Home Blog Page 3163

आंबेडकर जयंती निमित्त कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी नियोजन करावे -पालकमंत्री गिरीष बापट

0

पुणे – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती 14 एप्रिल रोजी मोठ्या आनंदाने व उत्साहाने जिल्ह्यात साजरी होते. या निमित्ताने कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी योग्य ते नियोजन करावे. शहरातील वाहतूक व्यवस्थेवर ताण येणार नाही या दृष्टिने काटेकोर नियोजन करावे, अशा सूचना अन्न व औषध प्रशासन, अन्न व नागरी पुरवठा तथा पालकमंत्री गिरीष बापट यांनी दिल्या.

येथील विधान भवन सभागृह येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने पालकमंत्री गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. त्यावेळी पोलिस अधिका-यांना त्यांनी या सूचना दिल्या.

यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार भिमराव तापकीर, संजय भेगडे, सुरेश गोरे, राहुल कूल, जिल्हाधिकारी सौरभ राव, मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज मांढरे, पोलीस सह आयुक्त रविंद्र कदम, पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक सुवेज हक, वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस उपायुक्त अशोक मोराळे आदी उपस्थित होते.

श्री. बापट म्हणाले, पुणे जिल्ह्यातील पोलिस प्रशासनाने कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीकोणातून योग्य ती खबरदारी घ्यावी. या दरम्यान अवैधरित्य मद्य विकले जाऊ नये यासाठी देखील दक्षता घ्यावी. पाण्याच्या टँकरचे नियोजन करून पाणी पुरवठा कमी पडणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना देखील त्यांनी दिल्या. पुणे शहरासह ग्रामीण भागात निघणाऱ्या मिरवणुका सुरळीतपणे पार पडतील, असे नियोजन करावे.

बैठकीसाठी उपस्थित पोलिस अधिकाऱ्यांनी केलेल्या नियोजनाबाबत माहिती दिली. पुणे शहरासह इतर ठिकाणी मद्य विक्री, अवैध फलक प्रतिबंधित करण्यासाठी तसेच शहरातील विविध रस्त्यावर वाहतूक सुरळीत राखण्यासाठी घेण्यात आलेल्या दक्षतेबाबत देखील त्यांनी माहिती दिली.

00000

खरीप हंगामासाठी खते व बियाणांच्या पुरवठ्याचे नियोजन करावे – पालकमंत्री गिरीश बापट

0

पुणे: यंदा खरीपाच्या एकूण 2.31 लाख हेक्टर क्षेत्राचे नियोजन करण्यात आले आहे. खरीप हंगामात शेतक-यांना खते व बियाणांचा पुरवठा वेळेत होण्यासाठी योग्य ते नियोजन करावे, अशा सूचना अन्न व औषध प्रशासन, अन्न व नागरी पुरवठा तथा पालकमंत्री ‍गिरीश बापट यांनी दिल्या.

येथील विधान भवन सभागृह येथे खरीप हंगाम 2018 आढावा व जलयुक्त  शिवार अभियान आढावा बैठक पालकमंत्री गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली झाली.त्यावेळी त्यांनी विविध विभागाच्या अधिका-यांना सूचना दिल्या. आमदार भिमराव तापकीर, संजय भेगडे, सुरेश गोरे, राहुल कूल, जिल्हाधिकारी सौरभ राव, मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज मांढरे, कृषी विभागाचे विभागीय सहसंचालक विजयकुमार इंगळे आदी उपस्थित होते.

श्री. बापट म्हणाले, रासायनिक खत विक्रीसाठी थेट लाभ हस्तांतरण या कार्यपध्दतीने जिल्ह्यातील 932 किरकोळ विक्रेत्यांकडे पी.ओ.एस. मशीन कार्यान्वित करण्यात आली आहेत. या सर्व विक्रेत्यांवर अधिकाऱ्यांनी लक्ष ठेवून शेतकऱ्यांना खत पुरवठा होईल याची खबरदारी घ्यावी. रासायनिक खतांबरोबरच सेंद्रिय खतांच्या वापर वाढण्यासाठी देखील प्रोत्साहन देऊन योग्य पद्धतीने नियोजन करावे.  मागेल त्याला शेततळे हा शासनाचा महत्त्वपूर्ण कार्यक्रम आहे. या अंतर्गत 2016 ते 2018 या कालावधीत एकूण 1989 शेततळे पूर्ण झालेली आहेत. सन 2017- 18 या वर्षात पुणे ग्रामीण मंडळ अंतर्गत 1296 कृषी पंप वीज जोडण्या दिल्या असून प्रलंबित वीज जोडणीसाठी 29 हजार 421 कोटी रक्कमेचा अहवाल सादर करण्यात आलेला आहे. प्रलंबित कृषी पंपांना वीज जोडणी देण्यासाठी पुरेशा क्षमतेने कार्यवाही करावी, अशा सूचना देखील त्यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत झालेल्या कामांचा आढावाही श्री. बापट यांनी घेतला. मागील प्रलंबित कामे तात्काळ पूर्ण करावीत तसेच या वर्षातील कामे तात्काळ सूरु करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावे. विविध विभागांचे अधिकारी तसेच लोकप्रतिनिधींनी देखील समन्वय राखून प्रलंबित कामे पूर्ण करुन घ्यावीत.

जिल्हाधिकारी श्री. राव यांनी जलयुक्त शिवार योजनेंतर्गत पुणे जिल्ह्यातील 60 टक्के काम पूर्ण झाले असल्याचे सांगितले. उर्वरीत काम देखील युद्ध पातळीवर पूर्ण करण्यात येणार आहे. याबरोबरच 274 ठिकाणी गाळ काढण्याचे काम पूर्ण झाले असल्याने एप्रिल अखेर पुणे जिल्ह्यात टँकरची आवश्यकता भासणार नाही. लोकप्रतिनिधींच्या सहकाऱ्याने उर्वरीत ठिकाणी देखील गाळ काढण्याचे काम सुरु करुन ते तात्काळ पूर्ण करण्याबाबत सूचना देखील त्यांनी दिल्या.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब अलगढमल यांनी सादरीकरणाद्वारे खरीप हंगाम नियोजनाची माहिती दिली. सन 2018-19 मध्ये संभाव्य पर्जन्यमानाच्या अंदाजानुसार खरीप पिकांचे नियोजन करण्यात येत आहे. राष्ट्रीय फलोत्पादन अभियान आणि राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत नियोजन करण्यात आले आहे. यावेळी लोकप्रतिनिधींनी खरीप हंगामाच्या दृष्टीने विविध सूचना केल्या. बैठकीस विविध विभागांचे अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते.

रुमा गायकैवारी, सायना देशपांडे, दक्ष अगरवाल, यशराज दळवी यांचा अंतिम फेरीत प्रवेश

0

पुणे :  मंदार वाकणकर टेनिस अकादमी(एमडब्लूटीए) यांच्या तर्फे आयोजित एमएसएलटीए योनेक्स सनराईज अरुण वाकणकर मेमोरिअल करंडक अखिल भारतीय मानांकन(16वर्षाखालील)टॅलेंट सिरीज टेनिस स्पर्धेत एकेरीत मुलींच्या गटात रुमा गायकैवारी, सायना देशपांडे यांनी तर, मुलांच्या गटात दक्ष अगरवाल, यशराज दळवी या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्परध्यांचा पराभव करून अंतिम प्रवेश केला.

एस.पी. कॉलेज टेनिस कोर्ट येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत मुलींच्या गटात उपांत्य फेरीत रुमा गाईकैवारीने सोनल पाटीलचा टायब्रेकमध्ये 7-6(5), 0-6, 6-3असा पराभव करून अंतिम फेरी गाठली. दुसऱ्या उपांत्य फेरीच्या लढतीत पाचव्या मानांकित सायना देशपांडेने दुसऱ्या मानांकित लोलाक्षी कांकरियाचा 6-3, 6-4असा संघर्षपूर्ण पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली. अंतिम फेरीत रुमा गाईकैवारीचा सामना सायना देशपांडेशी होणार आहे.

मुलांच्या गटात उपांत्य फेरीत तिसऱ्या मानांकित दक्ष अगरवाल याने पाचव्या मानांकित प्रसाद इंगळेचा 3-6, 6-4, 6-4असा तीन सेटमध्ये पराभव करून स्पर्धेतील आपले आव्हान कायम राखले. दुसऱ्या मानांकित
यशराज दळवीने मानस धामणेवर 6-3, 6-1असा विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला.

दुहेरीत उपांत्यपूर्व फेरीत मुलींच्या गटात सिया देशमुख व रुमा गाईकैवारी यांनी ख़ुशी शर्मा व ख़ुशी किंगर या जोडीचा टायब्रेकमध्ये 7-6(7-2), 7-6(7-3)असा पराभव केला. सोनल पाटील व परी चव्हाण या जोडीने आस्था खरे व अग्रिमा तिवारीवर 6-0, 6-4असा विजय मिळवला. लोलाक्षी कांकरियाने समीक्षा श्रॉफच्या साथीत मयुखी सेनगुप्ता व गौतमी खैरे यांचा 7-5, 6-4असा पराभव करून उपांत्य फेरी गाठली.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: एकेरी गट: उपांत्य फेरी: 16वर्षाखालील मुली:
रुमा गाईकैवारी वि.वि.सोनल पाटील 7-6(5), 0-6, 6-3;
सायना देशपांडे(5)वि.वि.लोलाक्षी कांकरिया(2)6-3, 6-4

16वर्षाखालील मुले: दक्ष अगरवाल(3)वि.वि.प्रसाद इंगळे(5)3-6, 6-4, 6-4;
यशराज दळवी(2) वि.वि.मानस धामणे 6-3, 6-1;

दुहेरी गट: उपांत्यपूर्व फेरी: मुली:
सिया देशमुख/रुमा गाईकैवारी वि.वि.ख़ुशी शर्मा/ख़ुशी किंगर(1) 7-6(7-2), 7-6(7-3);
सोनल पाटील/परी चव्हाण(4)वि.वि.आस्था खरे/अग्रिमा तिवारी 6-0, 6-4;
लोलाक्षी कांकरिया/समीक्षा श्रॉफ(3)वि.वि.मयुखी सेनगुप्ता/गौतमी खैरे 7-5, 6-4;
मधुरीमा सावंत/अन्या जेकब(2)वि.वि.स्वरा काटकर/संचिता नगरकर 6-1, 6-3;

मुली:
दक्ष अगरवाल/अनर्घ गांगुली(1)वि.वि.अभिरव पाटणकर/ईशान जिगली 7-5, 6-1;
सोहम भरमगोंडे/प्रणव गाडगीळ(4)वि.वि.कुशल चौधरी/अर्णव ओरुगांती 2-6, 6-3, 10-8;
प्रसाद इंगळे/अथर्व आमरुळे(2)वि.वि.अननमय उपाध्याय/आर्यन हूड 6-1, 6-2;
इंद्रजीत बोराडे/रोहन फुले वि.वि.मानस धामणे/अंशूल सातव 7-6(7-4), 4-6, 10-5.

 

काँग्रेसचा दुटप्पीपणा व कांगावा लक्षात आणून देण्यासाठीच लाक्षणिक उपोषण-खा.काकडे

हजारो कार्यकर्त्यांसह खासदार काकडेंची उपोषणस्थळी एंट्री!
खासदार शिरोळेंच्या उपोषणास खासदार काकडेंचा हजारो कार्यकर्त्यांसह पाठिंबा
पुणे : संसदेमध्ये संसदीय लोकशाहीप्रमाणे काँग्रेस पक्षाचे खासदार काम करीत नाही व सरकारच्या कामात अडथळा निर्माण करतात. केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार त्यांच्या प्रत्येक निर्णयासंबंधी संसदेमध्ये चर्चेस तयार असते. परंतु, काँग्रेसला चर्चाच नको असते. काँग्रेसचा हा दुटप्पीपणा व कांगावा देशातील जनतेच्या लक्षात आणून देण्यासाठीच आज भाजपाच्या खासदारांनी आपापल्या मतदार संघात एक दिवसाचे उपोषण केले आहे, असे राज्यसभेचे खासदार व भाजपाचे सहयोगी सदस्य संजय काकडे यांनी सांगितले.
खासदार संजय काकडे यांनी हजारो कार्यकर्त्यांसह येऊन पुण्याचे भाजपाचे खासदार अनिल शिरोळे यांच्या उपोषणास पाठिंबा दिला. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले की, भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारचे केंद्रात स्पष्ट बहुमत आहे. तरीदेखील संसदीय लोकशाहीप्रमाणे संसदेत विकासाच्या मुद्द्यांवर चर्चा व्हायला पाहिजे. मात्र काँग्रेस सभागृहात गोंधळ घालते. असे असुनही लोकशाहीच्या तत्वानेच सरकार चालविण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी करीत आहेत. देशातील जनतेला काँग्रेसचा हा दुटप्पीपणा व कांगावा लक्षात आणून देण्यासाठीच भाजपाच्या सर्व खासदारांनी आपापल्या मतदार संघात एक दिवसाचे उपोषण केले आहे.
दकम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सुरु असलेल्या हल्ला बोल आंदोलनाविषयी खासदार संजय काकडे यांना विचारले असता ते म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस सलग 15 वर्षे सत्तेत होती. त्यावेळी जर त्यांनी जनतेची कामे केली असती, ते जनतेत गेले असते आणि विकासाची कामे केली असती तर, त्यांच्यावर हल्ला बोल आंदोलनाची वेळच आली नसती. अजित पवार यांना मुख्यमंत्री म्हणून प्रोजेक्ट केले जात असल्याबाबत विचारल्यावर खासदार काकडे म्हणाले की, अजित पवार, सुप्रिया सुळे व धनंजय मुंडे यांच्या नावांची चर्चा भावी मुख्यमंत्री म्हणून चालविली जाते. परंतु, मुख्यमंत्री होण्यासाठी राष्ट्रवादीला राज्यातील क्रमांक एकचा पक्ष बनावा लागेल. जे शक्य नाही. त्यामुळे त्यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत आता बोलणे योग्य नाही.

‘राजा’ चित्रपटाचे शानदार संगीत अनावरण

0

उत्साहात आणि झगमगाटात संपन्न झालेल्या राजा या मराठी चित्रपटाच्या संगीत अनावरण सोहळ्यात शब्द-सुरांची अनोखी मैफल सजली. गायक सुखविंदर सिंग यांच्या रंगतदार लाइव्ह परफॉर्मन्सने या सोहळ्यात चांगलेच रंग भरले. खासदार प्रीतमताई मुंडे, डॉ. अजिंक्य पाटील (अध्यक्ष,डी.वाय.पाटील ग्रुप), सुरेंद्र पांडे (पोलीस अप्पर महासंचालक, महाराष्ट्र राज्य), प्रवीण घुगे (अध्यक्ष बालहक्क आयोग महाराष्ट्र शासन), संजय मुखर्जी (अतिरिक्त महानगर आयुक्त), संजय खंदारे (अतिरिक्त आयुक्त एमएमआरडीए), उद्योजक प्रवीण तलरेजा, प्रसिद्ध गायक शान आणि उदित नारायण अशा विविध क्षेत्रातल्या मान्यवरांच्या उपस्थितीत ‘राजा’ चित्रपटाचा संगीत अनावरण सोहळा नुकताच संपन्न झाला. दीपप्रज्वलन झाल्यानंतर या सिनेमाचं म्युझिक लाँच पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांच्या हस्ते करण्यात आले. येत्या २५ मे ला ‘राजा’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.

या संगीत अनावरण सोहळ्यात चित्रपटातील गाण्याची झलक या निमित्ताने सगळ्यांनी अनुभवली. उपस्थित मान्यवरांनी चित्रपटाला शुभेच्छा दिल्या. हा संगीतमय चित्रपट प्रेक्षकांना नक्की आवडेल असा विश्वास निर्माता व दिग्दर्शकांनी यावेळी व्यक्त केला. ‘सत्यसाई मल्टीमिडीया प्रा.लि’ या चित्रपट निर्मिती संस्थेचे निर्माते प्रवीण काकड यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटाची कथा-पटकथा दिग्दर्शक शशिकांत देशपांडे यांनी लिहिली असून संवाद मिलिंद इनामदार व शशिकांत देशपांडे यांनी लिहिले आहेत.

‘राजा’ या संगीतमय चित्रपटात ‘गावचा राजा’, ‘झन्नाटा’, ‘हंडीतला मेवा’, ‘जो बाळा जो जो रे’, ‘याद तुम्हारी आये’, ‘दगडाचे मन’, ‘हे मस्तीचे गाणे’, ‘आज सुरांना गहिवरले’ अशा वेगवेगळ्या जॉनरच्या आठ सुमधुर गाण्यांचा नजराणा आहे. वलय मुळगुंद, केदार नायगावकर, मिलिंद इमानदार यांच्या लेखणीने या चित्रपटातील गाणी सजली आहेत. सुखविंदर सिंग, शान, उदित नारायण या हिंदीतील दिग्गज गायकांसोबत रोहित राऊत, सौरभ साळुंखे, उर्मिला धनगर, सायली पडघन, मिलिंद शिंदे यांनी यातील गाणी गायली आहेत. या गीतांना पंकज पडघन यांनी संगीतबद्ध केलं आहे.

पॉप सिंगरच्या आयुष्यावर ‘राजा’ ची कथा बेतली आहे. सौरदीप कुमार, स्वरदा जोशी, निशिता पुरंदरे या तीन नव्या चेहऱ्यासह  शरद पोंक्षे, जयवंत वाडकर, सुरेखा कुडची, विनीत बोंडे, पौरस आदी कलाकारांच्या यात भूमिका आहेत.

‘राजा’ २५ मे ला प्रदर्शित होणार आहे.

सस्पेंस थ्रिलर व फॅमिली ड्रामा पारख नात्यांची २० एप्रिलपासून

0

नातं..मग ते कोणतंही असो आपल्या आयुष्यात एकदा तरी त्या नात्याची पारख होते असा प्रसंग नक्कीच येतो. मग तेव्हा आपल्याला त्या नात्याची खरी ओळख होते. असाच काही आशय असणारा फायनल रेंडर प्रस्तुत, प्रकाश जैन निर्मित पारख नात्यांची मराठी चित्रपट येत्या २० एप्रिलपासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. सिनेमात मिलिंद गवळी, निशा परुळेकर, सिया पाटील, अनिकेत केळकर, प्रदीप वेलणकर, प्रफुल सावंत, मुग्धा शहा, स्मृती पारकर, आणि मिलिंद शिंदे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. कथा प्रकाश वैद्य यांची असून पटकथा योगेश गवस, विराट भट यांची आहे तर दिग्दर्शन मुकेश मिस्त्री यांनी केले आहे. गीतकार मंदार चोळकर तर संगीत विवेक अस्थाना यांचे आहे.

मिलिंद गवळी, सिनेमाबद्दल सांगतात की, सिनेमाचे नाव जरी पारख नात्यांची असं असलं तरी हा सिनेमा म्हणजे सस्पेंस थ्रिलर आणि फॅमिली ड्रामा आहे. यात मी मस्त कलंदर अशा नायकाच्या भूमिकेत आहे. गावातील त्याच्या प्रेयसीचे (निशा परुळेकर) एक आगळे वेगळे आव्हान तो स्विकारतो. ते म्हणजे गावातील एक जुना वाडा निशाचे वडील विकत घेणार असतात, परंतु गावातील काही लोकं सांगतात कि या वाड्यात भूत आहे. त्या वाड्यात भूत नाही हे सिद्ध करण्यासाठी मी त्या वाड्यात एक रात्र मुक्काम करण्याचे ठरवतो.. त्याप्रमाणे मी तिथे रात्रही काढतो पण त्या रात्री तिथे बरंच काही घडतं. ते काय घडतं? त्यासाठी तुम्हाला सिनेमा बघावा लागेल.

निशा परुळेकर सांगते कि, हा सिनेमा म्हणजे नात्यांची परीक्षा आहे. जेव्हा एखादं नातं जोडलं जातं तेव्हा त्याला एखाद्या बिकट प्रसंगातून सामोरे जात सिद्ध व्हावं लागतं. अगदी तसंच काहीसं कथानक या सिनेमाचं आहे. एका वाक्यात सांगायचं झालं तर हा सिनेमा म्हणजे नात्यांचा खेळ आहे. जो आपण आपल्या वास्तविक आयुष्यात नेहमीच खेळत असतो. मिलिंद शिंदे खलनायकाच्या भूमिकेत आहे. जो गावात राहून गावातल्या शेतकऱ्यांचे शोषण करतो अशी त्यांची भूमिका आहे.

मनुवादी ,भ्रष्टाचारी आता तरी थोपवा -अजित पवार

पुणे-राष्ट्रवादी कुठे कमी पडले , भाजपने काय दिलं होतं, बालेवाडी हिंजेवाडी कोणी केलं ? असे प्रश्न विचारत आता तरी जावू तिथे खाऊ अशी प्रवृत्ती असलेले मनुवादी थोपवा असे आवाहन अजित पवार यांनी येथे केले . अजित पवारांच्या भाषणातला हा काही महत्व पूर्ण भाग जरूर ऐका ..पहा ….

पुणे लोकसभेला राष्ट्रवादीचाच उमेदवार -अजित पवार (व्हिडीओ)

पुणे- मतांची आकडेवारी पहाता आणि एकूणच राजकारणा पाहता पुणे लोकसभा निवडणूक काहीही झाले तरी राष्ट्रवादीचाच उमेदवार लढेल असा स्पष्ट इशारा आज राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आपल्या सहयोगी पक्षांना दिला .
हल्लाबोल यात्रे दरम्यान वारजे येथे झालेल्या सभेत ते बोलत होते .
पुण्याच्या सर्व विधानसभा मतदार संघात हि राष्ट्रवादीकडे तगडे उमेदवार असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रावादीच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांचे पाय खेचण्याचे प्रकार करू नयेत . अद्याप कोणाचीही उमेदवारी निश्चित झालेली नाही असेही ते म्हणाले … पहा आणि ऐका नेमके अजित पवार काय म्हणाले

नगरचे आ. संग्राम जगतापांना अडकविण्याचा प्रयत्न – अजित पवार (व्हिडीओ)

पुणे- शिवसैनिकांचे मारेकरी पोलिसात कारण आणि शस्त्र यासह हजर होऊनही तेथील राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांना अटक करण्यात आली , ते निष्पाप असूनही त्यांना बदनाम करून अडकविले जाते आहे . असा आरोप करत अजित पवार यांनी आज सरकारला लक्षात ठेवा चार दिवस सासूचे तर चार दिवस सुनेचे असतात असा इशारा हल्लाबोल आंदोलनात बोलताना दिला .
योग्य तपास करून मारेकरी पकडा कडक शासन करा पण निरपराधांना का पकडता ? तुमच्याबरोबर आले तर ठीक , नाहीतर … असे … हि प्रवृत्ती घातक  आहे असे हि ते म्हणाले … नेमके काय म्हणाले अजित पवार हे त्यांच्याच शब्दात ऐका ..पहा

..तर भाजप नगरसेवकांच्या घरासमोर … (?) व्हिडीओ

0

पुणे- शिवसृष्टी ला बीडीपी ची  जागा देवून ३ महिने झाले अजून त्यानंतर काही निर्णय नाही ..पण त्या दिवशी ज्यांनी पालिकेत फटाके वाजवून दिवाळी साजरी केली ..त्यांनी लक्षात घ्यावे अजून १ महिना प्रतीक्षा करू आम्ही ..पण शिवरायांच्या नावाने कोणी फसवाफसवी करेल तर त्याच्या घरासमोर .. आम्ही काय करायचं ते करून दाखवू .. असा इशारा माजी उपमहापौर दीपक मानकर यांनी आज वारजे येथे झालेल्या राष्ट्रवादीच्या हल्ला बोल आंदोलनातून दिला .
अजित पवार, सुप्रिया सुळे,सुनील तटकरे, धनंजय मुंडे,वंदना चव्हाण,प्रकाश कदम ,चेतन तुपे पाटील, प्रशांत जगताप आदी असणाख्या कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते . यावेळी दीपक मानकर काय म्हणाले ते ऐका त्यांच्याच शब्दात …

रोबोटिक सायन्सच्या मदतीने पायाच्या हाडांची लांबी एकसारखी करण्याची शस्त्रक्रिया यशस्वी

0
इनामदार हॉस्पिटलच्या डॉ. मुर्तझा अदीब यांची कामगिरी
पुणे :हाडांच्या चुकीच्या ठेवणीमुळे लांबीने कमी-जास्त झालेले पाय (पायांची हाडे) एकसारखी करण्याची दुर्मिळ शस्त्रक्रिया वानवडी येथील इनामदार मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये रोबोटिक सायन्सच्या मदतीने अलिकडेच झाली.
इनामदार हॉस्पिटलचे ऑर्थोपेडिक तज्ज्ञ डॉ. मुर्तझा अदीब यांनी डॉ. आशीष रानडे यांच्या समवेत ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी केली. डॉ. मुर्तझा अदीब यांनी ही माहिती पत्रकाद्वारे दिली.
इनामदार हॉस्पिटलचे ऑर्थोपेडिक तज्ज्ञ डॉ. मुर्तझा अदीब आणि डॉ. आशीष रानडे (टेलर स्पाशियल फ्रेमसह व्यंगात सुधारणा करणारे तज्ज्ञ) यांनी ंहा चमत्कार घडवून आणला.
22 वर्षीय कु. अयात ह्या वैद्यकीय विद्यार्थिनीच्या अस्थिरोग संबंधित समस्येवर ही यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली.
रुग्णाचा उजवा पाय 4 सेंमी. ने उंचीला कमी होता, आणि  गुडघा आतमध्ये वाकलेला होता (व्हेरस) आणि बाहेरील बाजूस वळलेला (रोटेशन). ती लंगडल्यासारखे चालायची त्यामुळे तिच्या मणक्यामध्ये बाक निर्माण झाला होता. बालपणापासूनच तिला हा त्रास होता. तिच्या उजव्या गुडग्यात व्यंग होते. अकराव्या वर्षी तिच्यावर पहिली शस्त्रक्रिया झाली. दुदैवाने या शस्त्रक्रियेतील गुंतागुंतीमुळे तिचा उजव्या पायात  विकृती निर्माण झाली.
 तिने अनेक चिकित्सकांशी सल्लामसलत केली; परंतु त्यांच्याकडून समाधानकारक उपचार सल्ला मिळाला नाही.
 शेवटी इनामदार हॉस्पिटल मधील डॉ. मुर्तझा अदीब ( एफआरसीएस,वरिष्ठ अस्थिरोग तज्ज्ञ) यांच्याशी चर्चा केल्यानंतर  शस्त्रक्रिया करायचे ठरविण्यात आले. ज्यामध्ये मांडीच्या हाडाच्या खालचा भाग कापून तो बाह्य भागी स्थिर करण्यात येणार होता.
या शस्त्रक्रियेनंतर एक्स रे मेजरमेंट आणि स्ट्रट कॅलिबर रिडिंग विशेष संगणक प्रणालीला पुरवले जात होते, आणि संगणकाकडून स्ट्रट अॅडजस्टमेंटच्या सूचना ४ आठवडे मिळत गेल्या.
या शस्त्रक्रियेत डॉ. मुर्तझा अदीब यांच्या समवेत डॉ. आशीष रानडे (टेलर स्पाशियल फ्रेमसह व्यंगात सुधारणा करणारे तज्ज्ञ) यांचे काम देखिल मोलाचे आहे. ही शस्त्रक्रिया म्हणजे ऑर्थोपेडिक विज्ञान आणि रोबोट विज्ञान यातील एक सुंदर सांगड होती. ऑर्थोपेडिक सर्जन आणि रोबोटीक इंजिनियर यांच्या मिलाफातून ही शस्त्रक्रिया पार पडली. शस्त्रक्रियेनंतर रुग्ण सरळ चालू लागली.सहा महिन्यानंतर पायांची लांबी एकसारखी झाली.

स्वावलंबी जीवनासाठी कौशल्य प्रशिक्षण गरजेचे : स्वाती पवार

0
महिला बंदिंसाठी कारागृहात ऍडव्हान्स फॅशन डिझायनिंग कोर्सला सुरुवात

पुणे : प्रत्येक महिलेने कौशल्य प्रशिक्षणाची कास धरल्यास त्यांना खऱ्या  अर्थाने  स्वावलंबी जीवन जगता येईल असे  मत  येरवडा महिला मध्यवर्ती कारागृहाच्या महिला तुरुंग अधिकारी स्वाती पवार यांनी व्यक्त केले.  येरवडा मध्यवर्ती कारागृहाचे  अधिक्षक  यु. टी. पवार यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली शुक्रवारी  दिनांक ६ एप्रिल २०१८ रोजी  येरवडा  कारागृहात महिला बंदीच्या पुनर्वसनासाठी सुरु करण्यात आलेल्या  ऍडव्हान्स फॅशन डिझायनिंग कोर्स चे उद्घाटन करताना  त्या बोलत होत्या.

यावेळी बोलताना  बंदी कल्याण व पुनर्वसन प्रकल्प संचालिका  वर्षा  कणिकदळे  म्हणाल्या की, कारागृहातील शिक्षा संपल्यानंतर  सामान्य नागरी जीवन जगताना पुरुषांच्या तुलनेत महिलांना खूप अडचणींचा सामना करावा लागतो.बऱ्याचदा त्यांच्या कुटुंबीयांकडूनही त्यांना सहकार्य मिळत नाही अशा अवस्थेत त्यांना स्वतःलाच स्वतःचा आधार बनण्यासाठी कौशल्य प्रशिक्षणाची मोलाची मदत होऊ शकते, या विचारानेच महाराष्ट्र कारागृह विभागाच्या बंदी कल्याण आणि पुनर्वसन प्रकल्पाअंतर्गत  यशस्वी एकेडमी फॉर स्किल्सच्या सहकार्याने महिला बंदीसाठी शिवणकाम क्षेत्रातील ऍडव्हान्स फॅशन डिझायनिंग कोर्स सुरु करण्यात आला आहे.

एकीकडे शहरी जीवनमान वेगाने उंचावत असल्याने मध्यमवर्गीय आणि कनिष्ठ मध्यमवर्गीय  समाजातील युवती व महिलांमध्ये वेषभूषेच्या नवनवीन संकल्पना रुजू लागल्या आहेत. सातत्याने नवीन प्रकार पेहरावाच्या  बाबतीत पुढे येत आहेत. यामुळेच फॅशन डिझायनिंगचे प्रशिक्षण करणाऱ्या महिलांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण होत आहेत.  त्यामुळे महिला बंदींना जर हे प्रशिक्षण दिले तर पुढे जाऊन त्या अगदी सहजपणे समाजाच्या  मुख्य प्रवाहात सामील होऊन आपले नागरी जीवन सन्मानाने जगू शकतात. हा विचार केंद्रस्थानी ठेऊन सदर प्रशिक्षण देण्याचे निश्चित केल्याचे त्यांनी सांगितले. तसेच महिला बंदींमध्येही या प्रशिक्षणाबाबतीत उत्साह दिसून येत असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.

तर यावेळी बोलताना यशस्वी एकेडमी फॉर स्किल्स संस्थेच्या संचालिका स्मिता धुमाळ म्हणाल्या की, हे प्रशिक्षण देण्याची संधी आम्हाला मिळत असल्याने आम्हालाही  एक समाधान मिळत असून या प्रशिक्षणादरम्यान स्वयंरोजगाराचेही मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

याप्रसंगी महिला तुरुंग अधिकारी मनीषा वालकोळी,  समाजसेविका  हिना सय्यद, मीनाक्षी बडवाईक, यशस्वी संस्थेच्या समन्वयक प्राची राऊत, प्रशिक्षक स्वाती कांबळे आदी उपस्थित होते.

लुटारू महेश मोतेवारची संपत्ती जप्त करून लोकांचे पैसे परत द्या – अजित पवार

0

पुणे- डायमंडवालेच घोटाळे करून पळून जातात कसे ? त्या लुटारू महेश मोतेवारची संपत्ती जप्त करून फसल्या गेलेल्या गरिबांचे पैसे परत द्या ना …. असे जाहीर पणे आव्हाने देत … डीएसके सारखे कित्येक उद्योगपती सरकारी धोरणांचे बळी ठरले आहेत.शिक्षण संस्था देखील शासकीय धोरणांमुळे अडचणीत येत आहेत . असे येथे हल्ला बोल आंदोलनात अजित पवार यांनी सांगितले ..पहा नेमके त्यांनी काय म्हटले आहे …..

पुणेकरांनो भोगा आता कमळाची फळं- अजित पवार (व्हिडीओ)

पुणे- आम्ही सारे मेहनतीने काम करत होतो, नरेंद्र मोदींनी असे काय केले होते ? आणि काय केलं आहे आता ? भोगा आता कमळाची फळं असं म्हणायची वेळ आता आली आहे …. पालकमंत्र्यांना पाण्याचा प्रश्न पाणी असूनही सोडविता येत नाही आणि कचर्याचा प्रश्न हि सोडविता येत नाही . काय करताहेत पुण्याचे ८ आमदार ? असां हि सवाल पुण्यातील वारजे येथे हल्ला बोल आंदोलनातील सभेत बोलताना अजित पवार यांनी केला …

छगन भुजबळांना गोवण्यात आलंय-अजित पवार (व्हिडीओ)

पुणे-पक्षांची शक्तीस्थळे नामशेष करण्याचे राजकारण होत असून छगन भुजबळ यांना गोवण्यात आल्याचा आरोप आज येथे अजित पवार यांनी केला. न्यायव्यवस्था सर्वोच्च आहे. पण लवकरात लवकर निर्णय द्यावा म्हणून आम्ही प्रयत्नशील आहोत .लवकरच भुजबळ आपल्यात परत येतील याबाबत माझ्या मनात शंका नाही असेही ते म्हणाले . पहा आणि ऐका नेमके पवार काय म्हणाले ….