प्रति फुले वाड्यात अविनाश आंबेडकर यांचे जयंती निमित्ताने वह्या व खाऊ वाटप
पुणे:- सांस्कृतिक चळवळीतील कलावंत कालकथित. अविनाश आंबडेकर यांचे जयंती निमित्ताने कुमार आहेर यांचे प्रति महात्मा फुले वाडा ,मांगडेवाडी येथे 85 मुलं, मुलींना वह्या व खाऊ वाटप करण्यात आला .
यावेळी डॉ.प्रतिभा काळे ,डॉ.विजया आंबेडकर सिने दिगदर्शक आनंद सरवदे,राष्ट्रिय ओबीसी महासंघाचे सरचिटणीस रघुनाथ ढोक, कुमार आहेर,नवदाम्पत्य पियुशा आणि मैत्रय आंबेडकर उपस्थित होते.
यावेळी मुलांना मार्गदर्शन करताना ढोक म्हणाले की मुलांनो जिद्दीने अभ्यास करा,यश अपोआप मिळेल.मोठे होऊन नावलौकिक होईल असे कार्य करा तर डॉ विजया आंबेडकर यांनी अभ्यासा बरोबर सांस्कृतिक आवड निर्माण करा असा मौलिक सल्ला दिला.यावेळी प्रति महात्मा फुले वाड्यात ज्या ज्या कलावंतांनी फुले शाहू आंबडेकर यांचे विचार समाजासमोर मांडून मोठे काम केले त्यांचे कार्याची माहिती फोटो सह लावणार असल्याचे कुमार आहेर यांनी माहिती दिली. आज कालकथित.अविनाश आंबेडकर यांचे कार्याची माहिती देऊन फोटो लावला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आनंद सरवदे व आभार प्रदर्शन पियुशा आंबेडकर यांनी मानले.