पुणे- सामान्य नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी मी कटिबद्ध असून समक्ष भेटीतून आपले प्रश्न समजून घेऊन ते सोडविण्यासाठी मी ” नगरसेविका आपल्या दारी ” हा उपक्रम सुरु केला आहे, केवळ यंत्रणेस दोष देऊन प्रश्न सुटत नाहीत तर नागरिक प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या समन्वयातून प्रश्न सुटतात हा माझा अनुभव आहे असे नगरसेविका मंजुश्री खर्डेकरयांनी येथे सांगितले.
“नगरसेविका आपल्या दारी” या उपक्रमाअंतर्गत आयोजित करिष्मा सोसायटी समोरील कार्यक्रमात त्या बोलत होत्या .येथील सर्व सोसायट्यांना भेडसावणारे विविध प्रश्न मी सोडविण्यासाठी मी आपल्यासाठी कायम उपलब्ध असून माझ्या मोबाईल वर आपण तक्रार केल्यास २४ तासात आपला प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल असे ही मंजुश्री खर्डेकर म्हणाल्या.
तेजलकुंज,संगमश्री,कुणाल अपार्टमेंट,अवंतिका,चिंतामणी पार्क,लोटस रेसिडेन्सी,आश्लेषा अपार्टमेंट,गणेश पार्क,अनुषा,चिनार,स्वप्नाली सोसायटी यासह विविध सोसायटीतील पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त श्री वाकुडे,पोलीस निरीक्षक प्रतिभा जोशी,मनपा च्या पथ,ड्रेनेज,कचरा,उद्यान,अश्या विविध खात्यांचे अधिकारी श्री राजेश फाटले,श्री मुकुंद शिंदे,श्री खिरीड,श्री किरण गुरव, श्री शेख,श्री मोरे व अन्य उपस्थित होते.
यावेळी वाहतुकीपासून,कचरा,डास,ड्रेनेज ची झाकणे,किर्लोस्कर ब्रदर्स कंपनीती लावलेल्या सेन्सर मुले रात्री अपरात्री होणारे भोंग्यांचे आवाज,नो पार्किंग चे फलक लावण्याचे निर्णय,पावसाळी लाईन टाकण्याचे निर्णय यासह विविध प्रश्नांवर उपाययोजना सुचविण्यात आल्या व त्यासाठीचा कालबद्ध कार्यक्रम ही निश्चित करण्यात आला.
यावेळी भाजप शहर उपाध्यक्ष संदीप खर्डेकर,श्री जगदीश खेर,श्री सुरेश कुलकर्णी,श्री एंडीगिरी,सौ डंबिर,श्री संतोष वाघ यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
अश्याच प्रकारचा उपक्रम हैप्पी कॉलोनीत ही राबविण्यात आला,त्यास नगरसेविका मंजुश्री खर्डेकर,पोलीस निरीक्षक कल्पना जाधव,हैप्पी कॉलनी फेडेरेशन चे अध्यक्ष अवधूत जोहरी,चिन्मय गोगटे,चारुचंद्र गोडबोले,सौरभ अथनीकर .यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.यावेळी कोकण एक्स्प्रेस ते कामात हॉटेल पर्यंतच्या पदपथावर झालेले अतिक्रमण,कचरा उचलण्यासाठी ची यंत्रणा,घरफोड्या होत असल्याने सुरक्षिततेची उपाययोजना,भटक्या कुत्र्यांची समस्या यासह विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.
माझ्या प्रभागातील नागरिकांच्या सुख दुःखाशी मी समरस असून संपूर्ण प्रभागात स्वतः फिरून समस्या सोडविणार असल्याचे सांगतानाच प्रशासन आणि नागरिकांचे उत्तम सहकार्य मिळत असल्याचे ही सौ खर्डेकर म्हणाल्या.

