‘फोर्स मोटर्स एव्हरेस्ट मोहीम २०१८’ मधील समीर पाथम व सूरज झिंगान या विजयीवीरांचा सत्कार

Date:

पुणे : ‘फोर्स मोटर्स एव्हरेस्ट एक्स्पीडिशन २०१८’ या गिर्यारोहण मोहिमेचे नेतृत्व करुन एव्हरेस्ट शिखरावर यशस्वी चढाई करणाऱ्या समीर पाथम व सूरज झिंगान या विजयीवीरांना काल ‘फोर्स मोटर्स कंपनी’च्या आकुर्डी प्रकल्पात गौरवण्यात आले. समीर व सूरज या दुकलीने जगातील सर्वोच्च उंचीचे माऊंट एव्हरेस्ट हे शिखर गेल्या १८ मे रोजी सर केले होते. या थरारक चढाईचा अनुभव विशद करत या पुणेकर गिर्यारोहकांनी मोहिमेचे व्हिडिओ उपस्थितांना दाखवले. मोहिमेवर नेलेला फोर्स मोटर्सचा ध्वज त्यांनी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक प्रसन फिरोदिया यांच्याकडे सुपूर्द केला आणि शिखरावरील आपल्या चढाईच्या छायाचित्रावर स्वाक्षरीही केली. “समीर व सूरज यांची चिकाटी व निर्धार इतरांना वैयक्तिक व व्यावसायिक उद्दिष्ट्ये गाठण्यासाठी प्रेरणादायी ठरेल,” या शब्दांत श्री. फिरोदिया यांनी कौतुक केले.

गेल्या २२ मार्च रोजी कंपनीच्या आकुर्डी येथील मुख्यालयातून झेंडा फडकवून या मोहिमेचा शुभारंभ झाला. समीर व सूरज यांनी काही आठवडे एव्हरेस्टजवळच्या शिखरांवर चढाई करुन आपल्या तांत्रिक कौशल्यांची उजळणी केली आणि नंतर ते एव्हरेस्ट बेस कॅम्पकडे रवाना झाले. तेथे त्यांनी अधिक उंचावरच्या कॅम्पला जाण्यासाठी अनेक फेऱ्या केल्या. त्यामागे अंतिम चढाईसाठी गरजेचे असलेले तंबू, अन्नपाणी व प्राणवायू आदी सामान साठवण्याचा हेतू होता.

अनुकूल हवामानाची साथ मिळाल्याने गेल्या १७ मे रोजी सायंकाळी या दोघांनी समुद्रसपाटीपासून ८००० मीटर उंचीवरील कॅम्प ४ सोडला आणि एव्हरेस्टवर चढाई सुरु केली. रात्रभर वाटचाल केल्यानंतर सकाळी सहा वाजून २० मिनिटांनी ते शिखरावर पोचले. तेथे ४० मिनिटे वेळ घालवून मग ते परतीच्या प्रवासासाठी खाली उतरले.

या मोहिमेसाठी फोर्स मोटर्स कंपनीने दिलेल्या पाठबळाबद्दल समीर व सूरज यांनी कृतज्ञता व्यक्त केली. या दुकलीला वर्ष २०१५ मधील एव्हरेस्ट चढाईचा आपला पहिला प्रयत्न नेपाळमधील भूकंपामुळे सोडून द्यावा लागला होता. या भूकंपामुळे एव्हरेस्ट बेस कॅम्पच उद्ध्वस्त झाल्याने समीर व सूरज माघारी फिरले. वर्ष २०१७ मध्ये त्यांनी पुन्हा एकदा मोहीम आखली, पण त्याहीवेळी ताशी १६० किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या तुफानी वाऱ्यांमुळे त्यांच्या मेहनतीवर पाणी पडले. तिसऱ्या मोहिमेच्या रुपाने फोर्स मोटर्सने त्यांच्या स्वप्नांना नवजीवन मिळवून दिले. “आमच्या निर्धारावर दृढ विश्वास ठेवणाऱ्या सर्वांचे आम्ही आभारी आहोत,” अशी प्रतिक्रिया समीर व सूरज यांनी यावेळी व्यक्त केली.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पाश्चात्य संगीतापेक्षा शास्त्रीय संगीत आणि नृत्यातून वेगळा आनंद मिळतो

नामदार चंद्रकांतदादा पाटील यांची भावना पंडिता रोहिणी भाटे नृत्य महोत्सवाचे...

सोशल मीडियावर औरंगजेबाचं समर्थन: पुण्यात दोघांवर कारवाई

पुणे-राज्यभरात औरंगजेबच्या कबरवरुन राजकीय वाद सुरु असतानाच त्याचे गंभीर...