पुणे-उच्च व तंत्र शिक्षण विभाग, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग आणि कृषी,
पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय व मत्सव्यवसाय विभाग यांच्या अख्यत्यारितील मान्यताप्राप्त अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश
घेणाऱ्या, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील पात्र विद्यार्थ्यांना राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क
शिष्यवृत्ती योजनेचा लाभ मिळावा यासाठी, महाविद्यालयांनी फॅसीलीटेशन सेंटर्स् तातडीने सुरु करावे, अशी
सूचना निवासी उपजिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख यांनी आज येथे केली.
राजर्षी शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना व डॉ.पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता
योजनांची जिल्हयात सुरु असलेल्या अंमलबजावणीच्या आढाव्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक
आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत सहभागी झालेल्या शिक्षण विभाग, विविध महाविद्यालयांचे
प्राचार्य व प्रतिनिधी यांच्याशी संवाद साधताना निवासी उपजिल्हाधिकारी बोलत होते. बैठकीमध्ये दोन्ही
योजनांच्या अंमलबजावणीमध्ये येणाऱ्या अडचणींचा आढावा घेण्यात आला. योजनांच्या अंमलबजावणीमध्ये
येणाऱ्या अडचणी संबधित महाविद्यालयांनी तातडीने सोडवाव्यात, असे निर्देशही निवासी उपजिल्हाधिकारी
यांनी यावेळी संबधितांना दिले. महसूल विभागातर्फे शिष्यवृत्तीसाठी आवश्यक असणारे दाखले विद्यार्थ्यांना
शिघ्रतेने देण्यात येतील. तसेच शिष्यवृत्ती प्रदानामध्ये होणारा विलंब टाळण्यासाठी समाज कल्याण
विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत लवकरच बैठक घेऊन त्यावर तोडगा काढण्यात येईल असे त्यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांच्या हितासाठीच्या या योजनांची अंमलबजावणी काटेकोरपणे करावी असेही ते म्हणाले. बैठकीला
शिक्षण विभागाचे अधिकारी, महाविद्यालयांचे प्राचार्य, अधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळण्यासाठी फॅसीलीटेशन सेंटर सुरु करावेत … निवासी उपजिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख
Date: