Home Blog Page 3119

लालफितेशाहीत अडकले विद्युतदाहिन्यांच्या देखभालीसाठीचे कंत्राट….

0

पुणे- लालफितेशाहीत अडकले विद्युतदाहिन्यांच्या देखभालीसाठीचे कंत्राट….आणि प्रशासकीय अनास्थेने वैकुंठातील गॅस दाहिनी तीन दिवसापासून बंद….अवस्थेत आहे अशी तक्रार भाजपचे  सिनिअर आणि अनुभवी कार्यकर्ते क्रिएटिव्ह फौंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या कडे केली आहे .

या संदर्भात त्यांनी आयुक्तांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे कि ,पुणे शहरातील विद्युतदाहिन्या व गॅस दाहिन्यांच्या देखभालीसाठी गेले दोन वर्ष अंदाजपत्रकात तरतूद करण्यात आली नव्हती.याबाबतीत क्रिएटिव्ह फौंडेशन ने मागणी केली व पाठपुरावा केला असता यावर्षी च्या अंदाजपत्रकात पन्नास लाख रुपयांची तरतूद करण्यात आली व सुमारे तीन महिन्यापूर्वी त्याची निविदा मंजूर झाली.गत दीड वर्षे याची देखभाल विनामोबदला सामाजिक बांधीलकीच्या जाणीवेतून करणारे कल्याणी एंटरप्राइझला निविदा मंजुर झाली तरी अद्याप वर्क ऑर्डर देण्यात आलेली नाही.देखभाली अभावी अनेक विद्युतदाहिन्यांची दुरावस्था तर आहेच पण त्याच बरोबर गेले तीन दिवस वैकुंठातील गॅस दाहिनी बंद आहे.अश्या परिस्थितीत किमान अश्या महत्त्वाच्या ठिकाणी तरी त्वरेने प्रशासकीय कार्यवाही होणे गरजेचे आहे मात्र येथे ही लालफितेशाही व अनास्थेचाच अनुभव येतो.तरी त्वरित देखभालीच्या मंजूर निविदेच्या वर्क ऑर्डर देण्यात याव्यात व वैकुंठातील गॅसदाहिनीची युद्धपातळीवर दुरुस्ती करावी अशी आग्रही मागणी करत आहे.असे खर्डेकर यांनी म्हटले आहे .

दिंडी सोहळा बहुआयामी तासिकेचे उद्घाटन

0

पुणे-वैष्णवजनांचा मेळा संत ज्ञानदेव व संत तुकाराम यांच्या पाल‘या पून्यनगरीत दाखल झाल्या व या भक्तीमय लहरींनी न्यू इंग्लिश स्कूल प्रशाला ही भारून गेली.


दिंडी सोहळ्याच्या नाट्यविष्कारातून संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर, जगद्गुरु तुकाराम महाराज, निवृत्तनाथ, सोपानदेव, मुक्ताई हे संतजन टाळ, मृदुंग, विणा, चिपळी यांच्या नादमाधुर्यात व ‘जय जय रामकृष्ण हरी’ या नाम गजरात रंगलेले वारकरी व वारीत सहभागी झालेले कडकलक्ष्मी, वासुदेव, तुळसीवृंदावन स्त्रीया व त्यांच्या असिम भक्तीने प्रसन्न होऊन साक्षात अवतरलेले भगवंत वैष्णवांचा मेळा देही याची डोळा आजी अनुभवासी आला. रमणबागेतील नाट्यविभागाच्या विद्यार्थ्यांनी कलादिग्दर्शक श्री. सातपुते सरांनी केलेल्या मार्गदर्शनातून साक्षात प्रत्यक्ष वारी चा प्रसंग चितारला. या कार्यक‘मास प्रमुख अतिथी म्हणून फर्जद या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन कथेवरील आधारीत चित्रपटाचे सुप्रसिध्द दिग्दर्शन लेखक तसेच तु माझा सांगाती या दूरदर्शन मालिकेचे लेखक श्री. दिग्पाल लांजेकर उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेल्या प्रभारी मुख्याध्यापिका सौ. कोलते यांनी केले. तर प्रमुख अतिथींचा परिचय प्रशालेतील शिक्षिका सौ. डोळे यांनी करुन दिला. आभार प्रदर्शन सौ. खरात यांनी केले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. देशपांडे सुहास यांनी केले.
या कार्यक्रमास मा. उपप्रमुख सौ. जयश्री रणखांबे सर्व शिक्षक-शिक्षकेतर व विद्यार्थी उपस्थित होते.

राजपत्रित अधिकारी महिलांची १३ जुलैला पुण्यात राज्यस्तरीय बैठक

0

पुणे९: राजपत्रित अधिकारी महासंघ अंतर्गत दुर्गा महिला मंच च्या वतीने महिला अधिकाऱ्यांसाठी दि.13 जुलै 2018 रोजी दुपारी 2.30 वाजता एस.सी.ई.आर.टी., पुणे येथे राज्यस्तरीय बैठकीचे आयोजन  करण्यात आले आहे.

राज्यातील सर्व महिला अधिकाऱ्यांनी अधिकाधिक संख्येने या बैठकीस उपस्थित राहावे,असे आवाहन महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे संस्थापक व मुख्य सल्लागार ग.दि. कुलथे, राज्य उपाध्यक्ष तथा संघाचे जिल्हा अध्यक्ष विनायक लहाडे, दुर्गा महिला मंचच्या राज्य अध्यक्ष डॉ. सोनाली कदम, उपाध्यक्ष सितल सेवतकर, राज्य सह सचिव सविता नलावडे, समीक्षा चंद्राकार, राज्य संघटक तथा दुर्गा मंच, पुणेच्या सुवर्णा पवार, मोनिका सिंग, सचिव वृषाली पाटील यांनी केले आहे.

ज्या जिल्ह्यात दुर्गामंच स्थापन झाला नाही त्या जिल्ह्यातील जिल्हा समन्वय समितीच्या महिला सदस्यांनी बैठकीस उपस्थित राहणे आवश्यक आहे. दुर्गामंच सदस्य, तसेच समन्वय सदस्यांशिवाय इतर इच्छुक महिला अधिकारीही बैठकीस उपस्थित राहू शकतात. या बैठकीत महिला अधिकारी यांना शासकीय नोकरी करताना येणाऱ्या विविध अडचणींवर चर्चा होणार असून त्या सोडवण्यासाठीच्या निश्चित धोरणाबाबत शासनाला सादर करावयाचे निवेदन तयार करण्यात येईल. बैठकीत महिलांच्या सेवेसंबंधीच्या समस्या व त्यावरील उपायांबाबत धोरण आखण्याबरोबरच दुर्गा महिला मंच  चे उद्दीष्ट ठरवण्यात येईल. सर्व कार्यालयात महिलांसाठी स्वच्छ  स्वच्छता गृहाची स्थापना, कामाच्या ठिकाणी महिलांच्या होणाऱ्या लैंगिक छळाबाबत कडक कार्यवाही, शासकीय कार्यालय परिसरात पाळणाघरांची स्थापना आदी बाबींवर बैठकीत चर्चा होईल.. यासाठी जास्तीत जास्त महिला अधिकारी उपस्थित रहावे. महिला अधिकाऱ्यांच्या समस्या व त्यावरील उपाययोजनांबाबतच्या टिपणीसह उपस्थित रहावे,असे आवाहन दुर्गा मंचच्या वतीने करण्यात आले आहे..

विज्ञान आणि तंत्रज्ञानासमवेत आर्किटेक्चरच्या “नदुल” या नव्या होलिस्टिक – एनर्जेटिक अभ्यासक्रमाला सुरुवात

0

पद्मभूषण डॉ. विजय भाटकर आणि प्रीट्झकर पुरस्कार प्राप्तकर्ते बी. व्ही. जोशी यांची उपस्थिती

 पुणे- विज्ञान, तंत्रज्ञान आणि आर्किटेक्चरच्या विलीनीकरणाचा ऐतिहासिक कार्यक्रम हायत पुणे येथे पार पडला. इंडिया इंटरनॅशनल मल्टीव्हर्सिटी आणि ईंडी ग्रीन ट्रस्ट यांच्यामध्ये ह्यावेळी विलीनीकरण झाले. इंडिया इंटरनॅशनल मल्टीव्हर्सिटीच्या सीइओ नचिकेता भाटकर आणि ईंडी ग्रीन ट्रस्टचे चेअरमन मयांक बडजात्या यांच्यामध्ये हा करार करण्यात आला. प्रीट्झकर पुरस्कार प्राप्तकर्ते बी. व्ही. जोशी, पद्मभूषण डॉ. विजय भाटकर, नचिकेता भाटकर, मयांक बडजात्या, प्रीती भंडारी, गिरीश दोशी, अमोल पुरंदरे आणि सुनेत्रा ह्या समारंभाला उपस्थिती होते.

ईंडी ग्रीन ट्रस्ट ही शैक्षणिक आणि संशोधन स्वयंसेवी संस्था गेल्या 5 वर्षापासून पारंपारिक भारतीय आर्किटेक्चरच्या क्षेत्रात कार्यरत आहे. मयांक बडजात्या आणि प्रीती भंडारी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय पारंपरिक आर्किटेक्चरच्या हरवलेल्या विषयांवर मुले आणि आर्किटेक्ट्ससह समाजातील सर्व भागांमध्ये सगळ्यांकरिता कार्यशाळा आणि प्रशिक्षण ‘प्रिथ्वी’ आणि ‘हँन्डस फुल ऑफ अर्थ’ यांच्या मदतीने ईंडी ग्रीन ट्रस्ट आयोजित करते.

कार्यक्रमात बोलताना बी. व्ही. दोशी म्हणाले हे विलीनीकरण अत्यंत महत्वाचे आणि आव्हानात्मक असून भाटकर आणि टीमने हे सत्यात घडवून आणल्याने मी अत्यंत आनंदी आहे. विद्यार्थ्यांनी अनेक उत्तम आर्किटेक्चरच्या अनुभवांचा आणि प्रोजेक्ट्सचा अभ्यास करायला हवा असेही ते म्हणाले.

प्रीथ्वी आणि मयांकच्या संशोधनावर आधारित नवे टेक्निकल लर्निंग मोड्यूल ऑनलाईन आणि कँम्पसमध्ये तयार करायला आम्हाला आवडेल अशी इच्छाडॉ. विजय भाटकर यांनी ह्यावेळी बोलून दाखविली. नदुल हे नक्कीच विद्यार्थ्यांना महत्वपूर्ण ठरेल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.

लीला पूनावाला फाउंडेशन द्वारा ३०० मुलींना शिष्यवृत्ती

0

पुणे-लीला पूनावाला फाउंडेशन (एलपीएफ) ने 300 पेक्षा जास्त शालेय मुलींना यावर्षी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली आहे. अश्या प्रकारे शिष्यवृत्ती देणारे हा ८वा शालेय शिष्यवृत्ती समारोह एमएफएच हॉल, कमिन्स, बलवाड़ी मध्ये आयोजित केला गेला होता. आपल्या मुलांच्या उज्वल भविष्यासाठी, त्यांच्या शिक्षणासाठी एलपीएफकडून मिळालेल्या ह्या मदतीमुळे सगळ्याच माता-पित्यांच्या चेहर्यावर हस्य उमलले होते.

शिष्यवृत्ती मध्ये स्कूल बैग, सायकल, शूज आणि पुस्तके देखील दिली जातात, कार्यक्रमाच्या वेळी पालकांशी देखील सवांद साधला गेला. या शिष्यवृत्तीचा अवधि १० वर्षापर्यंत आहे ज्यात ७वी ते पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणासाठी मुलींना मोफत शिष्यवृत्ती दिली जाते.

यावेळी सकाळच्या सत्रासाठी मुख्य अतिथी म्हणून लीला फेलो डॉ. सारिका देओरे (२००१ आणि २००९ मधली एलपीएफ पीजी शिष्यवृत्ती प्राप्तकर्ता) आणि सन्माननीय अतिथीच्या रुपात मिसेस शिवानी नायक शाह (मिसेस इंडिया क्वीन ऑफ़ सबस्टेंस २०१८) उपस्थीत होत्या.दुपारच्या सत्रामध्ये अणखी एक लीला फेलो डॉ. रुता लिमये (१९९९ च्या एलपीएफ पीजी शिष्यवृत्ती प्राप्तकर्ता) यांना सन्मानित केले गेले. या वेळी ह्या तिघींनी ही उपस्थीत असलेल्या सर्व पालकांना मुलींच्या शिक्षणावर जोर देण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमामध्ये पद्मश्री लीला पूनावाला यांनी आपल्या स्वागत भाषणात आपले विचार व्यक्त करताना सांगीतले की, पालकांनी मुलींच्या लग्नासाठी हूंडा देण्याएेवजी ते पैसे त्यांच्या शिक्षणावर करावे. जेणेकरुन त्या आपल्या जीवनात अधिक सक्षम बनतील.

बीव्हीजी इंडिया पीएमडीटीए ज्युनियर टेनिस लीग स्पर्धेत बीआयपीएल रायजिंग ईगल्स, टीईसीपीएसएल स्पीडिंग चिताज संघांची विजयी सलामी

0

पुणे,- पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांच्या तर्फे आयोजित बीव्हीजी इंडिया पीएमडीटीए ज्युनियर टेनिस लीग स्पर्धेत साखळी फेरीत बीआयपीएल रायजिंग ईगल्स व टीईसीपीएसएल स्पीडिंग चिताज या संघांनी अनुक्रमे  पीईएसबी रोअरींग लायन्स व  मिलेनियम एकेटीए ग्रोवलिंग टायगर्स  या संघांचा पराभव करून विजयी सलामी दिली. 

पीवायसी हिंदू जिमखाना येथील टेनिस कोर्टवर सुरु असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत  बीआयपीएल रायजिंग ईगल्स संघाने पीईएसबी रोअरींग लायन्स संघाचा 40-38असा संघर्षपूर्ण पराभव करून शानदार सुरुवात केली. विजयी संघाकडून वैष्णवी शिंदे,  अभय नागराजन,  अर्णव पापरकर, रिया वाशिमकर,  दक्ष अगरवाल यांनी अफलातून कामगिरी केली.

दुसऱ्या सामन्यात देवांशी प्रभुदेसाई,  अर्चित धूत,  आकांक्षा अग्निहोत्री,  आशी छाजेड,  अनमोल नागपुरे,  यशराज दळवी यांच्या विजयी कामगिरीच्या जोरावर टीईसीपीएसएल स्पीडिंग चिताज संघाने मिलेनियम एकेटीए ग्रोवलिंग टायगर्सचा 43-36असा पराभव करून आगेकूच केली.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी: 

बीआयपीएल रायजिंग ईगल्स वि.वि.पीईएसबी रोअरींग लायन्स 40-38(एकेरी: 10वर्षाखालील मुली: वैष्णवी शिंदे वि.वि.आस्मि आडकर 4-2; 10वर्षाखालील मुले: अभय नागराजन वि.वि.अमन शहा 4-1; 12वर्षाखालील मुली: अलिना शेख पराभूत वि.आस्मि आडकर 1-6; 12वर्षाखालील मुले: अर्णव पापरकर वि.वि.आदित्य भटेवर 6-1; 14वर्षाखालील मुली: रिया वाशिमकर वि.वि.सिया देशमुख 6-1;14 वर्षाखालील मुले: दक्ष अगरवाल वि.वि.जैष्णव शिंदे 6-3; 16वर्षाखालील मुली: मोहिनी घुले पराभूत वि.आर्या पाटील 3-6; 16वर्षाखालील मुले: परितोष पवार पराभूत वि.अथर्व आमरुळे 4-6; मिश्र दुहेरी: आदित्य राय / गौतमी खैरे पराभूत वि.अननमय उपाध्याय / सोनल पाटील 2-6; मिश्र दुहेरी: ओम काकड / मोहिनी घुले पराभूत वि.अथर्व आमरुळे 4-6);

टीईसीपीएसएल स्पीडिंग चिताज वि.वि.मिलेनियम एकेटीए ग्रोवलिंग टायगर्स 43-36(एकेरी: 10वर्षाखालील मुली: देवांशी प्रभुदेसाई वि.वि.मृणाल शेळके  4-0;  10वर्षाखालील मुले: अर्चित धूत वि.वि.दक्ष पाटील 4-0; 12वर्षाखालील मुली: आकांक्षा अग्निहोत्री वि.वि.जुई काळे  6-3;  12वर्षाखालील मुले: आरुष मिश्रा पराभूत वि. नील जोगळेकर 1-6;  14वर्षाखालील मुली: आशी छाजेड वि.वि.एंजल भाटिया  6-0; 14 वर्षाखालील मुले: अनमोल नागपुरे वि.वि.क्रिस नासा 6-5(4); 16वर्षाखालील मुली: वैष्णवी आडकर पराभूत वि.रिया भोसले 2-6; 16वर्षाखालील मुले: यशराज दळवी वि.वि.सिद्धार्थ मराठे 6-4; मिश्र दुहेरी: श्रावणी खवळे/पार्थ देवरुखकर पराभूत वि.ख़ुशी शर्मा/अर्जुन कीर्तने (3)5-6; मिश्र दुहेरी: स्नेहा रानडे/प्रसाद इंगळे पराभूत वि.रिया भोसले/रोहन फुले 3-6).

प्रति फुले वाड्यात अविनाश आंबेडकर यांचे जयंती निमित्ताने वह्या व खाऊ वाटप

0
पुणे:- सांस्कृतिक चळवळीतील कलावंत कालकथित. अविनाश आंबडेकर यांचे जयंती निमित्ताने कुमार आहेर यांचे प्रति महात्मा फुले वाडा ,मांगडेवाडी येथे  85 मुलं, मुलींना वह्या व खाऊ वाटप करण्यात आला .
यावेळी डॉ.प्रतिभा काळे ,डॉ.विजया आंबेडकर सिने दिगदर्शक आनंद सरवदे,राष्ट्रिय ओबीसी महासंघाचे सरचिटणीस रघुनाथ ढोक, कुमार आहेर,नवदाम्पत्य पियुशा आणि मैत्रय आंबेडकर उपस्थित होते.
यावेळी मुलांना मार्गदर्शन करताना ढोक म्हणाले की मुलांनो जिद्दीने अभ्यास करा,यश अपोआप मिळेल.मोठे होऊन नावलौकिक होईल असे कार्य करा तर डॉ विजया आंबेडकर यांनी अभ्यासा बरोबर  सांस्कृतिक आवड निर्माण करा असा मौलिक सल्ला दिला.यावेळी प्रति महात्मा फुले वाड्यात ज्या ज्या कलावंतांनी फुले शाहू आंबडेकर यांचे विचार समाजासमोर मांडून मोठे काम केले त्यांचे कार्याची माहिती फोटो सह लावणार असल्याचे कुमार आहेर यांनी माहिती दिली. आज कालकथित.अविनाश आंबेडकर यांचे कार्याची माहिती देऊन फोटो लावला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आनंद सरवदे व आभार प्रदर्शन पियुशा आंबेडकर यांनी मानले.

गरीब पुणेकरांना करमाफी देण्याऐवजी अंबानींना १८ कोटी ची माफी देण्याचा अमित शहांचा डाव- अरविंद शिंदे (व्हिडीओ)

पुणे-  ६०० चौरस फुटाच्या घरात राहणाऱ्या गरीब पुणेकरांना करमाफी देण्याऐवजी अंबानींच्या रिलायन्स जिओ ला १८ कोटी रुपयांची करमाफी देण्यासाठी स्थायी समिती मार्फत थेट अमित शहांनी प्रयत्न चालविल्याचा संशय व्यक्त करत कॉंग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी आज महापालिकेत स्थायी समिती सभागृहाबाहेर राष्ट्रवादी कॉंग्रेसला बरोबर घेवून जोरदार आंदोलन केले , अविनाश बागवे, रफिक शेख, अजित दरेकर आदी कॉंग्रेसचे नगरसेवक आणि नगरसेविका यावेळी आंदोलनात सहभागी झाले होते , यावेळी पहा आणि ऐका..त्यांच्याच शब्दात नेमके अरविंद शिंदे काय म्हणाले …

पुणेकरांचे १८ कोटी रिलायन्सला देण्याचा अमित शहांचा डाव – चेतन तुपे पाटलांचा आरोप (व्हिडीओ)

पुणे- रिलायन्स जिओ च्या पुण्यातील टाॅवर्सचा घोटाळा करून पुणेकरांचे १८ कोटी रुपये पळविण्याचा डाव स्थायी समितीच्या मार्फत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष दबाव आणून यशस्वी करू पाहत असल्याचा संशय महापालिकेतील विपक्ष नेते चेतन तुपे पाटील यांनी आज व्यक्त केला या प्रकरणी आज त्यांनी कॉंग्रेसला बरोबर घेवून महापालिकेतील स्थायी समिती सभागृहाबाहेर जोरदार आंदोलन केले आणि घोषणाबाजी केली . या आंदोलनात त्यांच्या समवेत राष्ट्रवादी कॉंग्रेस चे सुभाष जगताप, बाबुराव चांदेरे, दिलीप बराटे, अश्विनी कदम, रत्नप्रभा जगताप आदी नगरसेवक ,नगरसेविका सहभागी झाल्या होत्या . या वेळी बोलताना पहा आणि ऐका त्यांच्याच शब्दात ते काय म्हणाले …

नागरिकांनी एकत्र येउन राज्य शासनाचे १३ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट साध्य करावे -नगरसेविका मंजुश्री खर्डेकर.

पुणे-आपला प्रभाग १३ हा हरित प्रभाग म्हणून ओळखला जावा यासाठी प्रभागात जेथे जेथे मोकळी जागा आहे तेथे तेथे वृक्षारोपण करु आणि नागरिकांच्या सहकार्याने त्याची निगा ही राखू असे नगरसेविका मंजुश्री खर्डेकर म्हणाल्या.महाराष्ट्र शासनाने राज्यात १३ कोटी वृक्षलागवडीचा महत्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेतला आहे,त्यास अनुसरून पुणे शहरासाठी ६० हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आलेले असुन त्यातील मोठा वाटा प्रभाग १३ चा असावा यासाठी ३१ जुलै पर्यंत जास्तीत जास्त वृक्ष लागवड करुयात असे ही त्या म्हणाल्या.
आज प्रभागातील स्वप्नशिल्प सोसायटी तसेच रघुकुल सोसायटी येथे झालेल्या वृक्षारोपण कार्यक्रमाच्या निमित्ताने त्या बोलत होत्या.यावेळी स्वप्नशिल्प सोसायटी येथील विवेक विप्रदास,माधुरीताई सप्रे,सुभाष झनपुरे,दिलीप देशपांडे,प्रशांत भोलागीर,सुधीर वैद्य,अजय माळवदे,अनघा देशपांडे,सौ विभाताई पडळकर,श्री हलकरे,श्री पंडित,श्री चौधरी इ उपस्थित होते.तर रघुकुल सोसायटी येथे सौ सुजाता नाडकर्णी,मोहनराव अळवणी,सौ मंजिरी बाब्रस,गुरुनाथ नाडकर्णी,सौ अंजली सोमण,श्री फडके,श्री अरगडे इ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.नागरिकांनी अत्यंत उत्साही वातावरणात वृक्षारोपण केले व ह्या झाडांची निगा राखण्याचा संकल्प ही केला.यावेळी स्थानिक वृक्ष लागवड करण्यात आली,यात प्रामूख्याने बेल, पिंपळ, वड ,फणस इ वृक्ष लावण्यात आले.
सर्व सोसायटीच्या तसेच बंगल्यांच्या आवारात व रस्त्यावरील मोकळया जागांवर वृक्षारोपण करण्यात येइल असे ही सौ मंजुश्री खर्डेकर यांनी सांगितले.

क्रेडाई महाराष्ट्रच्या वार्षिक परिषदेचे नाशिक येथे आयोजन

पुणे :-  क्रेडाई महाराष्ट्राकडून येत्या १३ आणि १४ जुलैला नाशिक येथील महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेसला दोन दिवसीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘महारेरा’ अध्यक्ष गौतम चटर्जी यांच्या हस्ते या परिषदेचे उद्घाटन होणार आहे. ही सहावी वार्षिक परिषद आहे.या परिषदेत महाराष्ट्र राज्यातील ५१ शहरातून १००० हून अधिक बांधकाम व्यावसायिक उपस्थित असणार आहेत.

ही नोंदणी क्रेडाई तर्फे होणार असून हा क्रेडाईच्या इतिहासातील उच्चांक ठरणार आहे असा विश्वास  क्रेडाई महाराष्ट्रचे अध्यक्ष शांतीलाल कटारिया यांनी व्यक्त केला.

 

या परिषदेला वकील, वास्तुविशारद, कायदे सल्लागार,बँकर्स, अभियंते देखील उपस्थित राहू शकतील.  ही परिषद सशुल्क असून सर्वांसाठी खुली असणार आहे.

क्रेडाई नैशनलचे चेअरमन गीतांबर आनंद, प्रेसिडेंट (इलेक्ट) सतीश मगर,  अध्यक्ष जक्षय शहा,  उपाध्यक्ष  बोमन इराणी,  माजी चेअरमन इरफान रझाक, जमाबंदी आयुक्त व संचालक भूमी अभिलेख एस.चोकलिंगम यावेळी उपस्थित असणार आहेत.

महारेरा नंतरच्या १ वर्षाच्या कालावधीत बांधकाम व्यावसायिकांवर झालेला सकारात्मक बदल/परिणाम यावर गौतम चटर्जी व सतीश मगर मार्गदर्शन करणार आहेत.

गीतांबर आनंद, इरफान रझाक हे ‘रियल इस्टेट ब्रँडिंग’ या विषयावर बोलणार आहेत.  भूमी अभिलेखचे संचालक एस.चोकलिंगम हे जमिनीचे मालकी हक्क यामध्ये सरकार काय पाऊले उचलत आहे याबद्दल माहिती देणार आहेत.

पुण्याच्या जस्मिन जाधवला म्यान्मारमध्ये झालेल्या सौंदर्य स्पर्धेत ‘मिसेस क्वीन ऑफ द वर्ल्ड इंटरनॅशनल २०१८’ बहुमानाचा मुकूट

पुण्याच्या सौ. जस्मिन जाधव हिने म्यान्मारमध्ये नुकत्याच (२९ जून २०१८) झालेल्या सौंदर्य स्पर्धेत मिसेस क्वीन ऑफ द वर्ल्ड इंटरनॅशनल २०१८ बहुमान जिंकून इतिहास घडवला आहे. वयोगट २३ ते ३५ दरम्यानच्या महिलांच्या स्टँडर्ड कॅटॅगरीतून विजेतेपदाचा मुकूट पटकावत जस्मिनने भारताची मान जागतिक व्यासपीठावर अभिमानाने उंचावली आहे.

सौ. जस्मिन जाधव (वय ३१) ही गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये पुण्यात झालेल्या मिसेस महाराष्ट्र सौंदर्य स्पर्धेत उपविजेती ठरली होती. तेव्हापासून जागतिक सौंदर्य सम्राज्ञीपदाच्या मुकूटापर्यंतचा तिचा प्रवास अगदी अल्पकाळात आणि वेगाने पार पडला आहे. जस्मिनच्या मार्गदर्शक अंजना मस्कारेन्हस यांनी ही जागतिक सौंदर्य स्पर्धा होण्यापूर्वी केवळ दोन आठवडे आधी तिला स्पर्धेत भाग घेण्याविषयी सुचवले आणि त्यातून जस्मिनला प्रेरणा मिळाली.

खरं सांगायचं तर माझ्याकडे पासपोर्टही तयार नव्हता. तरीही मी गेल्या १९ जूनला पारपत्र कार्यालयात गेले आणि मला दोन दिवसांत पासपोर्ट मिळाला. त्यानंतर मी व्हिसासाठी अर्ज केला. तोही दोन दिवसांत मिळाला आणि २३ जूनला मी म्यान्मारला रवानाही झाले. मी जिंकण्याचा अथवा हरण्याचा विचारही केला नव्हता. या स्पर्धेत आपल्यातील गुणांचा १०० टक्के आविष्कार घडवायचा आणि एक समृद्ध अनुभव घेऊन परत यायचे, इतकेच मी ठरवले होते. तो आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टीकोन घेऊनच मी स्पर्धेत उतरले, अशी हर्षभरित प्रतिक्रिया जस्मिनने व्यक्त केली.

जागतिक सौंदर्य स्पर्धेत जस्मिनला विविध फेऱ्यांमधून पुढे जावे लागले. त्यातील बंद दारामागील मुलाखत ही फेरी विशेष लक्षात राहणारी होती. यामध्ये सात परीक्षकांनी तिच्यावर विविध प्रश्नांची फैर झाडली. ही फेरी अवघड होती, कारण त्यामागील उद्देश जस्मिनची केवळ बुद्धिमत्ता तपासण्याचा नसून तिची समयसूचकता व दडपणाला बळी न पडण्याची मानसिक ताकद जोखण्याचा होता. या फेरीतूनच जस्मिनच्या विजयाला खऱ्या अर्थाने सुरवात झाली.

अंतिम फेरीत जस्मिनला विचारण्यात आले, की तिची मुले नैराश्यग्रस्त झाली तर ती काय करेल? यावर जस्मिनने शांतपणे सकारात्मक उत्तर दिले, की पालक या नात्याने ती मुलांवर ओढवलेल्या संकटप्रसंगात त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील आणि त्यातून बाहेर पडण्यासाठीच्या लढ्यात सकारात्मक बनवण्यास मदत करेल. या उत्तराने परीक्षकांचे मन जिंकले आणि जस्मिनला जागतिक सम्राज्ञीपदाचा प्रतिष्ठेचा मुकूट सन्मानपूर्वक बहाल करण्यात आला.

जस्मिन ही पेशाने इंटेरियर डिझायनर आहे. ती व्हिविड इंटेरियर्स या फर्ममध्ये भागीदार आहे. जस्मिनच्या मते तुम्ही एखादी गोष्ट साध्य करण्याचा दृढ निश्चय केलात, की कुठलेही आव्हान तुम्हाला रोखू शकत नाही. निश्का व नीरजा या जुळ्या मुलींना जन्म दिल्यानंतर जस्मिनचे वजन इतके वाढले होते, की तिने स्वतःला तंदुरुस्त आणि सुडौल बनवण्याचा निश्चय केला. काटेकोर मेहनत करुन मी माझे वजन १०० किलोंवरुन ५३ किलोंवर आणले. सौंदर्य स्पर्धेसाठी मी दिवा पेजियंट स्टुडिओमध्ये मार्गदर्शन घेतले आणि त्यातून मला मिसेस महाराष्ट्र सौंदर्य स्पर्धेत भाग घेण्याची प्रेरणा मिळाली, असे जस्मिनने नमूद केले. आज जस्मिन एबीएस जिमचा चेहरा म्हणूनही ओळखली जाते.

आंतरराष्ट्रीय कामगिरीसंदर्भात जस्मिन आपल्या यशाचे श्रेय पेशाने थ्रीडी व्हिज्युअलायझर असलेले पती भूपेंद्र जाधव, सहा वर्षांच्या जुळ्या मुली, सासरचे लोक आणि मार्गदर्शक अंजना मस्कारेन्हास यांना देते. या सर्वांच्या सहभागाशिवाय हा प्रवास शक्यच झाला नसता. मी सौंदर्य स्पर्धेचे राष्ट्रीय संचालक अमर शामू सोनवणे व जीत दास यांचीही ऋणी आहे. उल्लेखनीय म्हणजे मिसेस क्वीन ऑफ द वर्ल्ड पेजियंट स्पर्धेची पुढची आवृत्ती आपल्या पुण्यात आयोजित करण्याची संधी या दोघा संचालकांनी प्रयत्नपूर्वक खेचून आणली आहे, असेही जस्मिनने आवर्जून नमूद केले.

जस्मिन ही मिसेस क्वीन ऑफ द वर्ल्ड सौंदर्य स्पर्धेची ब्रँड म्बॅसेडर बनली असून निरनिराळ्या देशांना भेटी देत आहे. या दौऱ्यातून ती महिला व मातांच्या सक्षमीकरणाचा ताकदवान संदेश प्रसृत करणार आहे.

एफसी पुणे सिटी संघात गब्रीएल व शंकर यांचा समावेश

पुणे- राजेश वाधवान समूह आणि बॉलिवूड स्टार अर्जुन कपूर यांच्या सहमालकीच्या इंडियन सुपर लीग टीम असलेल्या एफसी पुणे सिटी संघाने  विंगर गब्रीएल फर्नांडीस आणि बचावात्मक मध्यरक्षक शंकर संपिंगीराज यांची 2018-19 या मौसमासाठी संघात समावेश केला आहे.

एफसी पुणे सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव मोडवेल म्हणाले कि, गब्रीएल आय लीग मध्ये इस्ट बंगाल संघाचे प्रतिनिधित्व केले होते. दोन वर्षांच्या प्रतिक्षेनंतर त्याने एफसी पुणे सिटी संघाकडून इंडियन सुपर लीग मध्ये प्रवेश केला आहे. गब्रीएल हा त्याच्या वेग आणि चपळाईमुळे संघाला एक चांगला पर्याय मिळाला आहे. त्यांचा सरळ खेळ व तिक्ष्णता उत्तम आहे. त्याच्याकडे क्षमता आहे की तो संघासाठी उत्कृष्ट खेळाडू ठरेल.

गब्रीएलने आपल्या कारकिर्दिची सुरूवात डेंपो व आणि स्पोर्टींग गोवा या संघांकडून केली. 2012 मध्ये मुंबई एफसी संघात त्याने प्रवेश घेतला. वयाच्या 30व्या वर्षी 2014 साली एफसी गोवा संघाकडून आयएसएल मध्ये त्यांने प्रवेश केला आणि त्यानंतर मुंबई सिटी एफसी संघाकडून तो खेळला. गब्रीएलने आय लीग स्पर्धेमध्ये सालगावकर, चर्चिल ब्रोज् आणि इस्ट बंगाल संघाचे प्रतिनिधित्व केले आहे.

23 वर्षाखालील राष्ट्रीय संघासाठी बेंगळुरू एफसी संघाकडून प्रभावी कामगिरी केल्यानंतर शंकरने एफसी पुणे सिटी संघामध्ये प्रवेश केला. कर्नाटक येथे जन्मलेल्या शंकरने आपल्या कारर्किदीची सुरूवात एचएएल मधुन केली आणि डीएसके शिवाजीयन्स् संघात लोन वर खेळला. गौरव मोडवेल म्हणाले कि, शंकर हा कष्टाळू खेळाडू आहे. बॉल बरोबर तो अत्यांत तांत्रीकदृष्ट्या खेळ करतो. त्यांच्यामध्ये फुटबॉल खेळातील अनेक गुण आहेत. याचबरोबर तो एक अनुभवी खेळाडूही आहे. मला विश्वास आहे संघाबरोबरचा त्याचा आनुभव उत्तम असेल.

2016 साली बांगलादेश येथे झालेल्या  एएफसी 23 वर्षाखालील स्पर्धेत शंकरने उझबेकीस्तान संघा विरोधात भारतीय राष्ट्रीय संघाचे पात्रता फेरीत प्रतिनिधित्व केले होते. शंकर 2015च्या आयएसएल मौसमात केरळा ब्लास्टर्स संघाकडून खेळला होता.

यावेळी गब्रीएल म्हणाला आयएसएल मध्ये एफसी पुणे सिटी संघाकडून खेळण्यास मी उत्सुक आहे. गेल्या मौसमातील संघाची कामगिरी प्रभावी होती. माझ्या संघातील समावेशाचा संघाची कामगिरी अधिक उत्तम करण्यासाठी फायदा होईल यासाठी मी प्रयत्न करेल.

शंकर म्हणाला, एफसी पुणे सिटी संघासोबत हे नविन आव्हान पेलण्यासाठी मी तयार आहे. संघाने गेल्या मौसमात एतिहासीक कामगिरी केली आहे. संघातील समावेशामुळे मी आनंदीत आहे. यामुळे माझ्यासारख्या युवा खेळाडूंना एक चांगले व्यासपीठ मिळाले आहे. संघातील इतर खेळाडूंना भेटण्यासाठी मी उत्सुक आहे. संघाबरोबर ही माझ्या कारकिर्दीची नविन सुरूवात आहे.

भिडे गुरुजीच्या विरोधात संभाजी ब्रिगेडचा पोलिसात तक्रार अर्ज

पुणे : ”गावपातळीपासून संघटनात्मक बांधणी करुन हजारो अनुयायांना आपल्या मार्गावर चालायला मनुने शिकवले. हा मनु संत ज्ञानेश्वर महाराज तसेच संत तुकाराम महाराज यांच्यापेक्षा श्रेष्ठ होता”, असे वादग्रस्त वक्तव्य संभाजी भिडे यांनी शनिवारी (7 जुलै) जंगली महाराज मंदिरात अापल्या धारकऱ्यांना संबाेधित करताना केले हाेते. संभाजी भिडेंचे वक्तव्य वादग्रस्त व संविधान विराेधी अाहे. त्यांनी सार्वजनिक ठिकाणी असे वक्तव्य केल्याने अामच्या भावना दुखावल्या असून अामच्या महापुरुषांची बदनामी करण्यात अाली अाहे. असे म्हणत संभाजी ब्रिगेडने भिडेंवर महापुरुषांच्या बदनामी प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचा तक्रार अर्ज संभाजी ब्रिगेडकडने शिवाजीनगर पाेलीस स्टेशनमध्ये दिला अाहे.

संभाजी भिडे यांनी शनिवारी अापल्या धारकऱ्यांना जंगली महाराज मंदिरात संबाेधित केले. त्यावेळी मनु हा संत ज्ञानेश्वर अाणि तुकाराम महाराजांपेक्षा एक पाऊल पुढे हाेता असे वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केले हाेते. त्यावर विविध स्तरातून टीका झाली. मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनात भिडेंचे वक्तव्य तपासून ते संविधान विराेधी असल्यास कारवाई करु असे अाश्वासन दिले. भिडेंच्या याच वक्तव्याच्या विराेधात महापुरुषांच्या बदनामी प्रकरणी गुन्हा दाखल करावा असा तक्रार अर्ज शिवाजीनगर पाेलीस ठाण्यात संभाजी ब्रिगेडकडून देण्यात अाला अाहे. या अर्जात म्हंटले अाहे की, जंगली महाराज मंदिरात शिवप्रतिष्ठान हिंदूस्थानचे संभाजी भिडे यांचे व्याख्यान ठेवण्यात अाले हाेते. या व्याख्यानात भिडे यांनी मनुस्मृतीचे जाहीर समर्थन केले अाहे. हे संविधान विराेधी अाहे. त्यांनी सार्वजनिक ठिकाणी असे अाक्षेपार्ह व संतापजनक वक्तव्य केल्यामुळे अामच्या भावना दुखावल्या असून अामच्या महापुरुषांची बदनामी करण्यात अालेली अाहे.

मनुस्मृतीचे समर्थन करणे व महाराष्ट्राची अस्मिता असणाऱ्या जगतगुरु संत तुकाराम महाराज व संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांना कमी लेखने, त्यांचा अवमान करणे हे वादग्रस्त अाहे. या अागाेदर नाशिक व धुळे येथे मनुस्मृतीचे समर्थन भिडे यांनी केले अाहे. त्यांच्या या वक्तव्यांमुळे समाजात सामाजिक व धार्मिक तेढ निर्माण हाेऊ शकते. त्यामुळे याची गंभीर दखल घेऊन भिडे यांच्यावर महापुरुषांच्या बदनामी प्रकरणी गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात अाली अाहे. संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संताेष शिंदे, शहराध्यक्ष प्रशांत धुमाळ यांनी हा तक्रार अर्ज शिवाजीनगर पाेलीस स्टेशनमध्ये दिला.

खा .सुप्रिया सुळे रमल्या पालखी सोहळ्यात ..

माऊलींचा पालखी सोहळा सासवडनगरीत विसावला : संत तुकाराम महाराजांचा लोणी काळभोरला मुक्काम

पुणे-काल अजित पवारांनी पालख्यांचे दर्शन घेवून आज ते नागपूमध्ये  अधिवेशनात ज्ञानोबा माऊली आणि तुकोबा माऊलींचा अवमान करणाऱ्या संभाजी भिडेचा समाचार घेतला तर दुसरीकडे खासदार सुप्रिया सुळे यांनी पालखीच्या वाटेवर दिवे घाटात वारकऱ्यांसमवेत ज्ञानबा माऊली तुकारामाचा जयघोष केला ,तर कधी होऊन टाळ गजर केला.दरम्यान आज  माऊलींचा पालखीसोहळा सासवडनगरीत विसावला तर संत तुकाराम महाराजांची पालखी  लोणी काळभोरला मुक्कामी पोहोचली

लाडक्या विठूरायाच्या चरणी लीन होण्याकरिता कपाळी केशरी गंध लावून, खांद्यावर भगव्या पताका घेऊन, डोईवर तुळशीवृंदावन घेत मुखाने अखंड ज्ञानोबा-माऊली तुकारामांचा गजर करत संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि संत शिरोमणी जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या आज सकाळी पुण्यातून मार्गस्थ झाल्या आणि दुपारी हडपसरमध्ये दाखल झाल्या. त्यानंतर ज्ञानोबा-माऊलींच्या अखंड नामघोषाने पायात संचारलेल्या बळाच्या जोरावर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याने सोमवारी नागमोडी वळणाचा चार किलोमीटरचा अवघड दिवे घाट लीलया पार केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिवेघाटात वारकऱ्यांच्या मेळ्यात सहभाग घेतला. त्या म्हणाल्या, “विठ्ठलाच्या ओढीने पंढरपूराकडे निघालेल्या वारकऱ्यांच्या मेळ्यात दिवेघाटात मी सहभागी झाले. शतकांपासून वारकरी या मार्गावरुन पंढरीकडे मार्गस्थ होतात.राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणारे वारकरी,टाळ मृदुंगाच्या घोषात विठूरायाच्या नामस्मरणात तल्लीन होतात तेंव्हा अवघा रंग एक झाला हा अनुभव येतो”


चांगल्या पावसाने घाटात रंगलेल्या हिरवाईच्या दर्शनाने जलधारा अंगावर घेताना वारकऱ्यांचा थकवा पळून गेला. पुण्यातील दोन दिवसांच्या मुक्कामानंतर सोमवारी रात्री पालखी सोहळा संत सोपानदेवांच्या सासवडनगरीत दाखल झाला.
पुण्यनगरीत अवघा आनंद’ म्हणत शनिवार आणि रविवारचा दिवस वारकऱ्यांनी विश्रांती घेतली. परंतु, सोमवारी पालखी सोहळ्यातील सर्वात मोठा टप्पा होता. पण सोपानकाकांच्या सासवडनगरीच्या दर्शनाची ओढही होती. त्यामुळे सकाळी साडेसहा वाजताच पालखीने सासरवडच्या दिशेने प्रस्थान केले. लाखो वैष्णवजनांसह सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पालखी दिवे घाटात पोहोचली. हजारो भाविकांच्या उपस्थितीत ही चढण पार करून पालखीने पुरंदर तालुक्यात प्रवेश केला. घाटावर उपस्थित हजारो माऊली भक्तांनी हा नयनरम्य सोहळा ‘याचि देही याचि डोळा’ अनुभवला. या वेळी घाटाच्या शेवटच्या टप्प्यात माऊलींच्या पालखीरथावर पुरंदरकरांच्या वतीने पुष्पवृष्टी आणि विठू नामाच्या गजरात माऊलींचे स्वागत करण्यात आले.
तत्पूर्वी पुण्यातील भक्तीसंगमानंतर संतश्रेष्ठ तुकोबाराय व ज्ञानोबा माऊलींची पालखी सोहळा सकाळी पुण्यनगरीतून पंढरपूरच्या दिशेने निघाला. तुकोबारायांची पालखी हडपसर मार्गे लोणी काळभोर येथे मुक्कामी पोहचली तर ज्ञानोबा माऊलींची पालखी दिवे घाटातून संत सोपानकाकांच्या नगरीत मुक्कामाला विसावली.
पुरंदरच्या भूमीत संत ज्ञानेश्वरांचा पालखी सोहळा दुपारी पाच वाजता दाखल झाला. पुरंदर तालुक्यातील हजारो भाविक आज माऊलींच्या दर्शनासाठी व स्वागतासाठी ठिकठिकाणी थांबले होते. प्रत्यक्ष घाटाची चढण सुरू झाल्यावर स्थानिक ग्रामस्थांच्या पाच बैलजोड्या जोडण्यात आल्या होत्या. दुपारी ५ वाजता दिवे घाट चढून आल्यावर झेंडेवाडी येथील विसाव्याच्या ठिकाणी अनेक मान्यवरांनी सोहळ्याचे स्वागत केले. झेंडेवाडीनंतर काळेवाडी, ढुमेवाडी, दिवे, पवारवाडी या ठिकाणी गावकऱ्यांनी स्वागत केले व दर्शनाचा लाभ घेतला.
माऊलींच्या रथाला मानाच्या बैलजोडीबरोबर स्थानिक शेतकऱ्यांच्या बैलजोड्यांनीही रथ ओढण्यास मदत केली. घाटावरील भाविकांनी हा नयनरम्य सोहळा आपल्या डोळ्यांत साठवला. माऊलीनामाच्या जयघोषाने वातावरण भक्तिमय झाले होते.
झेंडेवाडी येथील विसाव्याच्या ठिकाणी काही वेळ हा सोहळा विश्रांतीसाठी थांबला. यावेळी हजारो वारकऱ्यांनी घाटमाथ्यावर काही वेळ विश्रांती घेतली.
पुढील मार्गावर विविध व्यक्ती, सामाजिक संस्थांच्या वतीने रस्त्यात ठिकठिकाणी वारकऱ्यांसाठी पाणी, चहा, फराळाचे साहित्य वाटले जात होते. तरुण, विद्यार्थी स्वयंस्फूर्तीने वाहतूक व्यवस्था पाहत होते. अनेक ठिकाणी वारकऱ्यांच्या सेवेसाठी औषधांची, पाणीपुरवठ्याची सोय केलेली आहे.
सासवड नगरपालिकेच्या वतीने चंदन टेकडी येथे नगराध्यक्ष मार्तंड भोंडे, उपनगराध्यक्ष मनोहर जगताप, अजित जगताप, मुख्याधिकारी विनोद जळक, सुहास बापू लांडगे, इतर नगरसेवक तसेच पालिकेच्या सर्व विभागांचे प्रमुख उपस्थित होते. पालखीने सासवड शहरात प्रवेश केल्यावर सोपाननगर कमानीजवळ पुरंदर तालुका कॉँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हा अध्यक्ष संजय जगताप, तालुकाध्यक्ष प्रदीप पोमण, अनिल उरवणे, चंद्रशेखर जगताप, विश्वजित आनंदे आदी उपस्थित होते. दिवे घाटापासून सासवडमध्ये प्रवेश करताना रिमझिम पावसाने हजेरी लावली.
सासवड येथील पालखीतळावर विजेचे दिवे, तंबूजवळ फ्लड लाईट, जनरेटर, भाविकांना दर्शनासाठी दर्शनबारी असून त्यासाठी स्वयंसेविका नेमल्या आहेत.