पुणे- लालफितेशाहीत अडकले विद्युतदाहिन्यांच्या देखभालीसाठीचे कंत्राट….आणि प्रशासकीय अनास्थेने वैकुंठातील गॅस दाहिनी तीन दिवसापासून बंद….अवस्थेत आहे अशी तक्रार भाजपचे सिनिअर आणि अनुभवी कार्यकर्ते क्रिएटिव्ह फौंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या कडे केली आहे .
या संदर्भात त्यांनी आयुक्तांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे कि ,पुणे शहरातील विद्युतदाहिन्या व गॅस दाहिन्यांच्या देखभालीसाठी गेले दोन वर्ष अंदाजपत्रकात तरतूद करण्यात आली नव्हती.याबाबतीत क्रिएटिव्ह फौंडेशन ने मागणी केली व पाठपुरावा केला असता यावर्षी च्या अंदाजपत्रकात पन्नास लाख रुपयांची तरतूद करण्यात आली व सुमारे तीन महिन्यापूर्वी त्याची निविदा मंजूर झाली.गत दीड वर्षे याची देखभाल विनामोबदला सामाजिक बांधीलकीच्या जाणीवेतून करणारे कल्याणी एंटरप्राइझला निविदा मंजुर झाली तरी अद्याप वर्क ऑर्डर देण्यात आलेली नाही.देखभाली अभावी अनेक विद्युतदाहिन्यांची दुरावस्था तर आहेच पण त्याच बरोबर गेले तीन दिवस वैकुंठातील गॅस दाहिनी बंद आहे.अश्या परिस्थितीत किमान अश्या महत्त्वाच्या ठिकाणी तरी त्वरेने प्रशासकीय कार्यवाही होणे गरजेचे आहे मात्र येथे ही लालफितेशाही व अनास्थेचाच अनुभव येतो.तरी त्वरित देखभालीच्या मंजूर निविदेच्या वर्क ऑर्डर देण्यात याव्यात व वैकुंठातील गॅसदाहिनीची युद्धपातळीवर दुरुस्ती करावी अशी आग्रही मागणी करत आहे.असे खर्डेकर यांनी म्हटले आहे .