Home Blog Page 3171

संभाजी भिडे समर्थनार्थ मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारल्याने,मोर्चाचा मार्ग बदलला

0

पुणे-कोरेगाव-भीमा प्रकरणातील संभाजी भिडे गुरुजींवरील खोटे आरोप मागे घेण्यासाठी उद्या पुण्यात श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने आयोजित महामोर्चाला पुणे पोलिसांनी परवानगी नाकारली. शनिवारवाडा ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चाचा मार्ग होता. परंतु ऐन वेळी पोलिसांनी परवानगी नाकारल्याने मोर्चाचा मार्ग बदलल्याची माहिती श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे पुणे महानगर कार्यवाह प्रा.पराशर मोने यांनी काही माध्यमांना दिली.

सकाळी 10 वाजता श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी नदीपात्रातील ओंकारेश्वर मंदिराजवळून शनिवारवाडा आणि लाल महालापर्यंत चालत जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनंतर त्यांचे एक शिष्टमंडळ जिल्हाधिका-यांना निवेदन देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

संभाजी भिडे यांच्या सन्मानार्थ निघणाऱ्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी देऊ नये – संभाजी ब्रिगेड

0

पुणे-कोरेगाव-भीमा प्रकरणातील संभाजी भिडे गुरुजींवरील खोटे आरोप मागे घेण्यासाठी उद्या पुण्यात श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने महामोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाला पोलिसांनी परवानगी देऊ नये अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने पोलीस आयुक्तांकडे करण्यात आली आहे.

संभाजी भिडे गुरुजींवरील खोटे आरोप मागे घेण्यासाठी उद्या पुण्यात श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने महामोर्चा काढण्यात येणार आहे. शनिवारवाडा येथून सकाळी साडेदहा वाजता हा मोर्चा सुरु होणार असून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात येणार आहे. जिल्हाधिका-यांना निवेदन दिल्यानंतर या मोर्चाची सांगता होणार आहे.

मात्र या मोर्चाला परवानगी देण्यात येऊ नये असे निवेदन संभाजी ब्रिगेडच्या वतीने पोलीस आयुक्तांना देण्यात आले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, 1 जानेवारी रोजी भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त लाखो लोकांच्या जनमुदायावर मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे यांच्या समर्थकांनी हल्ला करून दंगल घडवून आणली होती. समाजामध्ये जाणीवपूर्वक तेढ निर्माण करून जाती जातीमध्ये विष पसरविण्याचे काम समस्त हिंदू आघाडी आणि शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे प्रमुख मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे यांनी केले आहे. म्हणून त्यांच्या सन्मानार्थ बुधवारी (दि. 28) पुण्यात निघणाऱ्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारावे अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली आहे. या निवेदनावर जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे आणि संघटक मोनिका निंबाळकर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

टाटा स्काय वर्ल्ड स्क्रीनच्या माध्यमातून निवडक जागतिक सिनेमे आणि शो भारतात उपलब्ध

मुंबई – टाटा स्काय या भारतातील आघाडीच्या सर्वसमावेशक व डीटीएच आणि ओटीटीद्वारे कंटेट वितरित करणाऱ्या कंपनीने आंतरराष्ट्रीय मनोरंजनातील क्षेत्रातील निवडक कंटेट लाँच केला आहे.

अरूण उन्नी, मुख्य कंटेट अधिकारी – टाटा स्काय म्हणाले, ‘टाटा स्काय वर्ल्ड स्क्रीनचे लाँच करून आम्ही सिनेमा आणि टीव्हीप्रेमींना ६५० तासांचे मिळून उत्तम दर्जाचे मनोरंजन उपलब्ध करत आहोत. त्यात केवळ हॉलिवूडच नव्हे, तर संपूर्ण जगभरातील सर्वोत्तम गोष्टींचा जाहिरातींशिवाय आनंद घेता येणार आहे. आमचे विश्लेषण असे सांगते, की मनोरंजनाचे प्रकारांची आवड बदलत आहे आणि प्रेक्षकांना आता जास्तीत जास्त उत्सुकतापूर्ण व वैविध्यपूर्ण आशय हवा असतो तसेच त्यांना भाषेचा अडसर जाणवत नाही. आमच्या निवडक यादीत जगभरातील काही अतिशय लोकप्रिय आणि समीक्षकांनी गौरवलेले आणि आतापर्यंत भारतातील टीव्हीवर कधी न दर्शवलेले सिनेमे व टीव्ही शोजचा समावेश आहे.’

टाटा स्कायने सुरू केलेल्या या आणखी एका अनोख्या उपक्रमाअंतर्गत पहिल्यांदाच एखाद्या डीटीएच व्यासपीठाद्वारे जाहिरात मुक्त सेवा दिली जाणार आहे, ज्यामध्ये नोंदणीदारांना २४x७ उपलब्ध असलेल्या, जगभरातील मालिका व सिनेमे पाहाता येतील. विशेष म्हणजे, यातील बहुतेक आशय यापूर्वी भारतातील टीव्हीवर दाखवण्यात आलेला नाही. हा आशय नोंदणीदारांना त्यांच्या टीव्ही सेटवर एसटीबी, टाटा स्काय मोबाइल अप आणि टाटा स्कायचे वेब अपद्वारे (watch.tatasky.com) पाहाता येईल.

कोणत्याही अतिरिक्त इंटरनेट जोडणीशिवाय टाटा स्काय वर्ल्ड स्क्रीन दरमहा केवळ ७५ रुपयांत नोंदणीदारांसाठी उपलब्ध होणार असल्यामुळे ग्राहकांना वाजवी दरांत अभिनव आशय पाहाता येईल. हा कंटेट मोठ्या पडद्यासोबतच मोबाइल किंवा लॅपटॉपवरही उपलब्ध होणार आहे.

टाटा स्काय वर्ल्ड स्क्रीन – कंटेट

 टाटा स्काय वर्ल्ड स्क्रीनमध्ये वेगवेगळ्या भौगोलिक प्रदेशांतील आणि भाषांतील (अरेबिक, रशियन, स्पॅनिश, बेल्जियम, इस्त्राएल, क्युबा, जर्मन, फ्रेंच, इटालियन, पोर्तुगीज, हिंदी, जपानी, चीनी आणि कोरियन) प्रमुख मनोरंजनाचा समावेश असेल. इंग्रजीमध्ये नसलेल्या कंटेटसाठी उपशीर्षके देण्यात येतील, तर काहींचे इंग्रजीमध्ये भाषांतर केले जाईल.

सिनेमांमध्ये हॉलिवूडच्या काही आघाडीच्या स्टार्सचे सिनेमे, परिचित फ्रँचाईझी तसेच आंतरराष्ट्रीय भाषांतील निवडक भाषा, आशय आणि सिनेमॅटिक कौशल्यांसाठी प्रसिद्ध असलेले सिनेमे, अक्शनपट, कोरिओग्राफी आणि स्टंट्ससाठी प्रसिद्ध असलेले सिनेमे यांचा समावेश आहे.

ड्रामा सीरीजमध्ये समीक्षकांनी गौरवलेले ब्रिटिश, हिब्रू, स्पॅनिश, इटालियन आणि कॅनेडियन रहस्य, थ्रिलरपट तसेच नॉयरपट आणि काही आंतरराष्ट्रीय मालिकांचा समावेश आहे.

अशाप्रकारे वर्ल्ड स्क्रीन टाटा स्काय नोंदणीदारांना जगभरातील आशयसंपन्न सिनेमे आणि टीव्ही मालिका त्यांच्या सोयीनुसार, पाहिजे तेव्हा आणि टीव्ही, लॅपटॉप किंवा मोबाइलवर पाहाता येणार आहेत.

टीव्ही सीरीज बॉक्स सेट्स प्रीमियर्समध्ये प्रसिद्ध थ्रिलर्स वॉलांडर, हॅपी व्हॅली, कोड ३७, टीम चॉकलेट, प्रिझनर्स ऑफ वॉर आणि बेबीलॉन बर्लिन यांचा समावेश आहे. दरमहा जागतिक सिना क्षेत्रातील दोन प्रीमियर्सही पाहायला मिळतील. ऑपरेशन क्रोमाइट आणि डेसिआर्तो

अरूण उन्नी म्हणाले, ‘आता नोंदणीदारांना जगभरतील मनोरंजन, सर्वोत्तम कथांचा भाषेच्या अडथळ्याशिवाय मनसोक्त आनंद घेता येईल.’

टाटा स्कायबद्दल

टाटा स्काय लिमिटेड (टाटा स्काय) हे टाटा सन्स आणि ट्वेंटीफर्स्ट सेंच्युरी फॉक्स यांच्यातील संयुक्त भागिदारी आहे. २००१ मध्ये सुरू झालेले आणि २००६ मध्ये सेवा लाँच केलेले टाटा स्काय हे भारतातील आघाडीचे कंटेट वितरण व्यासपीठ असून ते पे टीव्ही आणि ओटीटी सुविधेद्वारे आपल्या सेवा देते. जगभरातील सर्वोत्तम आशय परवडणाऱ्या किंमतीत, कोठेही, कोणत्याही वेळेस आणि कोणत्याही स्क्रीनवर उपलब्ध करण्याच्या हेतूने लाँच करण्यात आलेले टाटा स्काय हे आपल्या विविध उत्पादनांसह देशातील नोंदणीदारांचा टीव्ही पाहाण्याचा अनुभव समृद्ध करणारे पहिले आहे. एचडी सेट टॉप बॉक्स क्षेत्रात प्रवर्तक ठरलेल्या टाटा स्कायने बाजारपेठेतील लक्षणीय हिस्सा मिळवला आहे. कंपनी सातत्याने आपल्या व्यासपीठावर वेगवेगळ्या प्रकारच्या आणि भाषांतील चॅनेल्सचा समावेश करून प्रेक्षकांसाठी नवा आशय पुरवत आहे. सध्या टाटा स्कायचा दोन लाख शहरांत विस्तार झाला असून देशभरात त्यांच्या १८ दशलक्ष जोडण्या आहेत.

काही आकर्षणे

वर्ल्ड ड्रामा सीरीज

टीम चॉकलेट – बेल्जियमची फ्लेमिशमध्ये असलेली ही हृदयस्पर्शी, भावनिक आणि प्रेरणादायी छोटी मालिका जेस्पर व्होलेमान्स नावाच्या डाउन सिंड्रोमने ग्रस्त असलेल्या सूत्रधाराची कहाणी आहे, जो एका बेल्जियन चॉकलेट फॅक्टरीमधल्या टीना दर्बानी नावाच्या मुलीच्या प्रेमात पडतो. बेकायदेशीर वास्तव्याच्या कारणावरून टीनाला कोसोवोला परत पाठवले जाते. मग जेस्पर आणि त्याचे सहकारी टीनाच्या शोधात निघतात. वाटेत त्यांना वेगवेगळ्या आव्हानांचा सामना करावा लागतो, ज्यातून त्यांच्या कक्षा रूंदावतात. दरम्यान त्यांना कल्पनाही नसते, की त्यांची आवडीची जाग म्हणजे त्यांच्या नोकरीचे ठिकाण एका लोभी परदेशी गुंतवणुकदाराशी लढा देत आहे. पुरस्कार – विविध पुरस्कार – सर्वोत्तम काल्पनिक, नामांकन – सीरीज मॅनिया – पॅनोरमा इंटरनॅशनल

हॅपी व्हॅली – सर्वोत्तम ड्रामा विजेते, सर्वोत्तम अभिनेता, सर्वोत्तम लेखक असे बाफ्ता पुरस्कार मिळवणारा हॅपी व्हॅली हा प्रसिद्ध, सहा भागांचा ड्रामा आहे, ज्यामध्ये पूर्णपणे फसलेलं अपहरण नाट्य आणि वेळेशी स्पर्धा करत अन गलांगर या अपहृत, छोट्या मुलाला शोधण्याचे साहस करणारी तरुणी कॅथरिन पाहायला मिळते. या मालिकेनं रायडर्स गिल्ड ऑफ ग्रेट ब्रिटन (२०१४) पुरस्तकार, बेस्ट लाँग फॉर्म टीव्ही ड्रामा पुरस्कार तसेच सर्वोत्तम टीव्ही ड्रामासाठी क्राइम थ्रिलर पुरस्कार, युके (२०१४) मिळाला आहे.

 कोड ३७ – इंग्रजी उपशीर्षके असलेली फ्लेमिशमधील ही बेल्जियन मालिका हॅना माइस नावाच्या स्त्री गुप्तहेरावर आधारित आहे. हॅना लैंगिक अत्याचाराचा छडा लावणाऱ्या एका पोलिस दलाचे नेतृत्व करत असते. कथेचा लहान पण महत्त्वाचा भाग म्हणजे, हॅनाचा स्वतःचा शोध आहे. ती खूप पूर्वी आपल्या घरात झालेली चोरी आणि आईवर झालेल्या बलात्काराचाही छडा लावत असते.

वॉलांडर – अतिशय प्रसिद्ध, सर्वोत्तम अभिनयाचा समावेश असलेली आणि ठाव घेणाऱ्या दृश्यांचा समावेश असलेली, हेनिंग मानकेल यांनी लिहिलेल्या स्वीडीश रहस्यकथेवर आधारित असलेली ही मालिका गुप्तहेर कर्ट वॉलांडरचा प्रवास दाखवते. दक्षिण स्वीडनमध्ये घडत असलेल्या विचित्र गुन्ह्यांची उकल करताना त्याला स्वतःच्याही काही समस्यांशी लढा द्यावा लागत असतो. ही मालिका चार वैशिष्ट्यपूर्ण फिल्म्सची बनलेली आहे – त्यातील प्रत्येक रहस्यमय प्रवासाचं खून, फसवणूक आणि चक्रावणाऱ्या गुन्ह्यात रुपांतर होत असतं. कर्ट वॉलांडर या निराश झालेल्या माणसाचा प्रवास जाणून घ्या, जो निसर्गरम्य दाक्षिणात्य स्वीडनच्या भवतीभवती वाढच्या हिंसेच्या विरोधात संघर्ष करतो. या मालिकेनं पुढील पुरस्कार जिंकलेले आहेत – बाफ्ता पुरस्कार (२००९) – सर्वोत्तम ड्रामा मालिका, सर्वोत्तम अस्सल टीव्ही संगीत, सर्वोत्तम निर्मिती रचना. ब्रॉडकास्टिंग प्रेस गिल्ड पुरस्कार (२००९) – सर्वोत्तम अभिनेता आणि बाफ्ता पुरस्कार (२०१०) सर्वोत्तम अभिनेता.

जागतिक सिनेमे

 ऑपरेशन क्रोमाइट या २०१६ मध्ये आलेल्या दक्षिण कोरिया युद्धावर आधारित सिनेमाचं दिग्दर्शन जॉन. एच. ली. यांनी केलं असून तो इनचॉनच्या लढाईत घडलेल्या खऱ्या घटनांवर आधारित आहे. लियाम नीसन, जंग- जे ली, बिओम सु ली यांनी त्यात काम केलं आहे. अमेरिकी जनरल डग्लस मॅकआर्थर (लियान नीसन) कोरियन परवाना कार्यालयातून आठ सदस्यांची तुकडी एका गुप्त मिशनसाठी पाठवतो. दक्षिण कोरियन नेव्ही लेफ्टनंट (ली जंग- जे) याच्या नेतृत्वाखाली ही तुकडी ऑपरेशन एक्स- रे पार पाडण्यासाठी उत्तर कोरियाई सीमेपार जाते. मॅकआर्थरला खतरनाक इनचॉन लँडिंग ऑपरेशन करण्यासाठी हे प्रतिष्ठित मिशन यशस्वी होणं अतिशय आवश्यक असतं.

द फॉरबिडन किंग्डम हा सिनेमा रॉब मिन्कॉफ यांनी दिग्दर्शित केला असून त्यात जॅकी चॅन, जेट ली आणि मायकेल अँगारानो यांनी काम केलं आहे. ही अमेरिकी टीनएजरची गेष्ट आहे, ज्याला हाँगकाँग सिनेमा आणि कुंग फूचं वेड असतं. त्यातूनच त्याला चीनमधल्या एका जुन्यापुराण्या वस्तूंच्या दुकानात जबरदस्त वस्तू मिळते. ही वस्तू म्हणजे मंकी किंग नावाच्याएका चीनी राजाचं सस्त्र असते. कालौघात हरवलेली एक वस्तू हातात आल्यावर हा टीनएजर अनपेक्षितपणे जुन्या चीनमध्ये जाऊन मार्शल आर्ट्समध्ये पारंगत योद्धांच्या तुकडीमध्ये जाऊन पोहोचतो. ही तुकडी कैदेत झालेल्या मंकी किंगला मुक्त करणाच्या अतिशय धोकादायक कामगिरीवर जाणार असते.

ऑटोमाटा हा २०१४ मध्ये आलेला स्पॅनिश- बल्गेरियन, काल्पनिक विज्ञान कथेवर आधारित अक्शनपट असून त्यात अँतानिओ बँदेरास यांनी काम केलं आहे. सिनेमाचं दिग्दर्शन स्पॅनिश दिग्दर्शन गेब इब्नेझ यांनी केलं असून त्याचं लेखन इब्नेज तसेच इगॉर लेगारेट्टा व जॅव्हियर सँचेझ डोनेट यांनी एकत्रितपणे केलं आहे. बँदेरास यांसह सिनेमात बर्गेट सोरेन्सान, मेलनी ग्रिफित, डिलन मॅकडॉरमॉट, रॉबर्ट फ्रॉस्टर आणि टिम मॅतइनर्नी यांनी काम केलं आहे. जॅक व्हॅकन (अँतानिओ बँदेरास) हा आरओसी रोबोटिक्स कॉर्पोरेशनचा एक विमा एजंट असतो जो रोबोजनी स्वतःमध्ये बदल न करण्याचा नियमभंग करणाऱ्या रोबोट्सच्या केसेसचा तपास करत असतो. या तपासातून त्याला अशा गोष्टींचा शोध लागतो ज्यामुळे मानवजातीच्या भविष्यावर परिणाम होणार असतो.

डेसिअर्तो हा २०१५ मध्ये आलेला मेक्सिकन- फ्रेंच थ्रिलरपट आहे ज्याचं सहलेखन आणि दिग्दर्शन जोनास कुआरान यांनी केलं आहे. कुआरान यांनी आपले वडील अल्फान्सो आणि काका कार्लोस यांच्यासह सिनेमाची निर्मिती केली असून त्याचं वितरण एसटीएक्स फिल्म्सने केलं आहे. या सिनेमात गेल गार्सिया बर्नाल (कार्यकारी निर्माती) आणि जेफ्री डीन मॉर्गन यांनी काम केलं आहे. हा सिना २०१५ च्या टोरँटो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्येही दाखवण्यात आला होता, जिथे त्याला खास सादरीकरणासाठी प्राइज ऑफ इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ फिल्म क्रिटिक्स (एफआयपीआरईएससीआय) मिळाले होते आणि ८९ व्या अकादमी पुरस्कारांमध्ये परकीय भाषेतील सर्वोत्तम सिनेमा विभागासाठी मेक्सिन प्रवेश म्हणून त्याची निवड करण्यात आली होती. मात्र, या सोहळ्यात सिनेमाला पुरस्कार मिळाला नाही.

 

महावितरणची ऑनलाईन अत्याधुनिक सुविधा वीजग्राहक, कर्मचाऱ्यांसाठी – कर्मचारी पोर्टल व डॅशबोर्डची सुविधा सर्व राज्यभर

0

मुंबई-ग्राहकांना सर्वोत्तम सेवा देण्यासाठी महावितरणने कर्मचाऱ्यांना कर्मचारी  पोर्टल व डॅशबोर्डच्या माध्यमातून दैनंदिन कामकाजासाठी बहुतांश आवश्यक सुविधा ऑनलाईन उपलब्ध करून दिल्या असून त्यामुळे महावितरणचे संपूर्ण कामकाज अधिक प्रभावी व गतीशील होत आहे.

 डिजिटल महाराष्ट्र ही संकल्पना प्रत्यक्षात आणावयाची असेल तर जास्तीत जास्त सेवा सुविधा ऑनलाईन होणे अत्यावश्यक आहे. ही बाब लक्षात घेऊन महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक  संजीव कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली महावितरणने ग्राहकांसह आपल्या कर्मचाऱ्यांनाही जास्तीत जास्त सेवा ऑनलाईन उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यात ग्राहक व कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र उपयुक्त मोबाईल ॲप यापूर्वीच उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्याशिवाय आता कर्मचाऱ्यांना आपले दैनंदिन कामकाज ऑनलाईन करता यावे यासाठी कर्मचारी पोर्टल व डॅशबोर्डची महत्वपूर्ण सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

 कर्मचारी पोर्टलमुळे महावितरणच्या कर्मचाऱ्यांना कार्यालयीन कामकाजासाठी सर्व वैयक्तिक सुविधा ऑनलाईन उपलब्ध झाल्या आहेत. यात पगारपत्रक, आयकर तपशील, पदोन्नती व उच्चवेतनश्रेणीच्या लाभाबाबतची कार्यवाही, विभागीय परीक्षेचा अर्ज व विविध प्रशिक्षणे, भविष्य निर्वाह निधीची माहिती, विविध भत्यांसाठी अर्ज व मंजुरी, रजेचा अर्ज व मंजुरी, शिस्तभंग कारवाईबाबतची माहिती, सेवाज्येष्ठता यादी, बदली विनंती अर्ज इत्यादी सुविधा कर्मचारी पोर्टलमध्ये  उपलब्ध आहेत. या पोर्टलमधून केलेल्या अर्जावर वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही विहित मुदतीत ऑनलाईन कार्यवाही करावी लागणार आहे. ईलायब्ररीची सोय कर्मचारी पोर्टलमधून करण्यात आली असून त्यामध्ये महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ व महावितरण कंपनीमध्ये कर्मचाऱ्यांच्या बाबतीतील सर्व प्रशासकीय परिपत्रके, सेवाविनियम उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत.  कर्मचाऱ्यांना त्यांच्या समस्यांची सोडवणूक या पोर्टलच्या माध्यमातून करता येणार आहे. कर्मचारी पोर्टलमध्ये लॉग ईन करताना कर्मचाऱ्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर ओटीपी पाठवून पोर्टलच्या सुरक्षित वापरासाठी खातरजमा केली जाते.  कर्मचारी पोर्टलमध्ये कर्मचाऱ्यांना कार्यालयीन कामकाजासंबंधी विविध नोटीफिकेशन्स उपलब्ध होतात. त्याद्वारे उपलब्ध अचूक माहितीच्या आधारे त्वरीत निर्णय घेणे शक्य होते.

महावितरणच्या कर्मचाऱ्यांसाठी डॅशबोर्डची महत्वपूर्ण ठरणारी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून यात विविध माहिती ऑनलाईन व एकत्रितपणे उपलब्ध हो आहे. महावितरणच्या वीजग्राहकांची आकडेवारी व यादी, ग्राहकांच्या तक्रारी व त्याचे निवारण, त्यांना देण्यात आलेले वीजबील, ग्राहकांनी केलेला देयकाचा भरणा, जमा झालेली रक्कम, थकबाकी या सर्वांची माहिती व या माहितीचे विश्लेषण महावितरणच्या सर्वच कार्यालयांमध्ये ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आली आहे. या प्रणालीमुळे महावितरणची दैनंदिन कामकाजासाठी आवश्यक सर्व माहिती अचूक व एकसमान उपलब्ध राहणार आहे. त्यामुळे विविध विभागातून येणाऱ्या माहितीत त्रुटी राहणार नाही व ती एक समान राहील. त्यामुळे या माहितीवर तात्काळ विचार करून अचूक निर्णय होईल व परिणामी या निर्णयाची प्रभावी अंबलबजावणी करता येईल. डॅशबोर्डवर उपलब्ध माहिती व विश्लेषणाचा उपयोग करून महावितरणच्या राज्यभरातील कार्यालयांना आपापल्या कार्यक्षेत्रातील वितरण वाणिज्यिक हानी, थकबाकी यासह इतर विविध त्रुटींवर अधिक लक्ष केंद्रित करून त्यावर परिणामकारक उपाययोजना करता येणे शक्य होणार आहे.

महावितरणने मागील वर्षांत ग्राहक व कर्मचाऱ्यांसाठी मोबाईल अँपची सुविधा उपलबध करून दिली. या अँपमुळे कामकाजाला गतीशीलता मिळाली आहे. कर्मचारी पोर्टल व डॅशबोर्ड या सुविधांमुळे कर्मचाऱ्यांना त्यांचे दैनंदिन कामकाज अधिक प्रभावी व सुलभ करता येत असून त्याद्वारे ग्राहकांनाही सर्वोत्कृष्ट सेवा उपलब्ध होत आहेत.

वृक्ष लागवडीसाठी जागा निश्चित करुन तात्काळ माहिती सादर करावी -जिल्हाधिकारी सौरभ राव

0

पुणे, राज्य शासनाच्या 13 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत वृक्षारोपण करण्यासाठी अद्याप जागा निश्चित केलेली नसल्यास येत्या दोन दिवसात हे काम पूर्ण करुन याबाबतची माहिती तात्काळ जिल्हा प्रशासनाला सादर करावी, अशी सूचना जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी दिली.

राज्य शासनाच्या 13 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमाच्या अनुषंगाने पुणे जिल्ह्याची आढावा बैठक जिल्हाधिकारी श्री. राव यांच्या अध्यक्षतेखाली झाली, यावेळी त्यांनी ही सूचना केली. यावेळी प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी दिनेश डोके, पुणे विभागाच्या उपवनसंरक्षक ए. श्रीलक्ष्मी, रोजगार हमी योजना शाखेचे उपजिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण यावेळी उपस्थित होते.

श्री. राव म्हणाले, वृक्ष लागवड करण्याबाबत वेळेत योग्य  ते नियोजन करावे. सर्व विभागप्रमुखांनी या कामास प्राधान्य देवून झालेल्या कामांचा दैनंदिन आढावा घ्यावा. त्याचबरोबर नियोजित कामांची माहिती द्यावी. वृक्षारोपणाचा कार्यक्रम जिल्हयात यशस्वीपणे पार पाडण्यासाठी या कामी विविध कंपन्या, संस्थांच्या आवारात रोपे लावण्यासाठी उद्योजकांचीही मदत घ्यावी. तसेच जिल्हयातील नद्या व उपनद्यांच्या दोन्ही बाजूंचे किनारे, रेल्वे मार्ग व रस्त्याच्या बाजूच्या जागांची उपलब्धता लक्षात घेऊन ही ठिकाणे निश्चित करावीत.

  यापूर्वी करण्यात आलेल्या वृक्ष लागवडीतील जीवंत रोपांची आकडेवारी  मोबाईल ॲपव्दारे कशी सादर करावी याचे प्रशिक्षण सादरीकरणाव्दारे देण्यात आले. वृक्षारोपण कार्यक्रमांतर्गत सद्यस्थितीचा विभागनिहाय आढावा यावेळी उपजिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण यांनी घेतला. या बैठकीस केंद्र सरकार व राज्यशासकीय कार्यालयांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

सामान्य आणि मध्यमवर्गीयांच्या जीवनमानाकडे दुर्लक्ष करणारा कारभार …

पुणे-गेली काही वर्षांपासून बेसुमार वाढत चाललेल्या महापालिकेच्या हद्दी म्हणजे सीमा रेषा आणि त्याबरोबर आयुक्तांनी मांडलेल्या योजना आणि त्यांचा व्यवस्थित आढावा घेतला तर ..पुणेकरांनो सावधान, तुम्हाला पुण्यात रहाणे होईल मुश्कील ..असा इशारा मिळाल्याशिवाय रहाणार नाही .
याचे कारण वाढणारे महाभयंकर कर आणि त्याविरुद्ध घटत चाललेले रोजगार असेच असणार आहे . पुणे हे देशातील सर्वाधिक महागडे शहर बनण्याकडे वाटचाल करीत आहे. त्यामुळे कितीही अत्याधुनिक सुविधा शहरात निर्माण झाल्या तरी सामन्य माणसाला येत्या 3 वर्षात पुण्यात रहाणे मुश्कील होणार आहे हे निश्चित . यास केवळ भाजप हा सत्ताधारी पक्षच जबाबदार नसेल तर सातत्याने जनतेला  कर्माची फळे भोगू द्या असे म्हणत सध्या स्वतः च कर्माची फळे भोगत असलेले विरोधी पक्ष देखील जबाबदार असल्याचे स्पष्ट झाल्याशिवाय रहाणार नाही .
हे कसे ..? तर पहा .. आताच घराघरात पोहोचण्यासाठी धड्कलेली पार्किंग पॉलीसी .. सध्या संपूर्णपणे यशस्वी झालेली नसली तरी हि तिची टांगती तलवार तुमच्या डोक्यावर कायम आहे ,शिवाय येत्या 2 वर्षात तुमच्या घरातील पाण्याच्या नळाला मीटर लावण्यात येणार आहे . म्हणजे पाणी ही तुम्हाला आता मोजून मापून वाढीव  पैका देवूनच मिळेल अशा  परिस्थितीचे बीजे आताच रोवून ठेवली आहेत .एकीकडे पावलोपावली जीएसटी व अन्य कर तुम्ही बाहेर भरत असताना पाणी आणि पार्किंग या दोन गोष्टींनी पुणेकर हैराण होणार तर आहेतच. बरे हे सारे कर तुम्ही आनंदाने भराल देखील ..पण केव्हा जर तुमची कमाई त्याप्रमाणात होणार असेल ..तुमच्या युवा पिढीला त्या पद्धतीत रोजगार निर्माण होणार असेल तर … पण अशा पद्धतीने पुण्यातील युवा पिढीला भक्कम रोजगार देणाऱ्या कोणत्याही योजना नाहीत . उलट ठेका पद्धतीने कमी म्हणजे अगदी तुटपुंज्या वेतनावर तेही कधीही रोजगार बंद होऊ शकेल अशा स्वरूपाचा रोजगार सध्या उपलब्ध होतो आहे . ज्यातून कोणीही आपले भवितव्य निश्चित करू शकत नाही .जी महापालिका तुम्हाला पाणी मीटरने मोजून मापून देऊन त्यापोटी अमाप पैका वसूल करणार आहे त्याच महापालिकेत कामाची आवश्यक्यता असताना अधिकृतपणे कर्मचारी घेण्याऐवजी अनधिकृतपणे ७३ कामगार ठेवून सर्व कामगार कायदे धाब्यावर बसविण्यात आलेले आहे .म्हणजेच ‘बाहेरील ‘कमी पैशात कधीही ‘चल घरी जा ‘ अशा पद्धतीने कामावर ठेवून महापालिका युवा पिढीचे भविष्य बरबाद करीत आहे .ज्यांनी कारवाई करायची त्यांनीच हा पराक्रम चालविला आहे , किंवा त्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करीत आहेत असे म्हणावे लागेल अशी गेली 1 वर्षापासून स्थिती आहे . जागा असून त्या अधिकृत भरत नाही , आणि मेट्रोसिटी …सारख्या स्मार्ट सिटीचा ढोल वाजविणाऱ्या या महापालिकेला पारितोषिकेही मिळत आहेत हे विशेष …
पाण्याच्या नळाला मीटर लावण्याची कागदोपत्री व्यवस्था आता पूर्ण झाली आहे . १५ ते २० वर्षापूर्वी न्यायालयाने महापालिकेने सर्व भागात समान पाणीपुरवठा करा असे आदेश दिले होते . ते तर अंमलात आणले नाहीत पण ते अंमलात आणायचे म्हणून २४ बाय 7 या योजनेचा घाट घातला गेला . खरे तर पुण्याला आवश्यक तेवढा पाणीपुरवठा ,आवश्यक त्या त्या वेळेत व्हावा हीच त्याम्गील न्यायालयाची भूमिका होती . पण त्या साठी २४ तास पाणी पुणेकरांना द्यावे असे स्वप्न दाखवून काही हजार कोटीचे टेंडर काढले गेले ..अर्थात ते वादग्रस्त ठरल्यानंतर सुरुवातीचे ते टेंडर सुमारे 1 हजार कोटी ने अधिक असल्याचे स्पष्ट झाले .इथेच या योजनेचा मतितार्थ आणि उद्दिष्ट्य लक्षात यायला हवे होते. शिवाय नळाला मीटर लावायचे होते. आणि आता या योजनेच्या कामासाठी सर्वत्र खोदाई सुरु झाली आहे . या योजनेचे काम हि सुरु झाले आहे .म्हणजे किमान २०२० च्या पालिकेच्या अर्थ संकल्पात मीटर ने पाणी घेण्याची तरतूद पुणेकरांना दिसणार आहे .एकीकडे अशा पद्धतीने पाण्यासाठी घराघरातून पैसे आणि तोपर्यंत पार्किंग पॉलीसीचा अजगर घराघरापर्यंत पोहोचलेला असणार आहे .पेट्रोल , डीझेल सह अन्य कर पुणेकर भरतात किती ? आणि प्रत्यक्षात त्यांची कमाई होते किती याचा हिशेब ठेवणे पुणेकरांसाठी गरजेचे होणार आहे . हे सारे कर भरून पुणेकर आनंदी जीवन जगू शकले असते जर त्यांना कायमस्वरूपी हमी देणारा चांगला रोजगार उपलब्ध झाला असता तर …पण ती देखील परिस्थिती दिसत नसल्याने २०२० नंतर पुणेकरांचे जीवन खडतर होणार काय ? असा प्रश्न आज उपस्थित झाल्याशिवाय रहाणार नाही .
अर्थात २०१९ ला निवडणुका आल्याने हा खडतर काळ थोडा पुढे ढकलला जाईल . भाजप च काय कोणीही सत्तेवर आले तरी पुणेकरांना या परिस्थितीचा सामना करावा लागेल .  त्यामुळे २०१९ च्या निवडणुकीत पुणेकरांनी जागृतपणे नव्या सुविधा द्या , हवे तर कर घ्या पण त्याप्रमाणात रोजगार असेल तरच कर देवू अशी ठाम भूमिका घेण्याची गरज निर्माण होणार आहे .
वाढती वाहनसंख्या , वाढती लोकसंख्या ,वाढता विस्तार या शहराला नेणार  कुठे ? शहराला ,शहरांच्या सीमारेषांना मर्यादा असणार आहेत कि नाही ? या प्रश्नांचा विचार न करता शहराचे होणारे अत्याधुनूकीकरण हे शहराच्या पर्यावरणाचे आणि शहराच्या मध्यमवर्गीय सामान्य नागरिकांचे रक्षण करणार आहेत काय ? असे मुख्य प्रश्न आहेत .  मध्यमवर्गीय सामान्य नागरिकांचे रक्षण होणार नसेल, त्याचे जीवनमान सांभाळले जाणार नसेल  तिथे खूप आधुनिकीकरण होवून तरी काय उपयोग .. असा सवाल निश्चित केला जाणार आहे. त्यामुळे निव्वळ आधुनिकिकरण असलेल्या शहरापेक्षा सामान्य  आणि मध्यमवर्गीय नागरिकांच्या जीवनमानाची काळजी घेणारे शहर बनणे महत्वाचे ठरणार आहे .तेव्हा हे शहर आनंददायी शहर म्हणून दिसणार आहे .

जेव्हा सर्वपक्षीय आक्रमक होतात …

0

येरवडा रुग्णालयातील ‘त्या ‘ डॉक्टरवर निलंबनाची कारवाई .
पुणे-डॉक्टारांच्या हलगर्जीपणामुळे प्रसुतीसाठी आलेल्या महिलेचा व बाळाचा मृत्यू झालाहि घटना पालिकेच्या प्रशासनाला लज्जास्पद असल्याचा मुद्दा आज पालिकेच्या मुख्य सभेत नगरसेविका अश्विनी लांडगे यांनी उपस्थित केला आणि सर्वच नगरसेवकांनी याप्रकरणी संताप व्यक्त करत संबंधित डॉक्टरवर त्वरित कारवाई करण्याची मागणी केली . सभागृहातील सर्व पक्षीयांनी घेतलेला आक्रमक पवित्रा पाहून अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी सभेतच ‘हलगर्जीपणा करणाऱ्या त्या डॉक्टर ‘चे निलंबन जाहीर केले.

याप्रकरणी असंख्य नगरसेवकांनी आपापल्या संतापजनक भावना या घटनेमुळे व्यक्त करत आरोग्य खात्याच्या कारभारावर ताशेरे ओढले … या पैकी काही नगरसेवकांची मनोगते आमच्या फेसबुक च्या https://www.facebook.com/MyMarathiNews/ या पेजवर लाइव्ह केलेली आपण पाहू -ऐकू शकाल ..

त्यानंतर नेमका सर्वपक्षीय नगरसेवकांनी एकत्रित आक्रमकता दाखविली आणि अखेरीस अतिरिक्त आयुक्त निंबाळकर यांनी ‘त्याडॉक्टर चे निलंबन जाहीर केले … पहा हा व्हिडीओ

पालिकेची मिळकत सामाजिक संस्थेला :भिमाले आणि अरविंद शिंदेंची सुंदोपसुंदी

0

पुणे- स्वा. सावरकरांच्या जीवनपटाच्या प्रदर्शनासाठी आयुक्तांनी आपल्या अधिकारात विवेक व्यासपीठ नावाच्या संस्थेला कर्वे रोडवरील गरवारे शाळेसमोरील पालिकेच्या मालकीचा २१०० चौ. फुटाचा हॉल ११ महिन्याच्या कराराने दिला आणि त्यास आज ५ वर्षाची मुदतवाढ  देण्यात आली . पालिकेची हि मिळकत देताना विशिष्ट संस्था डोळ्यासमोर ठेवून निविदा प्रक्रिया राबविली गेली , आणि संस्थेशी करार केल्यानंतर स्थायी समितीला आणि मुख्य सभेला १५ दिवसात माहिती देणे कायद्याने बंधनकारक असूनही तसे केले गेले नाही . केवळ सावरकरांच्या जीवनपटावर असा निर्णय आयुक्तांनी घेतला कसा ? शिवाजी महाराज , बाबासाहेब आंबेडकर , राणी लक्ष्मीबाई आदी महात्म्यांच्या बाबत का निर्णय घेतला गेला नाही ? असा सवाल करत कॉंग्रेसचे गात नेते अरविंद शिंदे यांनी भाजपला पेचात पकडण्याचा प्रयत्न केला यावेळी अरविंद शिंदे आणि सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांची सुंदोपसुंदी सभागृहात पहायला मिळाली , अखेरीस सुशील मेंगडे आणि दीपक पोटे हे शिंदे यांच्याशी विवाद करत भिमालेंच्या मदतीला धावले .. पहा नेमके सभागृहात काय घडले ….

वारजे येथे लाईट हाऊसचे उद्घाटन.

0
  वारजे येथे लाईट हाऊसचे उद्घाटन व वारजे जलशुध्दीकरण केंद्राच्या फेज २ मधून थेट पाणी याचे लोकार्पण पालकमंत्री गिरीष बापट यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शहराध्य योगेश गोगावले, आमदार भिमराव तापकीर, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, स्थायी समिती अध्यक्ष योगेश मुळीक, माजी नगरसेवक शिवराम मेंगडे, नगरसेवक राजाभाऊ बराटे, दिपक पोटे, नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, छाया मारणे आदी मान्यवर उपस्थिती होते.
       यावेळी पालकमंत्री गिरिष बापट म्हणाले, सध्या बेरोजगारीचा प्रश्न अत्यंत गंभीर असून लाईट हाऊस हे आजच्या बेरोजगार तरूण तरूणीसाठी एक उत्पन्नाचे साधन आहे. सरकार याबाबत अनेक ठोस पाऊले उचलून विविध योजना राबवित आहे. यावेळी भविष्यात बेरोजगारीचा प्रश्न नक्कीच मार्गी लागेल. आज वारजे शुध्दीकरण केंद्राच्या २ टप्याचे उद्घाटन माझ्या हस्ते याचे मला आनंद वाटत आहे. यापुढे वारजे कर्वेनगर भागातील नगरिकांना पुरेशा प्रमाणात पाणी मिळेल, असेही ते म्हणाले.
       याप्रसंगी शहराध्य योगेश गोगवले म्हणाले, पंतप्रधान नरेंद्रजी मोदींनी म्हटल्याप्रमाणे प्रत्येकाला हाताला साथ, प्रत्येक हाताला काम याच उद्देश्यांने पुणे शहरात लाईट हाऊस प्रकल्प राबवून यार्फत तरूण तरूणींना १००% नोकरी मि..वी हेच आमचे ध्येय आहे. आणी त्यानुसार योग्य ती पाऊले पक्षाच्या वतीने उचलण्यात आली आहे.
     नगरसेवक सुशिल मेंगडे म्हणाले, वारजे जलशुध्दीकरण केंद्र बांधून अनेक वर्षे झाली परंतू आजपर्यत वारजे कर्वेनगर भागातील नागरिकांना या टाकीतून पाणी पुरवठा होत नसे. त्यामुळे आम्ही भारतीय जनता पार्टीच्या तीन्ही नगरसेवकांनी प्रयत्न करून वारजे कर्वेनगर भागातील नागरिकांना या टाकीतून थेट पुरेशा प्रमाणात पाणी याचे लोकार्पण करण्याचे योजिले. नक्कीच भविष्यातील २५ वर्षातील पाण्याचा प्रश्न मार्गी लागला. त्याचप्रमाणे या लाईट हाऊसच्या माध्यमातून प्रत्येकाला विविध कोर्सचे प्रशिक्षण एकाच धताखाली शिकायला मिळेल. प्रशिक्षण घेतलेल्या प्रत्येकास नोकरी या उद्देश्याने या लाईट हाऊची निर्मिती करण्यात आली आहे.
       कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शंतनू खिलारे तर आभार प्रदर्शन श्रीनाथ भिमाले यांनी केले.

वाचकसंख्या घटत असल्याची खंत व्यर्थ : दिलीप भिकुले

0

पुणे: दीर्घकाळापासून वाचकांची संख्या घटत असल्याची खंत व्यक्त केली जाते. नवी पिढी वाचनापासून दूर असल्याची नाराजी व्यक्त होते. मात्र ही खंत आणि नाराजी व्यर्थ असून केवळ वाचकांची अभिरुची आणि पद्धत बदलत आहे; याची जाणीव सार्वजनिक वाचनालय चळवळीतील प्रमुख कार्यकर्ते दिलीप भिकुले यांनी करून दिली.

ललित कला साहित्य मंचाच्या राज्यभरातील नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या सन्मान सोहळ्यात भिकुले बोलत होते. यावेळी किर्तनाद्वारे प्रबोधनाचे कार्य करणाऱ्या कलावती सुर्वे; मंचाचे संस्थापक अध्यक्ष ललित कोलते; प्रियंका कोलते आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

वाचन कमी होत असल्याने अनेक जुनी आणि नामांकित ग्रंथविक्री दालने बंद होत असल्याचे उदाहरण हल्ली दिले जाते. मात्र त्याच वेळी वाचकांना आकर्षित करण्याच्या अनेक अभिनव कल्पना घेऊन अनेक दालने कात टाकून विस्तारत आहेत. वाचक कट्टे वाढत आहेत; याकडे भिकुले यांनी लक्ष वेधले. वाचक ही आपल्या नवनिर्मिती; नवविचारांची प्रेरणा आहे. साहित्य म्हणजे विद्वत्ता आणि शब्दांचे फुलोरे नाही; तर अंत:करणाची साद आहे; याची जाणीव साहित्यिकांनी ठेवावी; अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

साहित्यिकांनी सतत जागरूक राहून जबाबदारीने साहित्यनिर्मिती करावी. आपल्या अभिव्यक्तीतून समाजात रोष नव्हे; तर सौहार्द निर्माण होईल असा कटाक्ष ठेवावा; असे आवाहन कलावती सुर्वे यांनी केले.

‘साहित्यगंध’ या नियतकालिकाच्या माध्यमातून सर्व भाषा व साहित्यप्रकारांच्या साहित्यिकांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या साहित्य मंचाच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीसाठी कोणतेही अर्ज; शिफारसपत्र मागविली जात नाहीत; तर साहित्यनिर्मिती आणि प्रसाराच्या कार्याची दखल घेऊन ही निवड केली जाते; असे ललित कोलते यांनी प्रास्ताविकात सांगितले.

अतुल राऊत यांनी सूत्रसंचालन केले. नितीन पांपटवार यांनी आभार मानले.

दिनेश खैरे, राहूल भोसले, तनुजा इनामदार, अतुल राऊत, गणेश गव्हले, पुष्पांजली मराठे, गीता पांपटवार, उद्धव भयवाळ, अंजली बर्गे, चंद्रकांत खोसे, हरिश्चंद्र धिवार, अभिजीत देशमुख, निखिल पवार, सोनाली कुलकर्णी, कमलेश शिंदे, विजय गुंडेकर यांची वेगवेगळ्या जिल्ह्यांतून पदनियुक्ती करण्यात आली असून सन्मानपुर्वक प्रमाणपत्र यावेळी बहाल करण्यात आले.

‘तुला पण बाशिंग बांधायचंय’ ३० मार्चला

0

मराठी चित्रपटसृष्टीत सध्या वैविध्यपूर्ण विषयांवर भाष्य करणारे सिनेमे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत. मुख्य म्हणजे विविध विषयासोबतच सिनेमांच्या सादरीकरणातही विविधता दिसून येत आहे. तुला पण बाशिंग बांधायचंय या आगामी मराठी चित्रपटातून स्त्रीची कथा आणि व्यथा प्रेक्षकांसमोर आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. महिलांचे अनेक प्रश्न आजवर चित्रपटांतून हाताळलेले आहेत. स्वत:शी तडजोड करून संसार करणा-या अनेक महिलांच्या मनातील अस्वस्थता तुला पण बाशिंग बांधायचंय या चित्रपटातून दाखवण्यात आली आहे. ‘जयलक्ष्मी वैष्णवी फिल्म प्रोडक्शन’ यांची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटाची निर्मिती भानुदास व्यवहारे व दत्तात्रेय मोहिते यांनी केली असून दिग्दर्शनाची जबाबदारी भानुदास व्यवहारे यांनी सांभाळली आहे. तुला पण बाशिंग बांधायचंय  हा चित्रपट ३० मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

वयात आलेल्या मुला-मुलीचं लग्न म्हणजे घरच्यांसाठी काळजीचा विषय असतो; विशेषतः मुलीचं लग्न हा अंमळ जास्तच महत्त्वाचा असतो.तुला पण बाशिंग बांधायचंय ही कथा आहे वर्षा आणि आकाश या तरुण जोडप्याची. एकमेकांच्या पसंतीने लग्न ठरलेल्या या दोघांच्या आयुष्याला लग्नानंतर अचानक कलाटणी मिळते. या कलाटणी नंतर वर्षा आणि आकाशाचं आयुष्य कोणतं वळण घेत याची हृदयस्पर्शी कथा या चित्रपटातून पहायला मिळणार आहे. वैवाहिक आयुष्यातील समस्या, मुला-मुलींच्या अपेक्षा, त्यांच्या आई-वडिलांचे दृष्टिकोन यासोबत समाजाची मानसिकता या सगळ्यांवर चित्रपटात भाष्य करण्यात आले आहे.

वेगवेगळ्या धाटणीची पाच गीते या चित्रपटात आहेत. भानुदास व्यवहारे यांच्या लेखणीतून साकारलेल्या या गीतांना संगीतकार एँग्नेल रोमन यांचा संगीतसाज लाभला आहे. वैशाली माडे, सुहास सावंत, प्रसन्नजित कोसंबी यांनी यातील गीते गायली आहेत. संगीत संयोजन विलास गुरव यांचे आहे.

विक्रम गोखले, सुरेश विश्वकर्मा, यतिन कार्येकर, सुनील गोडबोले, भक्ती चव्हाण, श्वेता खरात, सुवर्णा काळे, रितेश नगराले, राहूल पाटील, हर्षा शर्मा, अर्जुन जाधव, शंकर सूर्यवंशी हे कलाकार या चित्रपटात आहेत. चित्रपटाचे सहनिर्माते अभय भंडारी, प्रमोद वेदपाठक, सुभाष चव्हाण, औदुंबर व्यवहारे असून सहदिग्दर्शन निशांत आडगळे यांनी केले आहे. कथा,पटकथा,संवाद भानुदास व्यवहारे यांचे आहेत. छायांकन सिद्धेश मोरे यांनी तर संकलन माधव शिरसाट यांचे आहे. ध्वनीमुद्रण कीर्ती पांचाळ यांचे असून ध्वनीआरेखन प्रमोद चांदोरकर यांनी  केले आहे. रंगभूषा- वेशभूषा कुमार मगरे यांची आहे.

तुला पण बाशिंग बांधायचंय३० मार्च ला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

संशोधन स्पर्धेत बीएमसीसीचे यश

0

पुणे-मराठा चेंबर ऑङ्ग कॉमर्स, इंडस्ट्रिज ऍण्ड ऍगि‘कल्चरने (एमसीसीआयए) आयोजित केलेल्या आंतरमहाविद्यालयीन संशोधन स्पर्धेत डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयाने (बीएमसीसी) प्रथम क‘मांक मिळविला. पुरु मित्तल, समरीन हुसेन, अभिनव लाहोटी, कशीश पंजाबी, प्रीटी लाझरस, विशाषा डायमा, निधी बोगम आणि यश शर्मा यांनी प्रतिनिधित्व केले. एमसीसीआयएचे अध्यक्ष डॉ. अनंत सरदेशमुख यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. प्राचार्य डॉ. चंद्रकांत रावळ, मृगाक्शी राजहंस, प्रा. भारती उपाध्ये यांनी मार्गदर्शन केले.

बीएमसीसीची ‘मातोश्री’त ‘स्वराविष्कार’
 डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयाचा (बीएमसीसी) हेरिटेज कलेक्टिव्ह विभाग आणि अनादी -एक विचार यांच्या संयुक्त विद्यमाने मातोश्री वृध्दाश्रमात ‘स्वराविष्कार’ ही अनोखी सांगीतिक मैङ्गिल सादर करण्यात आली. संस्थेती वृध्द आजी-आजोबांना विरंगुळा मिळावा या उद्देशाने संगीत, वादन व शास्त्रीय नृत्याचे सादरीकरण करण्यात आले. अस्तित्व या कार्यक‘मातून जमा झालेल्या निधीतून संस्थेला काही नित्योपयोगी वस्तू भेट देण्यात आल्या. डॉ. राजश्री गोखले, डॉ. अनघा काळे, प्रा. वृषाली महाजन यांची प्रमुख उपस्थिती होती.

राष्ट्रीय विधेयक विश्‍लेषण स्पर्धा

0

पुणे- डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या श्री नवलमल फीरोदिया विधी महाविद्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय विधेयक विश्‍लेषण स्पर्धेत बेगलोरच्या अलायन्स विद्यापीठाने पहिला क्रमांक मिळविला. श्रीशिष्या मिश्रा आणि मोहम्मद अरीफ यांनी प्रतिनिधित्व केले.
मुर्ंबीच्या शासकीय विधी महाविद्यालयाने दुसरा क्रमांक मिळविला. खुबी अगवालने प्रतिनिधित्व केले. रायपूरच्या हिदायतुल्ला राष्ट्रीय विधी विद्यापीठाने तिसरा क्रमांक मिळविला. साधव संबाकैलास यांनी प्रतिनिधित्व केले.
सुप्रसिध्द विधिज्ञ ऍड. अभय आपटे यांनी परीक्षण केले. सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ट विधिज्ञ विदुष्पद सिंघानिया यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. क्रीडाविषयक कायदा क्षेत्रात काम करणार्‍यांची संख्या या कमी असल्यामुळे या क्षेत्रात करिअरच्या अधिक संधी उपलब्ध असल्याचे मत श्री. सिंघानिया यांनी व्यक्त केले. प्राचार्या डॉ. रोहिणी होनप अध्यक्षस्थानी होत्या. राधा नाईक यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. सुधीर नरोटे यांनी आभार मानले.

सुरक्षेप्रती जागरूकता वाढविण्यासाठी देशव्यापी अभियान राबविणे गरजेचे – डॉ. एस.व्ही. भावे.

0

राष्ट्रीय सुरक्षा पुरस्कार वितरण सोहळा  उत्साहात संपन्न

पुणे   : सुरक्षेप्रती केवळ औद्योगिक क्षेत्रातच नव्हे तर शालेय स्तरापासून  ते सामान्य नागरिकांपर्यंत सर्वत्र जागरूकता  वाढविण्यासाठी ‘स्वच्छ भारत अभियाना’प्रमाणे ‘राष्ट्रीय सुरक्षा  जनजागृती अभियान ‘ राबविणे गरजेचे आहे असे मत भारत फोर्ज लि. कंपनीचे  वरिष्ठ  मनुष्यबळ  व्यवस्थापक डॉ. एस.व्ही.भावे  यांनी व्यक्त केले.  ते  नॅशनल  इन्स्टिट्यूट  ऑफ पर्सोनेल मॅनेजमेंट (एनआयपीएम), आरुष  फायर सिस्टम्स व एस एम ई   चेंबर  ऑफ इंडिया   यांच्यावतीने आयोजित ‘राष्ट्रीय  सुरक्षा  पुरस्कार’ वितरण सोहळ्यात  बोलत  होते.

 

यावेळी बोलताना  ते  पुढे म्हणाले की, औद्योगिक आस्थापनांमध्ये खूप मोठ्या  आकाराची  यंत्र सामुग्री असते अशावेळी एखादी छोटीशी चूकदेखील जीवावर बेतू शकते. म्हणूनच सर्वांनी  सावधगिरीने काम करावे यासाठी ‘सुरक्षा संस्कृती’ रुजू करण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यायला हवा.

याप्रसंगी विविध औद्योगिक आस्थापनांमध्ये सुरक्षा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सुरक्षा अधिकाऱ्यांना ‘राष्ट्रीय सुरक्षा पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले.सन्मानचिन्ह, मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप होते.  पर्यावरण सुरक्षा, औद्योगिक सुरक्षा व  अग्नी सुरक्षा अशा तीन प्रकारात पुरस्कार विभागून देण्यात आले.

या पुरस्करार्थींमध्ये  फ्लॅश इलेक्ट्रॉनिक्स इंडिया प्रा.लि. चे  सुरक्षा  अधिकारी  नंदू  लोखंडे,  कल्याणी  कारपेंटर  स्पेशल स्टील लि.चे  सुरक्षा  अधिकारी   आत्माराम  पाटील,  हिंदुस्तान  कोका  कोला  कंपनीचे  ई.एच. एस. व्यवस्थापक  अनिल  बडगुजर, कर्मवीर अंकुशराव  टोपे  सहकारी  साखर कारखान्याचे   सुरक्षा  अधिकारी  फारुख  डुंगे, गोदरेज  प्रॉपर्टीज लि.चे  सुरक्षा  अधिकारी  संतोष  जगताप आणि के. रहेजा  प्रॉपर्टीजचे  सुरक्षा  अधिकारी  राहुल  पवार  या सहा जणांचा  समावेश होता.

यावेळी बोलताना आरुष फायर   सिस्टम्सचे संचालक  राहुल जाधव यांनी सांगितले की, प्रत्येकाने आपापल्या परीने आपल्या सभोवतालच्या लोकांमध्ये सुरक्षेचे महत्व वाढविण्यासाठी जमेल तितका प्रयत्न करावा. याप्रसंगी त्यांनी विविध  अग्नि सुरक्षा  उपकरणांची माहिती चित्रफितीद्वारे स्पष्ट केली.  तसेच यावेळी उद्यम प्रकाशनच्या ‘धातुकाम’ मासिकाचे संपादक  दीपक देवधर, गेस्टॅम्प ऑटोमोटिव्हचे  वरिष्ठ सुरक्षा अधिकारी रुपेश कदम, आरुष फायर सिस्टम्सचे संस्थापक अर्जुन जाधव यांनीही मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त केले.

या कार्यक्रमात यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिटूयट ऑफ मॅनेजमेंट  सायन्स (आयआयएमएस) च्या विद्यार्थ्यानी ‘सुरक्षेचे महत्व’ ही नाट्यछटा सादर केली.

या कार्यक्रमाला  पुणे, पिंपरी चिंचवड तसेच राज्यातील विविध भागातून आलेल्या औद्योगिक कंपन्यांचे सुरक्षा अधिकारी, मनुष्यबळ व्यवस्थापक तसेच आयआयएमएसचे संचालक डॉ. मिलिंद  मराठे व इतर मान्यवर मोठ्या संख्येने  उपस्थित होते.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक राहुल जाधव यांनी  तर आभार प्रदर्शन पवन शर्मा  यांनी केले. तर  सूत्रसंचालन बच्चू पांडे यांनी  केले.

नवीन मराठी शाळेत निरोप समारंभ

0

पुणे-डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवीन मराठी शाळेत चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. सर्व शिक्षा अभियानाचे समन्वयक संजय गायकवाड प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. आत्मविश्‍वासाने जीवनाला सामोरे जा असा सल्ली श्री. गायकवाड यांनी आपल्या भाषणात दिला. विद्यार्थ्यांनी गाणी आणि गोष्टींच्या माध्यमातून शाळेतील आठवणी सांगितल्या. मु‘याध्यापिका कल्पना वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली अर्चना देव, तनुजा तिकोने, भाग्यश्री हजारे, स्वाती तळपे यांनी संयोजन केले.