पुणे- ६०० चौरस फुटाच्या घरात राहणाऱ्या गरीब पुणेकरांना करमाफी देण्याऐवजी अंबानींच्या रिलायन्स जिओ ला १८ कोटी रुपयांची करमाफी देण्यासाठी स्थायी समिती मार्फत थेट अमित शहांनी प्रयत्न चालविल्याचा संशय व्यक्त करत कॉंग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी आज महापालिकेत स्थायी समिती सभागृहाबाहेर राष्ट्रवादी कॉंग्रेसला बरोबर घेवून जोरदार आंदोलन केले , अविनाश बागवे, रफिक शेख, अजित दरेकर आदी कॉंग्रेसचे नगरसेवक आणि नगरसेविका यावेळी आंदोलनात सहभागी झाले होते , यावेळी पहा आणि ऐका..त्यांच्याच शब्दात नेमके अरविंद शिंदे काय म्हणाले …