‘संपर्क से समर्थन ’ या भारतीय जनता पार्टीच्या सध्या सुरू असलेल्या देशव्यापी अभियानांतर्गत खासदार अनिल शिरोळे यांनी ज्येष्ठ उद्योग पती आणि प्रवीण मसालेवाले उद्योगाचे प्रमुख हुकूमचंद चोरडिया यांची भेट घेतली. या वेळी झालेल्या चर्चेत श्री. शिरोळे यांनी गेल्या चार वर्षांतील केंद्र आणि राज्य सरकारची कामगिरी विशद केली. उद्योग, पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य, स्वच्छता यासह वेगवेगळ्या क्षेत्रात भाजपाने मागील ४८ महिन्यांत राबविलेल्या योजना आणि सध्या सुरू असलेले प्रकल्प यांची माहिती देणारा सविस्तर अहवाल शिरोळे यांनी चोरडिया यांना भेट दिला. तसेच त्यांच्याशी देशातील औद्योगिक विषयांवर सविस्तर चर्चा देखील केली. संपर्क से समर्थन हे अभियान सुरु झाल्यापासून शिरोळे ह्यांनी समाजातील विविध स्थरातील मान्यवर व नागरिकांची भेटी घेतल्या आहेत. या वेळी नगरसेवक सिद्धार्थ शिरोळे, नगरसेविका मानसी देशपांडे, राजकुमार चोरडिया, विशाल चोरडिया, सुनील पांडे, किरण वैष्णव, हरीश परदेशी आदी उपस्थित होते.
खा. अनिल शिरोळेंनी घेतली सायरस पुनावाला ,हुकूमचंद चोरडिया यांची भेट
Date:
पुणे-‘संपर्क से समर्थन ’ या भारतीय जनता पार्टीच्या सध्या सुरू असलेल्या देशव्यापी अभियानांतर्गत खासदार अनिल शिरोळे यांनी ज्येष्ठ उद्योग पती सायरस पुनावाला आणि आदर पुनावाला यांची भेट घेतली. या वेळी झालेल्या चर्चेत श्री. शिरोळे यांनी गेल्या चार वर्षांतील केंद्र आणि राज्य सरकारची कामगिरी विशद केली. उद्योग, पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य, स्वच्छता यासह वेगवेगळ्या क्षेत्रात भाजपाने मागील ४८ महिन्यांत राबविलेल्या योजना आणि सध्या सुरू असलेले प्रकल्प यांची माहिती देणारा सविस्तर अहवाल शिरोळे यांनी पुनावाला यांना भेट दिला. तसेच त्यांच्याशी देशातील औद्योगिक विषयांवर सविस्तर चर्चा देखील केली. संपर्क से समर्थन हे अभियान सुरु झाल्यापासून शिरोळे ह्यांनी समाजातील विविध स्थरातील मान्यवर व नागरिकांची भेटी घेतल्या आहेत. या वेळी नगरसेवक सिद्धार्थ शिरोळे,सुनील पांडे, भा ज प हडपसर मतदार संघ उपाध्यक्ष संकेत झेंडे, सरचिटणीस अमित गायकवाड आदी उपस्थित होते.