पुणे-डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवीन मराठी शाळेत चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. सर्व शिक्षा अभियानाचे समन्वयक संजय गायकवाड प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. आत्मविश्वासाने जीवनाला सामोरे जा असा सल्ली श्री. गायकवाड यांनी आपल्या भाषणात दिला. विद्यार्थ्यांनी गाणी आणि गोष्टींच्या माध्यमातून शाळेतील आठवणी सांगितल्या. मु‘याध्यापिका कल्पना वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली अर्चना देव, तनुजा तिकोने, भाग्यश्री हजारे, स्वाती तळपे यांनी संयोजन केले.