Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

सहकारी बॅंकांनी शेवटच्या घटकापर्यंत पोहोचावे-गिरीश बापट

Date:

पुणे-उद्यम विकास सहकारी बॅंकेने तब्बल ९०० रिक्षा चालकांना व्यावसायिक कर्ज उपलब्ध करुन दिले आणि पिग्मी एजंटच्या माध्यमातून सामान्य नागरिकांना बचतीसाठी प्रेरित केले हे स्पृहणीय असुन सहकारी बॅंकांनी शेवटच्या घटकापर्यंत पोहोचावे आणि सामान्य माणसाला बॅंकेचा आधार वाटावा असा कारभार करावा असे आवाहन पालकमंत्री  गिरीश बापट यांनी केले.सामान्य कर्जदार हा प्रामाणिकपणे कर्जाची परतफेड करतो आणि बॅंकेच्या आधाराने कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो असे ही ते म्हणाले.उद्यम विकास सहकारी बॅंकेच्या नवव्या (९व्या) धनकवडी सातारा रस्ता शाखेच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते.यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महानगर कार्यवाह महेशराव कर्पे,आ.भीमराव तापकीर,बॅंकेचे अध्यक्ष संदीप खर्डेकर,उपाध्यक्ष सौ लीना अनासकर,संचालक महेश लडकत,दिलीप उंबरकर,मनोज नायर,सीताराम खाडे,शिरीष कुलकर्णी,राजन परदेशी,गोकुळ शेलार,पांडुरंग कुलकर्णी,महेंद्र काळे आणि दिनेश गांधी उपस्थित होते.तर प्रमुख अतिथी म्हणून माजी महापौर दत्तात्रय धनकवडे,नगरसेवक महेश वाबळे,सौ मानसी देशपांडे,सौ मंजुश्री खर्डेकर,सौ राणी भोसले,सौ साईदिशा माने,रा स्व संघाचे भाग संघचालक अरविंदराव साठे,पतित पावन संघटनेचे शहर अध्यक्ष शिवाजीराव चव्हाण,भाजप चे पर्वती मतदारसंघाचे अध्यक्ष हरीश परदेशी,खडकवासला मतदारसंघ अध्यक्ष अरुण राजवाडे,भारतीय मजदूर संघाचे अण्णा धुमाळ,माथाडी आघाडीचे संतोष कांबळे व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी पालक मंत्री बापट साहेबांच्या हस्ते रिक्षाचालकाना चाव्या देण्यात आल्या.तसेच बॅंकेचे खातेदार असलेले व रिक्षात विसरलेल्या ४ लाखांच्या दागिन्यांची पिशवी प्रामाणिकपणे परत करणारे रिक्षा चालक संजय बिबवे यांनाही सन्मानित करण्यात आले.
बॅंकेचे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी प्रास्ताविक करताना बॅंकेच्या प्रगतीचा आलेख मांडला.अवघ्या ५ वर्षात बॅंकेच्या ठेवी ५६ कोटी वरुन ११५ कोटी वर पोहोचल्या असून ७७ कोटी कर्जवाटप झाले आहे व १८५ कोटीचे भाग भांडवल असून बॅंकेने ग्राहकांना सर्व अत्याधुनिक सोयी सुविधा उपलब्ध केल्या आहेत.ए टी एम,फ्रॅंकिंग,सर्व प्रकारचे कर भरण्याची सुविधा यासह सर्व यंत्रणा उपलब्ध असल्याचे ही ते म्हणाले.
प्रामाणिक कर्जदार आणि सचोटीचा व्यवहार हे सहकारी बॅंकांचे संचित असून उद्यम बॅंकेचे कामकाज उत्तम प्रकारे चालत आहे व बॅंक प्रगतीपथावर आहे याबाबत समाधान व्यक्त करताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महानगर कार्यवाह महेश कर्पे यांनी संचालक मंडळ आणि कर्मचारी वर्ग हातात हात घालून काम करतात व त्यातूनच प्रगती साध्य करता येते असे सांगितले.
बॅंकेचे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले,शिरीष कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन तर दिलीप उंबरकर यांनी आभार प्रदर्शन केले.
आपला,
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सहकारी बँकांनी ग्राहक आणि लोकाभिमुख व्हायला हवेउपमुख्यमंत्री अजित पवार

रामराज्य सहकारी बँक लि. च्या नव्या वास्तूच्या कोनशिलेचा...

संजय राऊतांची लेखणी काही लोकांना पचत नव्हती.. म्हणून पत्रा चाळ ED: शरद पवारांची फटकेबाजी

मुंबई शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या ‘नरकातला...

तर मी नरकात जाणं पसंत करेन, जावेद अख्तर यांची पाकिस्तानवर जोरदार टीका

मुंबई “जर मला पाकिस्तान आणि नरक यापैकी एकाची निवड...