पुणे:फुले शाहू आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फौंडेशन च्या वतीने कुमार आहेर यांच्या प्रति महात्मा फुले वाडा ,मांगडे वाडी येथे 17 जून 2018 रोजी सकाळी 11 वाजता 70 गरीब मुले मुली आणि महिलांना नवीन, जुने कपडे,साड्या तसेच सर्वाना आंबे वाटप केले.यावेळी जेष्ठ नाटककार कुमार आहेर,एक पात्री मी सावित्रीबाई फुले नाटक करणाऱ्या प्रा.रणधीर वृषाली ,प्रबुद्ध रंगभूमीचे विश्वस्त ए.पी.गायकवाड,जेष्ठ समाजसेवक पोपट नितनवरे. आयोजक अध्यक्ष रघुनाथ ढोक उपस्थितीत होते.यावेळी प्रा.रणधीर यांनी सावित्रीबाई फुले यांचे जीवनपट सांगून पुढे म्हणाल्या की मुलांनो भरपूर अभ्यास करा मोठे व्हा महापुरुषांचा आदर्श घेऊन समाज कार्य देखील करा.या प्रसंगी कुमार आहेर,गायकवाड आणि रघुनाथ ढोक यांनी देखील मौलिक मार्गदर्शन केले.यावेळी मोलाचे मदत राष्ट्रीय ओबीसी महासंघाची व प्रबुद्ध रंगभूमीची झाली.
मेट्रो तर्फे कर्मचाऱ्यांना हेल्मेट वितरण
विद्याच्या व्यक्तिमत्वाने भारावून गेले – सई ताम्हणकर
सॅव्ही वुमन एम्पॉवरमेंट पुरस्कार सोहळ्यामध्ये दोन सशक्त अभिनेत्रींना एकत्र पाहण्याचा योग उपस्थितांना आला. बॉलीवूड अभिनेत्री विद्या बालन आणि अभिनेत्री सई ताम्हणकर ह्या सोहळ्यामध्ये एकत्र आलेलं पाहणं, ह्या दोघींच्याही चाहत्यांसाठी ही एक पर्वणीच होती.
या पुरस्कार सोहळ्यात उपस्थित असलेल्या फिल्म इंडस्ट्रीतल्या सूत्रांनी सांगितलं की, “खरं तर दोन ‘उलाहलाह गर्ल्स’च एकत्र आल्या असं म्हणा ना… विद्या बालन जशी हॉट, सेन्शअस आणि तितकीच संवेदनशील अभिनेत्री आहे, तशीच सईचीही प्रतिमा आहे. ह्या दोघींनीही आपल्या चित्रपटांच्या निवडीने आणि यशस्वी चित्रपट कारकिर्दीव्दारे आपल्या प्रतिस्पर्ध्यांना ‘उलाहलाह’ म्हणायला भाग पाडलंय. त्यामूळेच ह्या अवॉर्ड नाइटला उपस्थित असलेल्या चित्रपट रसिकांसाठी हा दुग्धशर्करा योग होता.”
सई ताम्हणकरला ह्या भेटीबद्दल विचारल्यावर सई म्हणते, “मी खरं तर विद्याला पहिल्यांदाच भेटले. पण तिच्या नजरेत माझ्याशी बोलताना तिच्या डोळ्यांत असलेला परिचयाचा भाव, तिने माझे चित्रपट पाहिले असल्याचा विश्वास देऊन गेला. आणि हे माझ्यासाठी कोणत्याही क़म्पिलिमेंटपेक्षा पुरेसे आहे. विद्या बालन सशक्त महिलेचे प्रतिक आहे. आणि तिला भेटताक्षणीच तिच्या व्यक्तिमत्वाने तुम्ही भारावून जाता, ह्याचे प्रत्यंतर मला आमच्या भेटीने झाले. आणि ह्याविषयी मी तिच्याशी बोलले सुध्दा.”
पुरस्कार सोहळ्यात एकत्र आलेल्या ह्या दोन अभिनेत्री आता ऑनस्क्रिनही एकत्र याव्यात अशी इच्छा त्यांच्या चाहत्यांकडून व्यक्त होतेय.
माथाडी कामगारांचे आझाद मैदानात आमरण उपोषण सुरु!
मुंबई-माथाडी कामगारांच्या महाराष्ट्र शासनाशी संबंधित असलेल्या विविध प्रश्नांची सोडवणुक होण्यासाठी आज दि.१८ जून,२०१८ पासून आझाद मैदान,मुंबई येथे “महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन”च्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे उपोषण आंदोलन सुरु आहे,
या उपोषण आंदोलनामध्ये युनियनचे सरचिटणीस आमदार नरेंद्र अण्णासाहेब पाटील, कार्याध्यक्ष गुलाबराव जगताप, संयुक्त सरचिटणीस वसंतराव पवार, चंद्रकांत पाटील, ऋषिकांत शिंदे, आनंद पाटील, युनियनचे कायदेशीर सल्लागार अॅड.सौ.भारतीताई पाटील, अध्यक्ष एकनाथ जाधव, उपाध्यक्ष सुर्यकांत पाटील, खजिनदार गुंगा पाटील, सहा.खजिनदार भानुदास इंगूळकर, तसेच इतर सर्व पदाधिकारी व बृहन्मुंबई, ठाणे, पालघर, रायगड व महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झालेले आहेत. माथाडी सल्लागार समितीची पुनर्रचना करुन त्यावर अनुभवी कामगार नेत्यांच्या नेमणुका कराव्या, माथाडी बोर्डाच्या पुनर्रचना करुन त्यावर युनियनच्या सभासद संख्येच्या प्रमाणात सदस्यांच्या नेमणुका कराव्या, माथाडी बोर्डाच्या कार्यालयीन सेवेत कामगारांच्या सुशिक्षित मुला-मुलीना प्राध्यान्य द्यावे, महाराष्ट्रातील ३६ माथाडी मंडळाचे एकच माथाडी मंडळ करण्याचा प्रयत्न शासनाने थांबवावा, माथाडी मंडळावर पुर्णवेळ चेअरमन,सेक्रेटरी यांच्या नेमणुका कराव्या, माथाडी कायदा व बोर्डाच्या योजनांचा धोका निर्माण करणारे शासन निर्णय रद्द करावे, मापाडी कर्मचा-यांना बाजार समितीच्या कार्यालयीन सेवेत घ्यावे,कळंबोली स्टील मार्केट व रेल्वे माल धक्क्यावरील कामगारांच्या प्रश्नांची सोडवणुक व्हावी, गुलटेकडी मार्केट, पुणे, लातूर, कोल्हापूर येथिल कामगारांच्या प्रश्नांची सोडवणुक व्हावी, माथाडी कामगारांच्या घरकुलासाठी वडाळा व चेंबूर याठिकाणी दिलेल्या जमिनीसंदर्भातील प्रश्नांची आणि इतर दैनंदिन आदी प्रश्नांची सोडवणुक तातडीने करण्याबद्दल युनियनने शासनाकडे मागणी केली आहे. माथाडी कामगारांच्या न्याय्य मागणीकडे शासन सतत दुर्लक्ष करीत असल्यामुळे उपोषण आंदोलनाचा निर्णय घेणे भाग पडले असल्याचे पत्रकात युनियनने म्हटले आहे.
गेले अनेक वर्षापासून तेच प्रश्न तीच आश्वासने मात्र प्रत्यक्ष कोणतीच कृती सरकारकडून केली जात नसल्यामुळे तमाम माथाडी कामगारांमध्ये कमालीचा असंतोष पसरला आहे. राज्य सरकारने सकारात्मक भुमिकेतून गेले अनेक वर्षापासून प्रलंबित असलेले माथाडी कामगारांचे प्रश्न तातडीने सोडवावेत, अन्यथा माथाडी कामगारांना उपोषण आंदोलनाबरोबर रस्त्यावर उतरुन तीव्र निदर्शने व धरणे आंदोलन करणे भाग पडेल, असा इशारा “महाराष्ट्र राज्य माथाडी,ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन” ने दिला आहे.
टायर अचूक प्रकारचे नसूनही संजय टकलेला दुसरा क्रमांक
‘सरीवर सरी’ कार्यक्रमातील गीतांना रसिकांची उत्स्फूर्त दाद !
लीला पुनावाला फाऊंडेशनचा दहावी-बारावीचा निकाल १०० टक्के
अनधिकृत बांधकामे नियमित कण्यासाठी चार महिने मुदतवाढ
पालकमंत्री गिरीश बापट यांची पीएमआरडीए आढावा बैठकीत सूचना
पुणे-– पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए)मधील हिंजवडी- शिवाजीनगर मेट्रो, रिंगरोड, महाळुंगे टीपी स्कीम, पाणीपुरवठा, अनधिकृत बांधकाम, अग्निशमन केंद्र आदी विकासकामांचा महत्वपूर्ण बाबीवर बैठक पालकमंत्री गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली दि. १८ जुन २०१८ रोजी औंध कार्यालयात सोमवारी सकाळी ११ वाजता झाली.
सदर बैठकीला पालकमंत्री गिरीश बापट यांच्या उपस्थितीत पीएमआरडीएचे महानगर आयुक्त किरण गित्ते, अनधिकृत बांधकाम नियंत्रक प्रमुख तथा पोलिस अधीक्षक सारंग आवाड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कविता द्विवेदी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण देवरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद पाठक, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विद्युत वरखेडकर, मेट्रो मुख्य अभियंता विवेक खरवडकर, रिंगरोड मुख्य अभियंता चंद्रकांत जावळे, पाणीपुरवठा मुख्य अभियंता विठ्ठल तांदळे, विशेष
कार्यकारी अधिकारी सुहास मापारी, महानगर नियोजनकार विजयकुमार गोस्वामी, अग्निश्मन अधिकारी देवेंद्र पोटफोडे, मुख्य प्रशासन अधिकारी अर्चना तांबे उपस्थित होते.
बैठकीत हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पासाठी विविध ठिकाणी असलेले भूसंपादन तसेच शासनाकडे पुढील कार्यवाहीसाठी सादर करण्यात आलेले प्रस्ताव व निविदा याबाबत चर्चा झाली. तसेच म्हाळुंगे, वडाचीवाडी, हांडेवाडी, फुरसुंगी, आंबेगाव बुद्रुक, येवलेवाडी यांसह 15 गावात टीपी स्कीमच्या सध्यस्थीतीचा आढावा घेण्यात आला. म्हाळुंगे टीपी स्कीम लवकरच एक आदर्शवत टीपी स्कीम म्हणून नागरिकांना मिळणार आहे. म्हाळुंगे जवळील जवळपास सर्व नागरिकांनी या योजनेसाठी तयारी दर्शविली आहे.
पुण्यातील १२४ किलोमीटरचा रिंगरोड पीएमआरडीए मार्फत करण्यात येणार आहे. रिंगरोडसाठी वाघोली जवळची 30 किमीची जागा ताब्यात मिळाली आहे. तसेच वाघोली पाणी प्रश्नावरही यावेळीचर्चा करण्यात आली. पीएमआरडीए
क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांना नोटीस बजावून निष्कासनाची तत्पर कारवाई केली जाणार असल्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी केल्या.
पीएमआरडीए हद्दीतील दि. ३१/१२/२०१५ पूर्वीची अनधिकृत बांधकामे नियमित करणेसाठी २१ जुन २०१८ पर्यंतची मुदत देण्यात आली होती. सदरची जाहीर सूचना २२/१२/२०१७ रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. सदरची मुदत चार महिने म्हणजेच २१ ऑक्टोबर २०१८ पर्यंत वाढविण्यात आली आहे. नागरिकांची सूचना लक्षात घेता ही मुदत वाढून देण्यात आलेली आहे. तदनंतर पीएमआरडीएच्या वतीने कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तसेच पीएमआरडीएच्या माध्यमातून पाणीपुरवठा योजना, वाघोली अग्निशमन केंद्र तसेच वाघोली, शिक्रापूर बायपासचे कामकाजाच्या पाहणी लवकरच पालकमंत्री करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच मस्तानी, भूगाव, वडाचीवाडी, येवलेवाडी तलावातील गाळ कामकाजाची देखील सध्य स्थिती जाणून घेतली. तसेच लवकरच या कामकाजासाठी लागणारी यंत्रसामग्री पीएमआरडीएकडून उपलब्ध होणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले. तसेच घनकचरा व्यवस्थापनाबाबत सेवाभावी संस्थांची मदत घेऊन उद्भवणाऱ्या समस्या तातडीने सोडवता येतील असेही सांगितले, आदी सूचना पालकमंत्री गिरीश बापट यांनी बैठकीत केल्या.
अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी जमात प्रमाणपत्र पडताळणीकरिता विशेष मोहीम
पुणे – सन 2018-19 या शैक्षणिक वर्षात अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना इ. 10 वी, 12 वी नंतर पदविका/पदवी अभ्यासक्रमाकरिता तसेच इतर अभ्यासक्रमाकरिता प्रवेश घेताना अनुसूचित जमाती वैधता प्रमाणपत्रची आवश्यकता असते. त्यासाठी आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेतर्फे विेशेष मोहीम राबविण्यात येत आहे.
वैधता प्रमाणपत्राच्या आधारावर अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना सवलती मिळू शकतात. राज्यात नुकताच इयत्ता 10 वी व 12 वीच्या परिक्षेचा निकाल प्रसिद्ध झाल्यामुळे विद्यार्थ्यांची विविध अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी धावपळ सुरु झालेली आहे. परिणामी आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या अंतर्गत पुणे, नाशिक, नागपूर, ठाणे, औरंगाबाद, अमरावती, नंदूरबार व गडचिरोली अनुसूचित जमाती प्रमाणपत्र समित्यांकडे मोठ्या प्रमाणात अर्ज प्राप्त होत आहेत.
विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने त्यांना अनुसूचित प्रमाणपत्र त्वरित मिळण्याच्या दृष्टीने विशेष मोहीम आखण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना ई-ट्राईब पोर्टलवर https://www.etribevalidity.mahaonline.gov.in येथे ऑनलाईन अर्ज केल्यानंतर प्राधान्याने वैधता प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येईल. यासंदर्भात संबंधित समितीच्या पोलीस दक्षता पथकाला देखील गृह व शालेय चौकशीची व कागदपत्रांची पडताळणी करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे येथे हेल्पलाईन क्रमांक 020-26360941 सुरू करण्यात आलेला असून सकाळी 9 ते सायंकाळी 7 या वेळेत दूरध्वनीवरून वैधता प्रमाणपत्रावर मार्गदर्शन करण्यात येईल.
सर्व आठही अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी समित्यांमध्ये अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी विशेष कक्षामार्फत आवश्यक ती माहिती पुरविण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. तसेच सदर मोहिमेच्या कामकाजाचा वरिष्ठ व अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांकडून दैनंदिन आढावा घेतला जात असून अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना त्वरित वैधता प्रमाणपत्र मिळण्याच्या दृष्टीने सर्व प्रक्रिया पूर्ण करून आवश्यक ती खबरदारी घेण्यात येत आहे. सर्व समित्यांच्या स्तरावर अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी दूरध्वनी सेवा उपलब्ध करून देण्यात येत आहे.
अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी पुणे समितीसाठी पुणे, सांगली, सातारा, सोलापूर व कोल्हापूर या कार्यक्षेत्राकरिता 28, क्विन्स गार्ड, पुणे (020-26336961), ठाणे समितीत ठाणेसह मुंबई, मुंबई उपनगर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्गसाठी वर्तकनगर प्रभाग समिती कार्यालय, वर्तकनगर, ठाणे (पश्चिम), ठाणे (022-25883503), नाशिक समितीमध्ये नाशिक व अहमदनगरकरिता आदिवासी विकास भवन, जुना आग्रा रोड, नाशिक (0253-2577059), औरंगाबाद समितीतील औरंगाबाद, हिंगोली, परभणी, जालना, नांदेड, बीड, लातूर व उस्मानाबाद या कार्यक्षेत्रासाठी सेंट लॉरेन्स हायस्कूलजवळ, टाऊन सेंटर सिडको, औरंगाबाद (0240-2362901), अमरावती समितीत अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम आणि यवतमाळसाठी शासकीय विश्रामगृहाजवळ, राज्य माहिती आयुक्त यांच्या कार्यालयासमोर, सना हाऊस, जुना बायपास रोड, चपराशीपुरा, अमरावती (0721-2550995), नागपूर समितीसाठी नागपूर, वर्धा, भंडारा व गोंदियाकरिता आदिवासी विकास भवन, गिरी पेठ, नागपूर (0712-2560031), नंदूरबार समितीसाठी नंदुरबार, धुळे, जळगावकरिता शासकीय दूध डेअरी इमारत, आरटीओजवळ, नंदूरबार (02564-210130) तर गडचिरोली समितीसाठी गडचिरोली व चंद्रपूरकरिता जिल्हा परिषद कॉलनी कॉम्प्लेक्स, गडचिरोली (07132-223179 याठिकाणी संपर्क साधावा.
‘डेथ ऑफ आर्किटेक्चर ‘ विषयावरील प्रदर्शनाचे उदघाटन
सहकारी बॅंकांनी शेवटच्या घटकापर्यंत पोहोचावे-गिरीश बापट
माथाडी कामगारांच्या विविध प्रश्नांची सोडवणूक होण्यासाठी उद्या पासून आमरण उपोषण
मुंबई- माथाडी कामगारांशी संबंधित महाराष्ट्र शासनाच्या कामगार, पणन व सहकार, उद्योग व अन्य खात्याअंतर्गत प्रलंबित असलेल्या प्रश्नांची सोडवणुक होण्यासाठी सोमवार दि.१८ जून, २०१८ पासून मंत्रालयाजवळ, सकाळी ८: ३० वाजता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला हार व वंदन करून, आझाद मैदानात सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते आमरण उपोषण करणार असल्याचे महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे नेते सरचिटणीस नरेंद्र अण्णासाहेब पाटील, कार्याध्यक्ष गुलाबराव जगताप, आमदार शशिकांत शिंदे व अध्यक्ष एकनाथ जाधव यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे जाहिर केले आहे. दि.१३ जून रोजी माथाडी भवन, नवीमुंबई येथे आयोजित केलेल्या विविध माथाडी बोर्डाच्या टोळीचे मुकादम, उपमुकादम, कार्यकत्र्यांच्या बैठकित हा निर्णय निश्चित करण्यात आला.
(१) माथाडी सल्लागार समितीची पुर्नरचना करुन अनुभवी कामगार नेत्यांच्या सदस्य म्हणून नेमणुका कराव्या,
(२) विविध माथाडी मंडळाच्या पुनर्रचना करुन त्यावर युनियनच्या सभासद संख्येच्या प्रमाणात सदस्यांच्या नेमणुका कराव्या,
(३) माथाडी मंडळाच्या कार्यालयीन सेवेत माथाडी कामगारांच्या मुलांना प्राधान्य द्यावे,
(४) माथाडी मंडळावर पुर्णवेळ चेअरमन व सेक्रेटरी यांच्या नेमणुका कराव्या,
(५) महाराष्ट्रातील ३६ माथाडी मंडळाचे एकच माथाडी मंडळ करण्याचा प्रयत्न शासनाने थांबवावा,
(६) माथाडी कायदा व कामगारांच्या हिताला बाधा आणणारे शासनाने काढलेले शासन निर्णय रद्द करावे,
(७) वडाळा घरकुल योजनेसंबंधी महसूल विभागाकडून आदेश मिळणे व चेंबूर येथिल जमिनीवरील झोपड्यांचे अतिक्रमण हटविणे,
(८) नाशिक येथील माथाडी कामगारांच्या लेव्ही व अन्य प्रश्नांची सोडवणुक करणे,
(९) गुलटेकडील मार्केट, पुणे व लातूर येथिल कामगारांच्या प्रश्नांची सोडवणुक करणे,
(१०) माथाडी कायदा व मंडळाच्या योजनेचा दुरुपयोग करणाऱ्या अधिकारी/व्यक्तींना रोखण्यासाठी स्वतंत्र कमिटी गठीत करणे,
(११) बाजार समितीच्या अनुज्ञाप्तीधारक मापाडी कर्मचा-यांना बाजार समितीच्या सेवेत घेणे,
(१२) माथाडी अॅक्ट, १९६९ ला ५० वर्षे पुर्ण होत असल्याने सुवर्णमहोत्सवानिमित्त शासनामार्फत विविध कार्यक्रमाचे आयोजन करणे आदी माथाडी कामगारांचे न्याय्य प्रश्न महाराष्ट्र शासनाकडे संघटनेने मांडलेले आहेत, यासंदर्भात अनेक वेळा संयुक्त बैठकाही झाल्या तसेच लाक्षणिक बंद, मोर्चे यासारखी आंदोलनेही केली, मात्र महाराष्ट्र शासनाने प्रत्येक वेळी प्रश्नांची सोडवणुक करण्याचे फक्त आश्वासन दिले. पण प्रत्यक्षात कामगारांच्या न्याय्य प्रश्नांची सोडवणुक केली जात नसल्याचे महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे म्हणणे असून, माथाडी कामगारांच्या न्याय्य प्रश्नांची महाराष्ट्र शासनाकडून सोडवणुक व्हावी, यासाठी हा आमरण उपोषण आंदोलनाचा पवित्रा घेणे भाग पडले आहे. याही आंदोलनाची महाराष्ट्र शासनाने त्वरीत दखल न घेतल्यास पुढील आंदोलन अधिक तीव्र केले जाईल, असाही ईशारा युनियनने दिला आहे.
कष्टकरी कामगारांना नोकरीविषयक संरक्षण मिळण्यासाठी स्व. आमदार अण्णासाहेब पाटील यांनी महाराष्ट्र शासनाकडून “माथाडी अॅक्ट,१९६९” हा कायदा व त्यान्वये विविध माथाडी मंडळाच्या योजनांची निर्मिती करुन घेतली, माथाडी मंडळाच्या कामकाजात सुसूत्रता रहाण्यासाठी मंडळाच्या पुनर्रचना करणे, सेवानिवृत्त झालेल्या कर्मचा-यांच्या जागेवर माथाडी कामगारांच्या मुलांना सेवेत घेणे, माथाडी कायद्यात बदलत्या परिस्थितीत सुधारणा करण्याऐवजी मूळ कायद्यात व योजनेत फेरबदल करुन माथाडी कायदा व माथाडी मंडळांच्या योजना धोक्यात आणणारे निर्णय शासन घेत आहे, शासनाने आपली ही भुमिका बदलून सकारात्मक भूमिकेतून माथाडी कामगारांचे प्रश्न सोडवावेत, असेही कळकळीचे आवाहन संघटनेने केले आहे.
रमजान ईद दिवशीच मिळाले रेश्मा शेख यांना नवे घर
माय मावळ फौन्डेशनचा उपक्रम
पिंपरी – :जातीय सलोख्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य शासनातर्फे गेली अनेक वर्षे विविध उपक्रम राबविले जात आहेत. एकीकडे देशभरात जातीय ताणतणावाच्या अनेक घटना घडत असताना मावळ तालुक्यात मात्र जातीय सलोख्याचे प्रयत्न होताना दिसत आहेत . आज रमजान ईदच्या दिवशी(ता.16) एका विधवा मुस्लीम महिलेला एका मराठा हिंदु लोकप्रतिनिधीकडून जी ईदी (ईदची भेट गिफ्ट) देण्यात आली आहे ती अनोखी आहे. तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष तथा माय मावळ फौन्डेशनचे संस्थापक अध्यक्ष सुनील शंकरराव शेळके यांनी चांदखेड(ता.मावळ) येथील रेश्मा अहमद शेख या शेतमजुर महिलेचे सुमारे 50 वर्षापुर्वीचे मोडकळलेले घर नव्याने बांधून दिले आहे. गेल्या दोन महिन्यांपासून घराचे सुरू असलेले बांधकाम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यात आले. घरास ‘अपनापन’ नाव देण्यात आले आणि योगायोगाने रमजान ईदच्या दिवशी माजी महापौर आझम पानसरे यांच्या हस्ते ते रेश्मा शेख यांना सुपूर्त करण्यात आले. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी पत्रकार अमीन खान होते.
सुनील शेळके यांनी आज ‘अपनापन’च्या माध्यमातून या संतभूमीच्या परंपरेत सामाजिक ऐक्याची भर घातली आहे. लोकप्रतिनिधींच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उमटत असताना शेळके यांनी केलेले काम आशा निर्माण करणारे असल्याचे अमीन खान यांनी सांगितले.
आझम पानसरे म्हणाले, की सुनील शेळके यांनी तालुक्यातील सर्व समाजांसाठी स्वखर्चातून मदत केली आहे. विशेषत: ग्रामीण भागातील उपेक्षितांसाठी त्यांनी औषधोपचार, लग्नकार्य, ज्येष्ठांसाठी आरोग्योपचार, भुकेल्यांवृध्दांसाठी दररोज घरपोच जेवणाचे डबे, सामाजिक उपक्रमांसाठी निधी अशा कितीतरी प्रकारे त्यांनी केलेल्या मदतीमुळे सामाजिक सलोख्याबरोबरच लोकप्रतिनिधींची प्रतिमा देखील आशादायक होण्यास मदत झाली आहे. अनेक गावातील विकासकामांसाठी केवळ शासनाच्या योजनेवर अवलंबून न राहता त्यांनी गावक-यांचे श्रमदान आणि लोकवर्गणीची सांगड घातल उर्वरित रक्कम स्वत:खर्च करून सामाजिक बांधिलकीची जपणूक केली आहे.
रेश्मा शेख म्हणाल्या, आज जे घर मिळाले आहे त्यामुळे आता दोन मुली व एका मुलाचे शिक्षण, संगोपन आणि संसारातील आईची भूमिका अधिक चांगल्या प्रकारे निभावू शकेल.
प्रास्ताविकात सुनील शेळके म्हणाले, की लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना सामाजिक उत्तरदायित्वाचे भान नेत्यांनी ठेवले तर सामाजिक सलोख्यास मोठे बळ मिळते. पैसा कमावून जो आनंद मिळतो त्यापेक्षा तो सत्पात्री दानधर्मातून अधिक असतो. विद्या ददति विनयं, विनयात याति पात्रताम्, पात्रत्वाद् धनमाप्नोति, धनाद् धर्म तत: सुखम्… या भावनेतून आई-वडिलांनी दिलेल्या संस्कारातून आपण जातपात न पाहाता गरजूंसाठी प्रामाणिकपणे काम करतो आहोत. रेश्माताईंना घर बांधून दिले ते निरपेक्ष भावनेने दिलेली भेट आहे.
यावेळी सरपंच अमोल कांबळे, उपसरपंच पोरस बारमुख, पोलिस पाटील दत्ता माळी, माजी नगराध्यक्ष रवींद्र दाभाडे, नगरसेवक संदीप शेळके, बाबुलाल नालवंद, अब्दुल शेख, सामाजिक कार्यकर्त्या हसिना मुलाणी, अजित आगळे, गोपीचंद गराडे, फौन्डेशनचे कार्यकर्ते आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तळेगाव दाभाडे येथील माजी नगरसेवक चंद्रभान खळदे आणि व्यावसायिक जयंतीलाल ओसवाल या मित्रांनी स्टेशन भागातील मुस्लिम बांधवांना नमाज पठणासाठी जागा नसल्याने स्वत:च्या मालकीची जागा विनामोबदला, विना भाडे सलग 15 वर्षे वापरण्यास दिली होती. न्यायालयीन लढ्यानंतरही येथील मुस्लिम कब्रस्तान ट्रस्टला जमिनीचा ताबा देण्याच्या कुरघोड्या होत असताना अखिल भारतीय हिंदु-मुस्लिम ऐक्य कमिटीचे सदस्य तथा उद्योजक किशोर आवारे आणि तत्कालीन नगराध्यक्षा सुलोचनाताई आवारे यांनी त्यावर मात करून ट्रस्टला जागेचा ताबा घेण्यात मोठी भूमिका बजावली आहे.
रोजगार मेळावा सोहळा नसून शासनाची बांधिलकी -उद्योगमंत्री
पुणे – राज्यातील तरुणाईच्या हाताला रोजगार मिळवून देण्याचे काम उद्योग विभागाने हाती घेतले आहे. त्यासाठी बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळाव्याची अभिनव संकल्पना राज्य सरकारने सुरू केली आहे. रोजगार मेळावा हा फक्त ‘सोहळा’ नसून शासनाची ती ‘बांधिलकी’ असल्याचे सांगत या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून नोकरी मागणारा आणि देणारा यांच्यात सांगड घालण्याचे काम शासन करत असल्याचे प्रतिपादन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज केले.
राज्य शासनाचा उद्योग विभाग आणि सी.आय.आय.च्यावतीने उरळी देवाची जि. पुणे येथे आयोजित पहिल्या बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी उद्योग मंत्री सुभाष देसाई बोलत होते. यावेळी पालकमंत्री गिरीश बापट, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, शिवसेनेचे युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे, खादी ग्रामोद्योग महामंडळाचे विशाल चोरडीया, उद्योग विभागाचे विकास आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, सी. आय. आय.चे महाव्यवस्थापक आशिष केशरवानी उपस्थित होते.
उद्योग मंत्री सुभाष देसाई म्हणाले, राज्यातील उद्योगवाढी बरोबरच तरुणांच्या हाताला काम मिळवून देण्याचे काम उद्योग विभागाचे आहे. राज्यात उद्योगांची संख्या वाढली की त्यांना काम करणाऱ्या कुशल कामगारांचीही गरज असते, असे कुशल कामगार या मेळाव्याच्या माध्यमातून उद्योजकांना मिळणार आहेत. बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळाव्यासाठी पहिल्याच आठवड्यात 8 हजार 800 उमेदवारांनी ऑनलाईन नोंदणी केली होती. तर दोन ते तीन हजार नव्या उमेदवारांनी आज प्रत्यक्ष नोंदणी केली आहे. हा पहिलाच मेळावा अत्यंत यशस्वी झाला आहे. याच प्रकारचे मेळावे राज्यभर घेण्यात येणार आहेत. यासाठी एका स्वतंत्र कक्षाची स्थापना करून या मेळाव्याच्या माध्यमातून नोंदणी केलेल्या उमेदवारांना नोकरी मिळेपर्यंत त्याचा पाठपुरवा करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पालकमंत्री गिरीश बापट म्हणाले, तरुणांच्या हाती ताकद आहे, बुद्धी आहे, परंतु रोजगार नसल्याने प्रश्न निर्माण होत आहेत. अशा परिस्थितीत या रोजगार मेळाव्याला मोठे महत्व आहे. राज्यातील आतापर्यंतचा हा सर्वात मोठा मेळावा आहे. एका युवकाला रोजगार मिळाला की त्याचे संपुर्ण कुटुंब उभे राहते. त्यामुळे या मेळाव्याच्या माध्यमातून महाराष्ट्रातील अनेक कुटुंबे उभी राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यमंत्री विजय शिवतारे म्हणाले, विकासाच्या कामात प्रशिक्षीत मनुष्यबळाची खूप आवश्यकता असते. या मेळाव्याच्या माध्यमातून अनेक बेरोजगार युवकांना काम मिळणार आहे. रोजगाराबरोबरच स्वयंरोजगाराला या माध्यमातून चालना मिळणार आहे. गुंजवणी धरणाच्या माध्यमातून पुरंदर तालुक्याच्या विकासाला मोठी चालना मिळाली आहे. पुरंदर विमानतळामुळे पुरंदर हा सर्वात वेगाने विकसित होत असलेला तालुकाअसल्याचे त्यांनी सांगितले.
श्री आदित्य ठाकरे म्हणाले, बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळावा ही राज्य शासनाची अत्यंत उपयुक्त संकल्पना आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून राज्यातील तरुणाईच्या हाताला त्याच्या योग्यतेचे काम मिळणार आहे. राज्यातील बेरोजगारीचे प्रमाण कमी होण्यासाठी या मेळाव्याचा मोठा उपयोग होणार आहे. कोणत्याही परिस्थितीत तरुणांनी जिद्द आणि चिकाटी सोडू नये असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. हर्षदीप कांबळे यांनी केले. तर आभार विश्वनाथ राजाळे यांनी मानले. मेळाव्याला हजारो तरुण-तरुणींसह पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मेळाव्याची ठळक वैशिष्ट्ये
- या मेळाव्यासाठी एकूण १० हजार ६८० उमेदवारांची ऑनलाईन आणि ऑफलाईन नोंदणी.
- मेळाव्यामध्ये ४ हजार ३०० उमेदवारांची उपस्थिती.
- मेळाव्यात १ हजार ८९० उमेदवारांना नियुक्ती पत्र.
- नोंदणी झालेल्या उमेदवारांना नोकरी मिळवून देण्याच्या पाठपुराव्यासाठी उद्योग विभाग स्वतंत्र कक्ष उभारणार.
- देशातील नामवंत ६० हून अधिक कंपन्यांची मेळाव्यात हजेरी.
- स्वयंरोजगार मार्गदर्शनासाठी स्वतंत्र दालन.
- स्वयंरोजगार मार्गदर्शनासाठी विशेष चर्चासत्राचे आयोजन.
- योग्य नियोजनामुळे मेळाव्यासाठी उपस्थित उमेदवार आणि पालक यांच्यात समाधान.
- पालक आणि उमेदवारांच्यात मोठा उत्साह.
मेळाव्यात सहभागी झालेल्या उमेदवारांच्या प्रतिक्रीया-
मेळाव्याला आल्याचे सार्थक झाले…
मी माजी सैनिक आहे. सैन्य दलातून निवृत्त झाल्यावर कुटुंबाची काळजी घेत, घराच्या जवळ दुसरी नोकरी मिळविण्यासाठी प्रयत्नशील होतो. बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळाव्याची माहिती मिळाली, त्यानुसार मी नोकरीसाठी मेळाव्यात नाव नोंदविले. सैन्य दलातील माझ्या कामाचा अनुभव पाहून मला तात्काळ या ठिकाणी नोकरी मिळाली. मला लगेचच जॉईनिंग लेटर ही मिळाले. या मेळाव्याला आल्याचे सार्थक झाले, मी शासनाचा मनापासून आभारी आहे.
– आबासाहेब चौधरी रा. फुरसुंगी, पुणे.
मला माझ्या पात्रतेची नोकरी मिळाली!
कराड तालुक्यातील छोट्या खेड्यातील मी मुलगा आहे. मी सीएनजी ऑपरेटर आहे. मी कामाच्या शोधात होतो. नोकरीसाठी मी अनेक ठिकाणी जावून आलो परंतू मला माझ्या पात्रतेची नोकरी मिळत नव्हती. बाळासाहेब ठाकरे मेळाव्यात मी आलो आणि मला माझ्या पात्रतेची नोकरी मिळाली. या ठिकाणी मला थेट जॉईनिंग लेटरच मिळाले, त्यामुळे मी खूप खूश असून शासनाचा आभारी आहे.
– राहूल आनंदराव खबाले,रा. विंग, ता. कराड, जि. सातारा.
नोकरी मिळाल्याचा मोठा आनंद!
बाळासाहेब ठाकरे मेळाव्याची माहिती मला मिळाल्यानंतर या ठिकाणी मी नोकरीसाठी नावाची नोंदणी केली. एकाच ठिकाणी एवढ्या कंपन्या आल्यामुळे नोकरी नक्की मिळेल अशी आशा होती. मात्र लगेच आजच हातात कॉल लेटर मिळेल असे वाटले नव्हते. मात्र या रोजगार मेळाव्यामुळे हे शक्य झाले. नोकरी मिळाल्याचा मला मोठा आनंद असून शासनाचा मी खूप-खूप आभारी आहे.
– प्रसाद सुनिल मेमाणे ,रा. पारगाव, ता. पुरंदर, जि. पुणे.
लगेच नोकरी मिळेल असे वाटलेच नव्हते…
दौंड तालुक्यातले लोणारवाडी हे माझ गाव आहे. मात्र मी पुरंदर तालुक्यातल्या माझ्या काकांच्या गावात शिक्षण पूर्ण केले. बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळाव्या विषयी माहिती मला मिळाल्यावर मी सहजच नोकरीसाठी माझ्या नावाची नोंदणी केली. एवढी मुल इथ दिसल्यावर मला नोकरी मिळेल का? अशी शंका होती, मात्र अगदी सहजच मला नोकरी मिळाली, कॉल लेटर हातात घेतल्यावर सुध्दा एवढ्या सहज नोकरी मिळाली आहे, असं वाटतच नाही. मी शासनाचा आभारी आहे.
– अक्षय गाढवे ,रा. लोणारवाडी, ता. दौंड, जि. पुणे.
खुपच चांगले उमेदवार आम्हाला मिळाले
बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळाव्यात आमची आयएसटीसी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी सहभागी झाली होती. या निमित्ताने अनेक होतकरू, हुशार उमेदवार आम्हाला मिळाले आहेत. आमच्याकडे आलेल्या अर्जातील मुलांच्या पात्रतेनुसार आम्ही त्यांना नोकरी देणार आहे. या मेळाव्याच्या निमित्ताने कुशल उमेदवार आम्हाला मिळणार आहेत, या रोजगार मेळाव्याचा उमेदवारांबरोरच कंपन्यांनाही चांगला फायदा झाला आहे.- मनिषा मोहिते ( आयएसटीसी प्रा. लि. कंपनी. प्रतिनीधी रा. खराडी, पुणे. )
डॉइश बँक आणि स्वदेस फाउंडेशन वृक्षारोपणासाठी एकत्र
मुंबई-: रॉनी आणि झरीना स्क्रूवाला यांनी स्थापन केलेल्या स्वदेस फाउंडेशनने शनिवारी,१६ जून रोजी, डॉइश बँकेतील अनेक उत्साही स्वयंसेवकांच्या साथीने वृक्षारोपण मोहिमेचे आयोजन केले.
पुण्यातील पथक सकाळी १० वाजेच्या सुमारास रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील साइकोंड गावात पोहोचले. वृक्षारोपणाची प्रक्रिया आणि त्यादरम्यान अवलंबण्याचे सुरक्षिततेचे उपाय यांची माहिती
त्यांना स्वदेसच्या पथकाने दिली. तेथून ते खोदून ठेवलेल्या शेतांपर्यंत (डग फिल्ड्स) चालत गेले आणि त्यांनी एका मागोमाग एक आंब्याची रोपे लावण्यास सुरुवात केली. प्रत्येक कर्मचाऱ्याने सरासरी ५ रोपे लावल्यामुळे जवळपास ६० कर्मचाऱ्यांनी लावलेल्या रोपांची संख्या ५०० पर्यंत पोहोचली. येत्या ३-४
वर्षांत या रोपांची फळे लगडलेली झाडे होतील आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यात ती मदत करतील.त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना उपजीविकेचा स्रोतही पुरवतील.रायगड जिल्ह्यातील ग्रामीण भागात मोडणाऱ्या १९०० खेड्यांमध्ये सर्वांगीण ग्रामीण विकासासाठी काम करणाऱ्या स्वदेस फाउंडेशनने डॉइश बँकेच्या पुणे येथील कर्मचाऱ्यांना त्यांचा वेळ व संसाधने सत्कारणी
लावण्यासाठी ही संधी मिळवून दिली. यामुळे शेतकऱ्यांनाही लाभ मिळणार आहे.
या उपक्रमाबद्दल स्वदेस फाउंडेशनचे विश्वस्त व संस्थापक संचालक रॉनी आणि झरीना स्क्रूवाला म्हणाले, “या विशाल वृक्षारोपण उपक्रमासाठी डॉइश बँकेशी सहयोग करता आला याचा आम्हाला, स्वदेस फाउंडेशनला, खूप आनंद वाटतो. हा उपक्रम आनंदाने भरलेला असून; समाज, आमचे कर्मचारी आणि डॉइश
बँक एकत्र येण्याची ही तिसरी वेळ होती. फळझाडांच्या रोपणाचे महत्त्व अतिशयोक्त ठरणार नाही, कारण याचे फायदे पर्यावरणाच्या तसेच आर्थिक अशा दोन्ही दृष्टिकोनातून, सध्याच्या व आगामी पिढ्यांना
मिळणार आहेत.” रोपांच्या लागवडीनंतर शेतकरी व डॉइश बँकेच्या कर्मचाऱ्यांमध्ये संवादाचे एक सत्र झाले. या विचार व कल्पनांच्या आदानप्रदानामुळे बँकेतील कर्मचाऱ्यांना शेतकऱ्यांसोबत अधिक खोलवर जोडून घेण्यासाठी एक मार्ग मिळाला. डॉइश बँकेच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी विभागाच्या प्रमुख तसेच उपाध्यक्ष रुची खेमका म्हणाल्या, “आमचा स्वदेस फाउंडेशनसोबतचा सहयोग म्हणजे उपजीविकेचे शाश्वत स्रोत निर्माण करून
ग्रामीण समुदायांना सक्षम करण्याप्रती आम्ही मानत असलेली बांधिलकी आहे. या वृक्षारोपण उपक्रमाने आमच्या कर्मचाऱ्यांना शेतकऱ्यांच्या आयुष्यांत बदल घडवून आणण्यासाठी एक अर्थपूर्ण व्यासपीठ दिले.
शेतकऱ्यांसोबत संवाद साधणे आणि त्याचवेळी वृक्षारोपणासाठी त्यांच्यासोबत काम करणे हा आमच्यासाठी खूपच समाधान देणारा अनुभव होता. आमच्या कर्मचाऱ्यांना परिवर्तनाचे वाहक होण्याची संधी मिळेल अशा अनेक उपक्रमांत भाग घेण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.” शहरात राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना ग्रामीण भागातील पाककलेचा खरा स्वाद चाखण्याची संधी देणाऱ्या भोजनाच्या कार्यक्रमाने उपक्रमाची सांगता झाली. या भोजनाचे आयोजन स्थानिक स्वयंसहाय्यता गटाने केले होते. ग्रामीण भारतात शाश्वत विकास घडवून आणण्यासाठी सर्वोत्तम पद्धतींचे उपयोजन करण्यावर स्वदेस फाउंडेशनचा भर कायम आहे. डॉइश बँक स्वदेस फाउंडेशनला २०१६ सालापासून मदत पुरवत आहे. रायगड जिल्ह्यातील सहा तालुक्यांतील ग्रामीण भागात ७,५००हून अधिक कुटुंबांना पिण्याचे पाणी पुरवण्यात बँकेने स्वदेस फाउंडेशनला मदत केली आहे. त्याचप्रमाणे सुमारे ३५०हून अधिक ग्रामीण कुटुंबांची उपजीविकेची साधने
अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने वर्षाजल नियोजनाची साधने निर्माण करण्यात व सिंचनाच्या वितरणातही बँकेने मदत केली आहे.स्वदेस फाउंडेशनविषयी: रॉनी आणि झरीना स्क्रूवाला यांनी स्थापन केलेल्या स्वदेस फाउंडेशनचा एककेंद्री भर ग्रामीण भारताला सर्वांगीण व शाश्वत वाढीच्या माध्यमातून सक्षम करण्यावर आहे. यासाठी ही संस्था ग्रामीण भागातील
समुदायांच्या साथीने त्यांच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न करते, अनेकविध कार्यक्रमांची अमलबजावणी प्रत्यक्ष क्षेत्रावर जाऊन करते आणि ग्रामीण भागाला सध्याच्या परिस्थितीतून बाहेर काढण्याच्या धोरणाकडे (एग्झिट स्ट्रॅटेजी) वाटचाल करते.
त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे विकासासाठी सर्व बाजूंनी, आतून-बाहेरून हस्तक्षेप करणारे आणि वाढता प्रभाव असणारे प्रारूप. आरोग्य व पोषण, शिक्षण, पाणी व स्वच्छता आणि आर्थिक विकास या चार क्षेत्रांच्या माध्यमातून व्यक्ती आणि समुदाय विकासाच्या सर्व बाजू लक्षात घेणारा सर्वांगीण दृष्टिकोन संस्थेने ठेवला
आहे. सध्या संस्था रायगड जिल्ह्यांतील सहा तालुक्यात काम करत आहे. त्यांच्या कामाचा लाभ सुमारे पाचेक लाख लोकांना मिळत आहे.
डॉइश बँकेविषयी:
डॉइश बँक व्यावसायिक व गुंतवणूक बँकिंग, रिटेल बँकिंग, व्यवहार (ट्रान्झॅक्शन बँकिंग) आणि मालमत्ता व
संपत्ती व्यवस्थापन उत्पादने व सेवा कंपन्या, सरकारे, संस्थात्मक गुंतवणूकदार, छोटे व मध्यम
आकारमानाचे उद्योग व खासगी व्यक्तिगत ग्राहकांना पुरवते. डॉइश बँक ही जर्मनीतील आघाडीची बँक
असून, युरोपात हिचे स्थान भक्कम आहे. अमेरिका आणि आशिया पॅसिफिक प्रदेशातही बँकेला महत्त्वाचे
स्थान आहे.



