पुणे :- क्रेडाई महाराष्ट्राकडून येत्या १३ आणि १४ जुलैला नाशिक येथील महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेसला दोन दिवसीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘महारेरा’ अध्यक्ष गौतम चटर्जी यांच्या हस्ते या परिषदेचे उद्घाटन होणार आहे. ही सहावी वार्षिक परिषद आहे.या परिषदेत महाराष्ट्र राज्यातील ५१ शहरातून १००० हून अधिक बांधकाम व्यावसायिक उपस्थित असणार आहेत.
ही नोंदणी क्रेडाई तर्फे होणार असून हा क्रेडाईच्या इतिहासातील उच्चांक ठरणार आहे असा विश्वास क्रेडाई महाराष्ट्रचे अध्यक्ष शांतीलाल कटारिया यांनी व्यक्त केला.
या परिषदेला वकील, वास्तुविशारद, कायदे सल्लागार,बँकर्स, अभियंते देखील उपस्थित राहू शकतील. ही परिषद सशुल्क असून सर्वांसाठी खुली असणार आहे.
क्रेडाई नैशनलचे चेअरमन गीतांबर आनंद, प्रेसिडेंट (इलेक्ट) सतीश मगर, अध्यक्ष जक्षय शहा, उपाध्यक्ष बोमन इराणी, माजी चेअरमन इरफान रझाक, जमाबंदी आयुक्त व संचालक भूमी अभिलेख एस.चोकलिंगम यावेळी उपस्थित असणार आहेत.
महारेरा नंतरच्या १ वर्षाच्या कालावधीत बांधकाम व्यावसायिकांवर झालेला सकारात्मक बदल/परिणाम यावर गौतम चटर्जी व सतीश मगर मार्गदर्शन करणार आहेत.
गीतांबर आनंद, इरफान रझाक हे ‘रियल इस्टेट ब्रँडिंग’ या विषयावर बोलणार आहेत. भूमी अभिलेखचे संचालक एस.चोकलिंगम हे जमिनीचे मालकी हक्क यामध्ये सरकार काय पाऊले उचलत आहे याबद्दल माहिती देणार आहेत.