पुणे- महापालिकेच्या पार्किंग पॉलिसीला विरोध करीत आज मनसेने महापौरांच्या गाडीला पे अँड पार्कचा स्टिकर लावून अनोख्या पद्धतीने आंदोलन केले.तर आंदोलकांची तोंडे वळताच भाजपच्या 2 नगरसेवकांनी महापौरांच्या आणि उपमहापौरांच्या मोटारीवरील हे पोस्टर्स काढून टाकले .
शहरातील खासगी वाहनांना रोखण्यासाठी आणि वाहतूक कोंडीचा तिढा सोडविण्यासाठी महापालिकेने संपूर्ण शहरभर पे अॅन्ड पार्क योजना आणण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला विरोध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सह्यांची मोहीम राबविण्यात आली. त्यानंतर आज मनसेने महापौर मुक्ता टिळक यांच्या गाडीला पे अँड पार्कचा स्टिकर लावून या योजनेला विरोध प्रकट केला. यावेळी मनसे नगरसेवक वसंत मोरे, माजी नगरसेविका रुपाली पाटील ठोंबरे तसेच मनसे कार्यकर्ते उपस्थित होते.