पुणे-एच आय व्ही ग्रस्त मुलांच्या संगोपनासाठी जबाबदारी घेतलेल्या ममता फौन्डेशनला नगरसेवक राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रकाश कदम पुणे मनपा यांनी या संस्थेला स्वतःची 30 लाख रुपये किमतीची तिन गुंठे जागा
महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसा निमित्त प्रदान केली .
येथील भुरुक दापत्यांने गुजर निंबाळकर वाडी येथे 2मुलांपासुन चालू केल्यानंतर ती संख्या 33 झाली अन जागेची कमतरता भासू लागली जागेसाठी अनेकांनी त्यांना मदतीची आश्वासने दिली पण शब्द दिलेल्यांनी शब्द पाळला नाही
नगरसेवक प्रकाश कदम यांचे जवळचे मित्र माजी सरपंच दिपक गुजर; गुजर निंबाळकरवाडीचे सरपंच व्यंकोजी खोपडे तसेच प्रकाश कदम यांच्या विचारातून तयार झालेले दोन तरूण कार्यकर्ते महेश धुत व प्रसाद बांदल यांच्या प्रयत्नातून एच आय व्ही ग्रस्त असलेल्या लहान मुलांच्या संगोपनासाठी निवाऱ्यासाठी तीन गुंठ्यात छान अशी इमारत तयार होतेयं या सारखा आनंद नाही असे यावेळी भूरूक यांनी म्हटले.
समाजसेवा मनापासून केली तरं देवरुपी माणसं मदतीला आहेत, दोन हजार एकोणीस ला दादांच्या वाढदिवशी हि इमारत पुर्ण होईल असेही ते म्हणाले.
अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त यावेळी विठ्ठलराव वरुडे पाटील, युवा नेतृत्व प्रतिक कदम, राहुल काळे आकाश मोडक, ऋषिकेश कारले ,महेश, धुत प्रसाद, बांदल चेतन काळे यांनी मुलांना फळे वाटप केले