पुणे-लीला पूनावाला फाउंडेशन (एलपीएफ) ने 300 पेक्षा जास्त शालेय मुलींना यावर्षी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली आहे. अश्या प्रकारे शिष्यवृत्ती देणारे हा ८वा शालेय शिष्यवृत्ती समारोह एमएफएच हॉल, कमिन्स, बलवाड़ी मध्ये आयोजित केला गेला होता.
शिष्यवृत्ती मध्ये स्कूल बैग, सायकल, शूज आणि पुस्तके देखील दिली जातात, कार्यक्रमाच्या वेळी पालकांशी देखील सवांद साधला गेला. या शिष्यवृत्तीचा अवधि १० वर्षापर्यंत आहे ज्यात ७वी ते पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणासाठी मुलींना मोफत शिष्यवृत्ती दिली जाते.
यावेळी सकाळच्या सत्रासाठी मुख्य अतिथी म्हणून लीला फेलो डॉ. सारिका देओरे (२००१ आणि २००९ मधली एलपीएफ पीजी शिष्यवृत्ती प्राप्तकर्ता) आणि सन्माननीय अतिथीच्या रुपात मिसेस शिवानी नायक शाह (मिसेस इंडिया क्वीन ऑफ़ सबस्टेंस २०१८) उपस्थीत होत्या.
दुपारच्या सत्रामध्ये अणखी एक लीला फेलो डॉ. रुता लिमये (१९९९ च्या एलपीएफ पीजी शिष्यवृत्ती प्राप्तकर्ता) यांना सन्मानित केले गेले. या वेळी ह्या तिघींनी ही उपस्थीत असलेल्या सर्व पालकांना मुलींच्या शिक्षणावर जोर देण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमामध्ये पद्मश्री लीला पूनावाला यांनी आपल्या स्वागत भाषणात आपले विचार व्यक्त करताना सांगीतले की, पालकांनी मुलींच्या लग्नासाठी हूंडा देण्याएेवजी ते पैसे त्यांच्या शिक्षणावर करावे. जेणेकरुन त्या आपल्या जीवनात अधिक सक्षम बनतील.