पुणे-राज्यात आजपासून प्लास्टिक बंदी लागू करण्यात आली असून हॉटेल, दुकानदार यांच्यावर कडक कारवाई करण्यात येत आहे. पुण्यात आज सकाळ पासून 2 वाजे पर्यत 8 हजार 711 किलो कॅरीबॅग, ग्लास आणि थर्माकोल पुणे महानगरपालिकेच्या घनकचरा विभागाकडून शहरातील हॉटेल आणि दुकानदाराकडून जप्त केला आहे.त्यांच्याकडून 3 लाख 69 हजार 100 रुपयांचा दंड वसूल केला आहे.अशी माहिती घनकचरा विभागाचे सुरेश जगताप यांनी माहिती दिली.
राज्य शासनाच्या आदेशानुसार महानगरपालिका,नगरपालिका आणि जिल्हा परिषद यांच्या मार्फत प्लास्टिक बंदीवर कडक कारवाई करण्यात येत आहे. पुणे महानगरपालिकेच्या 15 क्षेत्रीय कार्यालया मार्फत सकाळी 10 वाजल्यापासून कारवाईला सुरुवात झाली.या कारवाईमध्ये किराणा दुकानदार, बेकरी चालक, कपड्याचे शॉप यासह अनेक दुकानदारावर कारवाई केली असून यात कॅरीबॅग आणि ग्लास असा माल मिळून 8711 किलो आणि थर्माकोल 75 किलो जप्त करण्यात आला आहे.या कारवाईतून 3 लाख 69 हजार 100 रुपयांचा दंड वसूल केला आहे.येत्या काळात अधिक तीव्र कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.