Home Blog Page 3129

राजेंद्र पाटील पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी,तर पांडुरंग सांडभोर सरचिटणीसपदी ..

0

नव्या कार्यकारिणीची निवड -विजय जगताप ,चंद्रकांत हंचाटेंचा समावेश

पुणे-पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी श्रीरामपूरच्या दै. सार्वमतचे पुणे प्रतिनिधी राजेंद्र पाटील यांची रविवारी निवड करण्यात आली. दै. पुढारीच्या पांडुरंग सांडभोर यांची सरचिटणीसपदी तर दै. सामनाच्या ब्रिजमोहन पाटील यांची खजिनदारपदी बिनविरोध निवड झाली आहे. उपाध्यक्षपदी सकाळचे विश्‍वजीत पवार आणि महाराष्ट्र टाईम्सचे रोहित आठवले यांची निवड झाली .

सन 2018-2019 साठीची निवडणुक जाहिर झाल्यानंतर दै. पुढारीचे पांडुरंग सांडभोर यांची सरचिटणीस म्हणून तर दै. सामनाचे ब्रिजमोहन पाटील यांची खजिनदार म्हणून बिनविरोध निवड झाली. कार्यकारिणी सदस्य म्हणून प्रशांत आहेर (महाराष्ट्र टाईम्स), सागर आव्हाड (टीव्ही 9), चंद्रकांत हंचाटे (सीएनएन आयबीएन), संदीप नवले (अ‍ॅग्रो वन), प्रसाद पाठक (सकाळ), अर्जुन शिरसाठ (पुण्यनगरी), युगंधर ताजणे (लोकमत), दिलीप तायडे (केसरी), निलेश शेंडे आणि मंजु पवार (पुण्यनगरी) यांची बिनविरोध निवड झाली . रविवारी सकाळी साडेदहा ते दुपारी एक या वेळेत मतदान झाले. एकुण 383 मतदारांनी मतदानाचा हक्‍क बजाविला.

‘फोर्स मोटर्स एव्हरेस्ट मोहीम २०१८’ मधील समीर पाथम व सूरज झिंगान या विजयीवीरांचा सत्कार

0

पुणे : ‘फोर्स मोटर्स एव्हरेस्ट एक्स्पीडिशन २०१८’ या गिर्यारोहण मोहिमेचे नेतृत्व करुन एव्हरेस्ट शिखरावर यशस्वी चढाई करणाऱ्या समीर पाथम व सूरज झिंगान या विजयीवीरांना काल ‘फोर्स मोटर्स कंपनी’च्या आकुर्डी प्रकल्पात गौरवण्यात आले. समीर व सूरज या दुकलीने जगातील सर्वोच्च उंचीचे माऊंट एव्हरेस्ट हे शिखर गेल्या १८ मे रोजी सर केले होते. या थरारक चढाईचा अनुभव विशद करत या पुणेकर गिर्यारोहकांनी मोहिमेचे व्हिडिओ उपस्थितांना दाखवले. मोहिमेवर नेलेला फोर्स मोटर्सचा ध्वज त्यांनी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक प्रसन फिरोदिया यांच्याकडे सुपूर्द केला आणि शिखरावरील आपल्या चढाईच्या छायाचित्रावर स्वाक्षरीही केली. “समीर व सूरज यांची चिकाटी व निर्धार इतरांना वैयक्तिक व व्यावसायिक उद्दिष्ट्ये गाठण्यासाठी प्रेरणादायी ठरेल,” या शब्दांत श्री. फिरोदिया यांनी कौतुक केले.

गेल्या २२ मार्च रोजी कंपनीच्या आकुर्डी येथील मुख्यालयातून झेंडा फडकवून या मोहिमेचा शुभारंभ झाला. समीर व सूरज यांनी काही आठवडे एव्हरेस्टजवळच्या शिखरांवर चढाई करुन आपल्या तांत्रिक कौशल्यांची उजळणी केली आणि नंतर ते एव्हरेस्ट बेस कॅम्पकडे रवाना झाले. तेथे त्यांनी अधिक उंचावरच्या कॅम्पला जाण्यासाठी अनेक फेऱ्या केल्या. त्यामागे अंतिम चढाईसाठी गरजेचे असलेले तंबू, अन्नपाणी व प्राणवायू आदी सामान साठवण्याचा हेतू होता.

अनुकूल हवामानाची साथ मिळाल्याने गेल्या १७ मे रोजी सायंकाळी या दोघांनी समुद्रसपाटीपासून ८००० मीटर उंचीवरील कॅम्प ४ सोडला आणि एव्हरेस्टवर चढाई सुरु केली. रात्रभर वाटचाल केल्यानंतर सकाळी सहा वाजून २० मिनिटांनी ते शिखरावर पोचले. तेथे ४० मिनिटे वेळ घालवून मग ते परतीच्या प्रवासासाठी खाली उतरले.

या मोहिमेसाठी फोर्स मोटर्स कंपनीने दिलेल्या पाठबळाबद्दल समीर व सूरज यांनी कृतज्ञता व्यक्त केली. या दुकलीला वर्ष २०१५ मधील एव्हरेस्ट चढाईचा आपला पहिला प्रयत्न नेपाळमधील भूकंपामुळे सोडून द्यावा लागला होता. या भूकंपामुळे एव्हरेस्ट बेस कॅम्पच उद्ध्वस्त झाल्याने समीर व सूरज माघारी फिरले. वर्ष २०१७ मध्ये त्यांनी पुन्हा एकदा मोहीम आखली, पण त्याहीवेळी ताशी १६० किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या तुफानी वाऱ्यांमुळे त्यांच्या मेहनतीवर पाणी पडले. तिसऱ्या मोहिमेच्या रुपाने फोर्स मोटर्सने त्यांच्या स्वप्नांना नवजीवन मिळवून दिले. “आमच्या निर्धारावर दृढ विश्वास ठेवणाऱ्या सर्वांचे आम्ही आभारी आहोत,” अशी प्रतिक्रिया समीर व सूरज यांनी यावेळी व्यक्त केली.

जैकलीन फर्नांडीज ने शिकागो में किया “ऊंची है बिल्डिंग” पर डांस!

शिकागो में दबंग टूर के दौरान जैकलीन फर्नांडीज के शानदार डांस ने दर्शकों को एक बार फिर रेस 3 अभिनेत्री का दीवाना बना दिया है।

इस खास मौके पर अभिनेत्री फ़िल्म “जुड़वा 2” से दर्शकों के पसंदीदा चार्टबस्टर गीत “ऊंची है बिल्डिंग” पर दिल खोल कर डांस करते हुए नज़र आई।

गोल्डन रंग की ड्रेस के साथ गोल्डन रंग के लंबे जूतों में जैकलीन के लुक ने हर किसी का मन मोह लिया थी।

शिकागो में दबंग टूर के दूसरे स्टॉप के दौरान जैकलीन ने सुपरस्टार सलमान खान के साथ अटलांटा में अपनी हाई एनर्जी परफॉर्मेंस के साथ  दर्शकों का खूब मनोरंजन किया और अपने सेक्सी मूव्स से दबंग टूर में चार चाँद लगा दिए।

जैकी इस दौरान फ़िल्म किक से यार ना मिले और हिरिये पर भी थिरकते हुए नज़र आई।

अभिनेत्री दबंग टूर में अपने दमदार चार्टबस्टर गानों पर परफॉर्म करते हुए नज़र आएगी जिन्हें देख कर एक बार फिर हर कोई जैकलीन की मदहोश कर देने वाली अदाओं का फैन हो जाएगा।

अभिनेत्री अपने 21 दिनों के दबंग टूर शेड्युल के दौरान विभिन्न देशों की यात्रा करेंगी।

रणपिसें ऐवजी आबा बागुलांना संधी मिळण्याची चिन्हे -महाराष्ट्र विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी १६ जुलैला निवडणूक

रामराजे नाईक निंबाळकर आणि माणिकराव ठाकरे यांचे सभापती, उपसभापती पद अडचणीत

मुंबई-महाराष्ट्र विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक जाहीर झाली असून पुण्यातील शरद रणपिसे यांच्या ऐवजी कॉंग्रेस कडून आबा बागुलांना संधी मिळण्याची चिन्हे आहेत .तसेच या निवडणुकीमुळे राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेल्या रामराजे नाईक निंबाळकर यांच्याकडील विधानपरिषदेतली सभापती पदावर गंडांतर येण्याची तर  दुसरीकडे उपसभापती माणिकराव ठाकरे यांना पुन्हा उमेदवारी मिळाली नाही तर त्यांचे उपसभापतीपदही अडचणीत येण्याची चिन्हं आहेत. विधानसभा सदस्यांमधून निवडून द्यावयाच्या विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी 16 जुलै रोजी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत पक्षाचे तिकीट मिळविण्यासाठी सर्वच पक्षात इच्छुकांमध्ये स्पर्धा निर्माण होणार आहे. भाजपचे भाई गिरकर, राष्ट्रवादीचे सुनील तटकरे, जयदेव गायकवाड, माथाडी नेते नरेंद्र पाटील, अमरसिंह पंडीत, काँग्रेसचे माणिकराव ठाकरे, संजय दत्त, शरद रणपिसे, शिवसेनेचे अनिल परब, रासपचे महादेव जानकर आणि शेकापचे जयंत पाटील यांच्या विधानपरिषद सदस्यत्वाची मुदत 27 जुलै रोजी संपत आहे. त्यामुळे रिक्त होणार्‍या जागांसाठी 16 जुलै रोजी निवडणूक आयोगाने निवडणूक जाहीर केली आहे.

या निवडणुकीत निवडून येण्यासाठी किमान 27 मतांची आवश्यकता आहे. काँग्रेस- राष्ट्रवादीचे 7 सदस्य निवृत्त होत असताना संख्याबळ पहाता दोघांचे मिळून तीनच सदस्य निवडून जाणार आहेत. त्यातच शेकापचे जयंत पाटीलही काँग्रेस – राष्ट्रवादी आघाडीकडेच उमेदवारी मागू शकतात. त्यामुळे दोन्ही पक्षातील विद्यमान सदस्यांचा पत्ता कट होणार आहे. राष्ट्रीवादीतून सुनील तटकरे यांना पुन्हा उमेदवारी मिळण्याची स्पष्ट शक्यता असल्याने जयदेव गायकवाड, नरेंद्र पाटील, अमरसिंह पंडीत यांचा पत्ता कट होणार आहे. नरेंद्र पाटील हे भाजपच्या संपर्कात आहेत. काँग्रेसमध्येही विधानपरिषदेचे उपसभापती असलेल्या माणिकराव ठाकरे यांची वर्णी निश्‍चित आहे. शरद रणपिसे, संजय दत्त यांचा पत्ता कापला जाणार आहे. शिवसेनेचे अनिल परब यांना पुन्हा संधी दिली जाऊ शकते. तसेच शिवसेनेचा आणखी एक सदस्य सहज निवडून येऊ शकतो. भाजपचे चार ते पाच सदस्य विधानपरिषदेवर पोहचू शकतात. भाजपला महादेव जानकर यांना तिकीट द्यावे लागणार आहे. उर्वरित जागांसाठी भाजपमध्ये स्पर्धा रंगणार आहे. सध्या विधानपरिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष आहे, तर त्या खालोखाल काँग्रेसचं संख्याबळ आहे. सत्ताधारी भाजपा विधानपरिषदेत तिसऱ्या स्थानी आहे. मात्र 16 जुलैच्या निवडणुकीनंतर भाजपा विधानपरिषदेतील सर्वात मोठा पक्ष ठरणार आहे.तर दुसरीकडे राष्ट्रवादीच्या जागा कमी होणार असल्यानं काँग्रेस सभापतीपदावर दावा सांगण्याची शक्यता आहे. सध्या विधानपरिषदेतील कमी संख्याबळामुळे सत्ताधारी भाजपाला अनेकदा विरोधकांच्या आक्रमकपणाला तोंड द्यावं लागतं. पण हे चित्र बदलण्याची संधी 16 जुलैच्या या निवडणुकीमुळे भाजपाला मिळणार आहे.


या सदस्यांचा कार्यकाळ संपणार

काँग्रेसचे माणिकराव ठाकरे, संजय दत्त, शरद रणपिसे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जयदेव गायकवाड, शिवसेनेचे अनिल परब, राष्ट्रवादी काँग्रेसचे नरेंद्र पाटील, शेकापचे जयंत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अमरसिंह पंडित, रासपचे महादेव जानकर यांची मुदत संपत आहे.
राजकीय पक्षाप्रमाणे निवृत्त संख्या-

राष्ट्रवादी – 3
काँग्रेस – 4
भाजप – 2 (रासप -1)
शिवसेना – 1
शेकाप – 1

संख्याबळा नुसार राजकीय पक्षाप्रमाणे निवडून येणाऱ्या सदस्यांची संख्या –

(निवडून येण्यासाठी किमान 27 मतांची आवश्यकता)
राष्ट्रवादी + काँग्रेस – 3
भाजप – 5 (रासप -1)
शिवसेना – 2
शेकाप – 1 (राष्ट्रवादी+काँग्रेस व इतरांनी पाठींबा दिला तर)

विधानपरिषद सध्याचे संख्याबळ-

राष्ट्रवादी काँग्रेस – 21
काँग्रेस – 19
भाजप – 18
शिवसेना – 9
जेडीयू – 1
शेकाप – 1
अपक्ष – 6
पीपल्स रिपब्लिकन पक्ष – 1
विधानपरिषद निवडणूक कार्यक्रम-

28 जून रोजी अधिसूचना जारी करण्यात येणार आहे. 5 जुलै उमेदवारी दाखल करण्याची अंतिम मुदत असून, 6 जुलैला छाननी करण्यात येईल. 9 जुलै उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. तर 16 जुलै रोजी सकाळी 9 ते 4 या वेळेत मतदान घेण्यात येऊन त्याच दिवशी मतमोजणी करण्यात येईल. विधानसभेचे आमदार यासाठी मतदान करणार आहेत.

28 जूनला नॉटिफिकेशन
अर्ज भरण्याची अंतिम मुदत : 5 जुलै
अर्जाची पडताळणी : 6 जुलै
अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख : 9 जुलै
मतदान : 16 जुलै (स. 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत)
मतमोजणी : 16 जुलै (सायंकाळी 5 वाजेनंतर)

‘सूफी दरबार’मध्ये संगीतातून उलगडला मानवतावाद !

0

पुणे :’अवामी महाज’ आयोजित ईद मिलन स्नेह मेळावा शनिवारी सायंकाळी उत्साहात पार पडला. समाजातील विविध मान्यवर, सर्वधर्मीय, सर्वपक्षीय कार्यकर्ते, संस्थांच्या प्रतिनिधींनी उपस्थित राहून सामाजिक सलोख्याचे दर्शन घडवले.

डॉ.कुमार सप्तर्षी ,सामाजिक न्याय राज्य मंत्री दिलीप कांबळे, माजी केंद्रीय मंत्री सुरेश कलमाडी, खा. वंदना चव्हाण, आ. जयदेव गायकवाड, डॉ. उर्मिला सप्तर्षी,मोहन सिंह राजपाल, सय्यदभाई, शमसुद्दीन तांबोळी, मोहन जोशी, डॉ. सतीश देसाई,दीप्ती चवधरी, चेतन तुपे, अभय छाजेड , अविनाश बागवे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

अवामी महाज ‘ चे अध्यक्षडॉ.पी. ए. इनामदार , आबेदा इनामदार, लतीफ मगदूम,वाहिद बियाबानी, शाहीद  शेख यांनी स्वागत केले.

यावेळी ‘नादब्रह्म संगीतालय, अहमदनगर ‘ यांच्या वतीने सुफी दरबार चे आयोजन केले होते. पवन श्रीकांत नाईक (अहमदनगर) यांच्या सुफी गायनाच्या सुफी दरबार कार्यक्रमाने वातावरणात रंगत आणली.

अल्लाह (जिक्र) ने दरबार ची सुरुवात झाली. मोहंमद प्रेषित पैगंबरांवरील ३ रचना सादर केल्या गेल्या. यामध्ये ‘फर्श पे रेहकर अर्श पे जाना’, ‘भर दो झोली मेरी या मोहंमद’, ‘जिक्रे एहमद से दिल को सजा लिजिए’, आध्यत्मिक तत्वज्ञानाची ‘बेखुद किए देते है’, प्रसिद्ध रचना ‘ख्वाजा मेरे ख्वाजा’, ‘फुल रही सरसो ही पारंपरिक हजरत आमीर खुसरो यांची रचना, ‘छास तिलक’, तेरे वाज्जो’, ‘आफरीन- आफरीन’ या रचना सादर झाल्या. संत सोयराबाईंची ‘ हरी भजनाविण काळ ‘ ही रचनाही सादर करण्यात आली.

ईश्वरी तत्वज्ञानापासून ते मानवतावाद असा सुफी सांप्रदायातील सुंदर प्रवास या मैफिलीचा माध्यमातून उलगडला .

या मैफिलीत अरबी, उर्दू, पंजाबी, ब्रज, हिंदी अशा विविध भाषांमधून रचना सादर करण्यात आल्या.

कल्याण मुरकुटे, नरसिंह देसाई ,पंकज नाईक यांनी हार्मोनियमवर, कुलदीप चव्हाण (बेंजो), हर्षद भावे (तबला) ,विश्वजित कुलकर्णी (तबला, जंबे, डफ) यांनी पवन नाईक यांना साथसंगत केली.

पंकज नाईक यांच्याबरोबर संकेत गांधी, पवन तळेकर, हरीश कुटे, अविनाश तिजोरे, नवरतन वर्मा, मुलांशु परदेशी, रिझवान शेख, विजय जाधव, सय्यद एहमद, उद्धव म्हस्के, भालचंद्र जाधव, संहिता परदेशी, उज्वल कुलकर्णी यांनी सहगायन केले.

कार्यक्रमाचे निवेदन वीणा दिघे यांनी केले. या सुफी दरबार विशेष मैफिलीत सुफी तत्वज्ञानातील विविध रहस्य उलगडले गेले.

उपस्थितांनी शीरखुर्मा, पुरणपोळी तसेच दालचा या पदार्थांचा आस्वाद घेतला.

हा कार्यक्रम शनिवारी सायंकाळी असेम्ब्ली हॉल, आझम कॅम्पस येथे झाला.

‘ईद मिलन’ हे सामाजिक सलोखा, संवादाचे माध्यम व्हावे, भेटीगाठी व्हाव्यात, संवाद व्हावा , यासाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आल्याचे डॉ.पी. ए. इनामदार यांनी सांगीतले.

ज्ञानावर अहंकार चढला तर माओवाद जन्माला येतो – डॉ.श्रीनिवास पाटील

0
पुणे-ज्ञानाला मर्यादा आहेत, मात्र त्यावर अहंकार चढला तर माओवाद जन्माला येतो. आज उच्चपदावर काम करणारे असे अनेकजण आहेत, जे याकडे वळत आहे. समाजातील तरुणाईचा सकारात्मक हुंकार बंद झाल्यास जशी दुरवस्था होते, तशी आज झाली आहे. परंतु त्यातही अनेक ठिकाणी तरुणाई चांगल्या कार्यासाठी पुढे येत असून मोठया प्रमाणात तरुणाईचा सकारात्मक हुंकार समाजात कायम रहायला हवा, असे मत सिक्किमचे राज्यपाल डॉ.श्रीनिवास पाटील यांनी व्यक्त केले.
लाईफ (लाईक-माईंडेड इनिशिएव्ह फॉर एम्पॉवरमेंट) संस्थेतर्फे टिळक रस्त्यावरील नितू मांडके सभागृहात लाईफ स्फूर्ती सन्मान 2018 या पुरस्कार वितरण समारंभात ते बोलत होते. यावेळी सनबीम एज्युकेशनल इन्स्टिटयूटचे अध्यक्ष सारंग पाटील, सोपान कुंजीर, पोपटराव कटके, लक्ष्मणराव कोंढाळकर, लाईफ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ओंकार कोंढाळकर, आदित्य जोशी, प्रज्वल कोंढरे  आदी उपस्थित होते.
यंदाचे पुरस्कार पुणे महापालिकेचे  सहआयुक्त ज्ञानेश्वर मोळक, पुण्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ.शिवाजी पवार सेवालय लातूरचे संस्थापक प्रा.रवी बापटले, स्वरा ग्रुप आॅफ हॉटेल्स रिसॉर्टस्चे संचालक रामदास मुरकुटे, आणि झील एज्युकेशन इन्स्टिटयूटचे जयेश काटकर यांना प्रदान करण्यात आले. याशिवाय विशेष युवा सन्मान अभिजीत अनाप, रविकांत वर्पे, कल्याणी माणगावे, सलोनी जाधव यांना प्रदान करण्यात आले. सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते. सन्मान सोहळ्याचे यंदा 4 थे वर्ष आहे.
डॉ.श्रीनिवास पाटील म्हणाले, सध्या सर्वच क्षेत्रात भेसळीचे प्रमाण वाढत असले, तरीही अनेकजण प्रामाणिकपणे काम करीत आहेत. लाईफ सारख्या शेकडो सामाजिक संस्थांच्या माध्यमातून कार्य करणा-या तरुणाईमुळे पुढील पिढीला प्रेरणा मिळत आहे. त्यामुळे अशा संस्थांना आणि गरजूंना मदत करण्याकरीता सामान्यांना आपल्या खिशात हात घालायला हवा. तरच, समाजातील अडचणी दूर होण्यास मदत होईल.

प्लास्टिकबंदी पुणे महापालिकेने कमविले 3 लाख 69 हजार

0

पुणे-राज्यात आजपासून प्लास्टिक बंदी लागू करण्यात आली असून  हॉटेल, दुकानदार यांच्यावर कडक कारवाई करण्यात येत आहे. पुण्यात आज सकाळ पासून 2 वाजे पर्यत 8 हजार 711 किलो कॅरीबॅग, ग्लास आणि थर्माकोल पुणे महानगरपालिकेच्या घनकचरा विभागाकडून शहरातील हॉटेल आणि दुकानदाराकडून जप्त केला आहे.त्यांच्याकडून 3 लाख 69 हजार 100 रुपयांचा दंड वसूल केला आहे.अशी माहिती घनकचरा विभागाचे सुरेश जगताप यांनी माहिती दिली.

राज्य शासनाच्या आदेशानुसार महानगरपालिका,नगरपालिका आणि जिल्हा परिषद यांच्या मार्फत प्लास्टिक बंदीवर कडक कारवाई करण्यात येत आहे. पुणे महानगरपालिकेच्या 15 क्षेत्रीय कार्यालया मार्फत सकाळी 10 वाजल्यापासून कारवाईला सुरुवात झाली.या कारवाईमध्ये किराणा दुकानदार, बेकरी चालक, कपड्याचे शॉप यासह अनेक दुकानदारावर कारवाई केली असून यात कॅरीबॅग आणि ग्लास असा माल मिळून 8711 किलो आणि थर्माकोल 75 किलो जप्त करण्यात आला आहे.या कारवाईतून 3 लाख 69 हजार 100 रुपयांचा दंड वसूल केला आहे.येत्या काळात अधिक तीव्र कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 

अमेरिकेतील कटेरा या आघाडीच्या कंपनीसोबत केइएफ इन्फ्राची भागीदारी

पुणे : भारतातील आघाडीची ऑफसाइट इन्फ्रास्ट्रक्चर मॅनीफॅक्चरिंग कंपनी केइएफ इन्फ्राने अमेरिकेतील डिझाईन आणि कन्सट्रक्शन क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या कटेरा या टेक्नोलॉजी कंपनीसोबतच्या व्यापार विस्ताराची नुकतीच घोषणा केली. ह्यात दोनही कंपनीच्या उत्पादन क्षमतेला याचा प्रचंड फायदा होईल. सध्या नॉर्थ अमेरिका आणि भारतात ३.७ बिलियन डॉलर्सचे बुकिंग कटेरा कंपनीचे आहे.

 या व्यावसायिक भागीदारीमुळे मी अत्यंत आनंदी असून सारखी विचारधारा असलेल्या टीमसोबत काम करताना भविष्यात अशीच उल्लेखनीय कामगिरी करण्याचा आमचा मानस आहे. अशी भावना ह्यावेळी केइएफ इन्फ्राचे संस्थापक आणि अध्यक्ष फैजल कोट्टीकॉलोन यांनी व्यक्त केली.

 सम विचारधारेलाच पुढे नेताना कटेरा कंपनीचे अध्यक्ष आणि सहसंस्थापक मायकल मार्क्स म्हणाले केइएफ इन्फ्रासारख्या कंपनीशी जुळणे ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. आमची मुल्ये, तत्वे आणि दृष्टीशी इतकी जवळ येणारी टीम आम्हाला मिळणे हे आमचे भाग्य आहे. 

 मुख्य कार्यकारी अधिकारी मायकेल मार्क्स असून कटेरा कंपनी जागतिक स्तरावर कार्यरत आहे,  कटेराचे जगभरात 2 कारखाने आणि 2,000 कर्मचारी आहेत. युएसडी 1.1 डॉलर्सचे टर्नओव्हर आहे.  कटेराच्या गुंतवणूकदारांमध्ये सॉफ्टबँक, फॉक्सकॉन आणि कॅनडा पेन्शन प्लॅन इनव्हेस्टमेंट बोर्ड यांचा समावेश आहे.

किल्ले व्हावेत जैवविविधता वारसा स्थळे !: डॉ. राहुल मुंगीकर

0

पुणे :’किल्ले केवळ ऐतिहासिक महत्वाची स्थळे नाहीत, तर पाणी- वनसंपदा, जैववैविध्य देणारी भौगोलिक , जैविक महत्वाची केंद्रे आहेत, त्यामुळे गडसंवर्धनाचा, सुशोभीकरणाचा विचार करताना जैववैविध्याला धोका पोहोचणार नाही, याची दक्षता घ्यायला हवी’, असे प्रतिपादन ‘बाँबे नॅचरल हिस्ट्री सोसायटी’च्या धोरण विभागाचे सहसंचालक डॉ. राहुल मुंगीकर यांनी केले.

‘जीविधा’ आयोजित आठव्या हिरवाई महोत्सवात दुसऱ्या दिवशीच्या व्याख्यानात ते बोलत होते. हा कार्यक्रम शुक्रवारी सायंकाळी इंद्रधनुष्य सभागृह येथे झाला.

डॉ. मुंगीकर म्हणाले, ‘महाराष्ट्राला ६० टक्के पाणी हे पश्चिम घाटातून, किल्ले भागातून मिळते. तिथल्या इतिहासाबरोबर भूगोल आणि पर्यावरणालाही समजून घेतले पाहिजे. तसे समजून न घेता गड संवर्धनाची आधुनिक कामे करणे योग्य ठरणार नाही. गड संवर्धनासाठी एकात्मिक दृष्टीकोण बाळगावा लागेल.

किल्ल्याच्या बुरुजात, भिंतीमधील वड- पिंपळाची झाडे काढली तर या बुरुजांना धरून ठेवणाऱ्या मुळया सैल होऊन बुरुज लवकर ढासळतील. उंच किल्ल्याच्या प्रतिकूल नैसर्गिक वातावरणात दगडांना धरून ठेवणारे दुसरे कोणतेही ताकदवान, परवडणारे सिमेंट मटेरियल उपलब्ध नाही.

किल्ल्याजवळच्या पठारावरील, कपारीजवळील गवताळ प्रदेश माती धरून ठेवत असल्याने तिथे वनीकरण करण्याचा आग्रह धरू नये. गवताळ प्रदेशावर अवलंबून असलेली जीवसाखळी धोक्यात येते.

‘महाराष्ट्राची किल्ल्यांची साखळी ही वन्य श्वापदांचे कॉरिडॉर आहेत, ते नष्ट होता काम नयेत.
किल्ला आणि किल्ल्याचा परिसर, तेथील वनसंपदा, उपयोग याचे ज्ञान स्थानिक व्यक्तींना असल्याने त्यांच्या सूचना विचारात घेतल्याशिवाय गड संवर्धन करून चालणार नाही.

गडांच्या परिसरात स्थानिक वृक्ष लावले जावेत. दूध -दुभते देणारे गवताळ प्रदेश नष्ट केले जाऊ नयेत. अन्यथा माती सरकण्याची माळीणसारखी दुर्घटना होण्याची शक्यता वाढते’, असेही डॉ. मुंगीकर यांनी सांगितले.’

‘ निसर्ग सेवक ‘ चे अध्यक्ष डॉ. रमेश गोडबोले, उपवनसंरक्षक सत्यजित गुजर यांच्या हस्ते रामकृष्ण आडकर, प्रीती कोरे, डॉ. विनया घाटे यांच्या ‘सातारा जिल्ह्यातील देवराया’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले.

राजीव पंडित यांनी प्रास्ताविक केले. यावेळी डॉ. सचिन पुणेकर, निवेदिता जोशी, आदी मान्यवर होते.

पुण्यातील पहिल्या अद्ययावत ‘प्रधानमंत्री कौशल केंद्रा’ चे खासदार शिरोळेंनी केले उद्घाटन –

0
पुणे
 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वाकांक्षी स्किल डेव्हलपमेंट योजनेतील पुण्यातील पहिल्या अद्ययावत ‘प्रधानमंत्री कौशल केंद्र’ चे उद्घाटन खासदार अनिल शिरोळे यांच्या हस्ते झाले.
जहांगीर हॉस्पिटल समोरील ‘सोहराब हॉल’ इमारतीमध्ये ८ हजार चौरस फुट प्रशस्त जागेत हे कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र सुरु करण्यात आले आहे. ज्युनियर सॉफ्टवेअर डेव्हलपर, डोमेस्टिक आय.टी. हेल्प डेस्क अटेंडंट, फिल्ड टेक्नीशियन नेटवर्किंग अॅण्ड स्टोरेज,फिल्ड टेक्नीशियन कॉम्प्युटिंग अॅण्ड पेरिफेरल्स्, सुईग मशीन ऑपरेटर, हेअर स्टायलीस्ट, रिटेल ट्रेनी असोसिएट असे ७ कोर्सस येथे उपलब्ध करण्यात आले आहेत.
पाचवी, दहावी, बारावी उत्तीर्ण प्रशिक्षणार्थींसाठी हे ३ ते ४ महिन्यांचे रोजगाराभिमुख कोर्स आहेत. यावेळी आमदार विजय काळे, आमदार मेधा कुलकर्णी, नगरसेवक दिलीप वेडे- पाटील, आदित्य मालवीय उपस्थित होते. प्रधानमंत्री कौशल केंद्र, पुणे चे संचालक सिद्धार्थ रहाळकर, संचालक मनीष सिन्हा यांनी स्वागत केले.
खा. अनिल शिरोळे म्हणाले, ‘देश समृध्द, समर्थ होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौशल्याभिमुख, रोजगाराभिमुख योजना आखल्या, धोरणे ठरवली. ती यशस्वी करण्यासाठी कौशल्ये विकसित करणाऱ्यांची व्यक्तींची गरज आहे. प्रधानमंत्री कौशल केंद्राच्या रुपाने ही गरज पूर्ण होत आहे. उद्योजक घडविण्याची आणि बेरोजगारी कमी करण्याची अपेक्षा आता पूर्ण होईल.’ मनिष सिन्हा यांनी प्रास्ताविक केले, सिध्दार्थ रहाळकर यांनी आभार मानले

भारतीय ‘ऑफलाइन’बाजारपेठेमध्ये ‘पीट्रॉन’चा प्रवेश

कंपनीच्या ऑनलाइन वितरण व्यवस्थेचे ऑफलाइन विस्तारीकरण

हैदराबाद : मोबाइल अॅक्सेसरीज ऑनलाईन विक्रीमध्ये भारतामध्ये पहिला क्रमांक पटकावणाऱ्या ‘पीट्रॉन’ कंपनीने आता ऑफलाइन बाजारपेठ काबीज करण्यासाठी एक विशेष योजना आखली आहे. या योजनेनुसार ‘पीट्रॉन’ने भारतामधील आपला सहावा मुख्य वितरक म्हणून ‘प्लेटाइम इलेक्ट्रॉनिक्स’ या कंपनीची नियुक्ती केली आहे. ही कंपनी हैदराबाद आणि तेलंगणा विभागातील काम पाहणार आहे. ‘पीट्रॉन’चे इतर पाच वितरक नवी दिल्ली, चेन्नई, अहमदाबाद, पुणे आणि जयपूर येथे कार्यरत आहेत. अवघ्या सहा महिन्यांच्या कालावधीत ‘पीट्रॉन’ प्रॉडक्ट्सच्या एकूण वितरकांनी आता चाळीशीचा आकडा ओलांडला असून देशभरातील १२ राज्यांमध्ये ही कंपनी कार्यरत आहे.

सध्याचे वितरण जाळे हे ७०० रीटेल आऊटलेटपर्यंत पोचणारे असून त्याद्वारे दर महिन्याला १५ हजार मोबाईल अॅक्सेसरीजची विक्री केली जाते. ‘पीट्रॉन’ने १२० वितरकांच्या नियुक्तीचे लक्ष्य आखले असून त्याद्वारे चालू वित्तीय वर्षाअखेर दर महिन्याला ५० हजार मोबाईल अॅक्सेसरीजच्या विक्रीची योजना आहे. ऑफलाइन विक्रीमध्ये ‘सेल पॉईंट’सारख्या आजच्या काळातील मोबाईल रीटेलर विक्रेत्याचा समावेश असून या कंपनीने ‘पीट्रॉन’चे प्रॉडक्ट्सच्या आपल्या केंद्रांवरून विक्रीस सुरुवात केली आहे.

‘पीट्रॉन’ने वितरण जाळे उभारण्यासाठी ३ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. तसेच अतिरिक्त २ कोटींचा निधी हा रीटेल भागीदारांना पाठबळ देण्यासाठी मंजूर केला आहे. हे पाठबळ ब्रॅंड सक्षमीकरण आणि विविध मार्केटिंग उपक्रमांसाठी देण्यात येणार आहे.

‘प्लेटाइम इलेक्ट्रॉनिक्स’चे श्री. विनय पारवानी म्हणाले, “विविध पद्धतीची दर्जेदार प्रॉडक्ट्स आणि किफायतशीर मूल्यामुळे ‘पीट्रॉन’ प्रॉडक्ट्सना रीटेल केंद्रांवर ग्राहकांकडून अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

आंध्रप्रदेशमधील प्रमुख वितरक आणि ‘ग्राम सर्किट’चे श्री. श्रीधर एज्युपुगंती म्हणाले, “पीट्रॉन अॅक्सेसरीजने भारतामधील ऑनलाईन बाजारपेठेवर चांगला ठसा उमटवला आहे. त्यामुळे ‘पीट्रॉन’शी जोडले जाण्याचा आम्हाला आनंद आणि अभिमान आहे.”

पीट्रॉनने आतापर्यंत विविध ऑनलाइन प्लॅटफॉर्मद्वारे ग्राहकांपर्यंत ५० लाख वस्तू पोचविल्या आहेत. देशभरात सर्वात मोठी मोबाईल अॅक्सेसरीजची रेंज पीट्रॉनकडेच उपलब्ध असून सातत्याने त्यात नवीन मॉडेल्सची भर पडत असते. त्यामुळे ऑडिओ चार्जर्स, वीअरेबल्स आणि ब्लुटुथ प्रॉडक्ट्सचा समावेश आहे. आपल्या भक्कम डिझायन टीमच्या सहकार्याने पीट्रॉनने ३ ‘पेटंट्स’साठी अर्ज दाखल केला आहे.  भारतामधील आपल्या ब्रॅंडला मिळालेले यश पाहून ‘पीट्रॉन’ची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत प्रवेश करण्याचीही योजना आहे.

पीट्रॉनचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अमीन ख्वाजा म्हणाले, “पोर्टेबल मोबाईल अॅक्सेसरीज बाजारपेठेत इतरही काही कंपन्या कार्यरत असल्या तरी दर्जा आणि किफायतशीर किंमत या दोन गोष्टींमध्ये ‘पीट्रॉन’ इतरांपेक्षा पुढे आहे. या कंपनीच्या प्रॉडक्ट्स ही ‘बीआयएस’ मानांकीत असून त्यासाठी एक वर्षाची वॉरंटीही देण्यात आली आहे. सुरक्षा

आणि विश्वासार्हता या दोन गोष्टींमुळे तरुण वर्गाकडून ब्रॅंडेड मोबाईल अॅक्सेसरीजला पसंती दिली जाते. हा वर्ग आमच्या प्रॉडक्ट्सचा ग्राहक आहे.

पीट्रॉनबद्दल :

‘पीट्रॉन’ ही मोबाईल अॅक्सेसरीज क्षेत्रामधील नामांकीत कंपनी आहे. ऑडिओ आणि चार्जिंग उपकरणांसह या कंपनीकडे इतर विविध प्रॉ़डक्ट्स आहेत. या कंपनीची मालकी ‘पालरेड ऑनलाईन टेक्नॉलॉजीस प्रा. लि.’कडे आहे. ही कंपनी ‘पालरेड टेक्नॉलॉजीस लि.’ची उपकंपनी असून ती मुंबई शेअर बाजार आणि राष्ट्रीय शेअर बाजारात २००४ पासून अस्तित्वात आहे.

प्लास्टिक बंदी कारवाईविरोधात व्यापाऱ्यांमध्ये असंतोष -अनेक ठिकाणी बंद

0

पुणे, दि. 23 जून : पॅकिंगच्या वस्तुंवरही चुकीच्या पद्धतीने दंड आकारून प्लास्टिक बंदीच्या निर्णयाची बेकायदेशीरपणे अंमलबजावणी केल्याच्या निषेधार्थ किरकोळ व्यापाऱ्यांनी आज उत्स्फूर्तपणे दुकाने बंद केली. ही कारवाई हुकुमशाही पद्धतीने होत असल्याचे लक्षात येताच शहरातील सिंहगड रस्ता, कोथरुड, सातारा रस्ता, मंडई, वडगावशेरी, हडपसर आदी भागातील दुकाने कारवाई सुरु होताच बंद झाली, अशी माहिती पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाचे अध्यक्ष सचिन निवंगुणे यांनी दिली.

राज्य सरकारने प्लास्टिक बंदी कायद्याचे स्पष्टीकरण करताना पॅकिंगच्या वस्तुंवर कारवाई होणार नसल्याचे सांगितले होते. वास्तवात आज कायदा लागू झाल्यानंतर व्यापाऱ्यांवर पॅकिंगच्या वस्तू असल्याचे सांगून दंडाच्या पावत्या देण्यात आल्या. व्यापाऱ्यांनी प्लास्टिक बंदीचे स्वागत केले आहे. त्यामुळे या कायद्याच्या विरोधात कुठल्याही प्रकारच्या आंदोलनाची घोषणा झालेली नव्हती. मात्र, आजची कारवाई हुकुमशाही पद्धतीने होत असल्याचे पाहून व्यापाऱ्यांनी आपले व्यवसाय बंद ठेवले. ही कारवाई अशीच राहणार असेल तर, 5 हजार, 10 हजार व 25 हजार रुपयांचा दंड भरणे महाराष्ट्रातल्या सामान्य व्यापाऱ्याला परवडणार नाही. ते आपले व्यवसाय बंद करतील.

आजच्या पहिल्या दिवशी झालेल्या कारवाईची आम्ही माहिती घेत आहोत. शहरातील सर्व विभागातल्या व्यापारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक सायंकाळी होणार आहे. त्यामध्ये या कारवाईबद्दल आणि पुढील कार्यवाहीबद्दल निर्णय घेण्यात येईल, असे निवंगुणे यांनी सांगितले.

यंदापासून लोकमान्य टिळक गुणवत्ता पुरस्कार- 41 विद्यार्थ्यांची निवड

0

पुणे- महापालिकेच्या शिक्षण विभागातील शाळांतील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘लोकमान्य टिळक गुणवत्ता पुरस्कार’ या शैक्षणिक वर्षापासून देण्यात येत आहे. यासाठी पालिकेच्या शाळेतील 41 गुणवंत विद्यार्थ्यांची निवड करण्यात आल्याची माहिती महापौर मुक्ता टिळक यांनी पत्रकार परिषदेत दिली.

महाराष्ट्र राज्याचे शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी (25 जून) सकाळी दहा वाजता पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन येथे या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात येणार आहे. यामध्ये ‘स्टूडंट ऑफ द इयर’ या संकल्पनेनुसार प्राथमिक शाळांमधील 19 आणि माध्यमिक शाळांमधील 22 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. पाच हजार रुपये आणि पुस्तके असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

मागील वर्षीच्या अंदाजपत्रकामध्ये मुरलीधर मोहोळ यांच्या निधीमधून या पुरस्कारासीठी तरतूद करण्यात आली होती. महापालिकेच्या सर्व शाळामधून विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. यासाठीचे निकष ठरवण्यात आले असून त्यामध्ये विद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थिती, तीन वर्षातील शैक्षणिक गुणवत्ता, स्पर्धा परीक्षेतील येश, कला, क्रिडा क्षेत्रातील नैपुण्य, शालेय उपक्रमांमधील सहभाग, वत्कृत्व, नेतृत्व विकास, साहित्य निर्मिती, वर्तणूक आणि विशेष उल्लेखनीय कार्य या आधारे शिक्षक आणि मुख्याध्यापकांच्या परिक्षणाने विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. यापुढे दरवर्षी अशा पद्धतीन प्रत्येक शाळेमधून एक विद्यार्थ्यांची निवड केली जाणार असल्याचे महापौरांनी सांगितले.

गळती प्रकरणी दोषींवर कारवाई होणार -महापौर (व्हिडिओ)

0
पुणे- महापालिकेच्या नव्या इमारतीच्या उद्घाटनाच्या वेळीच सभागृहाला गळती लागली होती, त्यावर आज (शुक्रवार) महापौरांनी ही गळती छतावरील कचरा अडकल्याने पाईप चोकअप होऊन झाल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आल्याचे स्पष्टीकरण पत्रकार परिषदेत दिले. तसेच याला जबाबदार असलेल्या कर्मचारी, ठेकेदार तसेच संबंधीत अधिकाऱ्यांवर चौकशी करून कारवाईच्या सुचना दिल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
पुण्याची नाचक्की केल्याचा विरोधकांचा सत्ताधाऱ्यांवर आरोप पुणे महापालिकेच्या नव्या इमारतीचा काल (गुरुवारी) उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा पार पडला. यावेळी बाहेर मुसळधार पाऊस सूरु झाला. त्यावेळी मुख्यमंत्र्यांचे भाषण सुरू असताना सभागृहाला गळती लागल्याचे चित्र दिसून आले होते. त्यानंतर उपराष्ट्रपतींसमोर पुण्याची नाचक्की केल्याचा आरोप विरोधकांनी सत्ताधारी भाजपवर केला होता.
बांधकामात दोष नसल्याचे महापौरांचे स्पष्टीकरण 
सभागृहाच्या गच्चीवर कचरा साचला होता. तो पावसाच्या पाण्यामुळे पाईपच्या तोंडाशी येऊन अडकल्याने पाईप चोकअप झाला. त्या ठिकाणी पाणी साचून पाठीमागील खिडकीतून पाण्याची सभागृहात गळती लागली. यासंदर्भातील संबंधीत विभागाने त्याची दुरुस्ती केली आहे. मात्र, ज्यांच्याकडे स्वच्छतेची जबाबदारी होती. त्यांची चौकशी करण्यासंदर्भात सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. यामध्ये बांधकामाचा कोणताही दोष नसल्याचे स्पष्टीकरण महापौरांनी दिले

नाचक्कीला -महापौर जबाबदार -मनसे

पुणे – आपल्याच कारकिर्दीत महापालिकेच्या नव्या विस्तारित इमारतीचे उद्घाटन उपराष्ट्रपती यांच्या हस्ते होवून आपले नाव कोनशिलेवर लागावे या अट्टाहासापायी अधुऱ्या इमारतीचे उद्घाटनकरण्याची घाई करण्यात आली आणि त्यामुळे अपुऱ्या अवस्थेतील इमारती ला उद्घाटन समयी गळती लागली या प्रकारामुळे तमाम महापालिका अधिकारी आणि पुणेकरांची नाचक्की झाली यास महापौर जबाबदार असल्याचा आरोप आज मनसे च्या शहर महिला अध्यक्षा ,माजी नगरसेविका रुपाली पाटील यांनी केला . या नाचक्की मुळे   त्यांनी माफी मागावी अशी मागणी हि त्यांनी यावेळी केली . महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज (दि.22) महापालिकेत  मनसे चे गटनेते नगरसेवक वसंत मोरे यांच्या नेतृत्वा खाली आयुक्त कार्यालया समोर  छत्री, रेनकोट घालून आंदोलन करण्यात आले.मात्र आयुक्त कार्यालयात नसल्याने अखेर अतिरिक्त आयुक्तांना या प्रकरणी निवेदन देण्यात आले.

बिल्डिंग झाली ब्युटीफुल, काम झाले डर्टीफुल असे म्हणत मनसे कार्यकर्त्यांनी इमारत गळतीविरोधात छत्र्या, रेनकोट घालून जोरदार घोषणाबाजी करत सत्ताधाऱ्यांचा निषेध केला. तसेच या निकृष्ट कामाला जबाबदार ठेकेदार, अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी यावेळी मनसेचे महापालिकेतील गटनेते वसंत मोरे यांनी केले. आपल्या खुर्च्या जाण्याच्या अगोदर इमारतीच्या कोनशिलेवर नाव लावून घेण्याच्या घाईमुळे हा प्रकार झाल्याचा आरोप हि त्यांनी केला.

वसंत मोरे म्हणाले, महापालिका विस्तारित इमारतीचे उदघाटन उपराष्ट्रपतींच्या हस्ते काल करण्यात आले, त्यावेळी व्यासपीठावर कार्यक्रम चालू असताना सभागृहात पाणी गळती झाली. त्यामुळे उपराष्ट्रपतींसमोर पुण्याची नाचक्की झाली. याला सत्ताधाऱ्यांची घाई कारणीभूत असल्याचा आरोप केला.