Home Blog Page 3121

न्यायालयांच्या पायाभूत सुविधांना राज्य सरकारचे प्राधान्य – देवेंद्र फडणवीस

0

औरंगाबाद : न्यायदानाच्या व्यवस्थेत पायाभूत सुविधांचे महत्त्व आहे. सुविधा नसल्या तरी न्यायदान होतेच. परंतु अत्यावश्यक सुविधा असल्यास न्याय देताना अधिक गती मिळते. त्यामुळे राज्य सरकारने न्यायालयांच्या पायाभूत सुविधांना प्राधान्य दिले आहे. त्यानुसार औरंगाबाद खंडापीठाला राज्य सरकारकडून अपेक्षित असलेल्या सर्व पायाभूत सुविधा उचित कालावधीत पुरविण्यात येतील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली.

औरंगाबाद खंडपीठाच्या नवीन इमारत विस्तारीकरण कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून श्री.फडणवीस बोलत होते. यावेळी मुंबई उच्च न्यायालयाच्या प्रभारी मुख्य न्यायाधीश विजया ताहीलरमाणी, औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती रवींद्र बोर्डे, विधी व न्याय राज्यमंत्री डॉ.रणजीत पाटील, औरंगाबाद खंडपीठ वकील संघाचे अध्यक्ष अतुल कराड यांची उपस्थिती होती.

मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले, उच्च न्यायालयांनी तडजोडीने तंटा निवारणाला प्राधान्य दिलेले आहे. त्यातून पैसा, वेळ वाचतो. मनस्तापही होत नाही. यापूर्वी श्री.बोर्डे यांनी न्यायाधिशांची निवासस्थाने, विश्रामगृह आणि ॲनेक्स इमारतीबाबत ज्या अपेक्षा राज्य सरकारकडून केल्या होत्या. त्या पूर्ण करण्यात येत आहेत. नवीन इमारत विस्तारीकरण करताना त्यात वाहनतळाचा विचार करण्यात आलेला आहे. त्यासाठी बहुपर्यायी वाहनतळ आराखड्याचा विचार करण्यात येतो आहे. हा आराखडा अंतिम टप्प्यात असून वास्तूविशारद त्यावर काम करत आहेत. औरंगाबाद खंडपीठाला आवश्यक असणाऱ्या सर्व सुविधा वेळेत पूर्ण करण्यात येतील. त्याचबरोबर 2020 पर्यंत ॲनेक्स इमारत पूर्ण होईल, अशी अपेक्षाही श्री.फडणवीस यांनी व्यक्त केली. राज्य सरकारने न्यायालयामध्ये पायाभूत सुविधा, इमारत उभारणीसाठी मागील तीन वर्षात 1400 कोटींच्या कामांना मंजुरी दिलेली आहे. राज्याने सातत्याने पायाभूत सुविधा देण्यावर भर दिला असल्याचेही श्री.फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

सरकारी वकील कार्यालयाने माहिती तंत्रज्ञान केंद्राची निर्मिती केली. ही अतिशय उपयोगी यंत्रणा उभारल्याने खटल्यांचा निकाल वेळेत लागण्यास मदत होईल. या केंद्राची पाहणी करताना खटला निवारण व्यवस्थापन प्रक्रियेबाबत मुख्य सरकारी वकील अमरजीतसिंह गिरासे यांनी इत्यंभूत माहिती दिली. खटला त्वरीत निकाली निघण्यासाठी ही प्रक्रिया अत्यंत मोलाची भर घालणारी आहे. प्रशासनाला गतिमान करणारी ही यंत्रणा आहे. खटला दाखल होताच संबंधितांना लागलीच त्याबाबत माहिती मिळाल्याने या खटल्याबाबतची जबाबदारी निश्चित होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे खटला निकाली काढण्यासाठी उपयोग हाईल. मुंबईतही अशाप्रकारची यंत्रणा उभारण्यात येते आहे, असेही श्री.फडणवीस म्हणाले.

औरंगाबादमधील महत्त्वाची असलेली देशातील संस्था राष्ट्रीय विधी विद्यापीठ याबाबत नुकतीच बैठक घेण्यात आली. बैठकीत सर्व विभागांची मते जाणून घेतली. या विद्यापीठाला सुविधा पुरविण्यासाठीही प्रथम प्राधान्य आहे. औरंगाबाद शहर झपाट्याने विकासाकडे वाटचाल करते आहे. डीएमआयसीचा पहिला टप्प्या संपत आहे. नागपूर- मुंबई एक्सप्रेस वे, जालना ड्रायपोर्ट औरंगाबादला विकासाच्या दिशेने घेऊन जाणारा आहे. त्यामुळे आगामी काळात औरंगाबादेत न्यायालय, शिक्षण, सरकारच्या इतर यंत्रणांना चांगल्या पायाभूत सुविधा असणे आवश्यक आहे. त्यासाठी राज्यशासन कटिबद्ध असल्याचे श्री.फडणवीस म्हणाले.

मुख्य न्यायमूर्ती श्रीमती ताहीलरमाणी यांनी खंडपीठाने 37 वर्षात 7 लाखांहून अधिक खटल्यांचा निपटारा केला, असे सांगितले. नवीन इमारतीमध्ये महिलांसाठी आवश्यक असणारी जागा उपलब्ध करून देण्यात येईल, अशी ग्वाहीही यावेळी दिली. वकील हा समाजातील अत्यंत महत्त्वपूर्ण घटक असून लोकशाहीचे महत्त्वाचे अंग आहे. समाज कल्याणासाठी वेळ वाया न घालवता न्यायदानावर सर्वांनी भर द्यावा, असेही त्या म्हणाल्या. न्यायाधीश श्री.बोर्डे यांनी खंडपीठाचे वैशिष्ट्ये, नवीन इमारतीचे वैशिष्ट्ये याबाबत माहिती दिली. श्री.कराड यांनी नवीन इमारतीत स्वतंत्र महिलांसाठी कक्ष, वाहनतळ याबाबत अपेक्षा व्यक्त केली.

नवीन इमारतीचे वैशिष्ट्ये

न्यायदान खटल्यांची वाढती संख्या पाहता नवीन इमारतीची आवश्यकता निर्माण झाल्याने खंडपीठात नवीन इमारत होऊ घातली आहे. ही ॲनेक्स इमारत एकूण चार मजल्यांची असणार आहे. 14 हजार 488 चौमी बांधकाम क्षेत्र, त्यात 12 न्यायदान कक्ष, 24 न्यायाधीशांच्या चेंबर्स, नऊ लिफ्ट, सभागृहे, कार्यालयांचा समावेश असणार आहे.

माहिती तंत्रज्ञान केंद्र

खंडपीठाच्या आवारातच सरकारी वकिलांच्या कार्यालयात माहिती तंत्रज्ञान केंद्राची उभारणी करण्यात आली आहे. सरकारी खटल्यांना वेळेत न्याय देण्यासाठी ही यंत्रणा अत्यंत उपयोगी पडणारी आहे. त्यामुळे श्रम, वेळ वाचणार आहेत. औरंगाबाद खंडपीठात प्रलंबित असलेल्या 1 लाख 73 हजार प्रकरणाला यामुळे गती मिळून प्रकरणे निकाली निघण्यास मदत होणार आहे. अधिकाधिक सुनावणी न होता, कमी सुनावणी कालावधीत प्रकरणांचा निपटारा होण्यास या केंद्रामुळे गती निर्माण होणार आहे. सरकारी वकील आणि प्रशासनातील संवाद यामुळे अधिक जलदगतीने होण्यास मदत होणार आहे.

रोझरी स्कूल ने नववीतील 85 विद्यार्थ्यांना केले नापास

पुणे – कॅम्पमधील रोझरी शाळेने जाणीवपूर्वक नववीतील 85 विद्यार्थ्यांना एकाच वेळी नापास केल्याची तक्रार पालकांनी शिक्षण उपसंचालक विभागाकडे केली आहे. दहावीचा निकाल शंभर टक्‍के लागण्याच्या उद्देशाने नववीतील विद्यार्थ्यांना नापास करणाऱ्या शाळांच्या विरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने दिला आहे.

रोझरी शाळेत तब्बल 85 हून अधिक नववीच्या विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या विद्यार्थ्यांना न्याय मिळाला, यासाठी “मनविसे’च्या कार्यकर्त्यांसह पालकांनी शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडे धाव घेतली. नववीच्या विद्यार्थ्याना एकाच वेळी एवढ्या संख्येने नापास करणे, ही पद्धत चुकीची आहे. यावरून रोझरीच्या शाळेतील शिक्षक योग्य पद्धतीने शिकवितात का, असा प्रश्‍नही पालकांनी उपस्थित केला आहे.

नापास विद्यार्थ्यांची शाळेने चुकीच्या पद्धतीने पेपर तपासणी केल्याचा आरोपही पालकांनी केला आहे. यावरून शाळा प्रशासनाची शैक्षणिक दर्जा पूर्णपणे खालावलेला असून, या नववीतील विद्यार्थी पालकांची होणारे शैक्षणिक पिळवणूक थांबवावी. या विद्यार्थ्यांची पुन्हा उत्तरपत्रिका तपासणी करण्याची मागणी संघटनेने केली आहे. या विद्यार्थ्यांना योग्य न्याय मिळावा अन्यथा पालकांसमवेत आक्रमक पवित्रा घेवून आंदोलन करणार असल्याचे “मनविसे’ शहराध्यक्ष कल्पेश यादव यांनी सांगितले.

अन्‌ डोंगरकुशीतले ‘कळकराई’ प्रकाशले! ग्राहकसेवेसाठी दीड किलोमीटर खोल दरीत दुरुस्तीचे काम

पुणे : कळकराई हे आंदर मावळातील अत्यंत दुर्गम, सह्याद्रीच्या डोगरांनी वेढलेले गाव. सुमारे दीड किलोमीटर खोल व अरुंद दरीत असणाऱ्या वीजवाहक तारा वादळी पावसामुळे तुटल्या अन्‌ वीजपुरवठा खंडित झाला. महावितरणचे कर्मचारी, स्थानिक ग्रामस्थ व धाडसी तरूणांनी अरुंद व खोल दरीत उतरून दुरुस्तीचे काम पूर्ण केले. त्यामुळे कळकराई गाव पुन्हा प्रकाशले व महावितरणच्या ग्राहकसेवेने ग्रामस्थ सुद्धा आनंदले.

मावळ तालुक्यातील कळकराई गाव हे खेड, मावळ व कर्जत तालुक्यांच्या सिमेवर आहे. कळकराईजवळील सावळा गावापर्यंत डांबरी रस्ता आहे. त्यापुढे सुमारे साडेतीन किलोमीटर डोंगराला वळसा घालत, धबधब्यांचे वेगवान प्रवाह ओलांडून जंगलातील अत्यंत खडतर पायवाटेने डोंगर पायथ्याशी असलेल्या 70 घरांच्या कळकराई गावात जाता येते. मावळकडे दळणवळणासाठी अत्यंत प्रतिकूल बिकटवाट व डोंगरदऱ्या असल्याने कळकराईमधील सर्व व्यवहार प्रामुख्याने कर्जतच्या बाजारपेठेत होतात. फक्त प्रशासकीय कामासाठी या गावाचा मावळ तालुक्याशी संबंध आहे. सन 2005 मध्ये कळकराई गावाजवळील डोंगरमाथ्यावर वीजयंत्रणेसह रोहित्र उभारण्यात आले व त्यास महावितरणच्या तळेगाव उपकेंद्रातून 22 केव्ही वाहिनीद्वारे वीज देण्यात आली. या रोहित्रापासून सुमारे दीड किलोमीटर अरुंद दरीमध्ये 5 ते 6 किलोमीटर लांबीच्या वीजतारा टाकून कळकराई गावाला वीजपुरवठा सुरु आहे.

हा वीजपुरवठा सुरळीत असतानाच जूनच्या पहिल्या आठवड्यात वादळ व मुसळधार पावसाने आंदरमावळात थैमान घातले. यामध्ये दरीत असलेल्या वीजतारा तुटल्या अन्‌ कळकराई गावाचा वीजपुरवठा खंडित झाला. अतिशय खोल, अरुंद व कातळ पाषाण असलेल्या दरीमधील दुरुस्ती कामाचे खडतर आव्हान महावितरणसमोर होते. डोंगरावरील रोहित्रापासून ते पायथ्याशी असलेल्या कळकराई गावापर्यंत नवीन वीजतारा टाकणे आवश्यक होते. संततधार पाऊस असल्याने निसरड्या दरीत उतरणे शक्य झाले नाही. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी त्याही परिस्थितीत प्रयत्न केला पण दुरुस्तीचे काम शक्य झाले नाही.

कळकराई गावात महावितरणचे 55 वीजग्राहक आहेत. विशेष म्हणजे ते नियमित वीजबिलांचा भरणा करणारे आहे. थकबाकी नाही. या प्रामाणिक वीजग्राहकांना सेवा देण्यासाठी महावितरणकडून निसर्गाशी झुंज देत वीजपुरवठ्यासाठी प्रयत्न सुरु झाले. प्रादेशिक संचालक श्री. संजय ताकसांडे, मुख्य अभियंता श्री. सचिन तालेवार यांनीही कळकराईच्या वीजपुरवठ्याची माहिती घेतली व दुरुस्तीच्या कामाबाबत मार्गदर्शन केले. अधीक्षक अभियंता श्री. राजेंद्र पवार, कार्यकारी अभियंता श्री. प्रल्हाद खडके यांच्या नेतृत्वात दुरुस्तीच्या कामाला सुरवात झाली. नवीन वीजतारा व दुरुस्तीचे साहित्य डोंगराळ पायवाटेने नेण्यासाठीच सुमारे 4 ते 5 दिवस लागले, अशी त्या ठिकाणची नैसर्गिक स्थिती आहे. उपकार्यकारी अभियंता श्री. विजय जाधव, शाखा अभियंता श्री. श्याम दिवटे यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला व सहकार्याचे आवाहन केले.

त्यानंतर महावितरणचे प्रशिक्षित कर्मचारी, स्थानिक ग्रामस्थ व ठाकर समाजातील धाडसी तरूण आदी सुमारे 30 ते 35 जणांच्या पथकाने डोंगरमाथ्यावरून खोलदरीतून कळकराईपर्यंत वीजतारा ओढण्याचे काम सुरु केले. या जोखमीच्या कामात महावितरणचे अधिकारी धोका टाळण्यासाठी स्वतः देखरेख करीत होते. नवीन वीजतारा ओढणे व इतर महत्वाचे दुरुस्ती काम करण्यासाठी 5 दिवसांचा कालावधी लागला. कोणत्याही प्रकारचा धोका न पत्करता हे काम नुकतेच पूर्ण झाले. त्यानंतर सुरळीत वीजपुरवठ्याने कळकराई गाव पुन्हा प्रकाशले अन्‌ ग्रामस्थांचे चेहरे सुद्धा आनंदाने उजळले. महावितरणचे अभियंते, कर्मचाऱ्यांचे व दुरुस्ती कामात सहकार्य करणाऱ्या धाडसी तरूणांचे ग्रामस्थांनी खुल्यादिलाने कौतुक केले. तसेच अत्यंत खडतर व बिकट नैसर्गिक परिस्थितीत धाडसी काम करून ग्राहकसेवा देणाऱ्या महावितरणला कळकराईचे माजी सरपंच श्री. लक्ष्मण कावळे व श्री. चंद्रकांत कावळे यांनी गावाच्या वतीने धन्यवाद दिले.

झी युवावरील फुलपाखरू मालिकेत एकूण १२ गाणी

झी युवा या वाहिनीने युथफूल कन्टेन्ट सादर करून तमाम महाराष्ट्रातील जनतेचं भरभरून मनोरंजन केलं आहे. अल्पावधीतच ‘फुलपाखरू’ या मालिकेने रसिकांची पसंती मिळाली आहे आणि या मालिकेने एक वर्ष प्रेक्षकांचेमनोरंजन करून लोकप्रियतेचे शिखर गाठले. मालिकेतील वैदेही म्हणजेच अभिनेत्री ऋता दुर्गुळे तमाम तरूणांच्या हृदयाची धडकन आहे तर मानस म्हणजेच यशोमन आपटे सगळ्या मुलींच्या गळ्यातील ताईत बनला आहे. कॉलेजच्या अल्लड वयात जुळलेलं प्रेम, त्यांचा एकमेकांवरचा लटका राग, त्यांची खोडकर मस्ती, थोडे रुसवे – फुगवे, एकमेकांवर निरपेक्ष प्रेम करणाऱ्या मानस आणि वैदेहीची ही प्रेमकथा म्हणजे ‘फुलपाखरू’. या कार्यक्रमातप्रेक्षकांनी अनेक ट्विस्ट्स अँड टर्न्स अनुभवले. तसेच या मालिकेत प्रेक्षकांनी अजून एक वेगळी गोष्ट अनुभवली ती म्हणजे श्रवणीय गाणी. नुकतंच यशोमन आणि हृता यांनी पावसाळी ऋतूत धुंद होणारे एक गाणे शूट केले.

मानस आणि वैदेही यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री ही उत्तमच आहे जी प्रेक्षकांना देखील भावते. याआधी देखील या मालिकेत अनेक गाणी प्रेक्षकांनी पाहिली पण आता प्रेक्षक एक पावसाळी रोमँटिक गाणं फुलपाखरू मध्ये पाहू शकणार आहेत. पाऊस गारवा आणि प्रेम या गोष्टींचा उत्तम मेळ साधून दिग्दर्शक मंदार देवस्थळी यांनी या गाण्याचं चित्रीकरण केलं. फुलपाखरू या मालिकेत एका वर्षात आतापर्यंत एकूण १२ गाणी चित्रित होऊन प्रेक्षकांच्या भेटीस अली. मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये कुठल्याही मालिकेत इतकी गाणी चित्रीत झालेली नाहीत, त्यामुळे या बाबतीत मालिकेने एक रेकॉर्ड केला आहे.

दिग्दर्शक मंदार देवस्थळी म्हणाले, “पावसाळा हा प्रेमाचा ऋतू असतो आणि म्हणूनच आम्ही हे गाणं चित्रित करण्याचा निर्णय घेतला. हा प्रेमाचा ऋतू या दोन प्रेमींसोबत या गाण्यातून प्रेक्षांच्या भेटीस लवकरच येणार आहे. या गाण्याच्या चित्रीकरणाच्या वेळी आम्ही खूप धमाल केली. एक एनर्जेटिक टीम सोबत तुम्ही जेव्हा काम करता तेव्हा काम करताना देखील एनर्जी येते. फुलपाखरूमध्ये एकूण १२ गाणी शूट केल्याचा वेगळाच विक्रम आम्ही केला आहे आणि याचा मला आनंद आहे.”

 

गोयल गंगा फाऊंडेशन तर्फे वाहतूक पोलिसांना रेनकोटचे वाटप

पुणे :- ऊन- वारा-पावसाची तमा न बाळगता आपले काम चोखपणे पार पाडतात त्यांच्या कामात त्यांना हातभार लागावा यासाठी गोयल गंगा फाऊंडेशन तर्फे बंड गार्डन येथील वाहतूक पोलिसांना  गोयल गंगा फाउंडेशनचे विश्वस्त अमित गोयल यांच्या हस्ते रेनकोटचे वाटप करण्यात आले.

पोलीस निरीक्षक ए. वाय नवगिरे,पोलीस उपनिरीक्षक बी. बी जगताप  यांसह इतर मान्यवर व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.  वाढती वाहतूक,नियमांचे उल्लंघन करणारे वाहनचालक अशा अनेक समस्यांचा सामना करत ते रोज आपले काम अत्यंत निष्ठेने करत असतात.त्यांच्यामुळेच वाहतूक सुरक्षित असते. यापुढे देखील त्यांना लागेल ती मदत करण्याचे आश्वासनही गोयल यांनी दिले.

खा. अनिल शिरोळेंनी घेतली सायरस पुनावाला ,हुकूमचंद चोरडिया यांची भेट

पुणे-‘संपर्क से समर्थन ’ या भारतीय जनता पार्टीच्या सध्या सुरू असलेल्या देशव्यापी अभियानांतर्गत खासदार अनिल शिरोळे यांनी ज्येष्ठ उद्योग पती सायरस पुनावाला आणि आदर पुनावाला यांची भेट घेतली. या वेळी  झालेल्या चर्चेत श्री. शिरोळे यांनी गेल्या चार वर्षांतील केंद्र आणि राज्य सरकारची कामगिरी विशद केली. उद्योग, पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य, स्वच्छता यासह वेगवेगळ्या क्षेत्रात भाजपाने मागील ४८ महिन्यांत राबविलेल्या योजना आणि सध्या सुरू असलेले प्रकल्प यांची माहिती देणारा सविस्तर अहवाल शिरोळे यांनी पुनावाला यांना भेट दिला. तसेच त्यांच्याशी  देशातील औद्योगिक विषयांवर सविस्तर चर्चा देखील केली. संपर्क से समर्थन हे अभियान सुरु झाल्यापासून शिरोळे ह्यांनी  समाजातील विविध स्थरातील मान्यवर व नागरिकांची भेटी घेतल्या आहेत. या वेळी नगरसेवक सिद्धार्थ शिरोळे,सुनील पांडे, भा ज प हडपसर मतदार संघ उपाध्यक्ष संकेत झेंडे, सरचिटणीस अमित गायकवाड आदी उपस्थित होते.

‘संपर्क से समर्थन ’ या भारतीय जनता पार्टीच्या सध्या सुरू असलेल्या देशव्यापी अभियानांतर्गत खासदार अनिल शिरोळे यांनी ज्येष्ठ उद्योग पती आणि प्रवीण मसालेवाले उद्योगाचे प्रमुख हुकूमचंद चोरडिया यांची भेट घेतली. या वेळी झालेल्या चर्चेत श्री. शिरोळे यांनी गेल्या चार वर्षांतील केंद्र आणि राज्य सरकारची कामगिरी विशद केली. उद्योग, पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य, स्वच्छता यासह वेगवेगळ्या क्षेत्रात भाजपाने मागील ४८ महिन्यांत राबविलेल्या योजना आणि सध्या सुरू असलेले प्रकल्प यांची माहिती देणारा सविस्तर अहवाल शिरोळे यांनी चोरडिया यांना भेट दिला. तसेच त्यांच्याशी देशातील औद्योगिक विषयांवर सविस्तर चर्चा देखील केली. संपर्क से समर्थन हे अभियान सुरु झाल्यापासून शिरोळे ह्यांनी समाजातील विविध स्थरातील मान्यवर व नागरिकांची भेटी घेतल्या आहेत. या वेळी नगरसेवक सिद्धार्थ शिरोळे, नगरसेविका मानसी देशपांडे, राजकुमार चोरडिया, विशाल चोरडिया, सुनील पांडे, किरण वैष्णव, हरीश परदेशी आदी उपस्थित होते.

लीला पूनावाला फाउंडेशन द्वारा ३०० मुलींना शिष्यवृत्ती

पुणे-लीला पूनावाला फाउंडेशन (एलपीएफ) ने 300 पेक्षा जास्त शालेय मुलींना यावर्षी शिक्षणासाठी  शिष्यवृत्ती दिली आहे. अश्या प्रकारे शिष्यवृत्ती देणारे हा ८वा शालेय शिष्यवृत्ती समारोह एमएफएच हॉल, कमिन्स, बलवाड़ी मध्ये आयोजित केला गेला होता.
शिष्यवृत्ती मध्ये  स्कूल बैग, सायकल, शूज आणि पुस्तके देखील दिली जातात,  कार्यक्रमाच्या वेळी पालकांशी देखील सवांद साधला गेला. या शिष्यवृत्तीचा अवधि १० वर्षापर्यंत आहे ज्यात ७वी ते पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणासाठी  मुलींना मोफत शिष्यवृत्ती दिली जाते.
यावेळी सकाळच्या सत्रासाठी मुख्य अतिथी म्हणून लीला फेलो डॉ. सारिका देओरे (२००१ आणि २००९ मधली एलपीएफ पीजी शिष्यवृत्ती प्राप्तकर्ता)  आणि सन्माननीय अतिथीच्या रुपात  मिसेस शिवानी नायक शाह (मिसेस इंडिया क्वीन ऑफ़ सबस्टेंस २०१८) उपस्थीत होत्या.
दुपारच्या सत्रामध्ये  अणखी एक लीला फेलो डॉ. रुता लिमये (१९९९ च्या एलपीएफ पीजी शिष्यवृत्ती प्राप्तकर्ता) यांना  सन्मानित केले गेले. या वेळी ह्या तिघींनी ही उपस्थीत असलेल्या सर्व पालकांना मुलींच्या शिक्षणावर जोर देण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमामध्ये पद्मश्री लीला पूनावाला यांनी आपल्या  स्वागत भाषणात आपले विचार व्यक्त करताना सांगीतले की, पालकांनी मुलींच्या लग्नासाठी हूंडा देण्याएेवजी ते पैसे त्यांच्या शिक्षणावर करावे. जेणेकरुन त्या आपल्या जीवनात अधिक सक्षम बनतील.

‘वंदना चव्हाण : ​​ अनरेवेलिंग द ट्रू स्टेट्समनशिप’

‘कॉफी टेबल बुक’ च्या सहाव्या आवृत्तीचे प्रकाशन
 पुणे :राज्यसभा सदस्य अ‍ॅड. वंदना चव्हाण यांच्या कार्यकर्तृत्वावरील ‘प्रबोधन माध्यम प्रकाशन’ निर्मित ‘वंदना चव्हाण : अनरेवेलिंग ट्रू स्टेट्समनशिप’ या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन करण्यात आले.
खा. अ‍ॅड. वंदना चव्हाण, राष्ट्रवादी युवती कॉंग्रेसच्या शहराध्यक्ष मनाली भिलारे, ‘प्रबोधन माध्यम प्रकाशन’चे समन्वयक सारिका रोजेकर, सचिन सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत प्रकाशन झाले.
खासदार अ‍ॅड. वंदना चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित ‘ स्माईल ‘ येथील कार्यक्रमात शनीवारी दुपारी या ‘कॉफी टेबल बुक’च्या सहाव्या वर्षाच्या आवृत्तीचे प्रकाशन करण्यात आले.
खासदार वंदना चव्हाण यांनी पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष म्हणून केलेली कामगिरी, राज्यसभा सदस्य या नात्याने केलेले अभ्यासदौरे, पर्यावरण स्नेही उपक्रम, महिला सक्षमीकरणाचे उपक्रम, शहर विकास प्रश्‍नावर केलेले काम याचा मागोवा या ‘कॉफी टेबल बुक’ प्रकारातील पुस्तकात घेण्यात आला आहे. ‘प्रबोधन माध्यम’च्या वतीने आयोजित या उपक्रमाचे हे सहावे वर्ष होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ‘प्रबोधन माध्यम प्रकाशन’चे , सारिका रोजेकर, सचिन सूर्यवंशी, श्रीकांत वाघ यांनी परिश्रम घेतले.

पीएमआरडीए क्षेत्रातील शिक्रापूर बाह्यवळण रस्ता भूमिपूजन संपन्न

पुणे-

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए)च्या वतीने पालकमंत्री गिरीष बापट
यांच्या उपस्थितीत शिरूर तालुक्यातील चौफुला (करंदी फाटा) नगर रोड ते तळेगाव ढमढेरे रस्ता इजिमा १५६ शिक्रापूर
दक्षिण बाजू बाह्यवळण ९ किमी रस्त्याचा भूमिपूजन समारंभ शनिवारी दि.७ जुलैला सकाळी १० वाजता पार पडला.
सदर कार्यक्रमाला अन्न आणि औषध प्रशासन, संसदीय कार्य तथा पालकमंत्री गिरीष बापट, पीएमआरडीएचे महानगर आयुक्त
किरण गित्ते,शिरूर लोकसभा सदस्य खा. शिवाजीराव आढळराव पाटील, अध्यक्ष, जि.प. विश्वासराव देवकाते,
विधानसभा सदस्य, शिरूर, हवेलीचे आमदार श्री. बाबुरावजी पाचर्णे, पं.स. शिरूरचे सभापती पै. सुभाष-अण्णा
उमाप, पं.स. शिरूर उपसभापती मोनिका हरगुडे, केंदूर, पाबळच्या जि. प. सदस्या सविता बगाटे , कोरेगाव- भीमा
सणसवाडी जि. प. सदस्या कुसुम मांढरे, तळेगाव ढमढेरे जि. प. सदस्या रेखा बांदल , जि.प,पुणे माजी सभापती मंगलदास
बांदल, केंदूरच्या पं. स. सदस्या सविता पऱ्हाड , शिक्रापूर गण पं. स. सदस्या जयमाला जकाते, तळेगाव ढमढेरे पं. स.
सदस्या अर्चना भोसुरे, शिक्रापूर ग्रा.पं सरपंच जयश्री भुजबळ, तळेगाव ढमढेरे सरपंच ताई सोनवणे,
पिंपळे जगताप ग्रा.पं, सरपंच पुष्पा जगताप, सणसवाडी ग्रा.पं, सरपंच रमेश सातपुते, कार्यकारी अभियंता एस.बी.देवढे,
वरिष्ठ अभियंता अमित तिडके व स्थानिक सामाजिक कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी महानगर आयुक्त किरण गित्ते म्हणाले, पिंपळे जगताप नगर रोड ते तळेगाव ढमढेरे रस्ता करणे ही मोठी जबाबदारी
पीएमआरडीएवर होती. त्यामुळे शिक्रापूर रस्त्याची वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणवर कमी होणार आहे. या दोन्ही ठिकाणी
वाहतूक वर्दळ मोठी असल्याने शिक्रपूर रस्त्यावर नियमित वाहतूक कोंडी होत असते. सणसवाडी ते शिक्रपूर रस्त्यावर
औद्योगीकरण व नागरीकरणासाठी मोठ्या प्रमाणावर झाल्याने वाहतुकीला अडसर निर्माण होत आहे. तसेच ड्रेनेज  व्यवस्था हि करून दिली जाणार आहे. जवळपास या भागात ७ रस्ते करण्याचे नियोजन आहे. सदरचा रस्ता अरुंद असल्याने रस्ता
विकसित करण्याची मागणी मागील अनेक दिवसापासून नागरिक करत होते. या रस्त्याच्या विकासकामासाठी १२ कोटी ८८
लाख खर्च प्रस्तावित आहे. सदर कामकाजाला ९ महिन्याचा कालावधी दिलेला आहे.
पालकमंत्री गिरीश बापट म्हणाले, “विकास कामे करीत असताना सामाजिक कामाला प्राधान्य दिले जाणार आहे. सामन
विकास झाला पाहिजे.शिरूर तालुक्यासाठी आतापर्यंत २०० कोटी रुपये विकासकामासाठी दिलेले आहेत. सर्वपक्षीय
सदस्यांनी एकत्रित येऊन काम करणे गरजेचे आहे. पीएमआरडीएच्या माध्यमातून सद्य जलदगतीने विकाकामे हाती घेतली
जात आहेत. वाघोली अग्निशमन केंद्राचा ही जोखमीच्या कामाला मोठ्या प्रमाणावर उपयोग होणार आहे. रस्त्यासाठी
लागणाऱ्या जागा ताब्यात घेताना आधी शेतकऱ्यांचे पुनर्वसन करूनच जमिनी ताब्यात घेतल्या जातील.
शिरूरचे आमदार बाबुराव पाचर्णे यांनी देखील मनोगत व्यक्त करताना तळेगाव रस्त्याचा प्रश्न अल्पावधीत सुटल्याने समाधानव्यक्त केले. तसेच वाघोली अग्निशमन केंद्र या भागात झाल्याने पीएमआरडीएचे आभार मानले. पिंपळे जगताप नगर रोड तेतळेगाव ढमढेरे रस्ता झाल्याने वाहतूक कोंडीचा प्रश्न या भागातला लवकरच सुटणार आहे.
वाघो ली अग्निशमन केंद्राची पालकमंत्री यांच्याकडून पाहणीयादरम्यान वाघोली अग्निशमन केंद्राची पालकमंत्र्याकडून   पाहणी करण्यात आली. या ठिकाणी देखील वेगाने नागरीकरण होतअसल्याने जवळच्या परिसरात एकही अग्निशमन केंद्र उपलब्ध नाह. अनेकदा जीवित व वित्त हानी होत असल्याने अग्निशमनकेंद्र या भागात होणे अत्यावश्यक होते. याकरिता ही गरज लक्षात घेता पीएमआरडीएने नागरिकांची ही मागणी पूर्ण केली आहे.

रिफिलर्सच्या ‘जिंका १ मिनीट फ्री शॉपिंग’ योजनेला भरघोस प्रतिसाद

१६०० स्पर्धकांचा या कार्यक्रमात सहभाग /बक्षिसांमध्ये एलजी ऑटोमॅटीक वॉशिंग मशीन, किचन सेट, पॉपअप टोस्टर इत्यादींचा समावेश

पुणे: पुण्यातील आघाडीचे वन स्टॉप होम शॉपिंग स्थळ असलेल्या रिफिलर्स व्हॅल्यू मार्टच्या प्रांगणात नुकतेच ‘जिंका १ मिनीट फ्री शॉपिंग’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संपूर्ण पुण्यातील १,६०० स्पर्धकांनी या कार्यक्रमात भाग घेतला होता. २७ अंतिम स्पर्धकांपैकी तीन भाग्यवान विजेत्यांची लकी ड्रॉ च्या माध्यमातून निवड करण्यात आली आणि संपूर्ण मॉल मधून १ मिनिटात हवे ते शॉपिंग मोफत करण्याची संधी त्यांना मिळाली. या तीन भाग्यवान विजेत्यांमध्ये रेखा इंदुलकर, मुस्कान अंबी आणि नीता सराफ यांचा समावेश होता. रेखा इंदुलकर यांनी १५,७२० रुपये किंमतीची, मुस्कान अंबी यांनी १३७७६ रुपये किंमतीची आणि नीता सराफ यांनी ५१९१ रुपये किंमतीची उत्पादने जिंकली. इतर स्पर्धकांना वॉशिंग मशीन, बेड शीट कॉम्बो, डिनर सेट, पॉपअप टोस्टर, सँडविच मेकर इत्यादी बक्षिसे जिंकण्याची संधी मिळाली.

कोंढवा येथील रहिवासी आणि गृहिणी असणाऱ्या रेखा इंदुलकर ‘जिंका १ मिनीट फ्री शॉपिंग’ या कार्यक्रमाच्या विजेत्या ठरल्या. त्या म्हणाल्या, “या मॉलच्या अगदी उद्घाटनापासून येणाऱ्या काही ग्राहकांमध्ये माझा समावेश आहे. त्यामुळे हे बक्षीस जिंकल्याचा मला विशेष आनंद होत आहे. माझे सगळे कुटुंबीयही ही बातमी ऐकून खूप खूष झाले आणि मला व्यासपीठावर बसलेले बघायला इथपर्यंत आले. या स्पर्धेत सहभागी होण्याची संधी दिल्याबद्दल रिफिलर्स व्हॅल्यू मार्टचे मी आभार मानते. शॉपिंग करताना इथे मिळत असलेल्या सवलतींमुळे शॉपिंगचा एक वेगळाच आनंद मिळतो. त्यामुळे मी इथे वरचेवर शॉपिंगला येण्याचा प्रयत्न करते.”

रिफिलर्स व्हॅल्यू मार्टचे संचालक अमित गुप्ता म्हणाले, “हा कार्यक्रम आयोजित करताना आम्हांला खरोखरच खूप आनंद झाला आहे. महिला आणि गृहिणी आपल्या कुटुंबाच्या कल्याणासाठी अखंड राबत असतात. त्यामुळे त्यांना प्रेरित करण्यासाठी, त्यांना आणखी प्रफुल्लीत करण्यासाठी आम्हांला खास त्यांच्यासाठी काहीतरी विशेष करण्याची इच्छा होती. आमच्या कार्यक्रमाला मिळालेला अविश्वसनीय प्रतिसाद बघता आमचे ग्राहक इतक्या उत्साहाने या कार्यक्रमात सहभागी झाले हे बघून आम्हांला खूपच आनंद होत आहे.”

रिफिलर्स व्हॅल्यू मार्टचे क्लस्टर प्रमुख रॉकी ब्रागंझा म्हणाले, “अशा प्रकारच्या कार्यक्रमाची कल्पना करणं आणि त्याची आखणी करणं ही नाण्याची केवळ एक बाजू आहे. अशा प्रकारचा कार्यक्रम सुव्यवस्थित पार पाडणे हे मुख्य आव्हान असते. प्रत्येक ग्राहकाच्या चेहऱ्यावर उमटलेले स्मितहास्य हेच मला वाटतं या कार्यक्रमासाठी आमच्या सगळ्या कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या कष्टाचे फलित आहे.”

रिफिलर्स व्हॅल्यू मार्ट (RVM) ही घाऊक आणि किरकोळ खरेदीसाठी असलेली एकत्रित प्रकारची  वैशिष्ट्यपूर्ण बाजारपेठ आहे. आपल्या ग्राहकांना गुणवत्ता आणि किंमत यांचा सुरेख मिलाफ असलेल्या वस्तू उपलब्ध करून देणारा हा शॉपिंग मॉल आहे. या ठिकाणी १२,००० हून अधिक विविध प्रकारची उत्पादने उपलब्ध आहेत. त्यामध्ये गरजेच्या गोष्टी जसे की धान्य, किराणा माल, फ्रोजन पदार्थ, शीतपेये, वैयक्तिक निगेच्या गोष्टी, घरात आणि स्वयंपाकघरात लागणाऱ्या वस्तू, फॅशन आणि सौंदर्य, स्टेशनरी आणि इतर उपकरणांचा समावेश आहे. रिफिलर्स व्हॅल्यू मार्ट १.२५ लाख चौरस फुट एवढ्या परिसरात पसरलेले असून पार्किंग, पुरेसे खेळ आणि इतर करमणुकीच्या गोष्टी, क्रिकेट अकादमी, स्केटिंग अरेना, इव्हेंट आणि विविध स्वादिष्ट चवींच्या पदार्थांनी सजलेले फूड कोर्ट यांच्यासाठी इथे विपुल जागा आहे. “सर्वसामान्य माणसाच्या कुटुंबीयांनी मौजमजा करण्यासाठी एकत्र येऊन अनुभवण्याचा हा जत्रा मॉल आहे.”

‘परिवर्तनाचे दूत’ या स्पर्धेच्या तिसऱ्या पर्वाची सुरुवात

पुणे-खासदार वंदना चव्हाण यांनी स्माईल संस्थेतर्फे मागील दोन अतिशय यशस्वी झालेल्या ‘चेंजमेकर्स’ अर्थात
‘परिवर्तनाचे दूत’ या स्पर्धेच्या तिसऱ्या पर्वाची सुरुवात आज केली.
आजपासून सहा महिने ५ महिला कार्यकर्त्यांनी स्वतःच्या परिसरात १०० घरांमध्ये असणाऱ्या प्रश्नांची नोंद करून त्यावर
उत्तरे शोधायची आहेत व त्यातून परिवर्तन घडवून आणावयचे आहे. स्माईल संस्थेतर्फे आज प्लास्टिक बंदीवर उत्तर म्हणून
कागदी पिशव्या शिकवण्यात आल्या. प्रत्येक महिलेने आज कागदाच्या ५ पिशव्या तयार केल्या. यामुळे होणारे बदल
लवकरच स्वच्छ, सुंदर पुणे व पर्यावरणपूरक वस्तूंचे पर्यायी वापर अशा गोष्टींमध्ये दिसून येतील. महिलांना शिकण्याची
व शिकवण्याची संधी स्माईलने या स्पर्धेतून दिली आहे.
या स्पर्धेचे तपशील स्माईलच्या ऑफीसमध्ये तसेच चेंजमेकर्सच्या व स्माईलच्या फेसबुकपेजवर उपलब्ध करून देण्यात आले आहेत .

मराठवाडा चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे वारकर्‍यांना पंढरपूरपर्यंत तीन टँकरद्वारे मोफत पिण्याचे पाणी

पिंपरी । प्रतिनिधी:
पिंपळे गुरव येथील मराठवाडा जनविकास संघ संचलित मराठवाडा चॅरिटेबल ट्रस्ट पिंपरी-चिंचवड शहर यांच्यातर्फे जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी, संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराज पालखी सोहळ्यात सहभागी वारकर्‍यांना पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी तीन टँकर मोफत उपलब्ध करून देण्यात आले आहेत. ही सेवा देहू-आळंदी ते पंढरपूर या संपूर्ण पालखी मार्गावर देण्यात येणार आहे.
पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या टँकरचे पूजन करून वारकर्‍यांच्या सेवेत दाखल करण्यात आले. या टँकरद्वारे जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील प.पु.श्री. रामकृष्ण प्रासादिक दिंडी क्र. 221, संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराज पालखी सोहळ्यातील संत ज्ञानेश्‍वर महाराज दिंडी समाज आणि ह.भ.प. मठाधिपती मुक्ताबाई पवार बेलगावकर दिंडी क्र. 59 अशा तीन दिंड्यांना पिण्याचे पाणी पुरविण्यात येणार आहे. या टँकरच्या लोकार्पण कार्यक्रमाप्रसंगी भंडारा डोंगर ट्रस्टचे सदस्य जगन्नाथ नाटक पाटील, मराठवाडा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष अरुण पवार, सखाराम जोशी, श्रीकृष्ण खडसे, श्रीकृष्ण फिरके, मल्हारराव येळवे, जनार्दन बोरोळे, जालिंदर दाते, प्रकाश बंडेवार, विजयराज नागरी सहकारी पतसंस्थेचे उपाध्यक्ष सूर्यकांत कुरुलकर, सचिव वामन भरगंडे, आदिती निकम, भरत शिंगोटे, युवराज नलावडे, तसेच भिष्माचार्य ज्येष्ठ नागरीक संघ, संत गाडगेबाबा सेवा संघ, भैरवनाथ ज्येष्ठ नागरीक संघाचे पदाधिकारी आदी उपस्थित होते.
अरुण पवार म्हणाले, पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या दिंडीतील वारकर्‍यांना पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी गेल्या अनेक वर्षापासून ट्रस्टतर्फे टँकर सुविधा उपलब्ध करून दिली जाते. यंदाही वारकर्‍यांसाठी तीन टँकरद्वारे मोफत पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले जात आहे. हीच पांडुरंगचरणी आमची सेवा आहे.

भाजपच्या ‘त्या’ खासदाराला लाज वाटली पाहिजे – शरद पवार (व्हिडीओ)

पुणे : देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात इसाई (ख्रिश्चन )समाजाचे योगदान नाही असे म्हणणाऱ्या भाजपच्या त्या खासदाराला लाज वाटली पाहिजे , देशाच्या  स्वातंत्र्य लढ्यात कॉंग्रेस पक्षाचे योगदान आहे आणि कॉंग्रेसच्या अध्यक्षा  अॅनी बेझंट होत्या त्या ख्रिश्चन समाजाच्या होत्या हे ते विसरले आहेत .असे वक्तव्य आज येथे राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि सर्वेसर्वो असलेले शरद पवार यांनी येथे केले.

  पुण्यातील ईद मिलन कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी व्यासपीठावर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, दिलीप वळसे पाटील,खासदार वंदना चव्हाण, अंकुश काकडे ,महापालिकेतील विपक्ष नेते चेतन तुपे पाटील ,दत्ता धनकवडे ,विशाल तांबे,गफूर खान ,इक्बाल शेख ,नंदा लोणकर,शिक्षणतज्ञ डॉ पी ए इनामदार आदी मान्यवर उपस्थित होते.

देशात परिस्थिती इतकी खालावली आहे की,  कोणी काय घालावं, काय खावं हे सांगितलं जातं आहे. देशाच्या नेतृत्वाला या प्रकारे देशात द्वेष निर्माण करायचा आहे अशी  टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली.

ते म्हणाले,’आज समाजाची स्थिती वेगळी आहे. जिथे बंधुभाव संपतो तिथे द्वेषाचा माहोल तयार होत असून अशा परिस्थितीत देशाची प्रगती संपते. दुर्दैवाने हीच स्थिती आज देशात दिसत आहे. कधी मुस्लिम तर कधी इसाई समाजाच्या व्यक्तीवर हल्ले होतात आणि सांगितलं जातं हे हल्ले करणं हा आमचा अधिकार आहे.

आज मला विचारलं, तुम्हाला फर कॅप घालू का ? त्यावर मी देशाच्या स्वातंत्र्यासाठी तुरुंगवास भोगलेले मौलाना अबुल कलाम आझाद जी टोपी घालायची मला का लाज वाटावी असे उत्तर देत फर कॅप घातली. ज्यांच्या हातात देशाचा नकाशा त्यांना फर कॅप घालण्यात लाज वाटते अशा भाषेत त्यांनी उत्तर प्रदेशाच्या मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ईदच्या कार्यक्रमात न घातलेल्या टोपीचा उल्लेख केला. आजूबाजूच्या देशात फार चांगली स्थिती नाही. अशावेळी द्वेषाचा माहोल पसरणार नाही याची आपण काळजी घेऊ असेही ते म्हणाले.

भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांनी ख्रिश्चन समाजाच्या बाबत केलेल्या विधानावरही त्यांनी टीका केली. ते म्हणाले की, शेट्टी यांनी बोलताना इसाईंचे योगदान नाही असे म्हटले. त्यांना लाज वाटली पाहिजे ज्यावेळी स्वातंत्र्यपूर्व काळात काँग्रेसची स्थापना झाली, त्यावेळच्या स्थापना सदस्या अँनी बेझंट या इसाई होत्या.

नागपूरचे अधिवेशन बालहट्ट आणि अंधश्रद्धेमुळे : अजित पवार (व्हिडीओ)

अजित पवार यांच्या बोलण्यातील  मुद्दे –

  • पुणे शहर राष्ट्रवादीचा अध्यक्ष निवडी बाबत आता विलंब करण्यात अर्थ नाही असे जयंतराव पाटलांना सोमवारी सांगतो
  • कालचा दिवस सिडको व्यवहाराच्या गोंधळात गेला, काल मुख्यमंत्र्यांनी सभागृहात वेगळं सांगितलं, आज जमिनीचे सर्व व्यवहार रद्द करण्यात आले आहेत. सिडकोची हजारो कोटींची जमीन  जमीन मातीमोल भावात देण्यात आली. 
  • पाणी साचल्यानंतर आज ड्रेनेज साफ  करताना दारूच्या बाटल्या सापडल्या, हे दुर्दैवी आहे. आज संपूर्ण नागपूर जलमय झालं आहे. 
  • शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चुनावी जुमले पुन्हा सुरू झाले आहेत, हमीभावाच दिडपड देऊ सांगितलं जातं पण यातही घोळ आहे. 
  • शिवसेनेचे आमदारही नाराजी व्यक्त करत म्हणले हे मुंबईत झालं असतं तर आमच्यावर टिकेची झोड उठली असती, पण मुख्यमंत्री नागपूरचे असल्याने काही शब्द नाही.
  • कामकाजावर केला जाणार लाखोंचा खर्च वाया जात आहे, ज्या अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे त्यांच्यावर कारवाई करावी.

 

पुणे :नागपूरच्या पावसाळी अधिवेशनातील आजच्या दिवसाचा पावसानेच बोऱ्या वाजविल्याच्या पार्श्वभूमीवर आज पुण्यात अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना भाजप सरकारवर टीका केली .यंदा प्रथमच नागपूर येथे होत असलेले पावसाळी अधिवेशन कुणाच्या तरी बालहट्टा पायी घेतले गेले आहे.त्यांच्या या हट्टापायी अधिवेशनाचा पहिला आठवडा पाण्यात गेला आहे असा आरोप माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात केला आहे. अधिवेशन परिसरात दारूच्या बाटल्या सापडल्या हे काय चाललय असा सवालही त्यांनी केला. नागपूरचे गडकरी केंद्रात फडणवीस राज्यात मुख्यमंत्री आणि महापालिकेत हि भाजपचे सरकार तरीही पावसाने झालेली नागपूरची दुरवस्था आणि त्यामुळे झालेले प्रचंड नुकसान याला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे असे सांगून पवार यांनी शेतकरी वर्गाला दीडपट हमी भाव जाहीर करणे म्हणजे मध्य निवडणुका लागण्याची शक्यता असल्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.

शहरातील बालगंधर्व रंगमंदिरात ईद मिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.त्यापूर्वी पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते.
यावेळी अजित पवार म्हणाले की,नागपूर येथील अधिवेशन मुहूर्त पाहून सोमवार ऐवजी बुधवारपासून अधिवेशन सुरु केले आहे.आपण कुठल्या काळात आहोत, अशा शब्दात त्यांनी भाजपवर निशाणा साधला.  ते पुढे म्हणाले की, नागपूरमध्ये नालेसफाई झाली नसल्याने ही अवस्था ओढवली.नागपूरपासून दिल्ली पर्यंत भाजपचेच सरकार आहे. तरीदेखील तिथे पाणी तुंबले आहे.याला जबाबदार कोण आहे.असा सवाल देखील उपस्थित केला.ज्या नागपूरचे केंद्रीय

मंत्री आणि मुख्यमंत्री असताना ही अवस्था एका पावसाने केली.तर राज्यातील सर्व सामान्य नागरिकांची काय अवस्था असेल असा खरपूस समाचार देखील त्यांनी घेतला.

शासनाकडे बिगरव्याजी पडलेल्या ५००कोटींचा विनियोग करा- माजी उपमहापौर आबा बागुल यांची पालिका प्रशासनाला सूचना

पुणे 
शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरणाऱ्या उच्च क्षमता जलदगती वर्तुळाकार मार्गाचा (हाय कपॅसिटी मास ट्रान्झिट रूट- एचसीएमटीआर) आराखडा पूर्ण झालेला असून या महत्वपूर्ण प्रकल्पाला आधी काम नंतर पैसे [ डिफर्ड पेमेंट ] या पर्यायाच्या माध्यमातून गती द्यावी, त्यासाठी राज्यशासनाच्या तिजोरीत भूसंपादनापोटी पालिकेने जमा केलेले ;पण बिगरव्याजी पडून असलेल्या ५०० कोटी रुपयांचा वापर करावा, ती रक्कम स्वतंत्र खाते उघडून बँकेत ठेवीच्यारूपात ठेवून मिळणाऱ्या व्याजातून या  एचसीएमटीआर प्रकल्पाला गती देणे सहजशक्य आहे, अशी सूचना माजी उपमहापौर व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रतिनिधी आबा बागुल यांनी केली आहे.  
 याबाबत माजी उपमहापौर आबा बागुल म्हणाले कि, गत काही वर्षात शहरातील वाहनांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. तसेच वाहतुक नियंत्रणाबाहेर गेली आहे. मेट्रो, मोनो रेल यासह सार्वजनिक वाहतुक व्यवस्था सक्षम करण्यासाठी हालचालीही सुरू आहेत. मात्र, नियंत्रणाबाहेर गेलेल्या वाहतुकीसाठी  शाश्‍वत पर्याय ठरणाऱ्या  ‘हाय कॅपेसिटी मास्ट ट्रांझिस्ट रूटच्या अंमलबजावणीचा [रिंगरोड ] मार्ग आता पूर्णपणे मोकळा झाला असला तरी निधीअभावी हा प्रकल्प अद्यापही रखडलेला आहे. 
या ‘हाय कॅपेसिटी मास्ट ट्रांझिस्ट रूट’चा आराखडा पूर्णत्वाला आला आहे,त्यामुळे आता तात्काळ या रिंगरोडचे काम सुरु करणे आवश्यक आहे. मागील ३५  वर्षांपासून प्रलंबित असलेला पुणे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि पुणे व खडकी कॅंटोन्मेंट अंतर्गत रिंगरोड (एचसीएमटीआर) हा नागरिकांना दिलासादायक ठरणार आहे. मी गेली ११ / १२ वर्षे या   एचसीएमटीआर रस्त्यासाठी पाठपुरावा करीत आहे. या रिंगरोड उभारणीसंदर्भात सर्व प्रक्रिया पूर्ण झालेली आहे त्यामुळे आता प्रत्यक्ष काम सुरु होणे अपेक्षित आहे.वास्तविक निधीअभावी  या प्रकल्पाला चालना  मिळत नसली तरी  आधी काम नंतर पैसे (डिफर्ड पेमेंट) या पर्यायांच्या माध्यमातून   या प्रकल्पाला गती देणे सहजशक्य आहे ,त्यासाठी   गेल्या दहा वर्षांपासून भूसंपादनापोटी पालिकेकडून  सुमारे ५०० कोटी रुपये  राज्यशासनाकडे बिगरव्याजी पडून आहेत. त्या रकमेचा उपयोग होणे शक्य आहे. इतकी मोठी रक्कम बिगरव्याजी पडून राहिल्याने आतापर्यंत ३०० कोटीं रुपयांच्या  व्याजावर पालिकेनेच  ‘पाणी ‘ फिरवले आहे,ते टाळण्यासाठी आणि हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी राज्यशासनाकडे भूसंपादनापोटी पालिकेने जमा केलेली ही ५०० कोटी रुपयांची रक्कम स्वतंत्र खाते उघडून बँकेत ठेवीच्या स्वरूपात ठेवल्यास त्यातून मिळणारे व्याजातून  एचसीएमटीआर रस्ता मार्गी लागू शकतो,केवळ डिफर्ड पेमेंट या पर्यायाचा अवलंब करावा आणि  २५ वर्षातील मिळणाऱ्या व्याजाचा उपयोग नक्कीच होऊ शकतो,असेही आबा बागुल म्हणाले.