Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

डॉइश बँक आणि स्वदेस फाउंडेशन वृक्षारोपणासाठी एकत्र

Date:

मुंबई-: रॉनी आणि झरीना स्क्रूवाला यांनी स्थापन केलेल्या स्वदेस फाउंडेशनने शनिवारी,१६ जून रोजी, डॉइश बँकेतील अनेक उत्साही स्वयंसेवकांच्या साथीने वृक्षारोपण मोहिमेचे आयोजन केले.
पुण्यातील पथक सकाळी १० वाजेच्या सुमारास रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील साइकोंड गावात पोहोचले. वृक्षारोपणाची प्रक्रिया आणि त्यादरम्यान अवलंबण्याचे सुरक्षिततेचे उपाय यांची माहिती
त्यांना स्वदेसच्या पथकाने दिली. तेथून ते खोदून ठेवलेल्या शेतांपर्यंत (डग फिल्ड्स) चालत गेले आणि त्यांनी एका मागोमाग एक आंब्याची रोपे लावण्यास सुरुवात केली. प्रत्येक कर्मचाऱ्याने सरासरी ५ रोपे लावल्यामुळे जवळपास ६० कर्मचाऱ्यांनी लावलेल्या रोपांची संख्या ५०० पर्यंत पोहोचली. येत्या ३-४
वर्षांत या रोपांची फळे लगडलेली झाडे होतील आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यात ती मदत करतील.त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना उपजीविकेचा स्रोतही पुरवतील.रायगड जिल्ह्यातील ग्रामीण भागात मोडणाऱ्या १९०० खेड्यांमध्ये सर्वांगीण ग्रामीण विकासासाठी काम करणाऱ्या स्वदेस फाउंडेशनने डॉइश बँकेच्या पुणे येथील कर्मचाऱ्यांना त्यांचा वेळ व संसाधने सत्कारणी
लावण्यासाठी ही संधी मिळवून दिली. यामुळे शेतकऱ्यांनाही लाभ मिळणार आहे.
या उपक्रमाबद्दल स्वदेस फाउंडेशनचे विश्वस्त व संस्थापक संचालक रॉनी आणि झरीना स्क्रूवाला म्हणाले, “या विशाल वृक्षारोपण उपक्रमासाठी डॉइश बँकेशी सहयोग करता आला याचा आम्हाला, स्वदेस फाउंडेशनला, खूप आनंद वाटतो. हा उपक्रम आनंदाने भरलेला असून; समाज, आमचे कर्मचारी आणि डॉइश
बँक एकत्र येण्याची ही तिसरी वेळ होती. फळझाडांच्या रोपणाचे महत्त्व अतिशयोक्त ठरणार नाही, कारण याचे फायदे पर्यावरणाच्या तसेच आर्थिक अशा दोन्ही दृष्टिकोनातून, सध्याच्या व आगामी पिढ्यांना
मिळणार आहेत.” रोपांच्या लागवडीनंतर शेतकरी व डॉइश बँकेच्या कर्मचाऱ्यांमध्ये संवादाचे एक सत्र झाले. या विचार व कल्पनांच्या आदानप्रदानामुळे बँकेतील कर्मचाऱ्यांना शेतकऱ्यांसोबत अधिक खोलवर जोडून घेण्यासाठी एक मार्ग मिळाला. डॉइश बँकेच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी विभागाच्या प्रमुख तसेच उपाध्यक्ष रुची खेमका म्हणाल्या, “आमचा स्वदेस फाउंडेशनसोबतचा सहयोग म्हणजे उपजीविकेचे शाश्वत स्रोत निर्माण करून
ग्रामीण समुदायांना सक्षम करण्याप्रती आम्ही मानत असलेली बांधिलकी आहे. या वृक्षारोपण उपक्रमाने आमच्या कर्मचाऱ्यांना शेतकऱ्यांच्या आयुष्यांत बदल घडवून आणण्यासाठी एक अर्थपूर्ण व्यासपीठ दिले.
शेतकऱ्यांसोबत संवाद साधणे आणि त्याचवेळी वृक्षारोपणासाठी त्यांच्यासोबत काम करणे हा आमच्यासाठी खूपच समाधान देणारा अनुभव होता. आमच्या कर्मचाऱ्यांना परिवर्तनाचे वाहक होण्याची संधी मिळेल अशा अनेक उपक्रमांत भाग घेण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.” शहरात राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना ग्रामीण भागातील पाककलेचा खरा स्वाद चाखण्याची संधी देणाऱ्या भोजनाच्या कार्यक्रमाने उपक्रमाची सांगता झाली. या भोजनाचे आयोजन स्थानिक स्वयंसहाय्यता गटाने केले होते. ग्रामीण भारतात शाश्वत विकास घडवून आणण्यासाठी सर्वोत्तम पद्धतींचे उपयोजन करण्यावर स्वदेस फाउंडेशनचा भर कायम आहे. डॉइश बँक स्वदेस फाउंडेशनला २०१६ सालापासून मदत पुरवत आहे. रायगड जिल्ह्यातील सहा तालुक्यांतील ग्रामीण भागात ७,५००हून अधिक कुटुंबांना पिण्याचे पाणी पुरवण्यात बँकेने स्वदेस फाउंडेशनला मदत केली आहे. त्याचप्रमाणे सुमारे ३५०हून अधिक ग्रामीण कुटुंबांची उपजीविकेची साधने

अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने वर्षाजल नियोजनाची साधने निर्माण करण्यात व सिंचनाच्या वितरणातही बँकेने मदत केली आहे.स्वदेस फाउंडेशनविषयी: रॉनी आणि झरीना स्क्रूवाला यांनी स्थापन केलेल्या स्वदेस फाउंडेशनचा एककेंद्री भर ग्रामीण भारताला सर्वांगीण व शाश्वत वाढीच्या माध्यमातून सक्षम करण्यावर आहे. यासाठी ही संस्था ग्रामीण भागातील
समुदायांच्या साथीने त्यांच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न करते, अनेकविध कार्यक्रमांची अमलबजावणी प्रत्यक्ष क्षेत्रावर जाऊन करते आणि ग्रामीण भागाला सध्याच्या परिस्थितीतून बाहेर काढण्याच्या धोरणाकडे (एग्झिट स्ट्रॅटेजी) वाटचाल करते.
त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे विकासासाठी सर्व बाजूंनी, आतून-बाहेरून हस्तक्षेप करणारे आणि वाढता प्रभाव असणारे प्रारूप. आरोग्य व पोषण, शिक्षण, पाणी व स्वच्छता आणि आर्थिक विकास या चार क्षेत्रांच्या माध्यमातून व्यक्ती आणि समुदाय विकासाच्या सर्व बाजू लक्षात घेणारा सर्वांगीण दृष्टिकोन संस्थेने ठेवला
आहे. सध्या संस्था रायगड जिल्ह्यांतील सहा तालुक्यात काम करत आहे. त्यांच्या कामाचा लाभ सुमारे पाचेक लाख लोकांना मिळत आहे.
डॉइश बँकेविषयी:
डॉइश बँक व्यावसायिक व गुंतवणूक बँकिंग, रिटेल बँकिंग, व्यवहार (ट्रान्झॅक्शन बँकिंग) आणि मालमत्ता व
संपत्ती व्यवस्थापन उत्पादने व सेवा कंपन्या, सरकारे, संस्थात्मक गुंतवणूकदार, छोटे व मध्यम
आकारमानाचे उद्योग व खासगी व्यक्तिगत ग्राहकांना पुरवते. डॉइश बँक ही जर्मनीतील आघाडीची बँक
असून, युरोपात हिचे स्थान भक्कम आहे. अमेरिका आणि आशिया पॅसिफिक प्रदेशातही बँकेला महत्त्वाचे
स्थान आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

महाराष्ट्र झोपडपट्टी पुनर्विकास विधेयकाच्या अंमलबजावणीतील संभाव्य अडचणींबाबत आमदार बापूसाहेब पठारे यांचा सवाल

मुंबई: महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा, निर्मूलन व पुनर्विकास) विधेयक सध्या...

ज्येष्ठ कलाकार मनमोहन महिमकर यांना बेघर होऊ देणार नाही

मनमोहन महिमकर यांनी घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट चित्रपट...

श्री ओंकारेश्वर मंदिराचा २८७ वा वर्धापन दिन साजरा

पुण्याच्या ऐतिहासिक आणि धार्मिक वैभवाचे प्रतीक ; आकर्षक सजावट...

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्यावतीने एकावर स्थानबद्धेची कारवाई

पुणे, दि. 9: जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या आदेशानुसार एमपीडीए...