पुणे- स्वा. सावरकरांच्या जीवनपटाच्या प्रदर्शनासाठी आयुक्तांनी आपल्या अधिकारात विवेक व्यासपीठ नावाच्या संस्थेला कर्वे रोडवरील गरवारे शाळेसमोरील पालिकेच्या मालकीचा २१०० चौ. फुटाचा हॉल ११ महिन्याच्या कराराने दिला आणि त्यास आज ५ वर्षाची मुदतवाढ देण्यात आली . पालिकेची हि मिळकत देताना विशिष्ट संस्था डोळ्यासमोर ठेवून निविदा प्रक्रिया राबविली गेली , आणि संस्थेशी करार केल्यानंतर स्थायी समितीला आणि मुख्य सभेला १५ दिवसात माहिती देणे कायद्याने बंधनकारक असूनही तसे केले गेले नाही . केवळ सावरकरांच्या जीवनपटावर असा निर्णय आयुक्तांनी घेतला कसा ? शिवाजी महाराज , बाबासाहेब आंबेडकर , राणी लक्ष्मीबाई आदी महात्म्यांच्या बाबत का निर्णय घेतला गेला नाही ? असा सवाल करत कॉंग्रेसचे गात नेते अरविंद शिंदे यांनी भाजपला पेचात पकडण्याचा प्रयत्न केला यावेळी अरविंद शिंदे आणि सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांची सुंदोपसुंदी सभागृहात पहायला मिळाली , अखेरीस सुशील मेंगडे आणि दीपक पोटे हे शिंदे यांच्याशी विवाद करत भिमालेंच्या मदतीला धावले .. पहा नेमके सभागृहात काय घडले ….