्युत कर्मचाऱ्यांना शिवीगाळ; गुन्हा दाखल

0

पुणे : थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई करणार्‍या महावितरणच्या दोन महिला विद्युत सहाय्यकांना अर्वाच्च व अश्लिल शिविगाळ केल्याचा प्रकार म्हाळसकर वाडी, तळेगाव दाभाडे येथे मंगळवारी (दि. 20) घडला. याप्रकरणी एका आरोपीविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी, की राजगुरुनगर विभाग अंतर्गत थकबाकीदार वीजग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरु आहे. तळेगाव दाभाडेमधील म्हाळसकर वाडी येथे महावितरणच्या विद्युत सहाय्यक सीमा वानखेडे व माधुरी इंगळे थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई करीत होत्या. यामध्ये रिद्धी सिद्धी मोबाईल दुकानाचाही थकीत वीजबिलांमुळे वीजपुरवठा खंडित करण्यात आला. त्याचा राग आल्याने आरोपी ओम यादव याने लाईट कनेक्शन कोणी कट करायला सांगितले असे विचारून आरडाओरड करीत अर्वाच्च व अश्लिल भाषेत शिविगाळ करून दमदाटी केली. याप्रकरणी तळेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलीसांनी आरोपी ओम यादवविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

जागतिक वन दिनानिमित्त वृक्ष लावगड विषयी पथनाटयाद्वारे जनजागृती

0

पुणे – सामाजिक वनीकरण व वनविभागाच्या वतीने जागतिक वन दिनानिमित्त मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीचे प्रांगणात पथनाटयाद्वारे वृक्षसंवर्धन, वृक्ष लागवड तसेच वन्य प्राणी व पशुपक्षी यांचे संरक्षण, विषयक महत्व या पथनाटयाद्वारे माहिती दिली व प्रभोधनात्मक कार्यक्रम संपन्न झाला.

या कार्यक्रमात शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या 50 कोटी वृक्ष लागवड मोहिमे अंतर्गत येत्या पावसाळयात 13 कोटी वृक्ष लागवडीचा धडक उपक्रमाची माहिती दिली व सर्व उपस्थितांना 13 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आवाहन करुन शासनामार्फत सुरु केलेल्या हरित सेना (Green Army) विषयी माहिती सांगून प्रत्येकाने www.greenarmy.mahaforest.gov.in या लिंकवर आपल्या नावाची नोंद करून सदस्य होण्यासाठी आवाहन केले. तसेच वन्य प्राण्यांचे रक्षण व पक्षी संवर्धनाचे महत्व या पथनाटयाद्वारे पटवून देण्यात आले. हा कार्यक्रम सामाजिक वनीकरण व वनविभागाच्या वतीने शाहीर श्री. एडगे सोलापूर, आणि त्यांचे सहकारी यांनी सादर केला. यावेळी विविध खात्यातील उपस्थित अधिकारी कर्मचारी यांनी उत्स्फुर्त दाद दिली.

      सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने विभागीय वन अधिकारी श्री. सालविठ्ठल, श्री.भालेराव तसेच सहायक वनसंरक्षक श्री. निकम व श्री. कांबळे, व वनक्षेत्रपाल श्रीम. गौरी बोराडे व वनक्षेत्र सर्वेक्षक श्री. रसाळ, तसेच सामाजिक वनीकरणाचे माहिती व प्रसिध्दी अधिकारी श्री. के. बी. वेदपाठक, व इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

‘मंत्र’ चा म्युझीक आणि टीजर लॉंच सोहळा उत्साहात संपन्न

0

ड्रीमबुक प्रॉडक्शन्सने वेदार्थ क्रिएशन्सच्या मदतीने तयार केलेला, हर्षवर्धन लिखित आणि दिग्दर्शित मराठी चित्रपट मंत्रलवकरच सिनेरसिकांच्या भेटीला येत असून त्याचा म्युझीक आणि टीजर लॉंच सोहळा मोठ्या उत्साहात मुंबईत पार पडला.

आजच्या काळातला अत्यंत संवेदनशील विषय मंत्रया चित्रपटात फारच संतुलितपणे मांडण्यात आला आहे. एका पुरोहिताचा मुलगा पैशासाठी वडिलांचा पेशा स्वीकारतो पण जेव्हा त्याच्या आयुष्यात कर्मकांडाला न मानणारी मुलगी येते तेव्हा मंत्रची कथा घडते. लेखक, दिग्दर्शक हर्षवर्धन यांनी मंत्रच्या माध्यमातून आजच्या तरुणाईचा अध्यात्मिक विषयावरचा गोंधळ नेमकेपणाने मांडला आहे.

या चित्रपटात अभिनेता सौरभ गोगटे आणि दीप्ती देवी प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत. अभिनेता पुष्कराज चिरपुटकर पुरोहिताच्या भूमिकेत दिसणार आहे तर ज्येष्ठ अभिनेते मनोज जोशी हे ही एका वेगळ्याच भूमिकेत रसिकांसमोर येणार आहेत. सिद्धेश्वर झाडबुके, सुनील अभ्यंकर, धीरेश जोशी, राजेश काटकर यांच्यासारख्या कसलेल्या कलाकारांसोबत शुभंकर एकबोटे आणि सुजय जाधव सारखे तरुण आणि नवे चेहरेही यात पहायला मिळतील. वृषाली काटकर, अनुराधा मराठे आणि शुभांगी दामले यांचीही कामं लक्षात राहतील अशी झाली आहेत.

मंत्रया चित्रपटला अविनाश विश्वजित या संगीतकार जोडीने संगीत दिले आहे. चित्रपटात एक वेस्टर्न बाजाचे गाणे, पुण्याची ओळख बनलेल्या ढोल ताशाचे एक गाणे आणि एक विरह गीत असे वेगवेगळ्या जॉनरचे संगीत ऐकायला मिळणार आहे. तसेच मंत्रच्या शीर्षक गीतासाठी विनया क्षीरसागर यांनी संस्कृत मध्ये गीत लिहिले आहे. अजय गोगावले, अवधूत गुप्ते, रोहित राऊत, धवल चांदवडकर आणि विश्वजित जोशी यांनी मंत्रसाठी पार्श्वगायन केले आहे. पार्श्वसंगीतात ३ संस्कृत काव्यासह पाश्चात्य आणि भारतीय संगीताचा उत्कृष्ठ मिलाफ जमवलेला आहे.

या चित्रपटाचे संकलन व स्पेशल इफेक्ट सचिन पंडित यांनी केले आहेत, तर कलादिग्दर्शन रजनीश कलावंत यांनी केले आहे. या चित्रपटात अत्यंत सुंदर लोकेशन्स वापरण्यात आले आहेत, यामध्ये पुण्यातील प्रसिद्ध नागेश्वर मंदिर, बलभीम मंदिर, सातारा जवळच्या लिंबगाव मंदिराचा सामावेश आहे.

पुण्याच्या  PIFF २०१८ (PUNE INTERNATIONAL FILM FESTIVAL) ला मंत्र ची निवड झाली होती. त्यावेळी प्रेक्षकांचा आणि समीक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. इफ्फीच्या ज्युरींनीही मंत्रच्या मांडणीला विशेष दाद दिली.

बहुचर्चित विषयावर वेगळ्या अर्थाने भाष्य करणारा मंत्रयेत्या १३ एप्रिल २०१८ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

बँक ऑफ महाराष्ट्रचे जुने मॅगस्ट्रिप कार्ड आता अधिक सुरक्षीत ईएमव्ही चीप कार्डासह

पुणे,   सुरक्षित आणि निर्धोक एटीएम याचबरोबर ऑनलाइन होणार्‍या व्यवहारांची विश्वसनीयता सुनिश्चित करण्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्र आता पूर्वी वितरित केलेल्या जुन्या मॅगस्ट्रिप कार्डाऐवजी नव्या आणि सुरक्षित ईएमव्ही प्रणालीचे कार्ड आपल्या सर्व ग्राहकांना बदलून देईल. या नव्या गुणवत्तेची कार्डस आपल्या सर्व ग्राहकांपर्यंत पोहचविण्यासाठी बँकेने विविध उपाययोजना केल्या असून मॅगस्ट्रिप कार्डधारकांच्या निदर्शनास कार्डबाबत सुधारणांचे बदल निदर्शनास आणून दिले आहेत आणि त्यांना नवीन ईएमव्ही प्रणालीचे कार्ड बदलून घेण्याचीदेखील विनंती केली आहे.

बँकेच्या कोणत्याही शाखेमधून बँकेचे ग्राहक नव्याने सुधारीत असलेली ईएमव्ही कार्डस बदलून घेऊ शकतात. यासाठी बँकेच्या जवळच्या शाखेमध्ये जाऊन एक अर्ज भरल्यास ग्राहकांना नवीन सुधारित ईएमव्ही कार्ड दिले जाईल. ग्राहकांनी नवे कार्ड स्वीकारल्यानंतर ताबडतोब चोवीस तासाच्या आत नव्याने दिलेले ईएमव्ही चिपसह असलेले डेबिट (एटीएम) कार्ड सक्रिय केले जाईल.

बँकेचे ग्राहक ही नेहमीबँक ऑफ महाराष्ट्रची प्राथमिकता असल्याने कार्ड बदलून देण्याच्या कार्यास प्राधान्य देण्यासंबंधी बँकेच्या सर्व शाखाना निर्देश दिले गेले आहेत. हे कार्य जलदगतीने पूर्ण करण्यासाठी आमच्या सर्व कर्मचार्‍यांना मार्गदर्शन दिले गेले असून फॉर्म भरल्यानंतर 20 मिनिटांमध्ये जुने कार्ड खात्रीपूर्वक बदलून देण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.

सर्व क्षेत्रीय आणि नोडल शाखांकडे असलेल्या उपलब्ध कार्डाची संख्या तपासून बँक वेळोवेळी अतिरिक्त कार्डे पुरविते. ग्राहकांना जुने कार्ड बदलून देण्याची प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी बँकेने किमान वेळेत कार्ड्स सक्रिय करण्याचा प्रयत्न केला असून बँकेची सर्व क्षेत्रीय कार्यालये / नोडल शाखांमध्ये पुरेसे कार्ड वेळेमध्ये उपलब्ध करून दिलेले आहेत.

बँक ऑफ महाराष्ट्र जुन्या चुंबकीय पट्टीच्या कार्डाऐवजी आता अधिक सुरक्षित कार्ड बदलून देण्याचे कार्य रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या दिशांनिर्देशांप्रमाणे करत आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेनी घालून दिलेल्या मुदतीमध्ये सर्व कार्डांच्या बदली पूर्ण करण्याच्या बँकेची योजना आहे.