Home Blog Page 3111

झी मराठी वाहिनीवर नुपूर दैठणकरची ‘बाजी’

0

झी मराठी वाहिनीवर पेशवाईचा काळ असणारी व उत्कंठावर्धक कथा असलेली ‘बाजी’ही नवीन मालिका ३० जुलैला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. झी मराठी पुन्हा एकदा शंभर भागांचीच मर्यादित कथा प्रेक्षकांसाठी सादर करणार आहे. पेशवाईच्या उत्तरार्धात मराठेशाही संपवण्यासाठी इंग्रजांनी निजामाशी हातमिळवणी केली होती. त्या काळाचा संदर्भ घेऊन ‘बाजी’ची काल्पनिक कथा लिहिण्यात आली आहे. त्या वेळी ‘शेरा’नावाच्या एका हेराला पेशवाईत पाठवण्यात आले होते आणि पेशव्यांना संपवण्यासाठी त्याला शंभर दिवसांची मुदत देण्यात आली होती, असे या मालिकेचे कथानक आहे. थोडीशी गो. नी. दांडेकरांच्या कादंबऱ्यांची जी शैली आहे त्या पद्धतीची ही कथा आहे आणि या मालिकेत अभिजीत श्वेताचंद्र सोबत नुपूर दैठणकर ही प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.

बालपणापासून कलेचा वारसा लाभलेली आणि कलेविषयी प्रेम असणारी क्षत्रिय नृत्यांगना नुपूर दैठणकर आता छोट्या पडद्यावर प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. झी मराठीवरील बाजी या मालिकेत ती हिराचं पात्र साकारणार आहे. या मालिकेचं चित्रीकरण पुणे, भोर, सातारा आणि सासवड येथे झालं आहे. ही मालिका प्रामुख्याने पेशवाईच्या उत्तरार्धावर आधारित आहे. यात १७७० मधील अनेक खऱ्या गोष्टी दाखवण्यात येणार आहेत. त्यामध्ये बिनीवाले, कोतवाल, कात्रजचा विष प्रयोग, गोदामाला आग, गणपतीच्या हाराची चोरी आदींचा समावेश आहे. यामध्ये शेराचं पात्र प्रखरसिंग तर बाजीचं पात्र अभिजित श्वेताचंद्र साकारणार आहे. संतोष कोल्हे यांनी या मालिकेसाठी खूप कष्ट घेतल्याचे नुपूरने सांगितले. नुपूर म्हणाली, “ही काल्पनिक कथा आहे. यात बाजी व हिराची प्रेमकथा दाखवली आहे. यातील प्रत्येक पात्राला वेगवेगळे कंगोरे आहेत. यात मी लावण्यवती, धाडसी, जिद्दी स्वराज्याच रक्षण करण्यास मागेपुढे न पाहणारी आणि घोडेस्वारी व तलवारबाजी करणारी दाखवली आहे. ही भूमिका माझ्यासाठी खूपच आव्हानात्मक आहे.”

अजित पवारांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने, एचआयव्हीग्रस्त मुलांच्या संगोपनासाठी नगरसेवक प्रकाश कदमांनी दिली 3 गुंठे जागा

0

 

पुणे-एच आय व्ही ग्रस्त  मुलांच्या संगोपनासाठी  जबाबदारी घेतलेल्या ममता फौन्डेशनला नगरसेवक राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रकाश  कदम पुणे मनपा यांनी या संस्थेला स्वतःची 30 लाख रुपये किमतीची तिन गुंठे जागा
महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसा निमित्त प्रदान केली .
येथील भुरुक दापत्यांने गुजर निंबाळकर वाडी येथे 2मुलांपासुन चालू केल्यानंतर ती संख्या 33 झाली अन जागेची कमतरता भासू लागली जागेसाठी अनेकांनी त्यांना मदतीची आश्वासने दिली पण शब्द दिलेल्यांनी शब्द पाळला नाही
नगरसेवक प्रकाश कदम यांचे जवळचे मित्र माजी सरपंच दिपक गुजर;  गुजर निंबाळकरवाडीचे सरपंच व्यंकोजी खोपडे तसेच प्रकाश कदम यांच्या  विचारातून तयार झालेले दोन तरूण कार्यकर्ते महेश धुत व प्रसाद बांदल यांच्या प्रयत्नातून एच आय व्ही ग्रस्त असलेल्या लहान मुलांच्या संगोपनासाठी निवाऱ्यासाठी  तीन गुंठ्यात छान अशी इमारत तयार होतेयं या सारखा आनंद  नाही असे यावेळी भूरूक यांनी म्हटले.
समाजसेवा मनापासून केली तरं देवरुपी माणसं मदतीला आहेत, दोन हजार एकोणीस ला दादांच्या वाढदिवशी हि इमारत पुर्ण होईल असेही ते म्हणाले.
अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त यावेळी विठ्ठलराव वरुडे पाटील, युवा नेतृत्व प्रतिक कदम, राहुल काळे आकाश मोडक, ऋषिकेश कारले ,महेश, धुत प्रसाद, बांदल चेतन काळे यांनी मुलांना फळे वाटप केले

अनधिकृत बांधकामे नियमितीकरणासाठी शुल्क आकारणीचे अधिकार महापालिकेला-मुख्यमंत्री

0

पुणे– ‘‘शास्तीकरासंदर्भात नुकतेच एक विधेयक मंजूर केलेले आहे. प्रधान सचिव नितीन करीर यांच्यासोबत बैठक घेतली आहे. त्यानुसार शहरातील अनधिकृत बांधकामे नियमितीकरणासाठी शुल्क आकारणीचे अधिकार महापालिकेला देण्यात आलेले आहेत,’’ असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

ते म्हणाले, ‘‘शास्तीकराचा मुद्दा महत्त्वाचा आहे. पूर्वलक्षी प्रभावाने शास्तीकर संपवणार आहे. यात काही त्रुटी असून त्याबाबत बैठक घेतली आहे. या भागातील अनधिकृत बांधकामे नियमित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, नियमितीकरणाचे शुल्क किती घ्यायचे, याचे अधिकार महापालिकेला दिले आहेत. समाजातील शेवटच्या माणसापर्यंत विकास पोचल्याशिवाय सुराज्य निर्माण होणार नाही.’’

देशाचा इतिहास जागृत ठेवायला हवा. नवीन पिढीला सुराज्य देण्यासाठी समाजाच्या शेवटच्या माणसापर्यंत विकास पोचवावा लागणार आहे. आषाढी एकादशीला आपण पांडुरंगाचे स्मरण करतो. आज महाराष्ट्रातील १२ कोटी जनता मला विठ्ठल-रखुमाई समान आहेत. त्यांचे दर्शन घेण्याचा योग आज आला. हा दिवस माझ्यासाठी भाग्याचा आहे. पांडुरंग आपल्या जीवनात आनंद आणो, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

पालकमंत्री गिरीश बापट म्हणाले, ‘‘गेल्या ४०-५० वर्षांत न झालेली कामे आम्ही पाच वर्षांत केली आहेत. शहराचा पाणीप्रश्‍न चर्चेतून सुटला आहे. भामा-आसखेडचा प्रश्‍न सोडवीत आहोत. मुख्यमंत्री व पंतप्रधानांच्या माध्यमातून योजना आणून सामान्यांना न्याय दिला आहे.’’

क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीचे अध्यक्ष गिरीश प्रभुणे यांनी संग्रहालयाची माहिती दिली. त्याचे लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते व्हावे, अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली. आमदार लक्ष्मण जगताप, महापौर नितीन काळजे यांनी मनोगत व्यक्त केले. एकनाथ पवार यांनी प्रास्ताविक केले. आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आभार मानले.

भिमालेंची शिष्टाई सफलतेच्या मार्गावर -महापालिका कर्मचाऱ्यांचा ग्रेड पे कमी केला जाणार नाही : मुख्यमंत्री

0

पुणे :पालिकेतील सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांनी पुढाकार घेवून मुख्यमंत्र्यांपर्यंत कामगार संघटनांचे प्रतिनिधी नेल्यानंतर  महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा ग्रेड पे कमी केला जाणार नाही; याबाबत लवकरच आदेश काढू असे आश्‍वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिकेच्या कामगार संघटनांच्या प्रतिनिधींना दिले आहे

पुण्याच्या दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्री फडणवीस यांची पुणे मनपा कामगार युनियन, पीएमसी एम्प्लॉईज युनियन, अधिकारी अभियंता संघ, डॉक्‍टर असोसिएशन या संघटनांच्या प्रतिनिधींनी भेट घेऊन “ग्रेड पे’च्या संदर्भातील प्रश्‍नाविषयी चर्चा केली. यावेळी   सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, कामगार संघटनांचे प्रतिनिधी उल्हास भट, बापू पवार, सुनिल कदम, आशिष चव्हाण, माधव जगताप आदी यावेळी उपस्थित होते. पाचवा वेतन आयोग लागू केल्याने पुणे महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा “ग्रेड पे’ हा राज्य शासनाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांपेक्षा अधिक होता.

राज्य सरकारने महापालिकेचा आकृतीबंधाला मंजूरी देताना महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वेतन राज्य शासनाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांपेक्षा अधिक होणार नाही, अशी सूचना केली होती. त्याची अंमलबजावणी करीत महापालिका प्रशासनाने अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा “ग्रेड पे’ कमी केला. यामुळे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे वेतन कमी झाल्याने सर्व कामगार संघटनांनी या प्रश्‍नावर आंदोलने केली. राज्य सरकारने केलेली सुचना आणि महापालिका प्रशासनाने घेतलेल्या भुमिकेचा फटका 18 हजार कर्मचाऱ्यांना बसत आहे. याप्रश्‍नावर गेल्या दोन महिन्यापासून कर्मचारी संघटना आक्रमकपणे बाजू मांडत आहे. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेतही याचे पडसाद पडले होते. गेल्या आठवड्यात झालेल्या सर्व साधारण सभेत महापौरांनी यासंदर्भात मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा करू, “ग्रेड पे’ कमी केला जाणार नाही असे आश्‍वासन दिले होते. लोहगाव विमानतळ येथे महापालिकेतील पदाधिकारी आणि कामगार संघटनांच्या प्रतिनिधींनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. त्यांना वस्तुस्थिती सांगितल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सदर आश्‍वासन दिले.

समाविष्ट गावांमधील कर्मचारी अधिकारी यांना महापालिकेच्या कायम सेवेत घ्या

0

पुणे : समाविष्ट गावांमधील कर्मचारी अधिकारी यांना महापालिकेच्या कायम सेवेत सामावून घ्यावे अशी मागणी या गावांच्या नजीकच्या भागातील नगरसेवकांनी केली आहे. महापालिका प्रशासनाने ग्रामपंचायत दप्तरी नोंद असलेल्या कर्मचाऱ्यांना सेवेत घेतले आहे, मात्र समाविष्ट झाल्याच्या काही महिनेच आधी किंवा दप्तरात नोंदच नाही व रोजंदारीवर काम करत होते अशा कर्मचाऱ्यांना मात्र सेवेत घेतलेले नाही. ११ गावांमध्ये मिळून असे सुमारे १२० कर्मचारी असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
शिवणे, उत्तमनगर, धायरी, आंबेगाव खुर्द, आंबेगाव बुद्रुक, लोहगांव, फुरसुंगी, उरुळी – देवाची, मुंढवा, साडेसतरानळी, उंड्री या ११ गावांचा महापालिकेत समावेश करण्यात आला आहे.यासंबधीच्या याचिकेच्या सुनावणीत न्यायालयानेच तसा आदेश सरकारला दिला होता. महापालिकेत समाविष्ट करतानाच या सर्व गावांमधील ग्रामपंचायती विसर्जित करण्यात आल्या. त्यांच्याकडील कर्मचारी त्यामुळे महापालिकेत वर्ग झाले. सर्व गावांमध्ये मिळून ४०० कर्मचारी होते. ग्रामपंचायत दप्तरात नोंद होती, त्यांचा निर्णय लगेच झाला, उर्वरित कर्मचाऱ्यांबाबत मात्र प्रशासनाने अद्याप काहीच निर्णय घेतलेला नाही.
त्यांना महापालिकेच्या कायम सेवेत सामावून घ्यावे असा प्रस्ताव सचिन दोडके व सुनील टिंगरे या नगरसेवकांनी स्थायी समितीकडे दिला आहे. या कर्मचाऱ्यांना गावांची माहिती आहे. महापालिकेचे कायम कर्मचारी तिथे नियुक्त केले तर गावांची माहिती नसल्याने त्यांना तिथे कार्यक्षमतेने काम करता येणार नाही, त्यात अडचणी येतील. त्यामुळे ग्रामपंचायतीचेच जे कर्मचारी होते, त्यांना तिथेच नियुक्त करावे असे या नगरसेवकांचे म्हणणे आहे. गावांमध्ये मोठ्या वसाहती झाल्या असल्या तरी तिथे पायाभूत सुविधांचा अभाव आहे, त्यामुळे महापालिकेने तिथे त्वरीत विकासकामे सुरू करावीत अशीही मागणी या नगरसेवकांनी केली आहे.

अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ‘ खिळेमुक्त झाडे ‘ अभियान

0
पुणे :’सनी मानकर मित्र परिवार ‘आणि ‘अंघोळीची गोळी ‘ संस्था यांनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कोथरूड येथील ४० झाडांना खिळेमुक्त केले.जवळपास ३२५ खिळे रविवारी झालेल्या अभियानात काढण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेस सांस्कृतिक सेल,पश्चिम महाराष्ट्र  अध्यक्ष सनी मानकर,राष्ट्रवादी विध्यार्थी काँग्रेसचे कोथरूड प्रमुख शुभम माताळे, सौ.साळुंके, सौ.बावकर, सरिता कबाडी,विकास उगले,प्रमोद शेवाळे,आशिष कांबळे ,अमोल बोरसे,तेजश्री निखार ,गौरव कोचरे आणि इतर सहभागी होते.
पुढील रविवारपासून सनी मानकर मित्र परिवार आणि अंघोळीची गोळी यांच्या संयुक्त विद्यमाने कोथरूडमधील झाडांना आळी करण्याचे काम घेण्यात येणार आहे.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस सांस्कृतिक सेल,पश्चिम महाराष्ट्र  अध्यक्ष सनी मानकर असे म्हणले कि ‘जगदीश बोस यांनी संशोधन करून असे सिद्ध केले आहे कि झाडांनासुद्धा संवेदना असतात म्हणून झाडांना खिळे मारणे चुकीचे आहे
.झाडांना वेदनामुक्त करून अजितदादांचा वाढदिवस विधायक कामातून साजरा केल्याचे समाधान  ‘अंघोळीची गोळी ‘ संस्थेच्या “खिळेमुक्त झाडे”  अभियानातून मिळाले.
अंघोळीची गोळी ‘ संस्थेचे माधव पाटील म्हणाले कि राष्ट्रीय हरित लवादाच्या २८ जुलै २०१५ च्या आदेशाप्रमाणे ह्या झाडांची काळजी घेण्याची जबाबदारी महानगरपालिकेची असते.
डांबर,काँक्रीट,पेव्हर ब्लॉकमुळे झाडांच्या मुळांना पाणी पोहचत नाही आणि ते ठिसूळ होतात व त्यामुळे पावसाळ्यात त्यांची पडण्याची शक्यता अधिक असते.
एक झाड टिकल्यामुळे तेथील जैव-विविधता टिकून राहते. तेथे अनेक पक्षी, प्राणी येतात आणि पर्यावरणाचा समतोल राखला जातो. एक जुने झाड जगवणे म्हणजे १००० नवीन झाडे लावणे, असेही ते म्हणाले.

 

१९ ऑक्टोबरला पटरी बॉईज चित्रपटगृहात

0

मुंबई … सात बेटांची पसरलेली मायावी नगरी. हिने प्रत्येकाला आपल्यात सामावून घेतलं आहे!

या नगरीची खासियत म्हणजे एका बाजूला गगनचुंबी इमारती तर दुसरीकडे अजगरासारखी पसरलेली इथली झोपडपट्टी !

मुंबईतील सर्वात मोठी झोपडपट्टी अर्थात धारावी..!! अगदी सामान्य माणसापासून, नगरसेवकापासून ते थेट मंत्र्यांपर्यंत साऱ्यांचाच रस या झोपडपट्टीत आहे. या झोपडपट्टीत राहतात अनेक जातीधर्माचे लोक!! त्यातूनच हाणामारी, मारामारी, वाद होत असतात. हे वाद इथलेच लोकलभाई अर्थात झोपडपट्टीदादा सोडवतात. अगदी लहान वयात इथल्या मुलांना याची सवय लागते. त्यातून गुंडगिरी, भाईगिरी जन्माला येते. अशाच एका झोपडपट्टीतील सात बालगुन्हेगारांची कथा उलगडून दाखवणारा ‘पटरी बॉईज’ हा मराठी चित्रपट १९ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. ‘श्रीरंगलेखा एन्टरटेन्मेंट’ प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती वेंकटवर्धन नरसिंहन आएंगर, श्रीधर आएंगर, अश्विन भराडे यांनी केली असून दिग्दर्शन अजित साबळे आणि मनोज येरूणकर यांनी केले आहे.

पाकिटमारी, छोट्या हाणामाऱ्या करणाऱ्या या सातजणांना एका चोरीच्या दरम्यान एक गोष्ट सापडते. ही गोष्ट मिळवण्यासाठी या सात जणांमध्ये झालेला संघर्ष आणि या सात जणांकडून ही गोष्ट मिळवण्यासाठी इतरांनी केलेली धडपड यावर हा चित्रपट बेतला आहे. अरुण नलावडे, गणेश यादव, मिलिंद गवळी, संजय खापरे, भूषण घाडी, मौसमी तोंडवळकर, डॉ.राजेश आहिर, संदीप जुवाटकर, नितीन बोधारे, मीरा जोशी, विकास खैरे, मिथुन चव्हाण, जयेश चव्हाण, सुधीर घाणेकर, परी लता, सानिया पाटील, श्रद्धा धामणकर या कलाकारांच्या ‘पटरी बॉईज’ चित्रपटात भूमिका आहेत.

चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद अजित साबळे आणि मनोज येरूणकर यांनी लिहिले आहेत. छायांकन अयुब शेख तर संकलन अनिल थोरात यांचे आहे. दीपक आगनेवर, राज सागर यांनी लिहिलेल्या गीतांना आदर्श शिंदे, रितू पाठक, शाहिद माल्या यांनी स्वरबद्ध केली आहेत. अमोल–परेश, शेज म्युजिक यांचे संगीत चित्रपटाला लाभले आहे. कलादिग्दर्शन मयूर निकम तर नृत्यदिग्दर्शन संतोष आंब्रे यांचे आहे. वेशभूषा तेजश्री मोरे तर रंगभूषा उदयराज तांगडी यांची आहे.

१९ ऑक्टोबरला ‘पटरी बॉईज’ चित्रपटगृहात येत आहे.

पुलकसागरजी महाराज यांचे कॉंग्रेस नेते दिग्विजयसिंग यांनी पुण्यात आशीर्वाद घेतले.

0

पुणे-कॉंग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते दिग्विजयसिंग यांनी आज पुण्यात चातुर्मासानिमित्त आलेल्या प.पू.१०८ पुलकसागरजी
महाराज यांचे धर्मानुरागी रसिकलाल.एम.धारीवाल नगरी, महालक्ष्मी लॉन्स,पुणे येथे जाऊन आशीर्वाद घेतले.


याप्रसंगी प.पू.१०८ पुलकसागरजी महाराज यांनी जुन्या आठवणींना उजाळा देऊन म्हटले की, मध्यप्रदेशाचे
मुख्यमंत्री असताना दिग्विजयसिंग यांनी गुरु परमपूज्य आचार्य पुष्पदंत सागरजी महाराज यांच्या नावाने इंदौर
पासून ६० किमी असणाऱ्या पुष्पगिरी येथे ३०० एकर जागा राज्यसरकारतर्फे दिली होती. येथे जैन समाजाचे
मोठे तीर्थक्षेत्र विकसित झाले असून शाळा, कॉलेज, इ. सुविधाही तेथे उपलब्ध झाल्या आहेत. अन्य
समाजांप्रमाणेच जैन समाजासाठीही दिग्विजयसिंग यांनी खूप मदत केली याचा उल्लेख प.पू.१०८ पुलकसागरजी
महाराज यांनी केला. याप्रसंगी दिग्विजयसिंग यांनी मध्यप्रदेशात विशेषतः बुंदेलखंड भागात दिगंबर जैन समाज
मोठा असल्याचा उल्लेख केला व मुनिश्रींना श्रीफळ अर्पण करून त्यांचे आशीर्वाद घेतले. प.पू.१०८.
पुलकसागरजी महाराज यांनी दिग्विजयसिंग यांना आशीर्वाद स्वरुपात’पुलकसागरम्’पुस्तके भेट दिली.
प्रारंभी सकल जैन वर्षायोग समितीचे कार्याध्यक्ष मिलिंद फडे व सचिव जितेंद्र शहा यांनी दिग्विजयसिंग यांचे
पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. समितीच्या अध्यक्षा श्रीमती शोभा धारीवाल यांनी दिग्विजयसिंग यांना 'णमोकर'
मंत्राची चांदीची प्रतिमा व श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार केला. याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस समितीचे
सरचिटणीस अॅड.अभय छाजेड समितीचे पदाधिकारी व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ओवेसी आणि भाजपा हे दोघे एकाच नाण्याच्या दोन बाजू – दिग्विजयसिंग(व्हिडीओ)

पुणे-आगामी निवडणूक व्यक्ती केंद्रीत होणार नसून  दोन विचारधारांमध्ये ही निवडणूक होणार आहे, देशाने ठरवायचे आहे ,म. गांधी ,पंडित नेहरूंची विचारधारा हवी आहे कि ,हेडगेवार ,गोळवलकर ,सावरकरांची विचारधारा हवी आहे ,एमआयएम चे ओवेसी आणि भाजपा हे दोघे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत , लोकपाल साठी अण्णा हजारेंच्या नेतृत्वाखाली भाजपने आंदोलन केले होते असे हि विधान करत आता लोकपालच्या अंमलबजावणीसाठी आंदोलन व्हावे या मताशी मी सहमत असेल असेही त्यांनी म्हटले आहे.

सोमवारी दिग्विजय सिंह यांनी पत्रकार परिषद घेतली. शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष ,माजी मंत्री ,रमेश बागवे,माजी आमदार मोहन जोशी ,अभय छाजेड ,नीता परदेशी,लता राजगुरू,विक्रम खन्ना आदी यावेळी उपस्थित होते.

आषाढी एकादशीनिमित्त राज्याचे मुख्यमंत्री आणि वारकऱ्यांच्या हस्ते विठ्ठलाला अभिषेकाची परंपरा राहिली आहे. मुख्यमंत्री विठ्ठलाप्रती समर्पित आहेत तर त्यांनी या समर्पित भावनेने पंढरपूरला जायला हवे होते, असे मतही सिंह यांनी व्यक्त केले. जनतेचा सरकारवरील विश्वास उडत चालला आहे. खुद्द मित्र पक्ष साथ सोडत आहेत, हा देखील सरकारवरील अविश्‍वासच आहे. केंद्र सरकार मधील मंत्र्यांनाही बोलण्याची मुभा नाही. “ना खाऊंगा ना खाने दुंगा’, म्हणणारे मोदी राफेल विमान खरेदीबाबत माहिती देण्यास तयार नाहीत. यासाठी करारातील माहिती गुप्त असल्याचे कारण सांगितले जात आहे. परंतु फ्रान्सच्या राफेल कंपनीने वार्षिक ताळेबंदात ही माहिती उघड केली आहे. त्यामुळे मोदींचा खरा चेहरा उघड झाला आहे, अशी टीका सिंह यांनी दिली.

कॅबिनेटच्या मंजुरीशिवाय परस्परच 36 विमानाच्या खरेदीचे आदेश दिले. त्यामध्ये 18 हजार कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे. काफिला टनेलच्या बाबतीही एकाच कंपनीचे 10 हजार 500 कोटी रुपयांची निविदा आली होती. त्या कंपनीला काम द्यायचे ठरत होते. हे चुकीचे असल्याचे पंतप्रधानांच्या लक्षात आणून दिल्यानंतर पुन्हा निविदा काढण्यात आली. त्यानंतर ते काम 4 हजार 800 कोटी रुपयांत झाले, असा दावा सिंह यांनी केला.

लोकपाल कायदा मंजूर झाला; परंतु त्याची अंमलबजावणी केली जात नाही. मुळात पंतप्रधानाचाच त्याला विरोध आहे. भाजप धार्मिक हिंसा भडकवून राजकारण करत आहे. राम मंदिरासाठी आंदोलन करणाऱ्या मोदी यांच्या वाराणसी मतदार संघात 100 मंदिरे पाडण्यात येत आहेत. परंतु त्या विषयी ते काही बोलत नाहीत. धर्माचा वापर केवळ समाजातील तेढ वाढवून राजकारणासाठी केला जात आहे. त्यामुळे कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी अविश्वास प्रस्तावावर मांडलेली भूमिका आणि मोदी यांची गळाभेट घेऊन घातलेला सहिष्णुतेचा पायंडा योग्यच आहे, असे सांगत राहुल गांधी यांच्या भूमिकेला पाठिंबाही दिला.

पहा आणि ऐका नेमके दिग्विजयसिंग यांनी काय म्हटले आहे  ….त्यांच्याच शब्दात ….

तिसर्‍या एफसी पुणे सिटी कॉर्पोरेट सुपर कप फुटबॉल स्पर्धेत फिनआयक्यु, सनगार्ड एएस, सायबेज, केपीआयटी संघांचा उपांत्य फेरीत प्रवेश

0

पुणे, 23 जुलै 2018-   राजेश वाधवान समुह व बॉलिवूड सुपरस्टार अर्जुन कपुर यांच्या सहमालकीच्या एफसी पुणे सिटी  तर्फे  व  नेस्टअवे, फास्ट अँड अप, स्कार्टर्स, मॅकडॉनडल्स, झुमकार, उबेर इट्स, रॅडिसन ब्लू(हिंजेवाडी)यांच्या संलग्नतेने आयोजित तिसऱ्या एफसी पुणे सिटी कॉर्पोरेट फुटबॉल स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत फिनआयक्यु, सनगार्ड एएस, सायबेज, केपीआयटी या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला.

मामुर्डी येथील एफसी पुणे सिटीच्या सराव मैदानावर सुरु असलेल्या या स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत पहिल्या सामन्यात प्रकाश थोरात(2,5मि.)याने नोंदविलेल्या दोन गोलांच्या जोरावर फिनआयक्यु संघाने कॅपजेमिनी संघाचा 4-0असा सहज पराभव केला. सनगार्ड एएस संघाने अॅमडॉक्सचा 4-1असा पराभव केला. विजयी संघाकडून याकुब पिरजादे, क्रिशॉल फर्नांडिस, रोमिओ अरुलदास, योगेश यादव यांनी प्रत्येकी एक गोल केला. सायबेज संघाने कनव्हर्जीज संघाचा 2-1असा संघर्षपूर्ण पराभव करून उपांत्य फेरी गाठली.

चुरशीच्या झालेल्या लढतीत केपीआयटी संघाने इन्फोसिसचा टायब्रेकरमध्ये 3-1असा पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली. निर्धारित वेळेत सामना गोलशून्य बरोबरीत सुटला व त्यामुळे टायब्रेकर पद्धतीचा अवलंब करण्यात आला. टायब्रेकरमध्ये केपीआयटीकडून हेमराज हुडा, प्रसाज सूर्यवंशी, प्रणव सिद्धेश्वर यांनी गोल केले, तर इन्फोसिसकडून सतीश बनसोडे, सुनील मेहता, विवेक नायर यांना गोल मारण्यात अपयश आले.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: उपांत्यपूर्व फेरी:
फिनआयक्यु: 4(प्रकाश थोरात 2,5मि., श्रीकांत मोलनगिरी 12मि., वैष्णव शर्मा 20मि.)वि.वि.कॅपजेमिनी: 0;

सनगार्ड एएस: 4(याकुब पिरजादे 3मि., क्रिशॉल फर्नांडिस 6मि., रोमिओ अरुलदास 10मि., योगेश यादव 15मि.)वि.वि.अॅमडॉक्स: 1(अविरल जैन 12मि.);

सायबेज: 2(आरिफ चितेवान 8मि., आशिष मगर 13मि.)वि.वि.कनव्हर्जीज: 1(लुईस रेमेई 4मि.);

केपीआयटी: 3(हेमराज हुडा, प्रसाज सूर्यवंशी, प्रणव सिद्धेश्वर)(गोल चुकविले-अल्बि अब्राहिम)टायब्रेकरमध्ये वि.वि.इन्फोसिस: 1(विल्सन लोबो)(गोल चुकविले-सतीश बनसोडे, सुनील मेहता, विवेक नायर);पूर्ण वेळ: 0-0.

तब्बल तेवीस विधेयके मंजूर – गिरीश बापट

0

पुणे – नाणार प्रकल्प आणि दूध दरवाढ यासारखे विषय पुढे करून सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करणा-या विरोधकांना नामोहरम करून सत्ताधारी पक्षाने विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात तब्बल तेवीस विधेयके मंजूर करवून घेतली. हे अधिवेशन शंभर टक्के यशस्वी झाले. असा दावा संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट यांनी सोमवारी केला. नागपूर येथील अधिवेशन संपल्यावर बापट यांनी आज संसदीय कामकाजाचा आढावा पत्रकारांना सादर केला. त्यावेळी ते बोलत होते. हिवाळी अधिवेशन नोव्हेंबर २०१८ मध्ये मुंबई येथे होणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.

बापट म्हणाले की, नाणार प्रकल्पावरून सभागृहात विरोधकांनी मित्रपक्षाला बरोबर घेऊन गोंधळ घातला. राजदंड पळविण्यापर्यंत त्यांची मजल गेली. त्यामुळे सरकार अल्पमतात आल्याचा दावा काँग्रेससह सर्वच विरोधक सभागृहात करीत होते. तथापि मुख्यमंत्र्यांनी हा दावा फेटाळून लावीत अभ्यासपूर्ण शैलीत निवेदन केल्याने विरोधकांचा डाव फसला. त्यानंतर दोन्ही सभागृहाचे कामकाज सुरळित पार पडले. विधानसभेचे कामकाज तब्बल ८६ तास १९ मिनिटे चालले. तेथील रोजच्या कामाची सरासरी सहा तास ३९ मिनिटे होती. तर विधानपरिषदेचे कामकाज तब्बल ७४ तास १२ मिनिटे चालले. तेथील रोजच्या कामाची सरासरी

पाच तास ४२ मिनिटे एवढी होती. दोन्ही सभागृहाच्या प्रत्येकी तेरा बैठका झाल्या.

विधानसभेत सदस्यांच्या उपस्थितीचे सरासरी प्रमाण ७६.४२ होते. ते प्रगल्भ लोकशाहीचे दर्शन घडविणारे होते. विधानसभेत ८१३ तारांकित प्रश्न विचारले गेले. सदोतीस प्रश्नांना तोंडी उत्तरे देण्यात आली. फक्त एक अल्पसूचना प्रश्न उपस्थित करण्यात आला. एकूण ११४ लक्षवेधी सूचना पटलावर ठेवण्यात आल्या. त्यापैकी प्रत्यक्ष ४२ सूचनांवर चर्चा झाली. स्थगन प्रस्तावाच्या ११३ सूचना प्राप्त झाल्या. त्यापैकी एकही सूचना मान्य झाली नाही. अर्धा तास चर्चेच्या २४६ सूचना मांडण्यात आल्या त्यावर अजिबात चर्चा झाली नाही. ४०८ अशासकीय ठराव आलेत्यापैकी २५४ मंजूर झाले. विधानपरिषदेत ९५८ तारांकित प्रश्न विचारण्यात आले. तिथे १६५ औचित्याचे मुद्दे उपस्थित करण्यात आले. लक्षवेधी स्वरुपाच्या ५२ सूचनांवर चर्चा झाली. विधानसभेने मांडलेली बावीस विधेयके तिथे मंजूर करण्यात आली.

बापट पुढे म्हणाले की विदर्भ मराठवाड्याला बावीस हजार कोटी रुपयांचे पॅकेज देऊन प्रादेशिक असमतोल दूर करण्याचा शासनाचा निर्णय हे या अधिवेशनाचे सर्वात मोठे यश मानले जाते. ज्येष्ठ नागरिकांचे धोरण त्यांचे वय निश्चित करणे. मराठा समाजाला नोकरीत सोळा टक्के आरक्षण. पत्रकारांना पेन्शन. आँनलाईन औषध खरेदीला चाप मल्टीप्लेक्समधील पदार्थांच्या भरमसाठ दरवाढीला आळा. दूधात भेसळ करणारांवर कठोर कारवाई. इत्यादी महत्वाचे निर्णय या अधिवेशनात घेण्यात आले.

मराठी भाषा समिती, राज्यातील विद्यापीठे, एसटी महामंडळ, जिल्हा परिषदा, महाराष्र्ट्र जीवन प्राधिकरण यांचे प्रशासकीय अहवाल पटलावर ठेवण्यात आले. संमत झालेल्या महत्वाच्या विधेयकांमध्ये ग्रामपंचायत अधिनियम सुधारणा, सहकारी संस्था सुधारणा, महाराष्र्ट्र झोपडपट्टीगुंड हातभट्टीवाले वाळू तस्कर यांच्या विघातक कृत्यांना आळा घालण्यासाठी सुधारणा विधेयक, कृषि उत्पन्न पणन विकास अधिनियम सुधारणा, ठेवीदारांच्या हितसंबधांचे संरक्षण सुधारणा विधेयक इत्यादींचा समावेश आहे.

पुण्याच्या प्रश्नांना चालना

पुण्यातील प्रश्नांचा संदर्भ देऊन बापट पुढे म्हणाले की, पुण्यातील वायू प्रदूषणाचा कृति आराखडा हा सर्वात महत्वाचा विषय विधीमंडळात मार्गी लागला. तसेच मुलींची पहिली शाळा सुरु झाली त्या भिडे वाड्यातील सावित्रीबाई फुले यांचे नियोजित स्मृतिस्थळ या विषयाला अधिवेशनात चालना मिळाली. एकात्मिक सायकल योजनाची माहितीही सदस्यांनी जाणून घेतली. वनविभागाच्या जागेवरील अतिक्रमणे. इंद्रायणी नदी प्रदूषण. ससूनमधील नवीन प्रशासकीय इमारत, जिल्हा परिषद सौर पथदिवे खरेदी, पुणे विद्यापीठातील पेपरफुटी, महापालिकेतील विस्तारित इमारतीची गळती, पुणे मनपा रुग्णालयांची अवस्था, मुळा मुठा प्रदूषण व सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, महावितरणची बिले, कामधेनू दत्तक योजना, पुणे मनपातील औषध खरेदी, समाविष्ठ अकरा गावातील विकास, टँकरमाफिया, ज्येष्ठ कलाकारांचे मानधन, पिंपरी चिंचवडसाठी आंन्द्रा धरणाचे पाणी, जिल्हा

परिषदेतील शिक्षण अधिका-याचा गैरव्यवहार इत्यादी विषय चर्चेला आले. त्यावर समाधानकारक माहिती देण्यात आली.शेतक-यांची कर्जमाफी, राज्यातील कायदा व सुव्यवस्था, राज्याची आर्थिक स्थिती, मुंबईतील भूखंड इत्यादी विषयावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखेपाटील, जयंत पाटील, अजित पवार यांनी प्रश्न उपस्थित करून चर्चा घडवून आणली. मुख्यमंत्री व मंत्रीमंडळातील अन्य सहका-यांनी अभ्यासपूर्ण उत्तरे देऊन कामकाज सुरळितपणे होऊ दिले.

समाजातील शेवटच्‍या माणसांपर्यंत विकास पोहोचल्याशिवाय सुराज्‍य निर्माण होणार नाही- मुख्‍यमंत्री

0

पुणे- आता सुराज्‍याची लढाई लढावी लागेल, नव्‍या पिढीला सुराज्‍य द्यावे लागेल.  समाजातील शेवटच्‍या माणसांपर्यंत विकास पोहोचल्याशिवाय सुराज्‍य निर्माण होणार नाही, असे स्‍पष्‍ट मत मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्‍यक्‍त केले.

पिंपरी-चिंचवड महापालिका व क्रांतीवीर चापेकर स्मारक समिति यांच्या संयुक्त विद्यमाने चिंचवडगाव येथे क्रांतीवीर चापेकर राष्ट्रीय संग्रहालय उभारण्यात येणार आहे. त्‍याच्‍या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते.  अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट, खासदार श्रीरंग बारणे, आमदार लक्ष्‍मण जगताप, महेश लांडगे, आयुक्त श्रावण हर्डीकर, उपमहापौर शैलजा मोरे,  क्रांतीवीर चापेकर स्मारक समितीचे अध्यक्ष गिरीश प्रभुणे,क्रांतीवीर चापेकर स्मारक समितीचे कार्यवाह ॲड सतिश गोरडे यांची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमाच्‍या  अध्यक्षस्थानी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे महापौर नितीन काळजे होते.

मुख्‍यमंत्री श्री. फडणवीस म्‍हणाले, जो समाज इतिहास विसरतो, त्‍याला वर्तमानकाळ असतो, मात्र भविष्‍यकाळ नसतो. क्रांतीवीर चापेकर बंधूंच्‍या स्‍मारकातून नव्‍या पिढीला प्रेरणा मिळणार आहे. संग्रहालयात क्रांतीकारकांची आठवण जागृत ठेवली जाणार आहे. क्रांतीकारकांच्‍या बलिदानाचे मोल समजले नाही तर स्‍वातंत्र्य धोक्‍यात येणार आहे. देशाचा इतिहास जागृत ठेवायला हवा, असे नमूद करुन  नवीन पिढीला सुराज्‍य द्यावे लागेल, असे सांगितले. समाजाच्‍या शेवटच्‍या माणसापर्यंत विकास पोहोचल्‍याशिवाय सुराज्‍य निर्माण होणार नाही, असे स्‍पष्‍ट केले.

आपल्‍या भाषणाच्‍या प्रारंभी मुख्‍यमंत्री श्री. फडणवीस यांनी क्रांतीची प्रेरणा देणा-या लोकमान्‍य टिळकांच्‍या स्मृतीला अभिवादन केले. तसेच तरुणांच्‍या मनात क्रांतीची ज्‍योत पेटवणा-या चापेकर बंधूंच्या स्मृतिला वंदन केले. आषाढी एकादशीच्‍या दिवशी आपण पांडुरंगाला स्‍मरतो. आज महाराष्‍ट्रातील 12 कोटी जनता विठ्ठल-रखुमाईसारखी असून आपले दर्शन घेण्‍याचा मला योग आला. हा दिवस माझ्यासाठी भाग्‍याचा आहे, पांडुरंग आपल्‍या जीवनात आनंद आणो, असे भावपूर्ण उद्गार काढले.

मुख्‍यमंत्री श्री. फडणवीस यांनी क्रांतीवीर चापेकरांच्‍या कार्याचे स्‍मरण केले. 19 व्‍या शतकाच्‍या शेवटी पुण्‍यनगरी प्‍लेगची साथ पसरली होती. रँड नावाच्‍या इंग्रज अधिका-याने पुण्‍यातील नागरिकांवर अनन्वित अत्‍याचार केले. छत्रपती शिवाजी महाराजांपासून प्रेरणा घेवून  चापेकर बंधूंनी नागरिकांवरील अत्‍याचाराचा बदला घेतला. या संग्रहालयात अनेक क्रांतीकारकांच्‍या स्‍मृति जतन केल्‍या जातील, त्‍यापासून नवीन पिढीला प्रेरणा मिळेल, असा विश्‍वास त्‍यांनी व्‍यकत केला. पिंपरी-चिंचवडमधील प्रश्‍नांचा उल्‍लेख करुन मुख्‍यमंत्री श्री. फडणवीस म्‍हणाले, शास्‍तीकराचा मुद्दा महत्‍वाचा असून पूर्वलक्षी प्रभावाने शास्‍ती कर संपवणार आहे. यात काही त्रुटी असून त्‍याबाबत लवकरच बैठक घेण्‍यात येणार असल्‍याचे त्‍यांनी सांगितले. या भागातील अनधिकृत बांधकामे नियमित करण्‍याचा निर्णय घेण्‍यात आला असून नियमितीकरणाचे शुल्‍क किती घ्‍यायचे याचे अधिकार महापालिकेला देऊ, असेही ते म्‍हणाले.

पालकमंत्री गिरीश बापट यांनी क्रांतीवीर चापेकर समृती संग्रहालयाच्‍या भूमिपूजनाचा कार्यक्रम ऐतिहासिक असल्‍याचे सांगि‍तले.  चापेकर बंधूंनी देशात आदर्श निर्माण केला. तरुणांना त्‍यापासून प्रेरणा मिळेल. पिंपरी-चिंचवडमधील प्रश्‍नांचा उल्‍लेख करुन शासन पूर्णपणे  पाठीशी राहील, असेही ते म्‍हणाले.

कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक एकनाथ पवार यांनी केले. यावेळी आमदार लक्ष्‍मण जगताप यांचेही समयोचित भाषण झाले. क्रांतीवीर चापेकर स्मारक समितीचे अध्यक्ष गिरीश प्रभुणे यांनी संग्रहालयाची माहिती दिली.

संग्रहालयाच्या तिस-या मजल्यावर प्रबोधन पर्वाचा इतिहास सचित्र दाखविण्यात येईल. यात राजा राममोहन राय यांच्या पासून महात्मा फुले, राजर्षि शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या सर्व प्रबोधन चळवळींचा इतिहास, त्याबरोबर स्वामी परमहंस, स्वामी विवेकानंद, योगी अरविंद, महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल या सर्व चळवळींचा सचित्र इतिहास ठेवण्यात येणार आहे. संग्रहालयाच्या पाचव्या मजल्यावर 350 आसन क्षमतेचे सभागृह असणार आहे. सहाव्या मजल्यावर स्मारक समिती अन्य उपक्रम रेकॉर्डिंग रूम, बैठक असणार आहे. यात ऐतिहासिक पुरातन काळात वापरण्यात येणाऱ्या वस्तू, भांडी, वेशभूषा, अलंकार, युद्ध कलेचे साहित्य, गडकोट, किल्ल्यांच्या प्रतिकृती,पुरातन भित्तिचित्रे यांचा समावेश असेल.त्यातून देशभरातील भारतीय संस्कृति, स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास सांगणारे दोन हजार वर्षातील घटना आणि घडामोडींवर चिरंतन स्मृति जपणारे हे सहा मजली राष्ट्रीय संग्रहालय उभारणार आहे.

शिकवण्यापेक्षा शिकण्याकडे लक्ष द्यावे

0

अमिता फडणीस यांचे आवाहन ; ‘आय पेरेंट्स क्लब’ या फेसबुक पेजचे उद्घाटन 

पुणे  :- लहान मुलांना शिकवण्यापेक्षा त्यांच्याकडून शिकल्यास आपण अधिकाधिक चांगले पालक होऊ असे मत बालरोगतज्ञ डॉ. अमिता फडणीस यांनी व्यक्त केले. बावधन मधील गंगा लेजंड येथे गोयल गंगा फौंडेशनच्या वतीने जीजीआयएस अथ अंतर्गत  ‘आय पेरेंट्स’ या सत्राचे आयोजन करण्यात आले होते त्यानिमित्त त्या बोलत होत्या.

‘आय पेरेंट्स’ अंतर्गत ‘आय पेरेंट्स क्लब’ या फेसबुक पेजची  सुरुवात  करण्यात आली आहे. ज्यात मुलांचे शारीरिक व मानसिक आरोग्य या क्षेत्रात अनेक वर्ष  काम करणारे मोहन आगाशे, रक्षित टंडन,भूषण शुक्ला,निर्मला तांबे,अनुपमा देसाई या तज्ञांचे मार्गदर्शन व पालकांच्या अनेक प्रश्नांचे निरसन निशुल्क  केले जाणार आहे.

यावेळी गोयल गंगा इंटरनैशनल स्कुलच्या मुख्याध्यापिका भारती भागवाणी, गोयल गंगा इंटरनैशनल स्कुलच्या संचालिका सोनू गुप्ता, नगरसेवक किरण दगडे पाटील उपस्थित होते. पालकत्वाचे स्वरूप मुलांच्या वाढीच्या वयानुसार बदलावेच लागते. याचे महत्वही त्यांनी उपस्थित पालकांना पटवून दिले. मुलांना समजून घेताना पालकांना कोणत्या अडचणी येतात, त्यासाठी काय केले पाहिजे. ‘पालक’ हे मुलांचे पहिले गुरु असतात त्यामुळे त्यांचे अनुकरण ते करत असतात म्हणूनच  पालकांनी आधी स्वतः अवलंबवाव्यात ज्यातून ते शकू शकतात यातूनच ते भविष्यात उत्तमोत्तम कामगिरी करू शकतात.अशा भावना सोनू गुप्ता यांनी मांडल्या.

आजच्या मुलांमध्ये संयमाची खूप कमी असल्याचे दिसून येते. कोणतीही गोष्ट मिळाली नाही कि त्यांचा चिडचिड सुरू होते. संयम ठेवणारी मुलेच भविष्यात कणखर,आत्मविश्वासी स्वावलंबी आणि संयमी होऊ शकतात. यासाठी त्यांना स्वतःची ओळख करून घ्यायला स्वतःची ओळख करू द्यायला थोडासा वेळ आणि मोकळीक द्या. त्यांच्या अनुभवातून त्यांना शिकायला वेळ द्या. असा सल्ला त्यांनी दिला.

नागपूरमध्ये एरोस्पेस अॅण्ड डिफेन्स सेंटर स्थापन करण्यासाठी विदर्भ डिफेन्स इंडस्ट्रीज असोसिएशनसोबत टाटा टेक्नोलॉजीजचा करार

पुणे – जागतिक स्तरावर इंजिनीअरिंग सेवा पुरवणाऱ्या टाटा टेक्नोलॉजीज लिमिटेडने विदर्भ डिफेन्स इंडस्ट्रीज असोसिएशनसोबत (व्हीडीआयए) सामंजस्य करारावर (एमओयू) स्वाक्षरी केली आहे. नागपूरमध्ये गेल्या आठवड्यात झालेल्या “मेड इन विदर्भ- एरोस्पेस अॅण्ड डिफेन्स” परिषदेत हा करार झाला. या भागीदारीच्या माध्यमातून नागपूरमध्ये एक अत्याधुनिक एरोस्पेस अॅण्ड डिफेन्स सेंटर स्थापन केले जाणार आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या एमओयूवर स्वाक्षऱ्या झाल्या.

“मेक इन इंडिया” उपक्रमाच्या पाठिंब्याने हे केंद्र महाराष्ट्राला अवकाशविषयक आणि संरक्षण साहित्याच्या उत्पादनातील गुंतवणुकीसाठी एक पसंतीचे स्थान म्हणून ओळख निर्माण करण्यात मदत करेल. त्याचप्रमाणे एतद्देशीय व आधुनिक तंत्रज्ञानात्मक क्षमतांना बढावा देईल आणि सुक्ष्म, छोट्या, मध्यम उद्योगांना अवकाश आणि संरक्षण क्षेत्रातील जागतिक स्पर्धेत उतरण्यासाठी आवश्यक कुशल संसाधनांचा विकास करण्यातही याची मदत होणार आहे. यासाठी एरोस्पेस आणि डिफेन्स क्षेत्राला सहाय्य करणारे ‘निर्माण’ हे ना-नफा तत्त्वावरील केंद्र स्थापन करण्यात येईल तसेच इंजिनीअरिंग संस्था आणि विद्यापीठांना स्पर्धात्मकतेवर आधारित शिक्षण पुरवणारा व उच्च कौशल्यविकास केंद्र स्थापन करणारा ‘उडान’ हा उपक्रम सुरू केला जाईल. टाटा टेक्नोलॉजीज लिमिटेड आणि महाराष्ट्र सरकारच्या पाठबळावरील व्हीडीआयए यांच्यातील भागीदारीमुळे राज्याचा विकास एक अवकाशविषयक व संरक्षणविषयक सामुग्रीचे उत्पादन व निर्यात करणारे केंद्र म्हणून होईल.

या सहयोगाबद्दल टाटा टेक्नोलॉजीजच्या आशियापॅसिफिक विभागाचे अध्यक्ष आनंद भदे म्हणाले, “मेड इन विदर्भ- एरोस्पेस अॅण्ड डिफेन्स हा एक उत्तम उपक्रम आहे आणि त्याच्याशी जोडले गेल्याचा आम्हाला अभिमान वाटतो. भारतातील एरोस्पेस आणि डिफेन्स उद्योगाला जागतिक स्तरावर स्पर्धात्मक होता यावे म्हणून संरक्षण-एकात्मिक विकासाला मदत करणारी अशा प्रकारची पहिलीच परिसंस्था निर्माण करण्याची व्हीडीआयएची योजना आहे. टाटा टेक्नोलॉजीज एरोस्पेस आणि डिफेन्स क्षेत्रात देऊ करत असलेली अनोखी सेवा यासाठी सुसंगत ठरेल.”

यावेळी व्हीडीआयएचे अध्यक्ष लेफ्टनंट जनरल (सेवानिवृत्त) श्री. रवींद्र थोडगे म्हणाले, “नागपूर अर्थातच विदर्भामध्ये एक एरोस्पेस आणि डिफेन्स उत्पादन केंद्र तयार करणे हे आमचे उद्दिष्ट आहे. या क्षेत्रातील आपल्या कौशल्याचा उपयोग करून घेत  प्रकल्पाला आवश्यक ती चालना देण्याची सर्वोत्तम क्षमता टाटा टेक्नोलॉजीमध्ये आहे.”

टाटा टेक्नोलॉजीजविषयी:

जगातील आघाडीच्या उत्पादकांसाठी काळाच्या पुढे चालणाऱ्या उत्पादनांचे डिझाइनिंग, इंजिनीअरिंग आणि पडताळणी करून टाटा टेक्नोलॉजीज उत्पादन विकासातील स्वप्ने सत्यात उतरवण्याचे काम करत आहे. जगभरातील ८५०० व्यावसायिकांच्या मदतीने काम करणारी टाटा टेक्नोलॉजीज म्हणजे उत्पादन उद्योगासाठी प्रगत इंजिनीअरिंग, संशोधन व विकास, उत्पादन जीवनचक्र व्यवस्थापन, सल्लागार सेवा व सॉफ्टवेअर तसेच कनेक्टेड एंटरप्राइज आयटी सोल्युशन्स पुरवणारा महत्त्वाचा भागीदार झाला आहे.

एनआयओ व्हिजन मॅराथॉन स्पर्धेत अनुराग कोंकर, समृद्धी पोल, शाश्वत शुक्ला, हिमांगी गोडबोले, वाघिशा कुमार, प्रवीण ठाकरे, सानिया केळकर यांना विजेतेपद

पुणे-नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ ऑपथेलमॉलजी(एनआयओ) आणि रन बडिज क्लब यांच्या तर्फे चौथ्या एनआयओ व्हिजन अर्ध मॅराथॉन स्पर्धेत अनुराग कोंकर, समृद्धी पोल, शाश्वत शुक्ला, हिमांगी गोडबोले, वाघिशा कुमार, प्रवीण ठाकरे, सानिया केळकर या धावपटूंनी आपापल्या गटांत प्रथम क्रमांक पटकावत विजेतेपद संपादन केले.

तसेच, 5कि.मी, 10कि.मी, 15कि.मी आणि 21कि.मी.या प्रकारात पार पडलेल्या या स्पर्धेत एकूण 1500 धावपटू सहभागी झाले होते यामध्ये 500 ब्लॉईंड फोल्डेड धावपटूंनी देखील सहभाग नोंदविला होता. स्पर्धेचा मार्ग रविंद्रनाथ टागोर स्कुल ऑफ ऑक्सलेन्स, बाणेर येथुन स्पर्धेला प्रारंभ झाला आणि औधच्या दिशेने पुन्हा फिरून रविंद्रनाथ टागोर स्कुल ऑफ ऑक्सलेन्स, बाणेर असा मार्ग होता. एनआयओ व्हिजन मॅराथॉन स्पर्धेत यावर्षी बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड तयार करण्याचा प्रयत्न करण्यात आला असून यामधुरे डोळेबांधून धावण्याचा विक्रम करण्याचा प्रयत्न केला गेला.

अर्ध मॅराथॉन (21 किलोमीटर) पुरूष खुला (40वर्षाखालील)गटात अनुराग कोंकरने 1:26:11सेकंद वेळ नोंदवत पहिला क्रमांक पटकावला. तर, हिरेन पटेल व हरीशचंद्र लोहटकर यांनी अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक पटकावला. महिला गटात समृद्धी राजपूतने  1:56:39सेकंद वेळ नोंदवून अव्वल क्रमांक पटकावला. याच गटात कीर्ती पोलने 2:21:28सेकंद आणि प्राची वापलेकरने  2:23:36सेकंद वेळ नोंदवून अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक पटकावला.10 किलोमीटर पुरूष खुला(40वर्षाखालील)गटात शाश्वत शुक्लाने 39:22सेकंद वेळ नोंदवत प्रथम क्रमांक पटकावला.

स्पर्धेतील विजेत्यांना करंडक व पदके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण एनआयओ व्हिजनचे  डॉ.श्रीकांत केळकर व एनआयओच्या संचालिका जाई केळकर यांच्या हस्ते होणार आहे. रनबडिज्‌ क्लबचे अरविंद बिजवे, निखिल शहा आदी मान्यवर उपस्थित होते.

स्पर्धेचा सविस्तर निकाल (प्रथम, व्दितीय व तृतीय या क्रमानुसार)
5 किलोमीटर: पुरूष खुला गट(40वर्षाखालील)गट: 1.सानिध्य 23:50से, 2.आशिष चंदनशीव 25:23से, 3.प्रथमेश 25:40से;
महिला खुला गट(40वर्षाखालील)गट: 1.वाघिशा कुमार 27:41से, 2.अवनी डोंगरे 30:21से, 3.दिया कुमार 30:49से;
पुरूष वरिष्ठ गट(40वर्षावरील)गट: 1.प्रवीण ठाकरे 31:14से, 2.संतोष सनब 33:39से, 3.समीर तटके 34:57से;
महिला वरिष्ठ गट(40वर्षावरील)गट: 1.सानिया केळकर 34:44, 2. सपना रासकर 35:23से, 3.दीपा नायर 41:24से;

10 किलोमीटर: पुरूष खुला गट(40वर्षाखालील)गट: 1.शाश्वत शुक्ला 39:22से, 2.अजय कुमार 40:27से, 3.जोमन मॅथ्यू चैयान 45: 17से;
महिला खुला गट(40वर्षाखालील)गट: 1.हिमांगी गोडबोले 51:33से, 2.संजना सक्सेना 52:11से, 3.स्वरा अहळूवालिया 52:47से;
पुरूष वरिष्ठ गट(40वर्षावरील)गट: 1.पराग 43:19से, 2.सुहास अंबराळे 44:03से, 3.आशिष पुनतांबेकर 44:36से;
महिला वरिष्ठ गट(40वर्षावरील)गट: 1.स्मिता कुलकर्णी 54:53से, 2.आरती मराठे 58:36से, 3.वर्षा शिंदे 1:00:20से;

15 किलोमीटर: पुरूष खुला गट(40वर्षाखालील)गट: 1.तहसीन खान 1:11:04से, 2.सागर लुईटेल 1:21:06से, 3.आलोक चौथरी 1:23:10से;
महिला खुला गट(40वर्षाखालील)गट: 1.कुझांग डोल्मा 1:43:05से, 2.रश्मी महाजन 1:44:43से, 3.मोनिशा शर्मा 1:49:29से;
पुरूष वरिष्ठ गट(40वर्षावरील)गट: 1.श्रीगणेश नाडगौडा 1:11:15से, 2.रोहित कुंडणया 1:24;51से, 3.सागर कवळे 1:25:38से;
महिला वरिष्ठ गट(40वर्षावरील)गट: 1.शिल्पा सरनाईक 1:57:05से, 2.नीला ननावरे 2:35:27से;

अर्ध मॅराथॉन (21 किलोमीटर): पुरूष खुला गट(40वर्षाखालील)गट: 1.अनुराग कोंकर 1:26:11से, 2.हिरेन पटेल 1:33:47से, 3.हरीशचंद्र लोहटकर 1:36:21से;
महिला खुला गट(40वर्षाखालील)गट: 1.समृद्धी राजपूत 1:56:39से, 2.कीर्ती पोल 2:21:28से, 3.प्राची वापलेकर 2:23:36से;
पुरूष वरिष्ठ गट(40वर्षावरील)गट: 1.संजय पंडित 1:33:51से, 2.प्रसाद मिझार 1:43:58से, 3.निखिल दाता 1:45:22से;
महिला वरिष्ठ गट(40वर्षावरील)गट: 1.चैनया पाध्ये 1:39:07से, 2.कविता रेड्डी 1:44:46से, 3.तन्मयी करमरकर 1:54:28से.