Home Blog Page 3095

पुणे लोकसभा -कॉंग्रेसचा कि राष्ट्रवादीचा उमेदवार याचा निर्णय राहुल गांधी आणि शरद पवार च घेतील – अशोक चव्हाण

0

पुणे – पुणे लोकसभा मतदारसंघात उमेदवार देण्याची घोषणा माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केली होती; परंतु यासंदर्भात राहुल गांधी आणि शरद पवार अंतिम निर्णय घेतील, असे वक्तव्य त्यांनी केले होते. त्यामुळे स्थानिक कार्यकर्ते व पदाधिकारी यांना विचारात घेऊन निवडून येण्याची क्षमता असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल, असे स्पष्टीकरण कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केले. चव्हाण म्हणाले, “”कोणत्याही निवडणुकीत जिंकणारा उमेदवार असावा असे प्रत्येक पक्षाचे मत असते. मतदारसंघातील राजकीय परिस्थिती पाहून त्यानुसार स्थानिक नेत्यांनी चर्चा करून मत व्यक्त केले असेल; परंतु उमेदवारीच्या निर्णयावर अद्याप निर्णय झालेला नाही. पक्षांतर्गत चर्चा करून योग्य त्या वेळी निर्णय घेतला जाईल. सध्या राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस पक्षाच्या आघाडीसंदर्भात उच्चस्तरावरून कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही. स्थानिक पातळीवरील परिस्थिती विचारात घेऊन स्थानिक नेत्यांना कार्यकर्त्यांशी चर्चा करून हा निर्णय घेतला जाईल; परंतु उमेदवार देताना जिंकणारा उमेदवार देण्यावर भर असेल,” असे संगितले

राष्ट्रवादी काँग्रेसकडून सरकार विरोधात राज्यभरात काढण्यात आलेल्या हल्लाबोल यात्रेनंतर आता, आघाडीमधील मुख्यपक्ष असणाऱ्या काँग्रेसकडून जनसंघर्ष यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. 31 ऑगस्टपासून कोल्हापूरमधून जनसंघर्ष यात्रेला सुरुवात होणार असल्याची देखील माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी दिली आहे.
मोदी सरकारच्या चार वर्षाच्या कार्यकाळात देशभरात केवळ घोषणांंचा पाऊस पडला आहे. मात्र, एकही आश्वासन पूर्ण करण्यात आलेले नाही, त्यामुळे जनतेचा विश्वासघात झाला असल्याचा आरोप यावेळी अशोक चव्हाण यांनी केला.
भाजपच्या सत्ताकाळात लोकशाही धोक्यात आली आहे. त्यामुळे लोकांपर्यंत जाऊन आजची वस्तुस्थिती सांगणे गरजेचे आहे. त्यामुळे काँग्रेसकडून जनसंघर्ष यात्रेचे आयोजन करण्यात आले असल्याचे अशोक चव्हाण म्हणाले.

महावितरणकडून वीजचोरीची माहिती देणाऱ्यांना ४१ लाखाच्या बक्षिसाचे वितरण

0

मुंबई, –  महावितरणतर्फे राबविण्यात येणाऱ्यावीजचोरी कळवा बक्षीस मिळवाया योजनेमध्ये वीजचोरीची माहिती देणाऱ्यांना मागील वर्षांत सुमारे  ४१ लाख रुपये रोख रक्कम म्हणून बक्षीस स्वरुपात देण्यात आली आहे. वीजचोरीला आळा बसावा यासाठी महावितरणतर्फे वीजचोरीविरुध्द सातत्याने मोठ्या प्रमाणात मोहिमा राबविण्यात येत असतात. तरी देखील काही वीजग्राहक नवनवीन युक्त्या वापरून विजेची चोरी करीत असतात. अशा वीजचोरीची माहिती देणाऱ्यांना वीजचोरीच्या अनुमानित रक्कमेच्या १० टक्के रक्कम रोख स्वरुपात बक्षीस म्हणून देण्यात येतेवीजचोरी करणाऱ्या ग्राहकाने तडजोड रकमेसह वीजचोरीची संपूर्ण रक्कम भरल्यानंतरच बक्षीस देण्यात येत असून माहिती देणाऱ्याचे नाव देखील गुप्त ठेवण्यात येत असते.

 २०१५१६, २०१६१७ आणि २०१७१८ या आर्थिक वर्षात अशा स्त्रोतांद्वारे वीजचोरीच्या ३६ ठिकाणांची माहिती मिळालीया ठिकाणी महावितरणच्या भरारी पथकाने टाकलेल्या धाडीत सुमारे कोटी १० लाख रुपयांची वीजचोरी उघडकीस आली असून ही संपूर्ण रक्कम वीजचोर ग्राहकांकडून वसूल करण्यात आली आहेयोजनेनुसार या वीजचोरीची १० टक्के रक्कम माहिती देणाऱ्याला रोख स्वरूपात बक्षीस रुपाने देण्यात आली आहे.

 या संदर्भात व्हिडीओ कॉन्फर्सिंगमध्ये महावितरणचे अध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक श्री. संजीव कुमार यांनी ज्या भागात जास्त वीजचोऱ्या आहेत, त्या भागात भरारी पथकाने सातत्याने भेटी द्याव्यात आणि स्थानिक जनतेच्या सहकार्याने वीजचोरांविरूध्द कारवाई करावी, असे निर्देश दिले. महावितरणने वीजचोरी पकडण्यासाठी सर्व मंडलस्तरांवर भरारी पथकांची स्थापना केली आहे. या भरारी पथकाद्वारे वीजचोरीविरुध्द सातत्याने मोहिमा राबविण्यात येत असतात.

सामाजिक न्याय विभागांतर्गत येणाऱ्या महामंडळांनी अधिक प्रभावीपणे काम करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0

मुंबई : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर विशेष सामुहिक प्रोत्साहन योजनेंतर्गत नवीन उद्योगांसाठी 52 भूखंडांचे वाटप करण्यात आले आहे. ऑगस्ट 2018 मध्ये 54 भूखंड अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या उद्योजकांना राखून ठेवण्यात आलेले आहेत. सामाजिक न्याय विभागांतर्गत येणाऱ्या विविध विकास महामंडळांचे काम अधिक प्रभावी झाले पाहिजे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिले.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची आढावा बैठक आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले, राज्यमंत्री दिलीप कांबळे उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, जातपडताळणी वैधता प्रमाणपत्र सुलभतेने उपलब्ध करण्याबाबत विद्यार्थ्यांना कुठलीही अडचण येवू नये. भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजना, राज्य शासनाची मॅट्रीकोत्तर शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजना व इतर शिष्यवृत्ती योजनांसाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही. तसेच अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तींचा विकास करण्यासाठी जास्तीत जास्त निधीचा वापर करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

राज्यातील अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या उद्योजकांना स्वयंपूर्ण व आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्याच्या उद्देशाने आणि ओद्योगिक वाढीच्या मुख्य प्रवाहात सामील करुन घेण्यासाठी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर विशेष सामुहिक प्रोत्साहन योजनेंतर्गत नवीन उद्योगांसाठी 52 भूखंडांचे वाटप करण्यात आले आहे. ऑगस्ट 2018 मध्ये 54 भूखंड अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या उद्योजकांना राखून ठेवण्यात आलेले आहेत. केंद्र शासनाच्या स्टँडअप इंडिया या योजनेंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या लाभार्थ्यांना सवलतीच्या दरात कर्ज उपलब्ध करुन देणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध शेतकऱ्यांना शाश्वत सिंचनाच्या सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी जास्तीत जास्त निधी देणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी सामाजिक न्याय विभागांतर्गत येणाऱ्या विविध योजना व महामंडळांच्या कामकाजाचा आढावा घेतला.

बैठकीस मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रविण परदेशी, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, समाजकल्याण आयुक्त मिलिंद शंभरकर, अपंग कल्याण आयुक्त रुचेश जयवंशी यांच्यासह विविध महामंडळांचे अधिकारी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळण्यासाठी फॅसीलीटेशन सेंटर सुरु करावेत … निवासी उपजिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख

0

पुणे-उच्च व तंत्र शिक्षण विभाग, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग आणि कृषी,
पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय व मत्सव्यवसाय विभाग यांच्या अख्यत्यारितील मान्यताप्राप्त अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश
घेणाऱ्या, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील पात्र विद्यार्थ्यांना राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क
शिष्यवृत्ती योजनेचा लाभ मिळावा यासाठी, महाविद्यालयांनी फॅसीलीटेशन सेंटर्स् तातडीने सुरु करावे, अशी
सूचना निवासी उपजिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख यांनी आज येथे केली.
राजर्षी शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना व डॉ.पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता
योजनांची जिल्हयात सुरु असलेल्या अंमलबजावणीच्या आढाव्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक
आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत सहभागी झालेल्या शिक्षण विभाग, विविध महाविद्यालयांचे
प्राचार्य व प्रतिनिधी यांच्याशी संवाद साधताना निवासी उपजिल्हाधिकारी बोलत होते. बैठकीमध्ये दोन्ही
योजनांच्या अंमलबजावणीमध्ये येणाऱ्या अडचणींचा आढावा घेण्यात आला. योजनांच्या अंमलबजावणीमध्ये
येणाऱ्या अडचणी संबधित महाविद्यालयांनी तातडीने सोडवाव्यात, असे निर्देशही निवासी उपजिल्हाधिकारी
यांनी यावेळी संबधितांना दिले. महसूल विभागातर्फे शिष्यवृत्तीसाठी आवश्यक असणारे दाखले विद्यार्थ्यांना
शिघ्रतेने देण्यात येतील. तसेच शिष्यवृत्ती प्रदानामध्ये होणारा विलंब टाळण्यासाठी समाज कल्याण
विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत लवकरच बैठक घेऊन त्यावर तोडगा काढण्यात येईल असे त्यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांच्या हितासाठीच्या या योजनांची अंमलबजावणी काटेकोरपणे करावी असेही ते म्हणाले. बैठकीला
शिक्षण विभागाचे अधिकारी, महाविद्यालयांचे प्राचार्य, अधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते.

डॉ.प्रमोद मुळे स्मृती करंडक पुणे जिल्हा मानांकन अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धेत मानांकीत खेळाडूंनी उद्घाटनाचा दिवस गाजवला

0

पुणे- पीवायसी हिंदू जिमखाना क्‍लब यांच्या वतीने आयोजित व पुणे जिल्हा टेबल टेनिस संघटनेच्या मान्यतेनेखाली होत असलेल्या डॉ. प्रमोद मुळ्ये स्मृती करंडक पुणे जिल्हा मानांकन अजिंक्‍यपद टेबल टेनिस स्पर्धेत शौनक शिंदे,  करण कुकरेजा, पृथा वर्टीकर, स्वप्नाली नरळे या मानांकीत खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून आजचा उद्घाटनाचा दिवस गाजवला. 

पीवायसी क्‍लबच्या कम्युनिटी हॉलमध्ये आजपासून सुरु झालेल्या या स्पर्धेत  18 वर्षाखालील मुलींच्या गटात उपउपांत्यपुर्व फेरीत अव्वल मानांकीत पृथा वर्टीकरने आपल्या लौकीकाला साजेशी खेळी करत धनश्री पवार हीचा 11/8,11/6,11/1 असा पराभव करत उपांत्यपुर्व फेरी गाठली. दुस-या मानांकीत स्वप्नाली नरळेने तितिक्षा पवारचा 11/5,11/3,11/8 असा तीन सेटमध्ये पराभव केला. चौथ्या मानांकीत प्रीती गाढवेने पृथा आचरेकरचा 11/5,11/7,11/6 असा पराभव करत  उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश केला.

18 वर्षाखालील मुलांच्या गटात दुस-या फेरीत अव्वल मानांकीत  शौनक शिंदेने अरमान जेसवानी वर 11/4,11/5,11/7 असा विजय मिळवला. दुस-या मानांकीत  आरुष गलपल्ली याने सिद्धार्थ भीमपुरेला 11/6,11/8,11/3 असे नमविले तर अतितटीच्या झालेल्या सामन्यात  आदित्यवर्धन त्रिमल याने वरद प्रभुणेचा 11/9,6/11,11/8,8/11,13/11 असा संघर्षपुर्ण पराभव केला.

स्पर्धेचे उदघाटन पीवायसी हिंदू जिमखानाचे टेबल टेनिस विभागाचे सचिव गिरीश करंबेळकर, विद्या मुळ्ये,  यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पीडीटीटीएचे सचिव श्रीराम कोणकर, संयोजन सचिव अविनाश जोशी, उपेंद्र मुळ्ये, कपिल खरे आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेचा सविस्तर निकाल:18 वर्षाखालील मुली- उपउपांत्यपुर्व फेरी

पृथा वर्टीकर(1)वि.वि.धनश्री पवार11/8,11/6,11/1
श्रुती गभाने(8)वि.वि.मयुरी ठोंबरे11/8,11/5,11/8
अनिहा डिसुझा(5)वि.वि.प्रीती साळुंके11/5,14/12,11/6
प्रीती गाढवे(4)वि.वि.पृथा आचरेकर11/5,11/7,11/6
मृण्मयी रायखेलकर(3)वि.वि.सृष्टी मिरपगारे11/2,11/3,11/4
अंकिता पटवर्धन(6)वि.वि.वैष्णवी देवघडे11/6,11/6,13/11
पूजा जोरवार(7)वि.वि.सिद्धी आचरेकर8/11,11/9,11/5,11/6
स्वप्नाली नरळे(2)वि.वि.तितिक्षा पवार 11/5,11/3,11/8

दुसरी फेरी: 18 वर्षाखालील: मुले:

शौनक शिंदे(1)वि.वि.अरमान जेसवानी 11/4,11/5,11/7
आदित्यवर्धन त्रिमल वि.वि.वरद प्रभुणे11/9,6/11,11/8,8/11,13/11
गौरव लोहपत्रे(9)वि.वि.अर्णव भालवलकर11/2,11/6,11/6
अर्चन आपटे(8)वि.वि.आदित्य जोरी11/5,8/11,11/6,12/10
आदर्श गोपाळ(5)वि.वि.मिहीर मोहिते11/6,11/8,11/6
सनत जैन वि.वि.हार्दिक क्षीरसागर11/5,11/3,11/8
श्रीयश भोसले(4)वि.वि.योगेश नाडगौडा11/1,11/2,11/5
करण कुकरेजा(3)वि.वि.प्रणव अब्दलवार13/11,11/9,11/7
साई बगाटे वि.वि.गणेश सिंग11/2,11/3,11/6
रोहित गोगटे वि.वि.जय पेंडसे6/11,11/5,11/6,11/8
मिहीर डंके(7)वि.वि.श्लोक दोभाडे11/4,11/7,11/8
आर्यन पानसे(10)वि.वि.अमिश आठवले11/7,6/11,11/8,11/7

आरुष गलपल्ली(2)वि.वि.सिद्धार्थ भीमपुरे11/6,11/8,11/3

दाभोळकर हत्येच्या सुत्राधारांपर्यंत पोहोचणार कधी ? आणि त्यांना शिक्षा होणार कधी ? सनातन वर बंदी घालणार कधी ? पृथ्वीराज चव्हाणांचे सवाल

0

पुणे–महाराष्ट्र सरकार सनातन संस्थेवर बंदी का घालत नाही असा प्रश्न उपस्थित करत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी महाराष्ट्र सरकारला , हत्या घडवून आणणाऱ्या मुख्य सूत्रधारापर्यंत पोहोचणार कधी ? आणि त्यांना शिक्षा होणार कधी ? असे सवाल केले आहेत .

 पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सनातन संस्थेवर बंदी घालण्याची मागणी आघाडी सरकारच्या काळात महाराष्ट्र सरकारने केंद्राला केली होती. मात्र एखादी संघटना किंवा संस्थेवर बंदी घालायची असल्यास त्यासाठी इतर राज्याचा अभिप्राय घ्यावा लागतो. त्या प्रक्रियेमुळे बंदीचा निर्णय राहिला. मात्र विचारवंतांच्या हत्या लक्षात घेऊन भाजपा सरकारने या संस्थेवर बंदी का घातली नाही? असा प्रश्न पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केला.

महाराष्ट्र सरकार या प्रकरणात बोटचेपी भूमिका घेत असून सनातन संस्थेबाबत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी.अशी मागणीही पृथ्वीराज चव्हाण यांनी  केली. पुण्यातील काँग्रेस भवन येथे प्रदेश अध्यक्ष माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती.त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सनातन संघटनेबाबत भूमिका मांडली.

यावेळी पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की,आघाडी सरकारच्या काळात आम्ही सनातनवर बंदी घालण्याची मागणी केंद्राकडे मागणी केली होती.त्यानंतर डॉ नरेंद्र दाभोलकर यांची हत्या झाली.या हत्या प्रकरणी खंडेवाल आणि नागोरी ची नाव समोर आली.त्याला काही काळ होत नाही. तोपर्यंत रविंद्र तावडे आणि आता सचिन आंदुरे ही अशी नावे समोर येत आहे.नरेंद्र दाभोलकर ते गौरी लंकेश हत्या प्रकरण लक्षात घेता.दररोज किंवा दिवसांनी नवीन नावे समोर येत आहे.त्यामुळे मुख्य सुत्रधारापर्यंत  पोहचणार कधी आणि या विचारवंतांच्या मारेकऱ्याना शिक्षा मिळणार का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

 

सचिन आंदुरे आणि भाजपा नगरसेवक धीरज घाटे 3 वर्षापूर्वी एफसी मध्ये बरोबर होते ; जितेंद्र आव्हाडांचा आरोप

0

पुणे-अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्याप्रकरणी सीबीआयच्या कोठडी असणारा सचिन अंदुरे याच्याशी पुण्यातील भाजपा नगरसेवक धीरज घाटे यांचे संबंध असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटद्वारे केला आहे. तर, धीरज घाटे यांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावत आव्हाड यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्याचा इशारा दिला आहे.

दाभोलकर यांच्या हत्येला पाच वर्ष पूर्ण झाली आहेत. याप्रकरणी दोन दिवसांपूर्वी सचिन आंदुरे याला सीबीआयने अटक केली असून न्यायालयाने त्याला आठवडाभराची कोठडी सुनावली आहे. या सर्व घडामोडी होत असताना आज राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पुण्यातील भाजपचे नगरसेवक धीरज घाटे यांचे सचिन आंदुरेशी संबंध असल्याचे ट्विट केले आहे.

दरम्यान, आव्हाड यांनी म्हटले आहे की, जेएनयूमध्ये कन्हैय्याकुमार आणि उमर खलीदच्या मुद्यांवरून पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये आव्हाड यांनी मार्च २०१५ मध्ये आंदोलन केले होते. त्यावेळी आव्हाड यांच्यावर हल्ला करण्यात आला होता. त्यावेळी तेथे सचिन अंदुरे आणि धीरज घाटे सोबत उपस्थित होते. आव्हाड यांच्या ट्विटनंतर पुण्याच्या राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क काढले जात आहे. यावर घाटे यांनी प्रतिक्रिया घेतली असता त्यांनी आपल्यावरील हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

फर्ग्युसन महाविद्यालयातील त्यावेळचे सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासातून सर्व सत्य बाहेर येईल असे आपल्यावरील आरोपांना उत्तर देताना घाटे यांनी म्हटले आहे. दरम्यान, जितेंद्र आव्हाड आणि धीरज घाटे यांच्यातील ट्विट युद्धामुळे पुण्याच्या राजकीय क्षेत्रासह सोशल मीडियावर अनेक चर्चांना उधाण आले आहे.

‘सनातन’वर बंदीबाबत तत्कालीन राज्य सरकारने पाठपुरावा केला नाही!

0

सुशीलकुमार शिंदे यांचा काँग्रेसला घरचा आहेर

सोलापूर : ‘सनातन’वर बंदी घालण्याची मागणी काँग्रेस-राष्ट्रवादी जोरकसपणे मांडत असताना माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी मात्र तत्कालीन राज्य सरकारकडे बोट दाखवले आहे. राज्यातील तत्कालीन काँग्रेस आघाडी सरकारने केंद्र सरकारकडे योग्य पाठपुरावा न केल्यामुळे ‘सनातन’वर बंदी घालण्याचा निर्णय होऊ शकला नाही, असे शिंदे यांनी सोमवारी स्पष्ट केले.

दहशतवादीविरोधी पथक आणि केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) काही संशयित हिंदुत्ववादी दहशतवाद्यांना अटक केली आहे. या अटकेच्या पाश्र्वभूमीवर सनातन संस्थेवर बंदी घालण्याचा मुद्दा पुन्हा चर्चेला आला आहे. ‘‘आपण राज्याचे मुख्यमंत्री असताना सनातन संस्थेवर बंदी घालण्याबाबतचा अहवाल केंद्रातील तत्कालीन यूपीए सरकारकडे दिला होता’’, असे काँग्रेसचे नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे. मात्र, राज्यात आणि केंद्रात तेव्हा काँग्रेसचेच सरकार असताना महाराष्ट्र सरकारने ‘सनातन’वर बंदी घालण्याबाबत पाठवलेल्या या अहवालावरून काँग्रेस नेत्यांमध्येच जुंपली आहे.

सनातन संस्थेवर बंदी घालण्यासाठी तत्कालीन महाराष्ट्र सरकारने प्रस्ताव पाठवला तेव्हा मी केंद्रात गृहमंत्री नव्हतो, असे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी स्पष्ट केले. ‘‘महाराष्ट्र शासनाने सनातन संस्थेवर बंदी घालण्याबाबतचा प्रस्ताव त्याआधी म्हणजे साधारणत: २००८ मध्ये पाठविला. मी २०१२ मध्ये केंद्रात गृहमंत्री झालो. मात्र, तरीही त्या वेळी आपल्याकडे संबंधितांनी पाठपुरावा केला असता तर हा बंदीचा निर्णय कदाचित मार्गी लागला असता. हा प्रस्ताव ज्या तत्कालीन केंद्रीय गृहमंत्र्यांकडे पाठविण्यात आला त्यांचे नाव उघड करावे, म्हणजे वस्तुस्थिती समोर येईल’’, असे शिंदे म्हणाले.

या प्रश्नावर यापूर्वीही एक-दोन वेळा असेच आरोप झाले होते, त्या वेळीही आपण खुलासा केल्याचेही शिंदे यांनी सांगितले.

 

तरुणांनी उन्नतीसाठी सर्वांगीण विचार करावा – पुलकसागरजी महाराज

0

पुणे-यश हा प्रत्येक व्यक्तीचा कर्मसिद्ध अधिकार आहे. यश केवळ मेहनतीने नाही मिळत, ती कोणत्या दिशेने करतात यावर अवलंबून असते. आजच्या तरूणाईमध्ये गती आहे, मात्र त्यांच्यामध्ये दिशेचे ज्ञान नाहीये. तसेच अनेकवेळा मेहनत करूनही आपल्याला यश मिळत नाही. अशावेळी आपण नशीबाला दोष देत असतो. मात्र अपयशाचे कारण हे आपल्या चूका असू शकतात याबाबत फारसा विचार केला जात नाही. आपण करत असलेली मेहनत योग्य दिशेने होत आहे की नाही, याबाबबत योग्य आकलन केले पाहिजे. तुमचे करिअर केवळ मेहनतीने घडणार नाही, त्यासाठी स्मार्ट वर्कची गरज आहे,” असे मत मुनिश्री प.पु. १०८  पुलकसागर महाराज यांनी व्यक्त केले. 
तसेच इतरांच्या निर्णयावर अवलंबून न राहता, स्वत:ची रूची, क्षमता यांचा विचार करून स्वत:चे निर्णय स्वत: घ्यावे आणि सुनियोजित पद्धतीने काम करावे, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. 
    सकल जैन वर्षा योग समितीतर्फे मुनिश्रींच्या चातुर्मासाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त ज्ञानगंगा महोत्सव या मुनिश्रींच्या प्रवचन कार्यक्रमास धर्मानुरागी रसिकलाल एम. धारिवाल नगरी, महालक्ष्मी लॉन्स येथे प्रारंभ झाला आहे. यावेळी ज्ञानगंगा महोत्सवात प्रवचनाचे नववे पुष्प गुंफतांना स्मार्ट करिअरया विषयावर ते बोलत होते. समितीच्या अध्यक्षा शोभा धारिवाल, कार्याध्यक्ष मिलिंद फडे, आर. एम फाऊंडेशनच्या जानवी धारिवाल, उपाध्यक्ष अजित पाटील, सुजाता शहा, संजीव नाईक, सुदिन खोत हे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरूवात मुनिश्रींचे पादप्रक्षालन करून करण्यात आली. कमल कासलीवाल , संजय नाईक परिवार यांच्या हस्ते हा विधी संपन्न झाला. यानंतर प्रगती महिला सोशल ग्रुपतर्फे मंगलाचरण सादर करण्यात आले. स्वागत व प्रास्ताविक कार्याध्यक्ष मिलिंद फडे यांनी केले. 
     रविवारी (दि २०) दुपारच्या सत्रात भक्तांबर स्त्रोत्राचे शास्त्रोक्त पद्धतीने अनुष्ठान कसे करायचे याविषयी सुजाता फुलफगर यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी हजारोंच्या संख्येने जैन भगिनी बांधव उपस्थित होते. कार्यक्रमात सहकुटुंब सहभागी होत त्यांनी शास्त्रोक्त पद्धतीने भक्तांबर अनुष्ठानाचे मार्गदर्शन तर घेतलेच तसेच मंत्राबद्‌द्‌ल जाणून घेत अर्घ्यदेखील दिले. यावेळी समितीच्या अध्यक्षा शोभा धारिवाल,कार्याध्यक्ष मिलिंद फडे ,अंजली शहा,आनंदी शहा, गंधाली कोठडिया हया व्यासपीठावर उपस्थित होत्या. याप्रसंगी सुजाता फुलफगर म्हणाल्या, ‘भगवान,भक्त आणि भक्ती यांचा त्रिवेणी संगम म्हणजे “भक्तांबरस्तोत्र आहे. या स्तोत्राच्या प्रत्येक बीजाक्षरामध्ये अलौकिक शक्ती आहे. यांच्या नियमित उच्चाराने विविध आरोग्यविषयक समास्यांचे निराकरण होते. त्यामुळेच या भक्तांबर अनुष्ठानाला विशेष महत्व प्राप्त होते.” 
    या महोत्सवात रविवारी (दि. २०) सायंकाळी खासदार राजू शेट्टी यांनी मुनिश्रींना श्रीफळ अर्पण करून त्यांचा आशीर्वाद घेतला. तसेच मुनिश्रीनी कोल्हापूरला यावे असे निमंत्रणही दिले.यावेळी राजू शेट्टी म्हणाले की,कोल्हापूर सांगली परिसरात जैन समाज मोठा असून तो प्रामुख्याने शेती व्यवसायात आहे.आधुनिक तंत्रज्ञानाचा  वापर करून शेतीत प्रगती करणारे हे जैन शेतकरी बांधव जैन आचारांचे आचरण करीत असतात. सध्या राज्यात शेतकरी हे मानसिक तणावाखाली आहेत. त्यांना या परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी अध्यात्म अतिशय उपयुक्त ठरेल. त्यामुळे मुनिश्रींनी कोल्हापूरला येऊन तेथील लोकांना मार्गदर्शन करावे, अशी विनंतीदेखील त्यांनी यावेळी केली. 

     २१ ऑगस्ट कार्यक्रम – सकाळी ९ वाजता मुनिश्रींचे “मिठी जुबान का जादूयाविषयावर प्रवचन होईल. या चातुर्मासानिमित्त रसिकलाल एम धारिवाल फाउंडेशनतर्फे ३ सप्टेंबरपर्यंत रक्तदान महायज्ञ सुरू झाला आहे. त्यासाठी सर्व सुविधांनी परिपूर्ण अशी मोठी आर. एम. धारिवायल फाउंडेशनची बसही येथे उपलब्ध करण्यात आली आहे. 

दाभोळकर हत्या ; कधी पोहोचणार खऱ्या सूत्रधारांपर्यंत – अंनिसचा सवाल..

0

पुणे – महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला आज 5 वर्ष पूर्ण झाली आहेत. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची 20 ऑगस्ट 2013 रोजी पुण्यातील ओकांरेश्वर मंदिराजवळील महर्षी शिंदे पुलावर गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी डॉ. दाभोलकर यांच्यावर गोळ्या झाडणाऱ्यांमध्ये समावेश असलेल्या सचिन अंदुरेला अटक करण्यात आली आहे.  मात्र अद्यापपर्यंत या हत्येमागील सूत्रधाराचा शोध लागलेला नाही. या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी ज्या ठिकाणी त्यांची हत्या करण्यात आली,  त्याच महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलापासून आज सकाळी रॅली काढण्यात आली. या रॅलीत डॉ. हमीद दाभोलकर, डॉ. शैला दाभोलकर, मुक्ता दाभोलकर, समाजवादी नेते डॉ. बाबा आढाव, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, नाट्यदिग्दर्शक अतुल पेठे आदी सहभागी झाले होते. त्याचबरोबर तरुणांचा सहभागही मोठ्या प्रमाणावर होता. 

‘जवाब दो, जवाब दो, मोदी सरकार जवाब दो’, ‘विवेकाचा आवाज बुलंद करूया’, ‘फुले, शाहू, आंबेडकर, आम्ही सारे दाभोलकर’, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. डॉ. दाभोलकरांचे छायाचित्र तसेच घोषणांचे फलक यावेळी हातात धरण्यात आले होते. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलापासून रॅली लक्ष्मी रस्ता, अलका चौक, शास्त्री रस्त्याने रॅली सिंहगड रोडवरील साने गुरुजी स्मारक येथे आली.  

सकाळी शिंदे पुलावर जोशपूर्ण गीतांमधून दाभोळकरांना अभिवादन करण्यात आले. आज दिवसभर साने गुरुजी स्मारक येथे विवेकवादी विचारांचा जागर करण्यात आला   सकाळी 11 वाजता ‘व्यर्थ न हो बलिदान’ हे चर्चासत्र झाले . त्यात मेघा पानसरे, कविता लंकेश, श्रीविजय कलबुर्गी, मुक्ता दाभोलकर आणि तुषार गांधी जेष्ठ दिग्दर्शक अमोल पालेकर सहभागी झाले

एनआयपीएम च्या राष्ट्रीय अध्यक्षपदी विश्वेश कुलकर्णी यांची निवड

0

पुणे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पर्सोनेल  मॅनेजमेंट अर्थात एनआयपीएम ही  मनुष्यबळ विकास क्षेत्रातील राष्ट्रीय स्तरावरील संस्था असून संस्थेचे संपूर्ण देशभर पस्तीस हजार सभासद आहेत. ५३ विभागीय  केंद्रांमार्फत संस्था कार्यरत आहे. या संस्थेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी विश्वेश  कुलकर्णी यांची निवड झाली.  २०१८-२०२० या कार्यकाळासाठी  बहुमताने हि निवड करण्यात आली.

विश्वेश  कुलकर्णी हे ‘यशस्वी’ या संस्थेचे अध्यक्ष असून मनुष्यबळ व कौशल्य विकास या क्षेत्रामध्ये गेली ३०-३५ वर्षे कार्यरत आहेत.त्यांनी एनआयपीएमच्या पुणे विभागाचे अध्यक्ष म्हणूनही याआधी काम पाहिले होते. त्यांच्याच अध्यक्षतेखाली पुणे येथे पश्चिम विभागीय परिषद  आयोजित  करण्यात आली होती. तसेच येत्या २८ व २९ सप्टेंबर २०१८ रोजी पुणे येथे ‘नॅटकॉन’ ही आंतरराष्ट्रीय  परिषद आयोजित करण्यात आली असून या परिषदेसाठी सुमारे १५ देशांचे वक्ते व मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

विश्वेश  कुलकर्णी यांची  ‘राष्ट्रीय अध्यक्ष’ म्हणून निवड  झाल्याबद्दल विविध स्तरातून आनंद व्यक्त होत आहे. त्यांची या पदावर निवड झाल्याने ३५ वर्षांनंतर पुन्हा एकदा महाराष्ट्रातील नेतृत्वाला राष्ट्रीय स्तरावर आपली भूमिका मांडण्याची  संधी  मिळाली आहे.

मंडप व्यवसायिकांना गृहीत धरणे थांबवा -अन्यायाला वाचा फोडण्यासाठी पुणे व पिंपरी-चिंचवड मंडप असोसिएशनची स्थापना

0

पुणे : मंडपवाले हे सामाजिक उपक्रम व सार्वजनिक उत्सवांचे अविभाज्य भाग आहेत. परंतु, मंडपवाल्यांना सरकार, प्रशासन आणि काही मंडळांकडून अनेकवेळा दुजाभावाची वागणूक मिळते. कारवाईच्यावेळी मंडपवाल्यांचे नुकसान होते. अनेकदा ठरलेली रक्कम मिळत नाही. सामानांची मोडतोडबरोबरत अनेक अन्यायकारक प्रकार मंडप व्यावसायिकांना एकी नसल्याने आजपर्यंत सोसावे लागले आहेत. असोसिएशनमुळे मंडपवाल्यांवरील अन्यायाला वाचा फुटेल आणि मंडप व्यावसायिकांना आता गृहीत धरण्याचे प्रकार थांबवा, अशी भूमिका पुणे व पिंपरी-चिंचवड मंडप असोसिएशनच्या वतीने आज झालेल्या बैठकीत घेण्यात आली आहे.

पुणे व पिंपरी-चिंचवड मंडप असोसिएशनच्या वतीने औंध येथील पं. भीमसेन जोशी सभागृहात मंडप व्यावसायिकांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी संजय कांबळे, महेश देशपांडे, फ्रान्सिस डेव्हिड, नाना कांबळे, दगडे, अशोक ढोरे, अप्पा भूमकर, दिलीप ताटे, राहुल आपटे, विक्रम भोर, सुफियान चौधरी, सचिन भालेराव, राजु चेटीयार आदी मान्यवर उपस्थित होते. दोन्ही शहरांतील मंडप व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुणे व पिंपरी-चिंचवड शहरांत मिळून लहान-मोठे असे सुमारे 4 हजार मंडप व्यावसायिक आहेत.

गणेशोत्सव, नवरात्रोत्सव आणि इतर सण-उत्सवांबरोबरच लग्न व इतर सर्व उपक्रमांना मंडप व्यावसायिकाची गरज भासते. समाजाच्या आनंदाच्या कार्यक्रमांबरोबरच दुःखाच्या कार्यक्रमातही मंडप लागतोच. असे असताना मंडप व्यावसायिकांची अडवणूक करण्याची भूमिका प्रशासन, पोलीस व काही मंडळांकडून का घेतली जाते? असा प्रश्न बैठकीमध्ये उपस्थित करतानाच मंडप व्यावसायिकांनीदेखील आपापसाती मतभेद, स्पर्धा बाजुला ठेवून व्यावसायिक दृष्टीकोनातून काम करण्याची आवश्यकता व्यक्त करण्यात आली.

असोसिएशनच्या माध्यमातून मंडप व्यवसायासाठी लागणाऱ्या साहित्याची खरेदी, पोलीस कारवाई, मनुष्यबळाचा प्रश्न, प्रशासनाची कारवाई याबरोबरच नव्याने वाढत असलेल्या इव्हेंट मॅनेजमेंट व्यवसायामध्ये मंडप व्यावसायिकांचे वाढत असलेले महत्व याविषयी महत्वपूर्ण चर्चा यावेळी करण्यात आली.

नागरिक,प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्या समन्वयातून प्रश्न सुटतात – सौ मंजुश्री खर्डेकर…

0

पुणे- सामान्य नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी मी कटिबद्ध असून समक्ष भेटीतून आपले प्रश्न समजून घेऊन ते सोडविण्यासाठी मी ” नगरसेविका आपल्या दारी ” हा उपक्रम सुरु केला आहे, केवळ यंत्रणेस दोष देऊन प्रश्न सुटत नाहीत तर नागरिक प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या समन्वयातून प्रश्न सुटतात हा माझा अनुभव आहे असे नगरसेविका मंजुश्री खर्डेकरयांनी येथे सांगितले.

“नगरसेविका आपल्या दारी” या उपक्रमाअंतर्गत आयोजित करिष्मा सोसायटी समोरील कार्यक्रमात त्या बोलत होत्या .येथील सर्व सोसायट्यांना भेडसावणारे विविध प्रश्न मी सोडविण्यासाठी मी आपल्यासाठी कायम उपलब्ध असून माझ्या मोबाईल वर आपण तक्रार केल्यास २४ तासात आपला प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल असे ही मंजुश्री खर्डेकर म्हणाल्या.
तेजलकुंज,संगमश्री,कुणाल अपार्टमेंट,अवंतिका,चिंतामणी पार्क,लोटस रेसिडेन्सी,आश्लेषा अपार्टमेंट,गणेश पार्क,अनुषा,चिनार,स्वप्नाली सोसायटी यासह विविध सोसायटीतील पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त श्री वाकुडे,पोलीस निरीक्षक प्रतिभा जोशी,मनपा च्या पथ,ड्रेनेज,कचरा,उद्यान,अश्या विविध खात्यांचे अधिकारी श्री राजेश फाटले,श्री मुकुंद शिंदे,श्री खिरीड,श्री किरण गुरव, श्री शेख,श्री मोरे व अन्य उपस्थित होते.
यावेळी वाहतुकीपासून,कचरा,डास,ड्रेनेज ची झाकणे,किर्लोस्कर ब्रदर्स कंपनीती लावलेल्या सेन्सर मुले रात्री अपरात्री होणारे भोंग्यांचे आवाज,नो पार्किंग चे फलक लावण्याचे निर्णय,पावसाळी लाईन टाकण्याचे निर्णय यासह विविध प्रश्नांवर उपाययोजना सुचविण्यात आल्या व त्यासाठीचा कालबद्ध कार्यक्रम ही निश्चित करण्यात आला.
यावेळी भाजप शहर उपाध्यक्ष संदीप खर्डेकर,श्री जगदीश खेर,श्री सुरेश कुलकर्णी,श्री एंडीगिरी,सौ डंबिर,श्री संतोष वाघ यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
अश्याच प्रकारचा उपक्रम हैप्पी कॉलोनीत ही राबविण्यात आला,त्यास नगरसेविका मंजुश्री खर्डेकर,पोलीस निरीक्षक कल्पना जाधव,हैप्पी कॉलनी फेडेरेशन चे अध्यक्ष अवधूत जोहरी,चिन्मय गोगटे,चारुचंद्र गोडबोले,सौरभ अथनीकर .यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.यावेळी कोकण एक्स्प्रेस ते कामात हॉटेल पर्यंतच्या पदपथावर झालेले अतिक्रमण,कचरा उचलण्यासाठी ची यंत्रणा,घरफोड्या होत असल्याने सुरक्षिततेची उपाययोजना,भटक्या कुत्र्यांची समस्या यासह विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.
माझ्या प्रभागातील नागरिकांच्या सुख दुःखाशी मी समरस असून संपूर्ण प्रभागात स्वतः फिरून समस्या सोडविणार असल्याचे सांगतानाच प्रशासन आणि नागरिकांचे उत्तम सहकार्य मिळत असल्याचे ही सौ खर्डेकर म्हणाल्या.

जलसंधारणातून ‘जांब’ गावाने केला कृषी उत्पन्न 1 कोटीने वाढविण्याचा संकल्प

0
पुण्यातील‘अनिवासी सातारकर मित्र’ संस्थेचा गावाला मदतीचा हात देण्याचा निर्धार
 
 
पुणे  ः   जांब (ता. कोरेगाव, जि. सातारा) या गावाने एकत्रित काम करून जलसंधारणाद्वारे शेतीचे पाणी वाढविण्याचा आणि त्याद्वारे गावाचे कृषी उत्पन्न 1 कोटी रुपयांनी वाढविण्याचा संकल्प केला असून
,

पावसाळ्यापूर्वी पूर्णत्वास गेलेल्या कामांमुळे गावातील 500 एकर पडीक जमीन लागवडीखाली येणार आहे.

गावच्या सरपंच सौ. रेश्मा निकम यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.
पुण्यातील ‘अनिवासी सातारकर मित्र’ संस्थेने गावाला मदतीचा हात देऊन जांब गावाला स्वयंपूर्ण करण्याचा निर्धार केला आहे, असेही सरपंच सौ. रेश्मा निकम यांनी सांगीतले.
जरंडेश्‍वर डोंगराला लागून असलेल्या जांब या गावाची लोकसंख्या 1994 इतकी आहे. जलयुक्त शिवार, पाणी फाऊंडेशन स्पर्धा, वनविभागाची कामे अशा अनेक माध्यमातून गावाने श्रमदान, योगदान देऊन गावातील पाणी पातळी वाढविण्यासाठी प्रयत्न केले.
गावाने 19 हजार मीटर इतके सलग समतल चर (सी.सी.टी.) घेतले आहेत. 2 पाझर तलाव सी.ओ.टी. घेतले आहेत. लोकसहभागातून 4 हजार खड्डे वृक्षारोपणासाठी घेतले. वनविभागाने 6 हजार खड्डे वृक्षारोपणासाठी घेतले. रोपवाटिका उभारून चिंच, करंज, जांभूळ अशी 5 हजार झाडे, रोप तयार केली.
भारतीय जैन संघटनेने गावाला ‘जेसीबी’, ‘पोकलेन’ दिले. त्यातून 350 तास काम झाले. या दोन यंत्रांसाठी डिझेलची व्यवस्था वर्गणी काढून करण्यात आली. ओढ्यांचे खोलीकरण, माती नाल्यातील गाळ काढणे, पाझर तलावातील गाळ काढणे अशी कामे झाली.
गावाला 3 डोंगराचे सानिध्य आहे. या डोंगरातून ‘माथा ते पायथा’, तत्त्वावर जलसंधारणाची कामे केली. त्यासाठी 3 पुरुष, 2 महिलांनी ‘पाणी फाऊंडेशन’चे प्रशिक्षण घेतले. पहिल्याच वर्षी ’पाणी फाऊंडेशन’च्या स्पर्धेत सहभागही घेतला.
‘सरपंच म्हणून मी जलसंधारणाच्या सर्व योजनांमध्ये लोकसहभागासह हिरीरीने भाग घेण्याचा निर्णय घेतला. गावात जनजागृती केली. रोज पहाटेपासून प्रत्यक्ष कामेही केली’ असे सरपंच सौ. रेश्मा निकम यांनी सांगितले.
‘शेजारच्या अनेक गावात हिरवळ दिसत असताना आमची शिवारे, शेती उघडी दिसत असे. जलसंधारणाच्या कामातून शेतीला पाणी मिळून गावचे एकत्रित कृषी उत्पन्न 1 कोटी रुपयांनी वाढेल, असा आत्मविश्‍वास आम्हाला आला आहे.’ असे गावकरी संतोष निकम (बाळू मिस्त्री) यांनी सांगितले.
खरीपाचे पहीले पिक सोयाबिन निघाल्यावर 5OO एकर शेती पाण्यावाचुन मोकळी असायची आता रब्बी हंगामात  या वर्षीच्या जलसंधारणाच्या कामामुळे पाणी ऊपलब्ध झाल्यानंतर गहू, हरबरा, ज्वारी अशी पिके घेता येतील
पुण्यातील अनिवासी सातारकर, स्वयंसेवी संस्था, कंपन्यांचे सीएस आर फंड यातून गावाचे जलसंधारण नियोजन पूर्ण व्हावे, आणि गावातील सेंद्रीय शेतीला प्रोत्साहन मिळावे, यासाठी ‘अनिवासी सातारकर” संस्था प्रयत्न करणार आहे,’ असे संस्थापक बी.एस.जाधव यांनी सांगीतले.

विद्यार्थीनींना स्वयं सुरक्षेचे प्रशिक्षण

0

पुणे : राज्यात महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर असल्याने कायदा, सुव्यवस्था, सामाजिक प्रबोधन यांवर ताशेरे ओढण्यापेक्षा महिलांना स्वतः चे संरक्षण स्वतः करता आले पाहिजे, या भावनेने लव्हलीना शहा यांनी मार्शल आर्ट चॅम्पियन राजन वर्नेकर यांच्या सहकार्याने महिलांना मोफत स्वयं सुरक्षेचे प्रशिक्षण दिले

हडपसर येथील ज्ञानप्रबोधिनी शाळेतील १६ वर्षांपेक्षा कमी वयातील मुलींसाठी ही विनामूल्य स्वरूपात कार्यशाळा घेण्यात आली .सुमारे ६० विद्यार्थ्यांनींनी उत्स्फूर्तपणे आपला सहभाग नोंदवून या कार्यशाळेचा लाभ घेतला.

 

या उपक्रमात सुरक्षितता जागरूकता, मानसिक स्वास्थ्य, शारीरिक तंदुरुस्ती, दैनिक जीवनातील सुरक्षाविषयी माहिती व उपयुक्त ठरणारी संरक्षण तंत्र यांसारख्या विषयांवर लव्हलीना शहा व राजन वर्नेकर यांनी प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन केले.

 

 लव्हलीना शहा सामाजिक कार्यकर्त्या असून अनेक लोकाभिमूख उपक्रम वैयक्तिक पातळीवर राबविले आहेत. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांसाठी काम करण्याचे ध्येय त्यांनी उराशी बाळगले असून अशा महिलांना सुरक्षा विषयक व्यावसायिक प्रशिक्षण देण्या बरोबरच, वैद्यकीय व दंत तपासणी, लसीकरण शिबीर आदी उपक्रम शहा यांनी विनामूल्य स्वरूपात राबविले आहेत. तर राजन वर्नेकर हे देखील मार्शल आर्ट चॅम्पियन असून बलात्कारासारखा प्रसंग ओढवल्यावर उपयुक्त ठरणारी प्रात्यक्षिकांचे धडे व कायद्याची माहिती विद्यार्थीनींना गेली अनेक वर्ष देत आहेत.