लीला पुनावाला फाऊंडेशनचा दहावी-बारावीचा निकाल १०० टक्के
पुणे – लीला पुनवाला फाऊंडेशन(एलपीएफ) शिष्यवृत्तीद्वारे वंचित पण हूशार मुलींना शिक्षणासाठी पाठिंबा देतो. नुकत्याच घोषित झालेल्या एसएससी आणि एचएससी परीक्षांमध्ये लीला पूनावाला फाउंडेशनच्या मुलींनी चमकदार कामगीरी केली आहे. लीला ज्युनियर्स आणि लीला सीनियर्सच्या चौथ्या बॅचचा एसएससी बोर्ड आणि एचएससी बोर्डचा निकाल १०० टक्के लागला आहे.
एलपीएफने समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील आणि शिकण्याची इच्छा असरणार्या हुशार मुलींना पाठिंबा देतो. ह्या मुलींचा ७ ते पदवी पर्यंतच्या शिक्षणाचा पूर्ण खर्च एलपीएफ उचलतो. आता हे एलपीएफचे आठवे वर्ष आहे.
ह्या वर्षी २० टक्यांपेक्षा जास्त मुलींना ८० टक्के मार्क मिळविले आहेत, तसेच अन्य मुलींना ७० टक्यांपेक्षा अधिक गुण मिळाले आहे. लीला सीनियर्सला देखील एकूण ७० टक्यांपेक्षा अधिक गुण मिळाले आहेत.
मुलींच्या शिक्षणासाठी आणि संपुर्ण विकासासाठी आवश्यक असलेला सर्व खर्च फाउंडेशन उचलतो. जोपर्यंत त्या पदवीधर होत नाही तोपर्यंत त्यांचा पूर्ण खर्च परतफेडीची अपेक्षा न करता संपुर्णतहा निशुल्क तत्वावर करत आहे. गरजू मुलींचे भविष्य सुरक्षीत करुन त्यांना स्वताच्या पायावर समर्थपणे उभे करण्यासाठी एलपीएफ नेहमीच प्रयत्नशील आहे.