|
|
|||
लीला पूनावाला फाउंडेशनचा ‘हरित कार्यक्रम’ संपन्न
पुणेकर अनुभवणार प्रथमच अनोखी टॅप नृत्य व तबल्याची स्वरमयी पर्वणी…
पुणे-भारतीय शास्त्रीय संगीत आणि पाश्चिमात्य नृत्य यांचा मिलाफ पुणेकरांना अनुभवायला मिळणार आहे. दि.२५-८-१८ रोजी सायंकाळी ७ वाजता ,कालाछाया कल्चरल सेंटर,सेनापती बापट रोड,येथे ही संगीत मैफल होईल .संपूर्णम प्रस्तुत टॅपडान्स आणि तबला यांचा मिलाफ ‘तबला टॅप ड्यूओ‘ नावानी सादरीकरण होईल. तसेच‘‘बॉलीवूड टू ब्राॅड्वे’ या संकल्पनेने आगळी कलाकृती रसिकांच्या समोर येत आहे . तसेच उत्तरार्धात ‘बेस्ट ऑफ बॉलीवूड’मध्ये सायन टी. गुप्ता हे काही सिने-संगीतातील रचना आपल्या तडफदार आवाजात सादर करणार आहेत.
या मैफलीत ‘तबला टॅप ड्यूओ‘ मध्ये निखील गोसावी टॅपडान्स आणि मोहनीश जाजू हे तबला सादर करतील.त्यांना संतोष घनटे हार्मोनियमची तर मृगयेन्द्र मोहाडकर बासरी,निलांबू मुजुमदार हे बेस गिटारची साथ करतील. तर ‘बेस्ट ऑफ बॉलीवूड’ यामध्ये आंतरराष्ट्रीय ख्यातीचे गायक सायन टी. गुप्ता यांचे गायन होईल व ते सिने-संगीताची पेशकश करतील, त्यांना अरीन दुबे हे लीड गिटार व ज्योतीर्मोय हे रिदम गिटारची साथ करणार असून, मैफलीत भारतीय शास्त्रीय आणि सिनेसंगीत त्याचप्रमाणे पाश्चिमात्य संगीत या तिन्हीचे दर्शन वेगळ्या स्वरमय स्वरुपात होणार आहे .
ईद निमित्त पुण्यातील परदेशी मुस्लिम विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्याचा कार्यक्रमास प्रतिसाद
पुणे :ईद-उल -झुआ निमित्त पुण्यातील परदेशी मुस्लिम विद्यार्थ्यांना
शुभेच्छा कार्यक्रमास मंगळवारी चांगला प्रतिसाद मिळाला . हाजी गुलाम महंमद आझम एज्युकेशन ट्रस्ट ने या उपक्रमाचे आझम कॅम्पस (पुणे कॅम्प )येथे आयोजन केले होते . ट्रस्ट चे अध्यक्ष डॉ . पी . ए . इनामदार यांच्या हस्ते या विद्यार्थ्यांना चॉकलेट ,गुलाबपुष्प ,अत्तर भेट देण्यात आले . यावेळी ‘अवामी महाज ‘सामाजिक संघटनेचे सचिव वाहिद बियाबानी ,नासिर खान ,मुफ्ती कासमी,कुरेशी इत्यादी मान्यवर उपस्थित होते .अरब आणि आखातासह अनेक देशांचे पुण्यात शिकणारे सुमारे एक हजार विद्यार्थी या उपक्रमात सहभागी झाले . आझम कॅम्पस मशिदीत ईद चा नमाज पढण्यात आला
अल्लाना इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स ‘च्या विद्यार्थ्यांकडून केरळ पूरग्रस्तांसाठी मदत संकलन
कौन पांडव ..कौन कौरव …महापालिकेत जागवल्या अटलजींच्या आठवणी ..(व्हिडीओ)
पुणे- महापालिकेच्या मुख्य सभेत अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहताना विरोधीपक्षनेते चेतन तुपे पाटील यांनी केलेले भाषण ….
प्रत्येकाच्या बोलण्यात गोडवा हवा – मुनिश्री पुलकसागर महाराज
पुणे-व्यक्तीचे व्यक्तीत्व हे त्याच्या वाणीच्या माध्यमातून कळते. वाणी अंतरंगाचे दर्पण असते. त्यामुळे बोलताना नेहमी विचारपूर्वक बोलावे. वाणीमध्ये वीणेची झनकार असली पाहिजे, मात्र आपल्या वाणीमध्ये बाण असतात. या शब्दांचे घाव इतके तीव्र असतात की ते कधीही भरू शकत नाहीत. त्यामुळेच मनात दुरावा, तिरस्कार निर्माण होतो. जी व्यक्ती ‘इट का जवाब पत्थर से’ अशी वृत्ती बाळगणारी व्यक्ती कधीही देवत्व मिळवू शकत नाही. याउलट ज्या व्यक्तीच्या बोलण्यात गोडवा असेल, तीला सर्वत्र सन्मानपूर्वक वागणूक मिळते. त्यामुळे नर्म लहेजे से तो पत्थर भी पिघल जाते है’ ही बाब प्रत्येकाने लक्षात ठेवून त्यानुसार आचरण केले पाहिजे, अशा शब्दांत प. पु. 108 मुनिश्री पुलकसागर महाराज यांनी बोलण्यातील गोडवा ठेवण्याचा संदेश दिला.
तसेच इतरांच्या निर्णयावर अवलंबून न राहता, स्वत:ची रूची, क्षमता यांचा विचार करून स्वत:चे निर्णय स्वत: घ्यावे आणि सुनियोजित पद्धतीने काम करावे, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.
सकल जैन वर्षा योग समितीतर्फे मुनिश्रींच्या चातुर्मासाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त ज्ञानगंगा महोत्सव या मुनिश्रींच्या प्रवचन कार्यक्रमास धर्मानुरागी रसिकलाल एम. धारिवाल नगरी, महालक्ष्मी लॉन्स येथे प्रारंभ झाला आहे. यावेळी ज्ञानगंगा महोत्सवात प्रवचनाचे दहावे पुष्प गुंफतांना ’मिठी जुबान का जादू’ या विषयावर ते बोलत होते. समितीच्या अध्यक्षा शोभा धारिवाल, कार्याध्यक्ष मिलिंद फडे, आर. एम फाऊंडेशनच्या जानवी धारिवाल, सामाजिक कार्यकर्त्या डॉ. उदिता शहा, उपाध्यक्ष चकोर गांधी, अजित पाटील, सुजाता शहा, जितेंद्र शहा, वीरकुमार शहा, संजीव नाईक, सुदिन खोत, उत्कर्ष गांधी हे उपस्थित होते. डॉ. उदिता शहा यांच्या हस्ते मुनिश्रींना शास्त्र भेट देण्यात आली. याप्रसंगी जीएसटीचे असिस्टंट कमिशनर एस.के. पाटील यांनी मुनिश्रींचे पादप्रक्षालन करून मंगल कलशाची स्थापना केली. यानंतर जिन सेवा ग्रुपतर्फे मंगलाचरण सादर करण्यात आले. स्वागत व प्रास्ताविक कार्याध्यक्ष मिलिंद फडे यांनी केले.
मुनिश्री म्हणाले, तुम्ही कितीही सौंदर्यवान असोत, कितीही श्रीमंत असोत या सर्वांपेक्षा जास्त महत्वपूर्ण असते, ते तुमचा व्यवहार. व्यवहार जर मधूर असेल तर सर्वांच्या मनात तुमच्याबाबत आदराचे स्थान निर्माण होते. वाणी ही मनाला तोडते आणि वाणीच मनाला जोडते. जगात प्रत्येक व्यक्तीला सर्वात जास्त कुठल्या गोष्टीचा हव्यास असेल तर ते प्रेमपूर्वक बोलण्याचा आहे. पारिवारिक संबंधामध्ये जर गोडवा असेल, तर कुटुंबात प्रेम, आदर आणि एकोपा वाढतो.”
स्टार हेल्थ इन्शुरन्सने अधिक वैशिष्ट्यांचा व कमी प्रीमिअमचा समावेश करून स्टार डायबिटीस सेफ इन्शुरन्स पॉलिसी नव्याने केली दाखल
सुधारित योजनेमध्ये प्रीमिअममध्ये 20% पर्यंत घट~
~सर्व प्रकारच्या डे केअर उपचारांचा समावेश~
चेन्नई, तामिळनाडू, ऑगस्ट 21, 2018: स्टार हेल्थ अँड अॅलिड इन्शुरन्स कंपनी लि. या नावीन्यपूर्ण उत्पादनांसाठी लोकप्रिय असलेल्या, देशातील पहिल्या स्टँडअलोन आरोग्य विमा कंपनीने अधिक मूल्यांचा समावेश करून व प्रीमिअममध्ये घट करून स्टार डायबिटीस सेफ इन्शुरन्स पॉलिसी नव्याने दाखल केली आहे. स्टार डायबिटीस योजना आता 15%–20% कमी दरामध्ये खरेदी करता येऊ शकते.
नव्याने दाखल केलेल्या योजनेमध्ये विम्याच्या रकमेइतक्या वैयक्तिक अपघात कवचाबरोबरच, डॉक्टरांचे कन्सल्टेशन शुल्क, डायग्नॉस्टिक चार्जेसची भरपाई, फार्मसी बिले यांचाही समावेश करण्यात आला आहे. ग्राहकांना अतिशय कमी प्रीमिअममध्ये हे अतिरिक्त फायदे देण्यात येणार आहेत, म्हणजेच वर नमूद केलेल्या सेवांसाठी कोणताही अतिरिक्त खर्च करावा लागणार नाही.
मूळ योजनेनुसार, कितीही वर्षे डायबिटीस असलेल्या व्यक्तीला (नियमित हॉस्पिटलायझेशन कव्हरसह) कवच देण्यात आले व डायबिटीसची सद्यस्थिती काहीही असली तरी आरोग्य विमा कवच घेणे शक्य होते.
सध्या उपलब्ध असलेल्या कव्हरबरोबरच, सुधारित योजनेमध्ये सर्व प्रकारच्या डे केअर उपचारांचा समावेश करण्यात आला आहे; योजनेच्या बाबतीत झालेली ही अत्यंत महत्त्वाची घडामोड आहे, कारण अगोदर योजनेमध्ये केवळ 405 उपचारांचा समावेश होता.
योजनेतील बदलांविषयी बोलताना, डॉ. एस. प्रकाश, एफआरसीएस (Glasg), एफएआयएस, चीफ ऑपरेटिंग ऑफिसर, स्टार हेल्थ अँड अॅलिड इन्शुरन्स कं. लि. म्हणाले, “आमच्या ग्राहकांसाठी अतिरिक्त फायदे समाविष्ट करून, स्टार डायबिटीस सेफ इन्शुरन्स योजना नव्याने दाखल करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. बाजारातून चांगला प्रतिसाद मिळत आहे व आमच्या सेल्स टीमकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. यामुळेच आम्हाला या उत्पादनात सुधारणा करण्याची व डायबिटीस असलेल्या नागरिकांपर्यंत पोहोचण्याची प्रेरणा मिळाली. आज, स्टार डायबिटीस सेफ इन्शुरन्स पॉलिसी या क्षेत्रातील वैशिष्ट्यपूर्ण व एकमेव योजना आहे.”
“दाव्यांवर प्रक्रिया करण्यासाठी व आमची नावीन्यपूर्ण उत्पादने तयार करण्यासाठी आम्ही 400 वैद्यकीय कर्मचाऱ्यांना सहभागी करून घेतो. आमच्या कंपनीतील वैद्यकीय कर्मचारी उत्पादनांची आखणी करत असल्याने व सेवा देत असल्याने, ग्राहकांना परिणामकारक सेवा देण्यासाठी आम्हाला मदत करतात” असे डॉ. एस. प्रकाश, एफआरसीएस (Glasg), एफएआयएस, चीफ ऑपरेटिंग ऑफिसर, स्टार हेल्थ अँड अॅलिड इन्शुरन्स कं. लि., यांनी नमूद केले.
डायबिटीस सेफ इन्शुरन्स पॉलिसी
- सध्या टाइप I व II डायबिटीस असलेल्या व्यक्तींना ही योजना खरेदी करता येऊ शकते
- प्री-पॉलिसी मेडिकल चेक-अप न करता योजना खरेदी करणे शक्य
- मेडिक्लेम कव्हरबरोबरच, डायबिटीस व त्यातून निर्माण होणारी गुंतागुंत यांवरील उपचाराचा समावेश
- इन्सुलिन व HbA1c वैद्यकीय चाचण्या यांच्या खर्चाचा समावेश
स्टार हेल्थ अँड अॅलिड इन्शुरन्स कं. लि.विषयी
स्टार हेल्थ अँड अॅलिड इन्शुरन्स कं. लि. ही भारतातील पहिली स्टँडअलोन आरोग्य विमा कंपनी आहे. कंपनीने बाजाराच्या वैविध्यपूर्ण गरजा पूर्ण करण्यासाठी अनेक प्रकारची अपूर्व विमा उत्पादने दाखल केली आहेत – कार्डिआक आजारांसाठी स्टार कार्डिआक केअर, सीनिअर सिटीझन्स हेल्थ इन्शुरन्ससाठी स्टार सीनिअर सिटिझन्स रेड कार्पेट व टाइप 1 व 2 डायबिटीस असलेल्यांसाठी स्टार डायबिटीस सेफ इन्शुरन्स. आरोग्याचे रक्षण करणे व आरोग्याविषयी जागृत करणे यासाठी देशभरातील ग्राहकांना सेवा देण्यासाठी स्टार हेल्थ अँड अॅलिड इन्शुरन्सकडे 300+ शाखा कार्यालये, 7600+ नेटवर्क हॉस्पिटल आहेत.
एकनाथजी रानडे यांच्या उद्बोधनपर भाषणांचे संकलन असलेल्या ‘सेवा समर्पण’ ग्रंथाचे प्रकाशन 25 ऑगस्ट रोजी
पुणे :विवेकानंद केंद्राचे संस्थापक एकनाथजी रानडे यांच्या उद्बोधनपर भाषणांचे संकलन असलेल्या ‘सेवा समर्पण’ (अध्यात्मिक जीवनाची साधना) ग्रंथाचे प्रकाशन शनिवार २५ ऑगस्ट रोजी पुण्यात होणार आहे.
टिळक स्मारक मंदिर येथे निवृत्त सनदी अधिकारी आणि ‘चाणक्य मंडल’चे संस्थापक अविनाश धर्माधिकारी आणि ‘लोकमान्य मल्टीपर्पज को ऑपरेटिव्ह क्रेडीट सोसायटी’चे संस्थापक अध्यक्ष किरण ठाकूर यांच्या हस्ते हे प्रकाशन सकाळी १० वाजता होणार आहे.
या कार्यक्रमात अविनाश धर्माधिकारी यांचे ‘प्रशासनातील सेवाभाव’ विषयावर व्याख्यान होणार आहे.
एकनाथजी रानडे यांनी जीवनव्रती प्रशिक्षणार्थींना वेळोवेळी केलेल्या उद्बोधनपर व्याख्यानांचे संकलन ‘सेवा समर्पण’ या ग्रंथात आहे. सुधीर जोगळेकर (मराठी प्रकाशन विभागाचे सचिव), जयंत कुलकर्णी (विवेकानंद केंद्र संचालक, पुणे शाखा) यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.
या पुस्तकाचे लेखन सुनिता करकरे यांनी तर पुस्तकाचे संपादन निवेदिता भिडे यांनी केले आहे .
कन्याकुमारीतील शिलाखंडावरील विवेकानंद स्मारकाला २०२० साली ५० वर्षे होत आहेत तर विवेकानंद केंद्राच्या स्थापनेला २०२२ साली ५० वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने विवेकानंद केंद्राच्या मराठी प्रकाशन विभागाने अनेक महत्वाकांक्षी प्रकाशनांची आखणी केली आहे.
केंद्राचे संस्थापक एकनाथजी रानडे यांनी विवेकानंदांचा विचार देशभर घेऊन जाणाऱ्या जीवनव्रती कार्यकर्त्यांची कल्पना मांडली आणि तिला देशभरातून युवक-युवतींचा उत्तम प्रतिसाद लाभला. त्यातून निवडलेल्या कार्यकर्त्यांपुढे एकनाथजी ४० व्याख्याने गुंफत असत. ती सर्वच व्याख्याने ध्वनिमुद्रित झाली नव्हती, परंतु त्यातल्या अनेकांची टिपणे कालांतराने उपलब्ध होत गेली. त्या व्याख्यानांचे शब्दांकन म्हणजे पूर्वीचे ‘सेवा साधना ‘आणि आत्ताचे विस्तारित रूपातील ‘सेवा समर्पण’ हा ग्रंथ आहे
पीएमआरडीएकडून तळेगाव ढमढेरे-माळीमळा-पिंपळे जगताप रस्त्याच्या प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात
पुणे-पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीएच्या) वतीने तयार
करण्यात येणारा शिरूर तालुक्यातील चौफुला (करंदी फाटा) नगर रोड ते तळेगाव ढमढेरे रस्ता
शिक्रापूर दक्षिण बाजू बाह्यवळण ९ किमी रस्त्याचे कामकाज सुरु करण्यात आले आहे.
शिक्रपूरची वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी तळेगाव ढमढेरे- माळीमळा ते पिंपळे जगताप या
रिंगरोड रस्त्याचे प्रत्यक्ष कामकाज सुरु करण्यात आले आहे. या रस्त्याच्या कामकाजाचा खर्च
१२ कोटी ८८ लाख इतका आहे. सध्य रस्त्याच्या कामकाजाची पाहणी पीएमआरडीएचे
अधीक्षक अभियंता रीनाज पठाण, कार्यकारी अभियंता एस.पी. कुंभार यांनी केली आहे.
पालकमंत्री गिरीश बापट व आमदार बाबुराव पाचर्णे, महानगर आयुक्त किरण गित्ते यांच्या
हस्ते कामकाजाचे भूमिपूजन करण्यात आले होते. तळेगाव ढमढेरे येथील मालीमळा एल अँड टी
फाटामार्गे पिंपळे जगतापपर्यंत सुमारे ९ किमी लांबीचा हा रस्ता होणार आहे. या रस्ताची १०
मीटर इतकी रुंदी आहे. सणसवाडी ते शिक्रापूर रस्त्यावर औद्योगीकरण व नागरीकरण मोठ्या
प्रमाणावर झाल्याने वाहतुकीला अडसर निर्माण होत आहे. या ठिकाणी अनेक गृहप्रकल्प व
कंपन्या असल्यामुळे या रस्त्याला अधिक महत्व प्राप्त झाले आहे.
राष्ट्राच्या उभारणीचा मुख्य पाया शिक्षकच
उत्सव काळात प्रशासनाने समन्वयाने काम करावे -जिल्हाधिकारी नवल किशोर राम
पुणे दि. 21- शहरात बकरी ईद, गोकुळाष्टमी, गणेश चतुर्थी, मोहरम आदी उत्सव साजरे केले जातात. या उत्सव काळात कायदा व सुव्यस्था राखण्यासाठी प्रशासनाने समन्वयाने काम करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिल्या.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयात उत्सव काळातील कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने आयोजित बैठकित त्यांनी या सूचना केल्या. यावेळी अपर जिल्हादंडाधिकारी विजयसिंह देशमुख, पोलिस अधीक्षक संदिप पाटील, पोलिस उपायुक्त अशोक मोराळे, उपविभागीय अधिकारी ज्योती कदम, अजित देशमुख, मोसमी बरडे, तसेच महापालिका, आरोग्य विभाग, जिल्हापरिषद, पशुसंवर्धन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, एन. डि. आर. एफ विभाग, पाटबंधारे विभाग आदी विभागाचे अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी नवल किशोर राम म्हणाले, पुणे शहरातून गणेश उत्सवाची सुरवात झाली आहे. त्यामुळे शहरात हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो. त्याबरोबरच इतर उत्सव देखील साजरे होतात. या उत्सव काळात लागणाऱ्या सर्व अत्यावश्यक सेवांचे पूर्व नियोजन करावे. पोलिस प्रशासनाने अनुचित प्रकार घडणार नाहीत, याची दक्षता घेण्याबरोबरच सुरक्षा व्यवस्थेचा बंदोबस्त देखील करावा. सर्व प्रशासकीय विभागांना पूर्व नियोजन करून नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना देखील जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केल्या.
उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांनी उद्भवणाऱ्या अडचणी तसेच त्यावरील उपायांवर यावेळी चर्चा केली.
टेबल टेनिस स्पर्धेत गौरव लोहपात्रे, नेहा महांगडे यांचा मानांकीत खेळाडूंवर विजय
मिश्र दुहेरीत ईशा जोशी व आदर्श गोपाळ यांना विजेतेपद
पुणे – पीवायसी हिंदू जिमखाना क्लहब यांच्या वतीने आयोजित व पुणे जिल्हा टेबल टेनिस संघटनेच्या मान्यतेनेखाली होत असलेल्या डॉ. प्रमोद मुळ्ये स्मृती करंडक पुणे जिल्हा मानांकन अजिंक्यतपद टेबल टेनिस स्पर्धेत मिश्र दुहेरी गटात अव्वल मानंकीत ईशा जोशी व आदर्श गोपाळ या जोडीने दुस-या मानांकीत वैभव दहीभाते व पूर्वा सोहोनी यांचा 11/3,9/11,11/7,11/7 असा पराभव करत विजेतेपद पटकावले.
पीवायसी क्लबच्या कम्युनिटी हॉलमध्ये सुरु असलेल्या या स्पर्धेत 18 वर्षाखालील मुलांच्या गटात अतितटीच्या झालेल्या सामन्यात नवव्या मानांकीत गौरव लोहपत्रेने अव्वल मानांकीत शौनक शिंदेचा 9/11,11/5,11/6,12/10,6/11,9/11,11/3 असा संघर्षपुर्ण पराभव करच उपांत्य फेरीत प्रवेश केला. श्रीयश भोसले, करण कुकरेजा, आरुष गलपल्ली यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. 18 वर्षीखालील मुलींच्या गटात अव्वल मानांकीत पृथा वर्टीकरने आपल्या लौकीकाला साजेशी खेळी करत आठव्या मानांकीत श्रुती गभानेचा 11/5,11/9,9/11,11/5,11/9 असा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. प्रीती गाढवे, मृण्मयी रायखेलकर व स्वप्नाली नराळे यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत उपांत्य फेरी गाठली.
महिलांच्या गटात बिगर मानांकीत नेहा महांगडे हीने दुस-या मानांकीत सलोनी शहा हीचा 11/7,11/8,11/6 असा पराभव करत खळबळजनक निकालाची नोंद करत उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश केला. तर ईशा जोशी, स्वप्नाली नारळे, वेदिका भेंडे, फौजिया मेहेरली, वैभवी खेर, प्रितिका सेनगुप्ता यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत उपांत्यपुर्व फेरी गाठली.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: मिश्र दुहेरी: उपांत्य फेरी:
ईशा जोशी/आदर्श गोपाळ(1)वि.वि.उपेंद्र मुळ्ये/नेहा महांगडे 7/11,11/8,11/8,11/7
वैभव दहीभाते/पूर्वा सोहोनी(2)वि.वि.इकबाल मेहेरली/फौजिया मेहेरली 11/3,11/8,11/8
मिश्र दुहेरी: अंतिम फेरी: ईशा जोशी/आदर्श गोपाळ(1)वि.वि. वैभव दहीभाते/पूर्वा सोहोनी(2) 11/3,9/11,11/7,11/7
18 वर्षाखालील-मुले उपांत्यपुर्व फेरी
गौरव लोहपत्रे(9)वि.वि.शौनक शिंदे(1)9/11,11/5,11/6,12/10,6/11,9/11,11/3
श्रीयश भोसले(4)वि.वि.आदर्श गोपाळ(5)11/4,11/9,11
करण कुकरेजा(3)वि.वि.अनय कोव्हेलमुडी(6)11/7,11/4,5/11,11/8,11/3
आरुष गलपल्ली(2)वि.वि.आर्यन पानसे(10)5/11,11/7,11/6,11/7,11/4
18 वर्षाखालील मुली– उपांत्यपुर्व फेरी
पृथा वर्टीकर(1)वि.वि.श्रुती गभाने(8)11/5,11/9,9/11,11/5,11/9
प्रीती गाढवे(4)वि.वि.अनिहा डिसुझा(5)11/6,7/11,11/9,5/11,11/7,11/9
मृण्मयी रायखेलकर(3)वि.वि.अंकिता पटवर्धन(6)12/10,11/6,11/8,9/11,11/9
स्वप्नाली नराळे(2)वि.वि.पूजा जोरवार(7)11/6,11/4,11/3,13/11
महिला एकेरी गट: उप-उपांत्यपूर्व फेरी:
ईशा जोशी(1)वि.वि.सुहासिनी बाकरे 11/2,14/12,11/8
स्वप्नाली नारळे(8)वि.वि.पूर्वा सोहोनी(9) 11/9,8/11,11/9,11/6
वेदिका भेंडे(12)वि.वि.शुभदा चोंदेकर(5) 11/9,9/11,11/5,11/5
फौजिया मेहेरली(3)वि.वि.चाओबा थोउंजाम 11/4,11/6,11/7
वैभवी खेर(11)वि.वि.सिद्धी आचरेकर(6) 11/6,11/7,11/7
प्रितिका सेनगुप्ता(7)वि.उज्वला गायकवाड(10) 8/11,13/11,14/12,11/13,11/6
नेहा महांगडे वि.वि.सलोनी शहा(2) 11/7,11/8,11/6.
पुरुष एकेरी गट: पहिली फेरी:
भूषण पुजारी वि.वि.सागर पटनायक 11/8,11/6,11/8
योगेश नाडगौडा वि.वि.जितेंद्र खासनिस 8/11,11/9,11/1,11/4
अनिकेत बोकील वि.वि.सचिन सुद्रीक 11/3,11/7,14/12
निखिल मनचंदा वि.वि.गजानन सावंजी 4/11,11/6,11/8,12/10
मिथिलेश पंडित वि.वि.रवी शेठ 11/5,11/8,12/10
अभिषेक बाजपेयी वि.वि.पार्थ खंडेलवाल 11/2,11/7,11/1
शुभम पहाडे वि.वि.रोहिदास गरुड 11/9,11/13,10/12,11/8,11/7
अमित क्षत्रिय वि.वि.सिद्धार्थ राऊत 11/5,14/12,11/6
तेजस धावडे वि.वि.पुल्केश गुणेचा 11/7,8/11,11/7,11/6
सागर कुलकर्णी वि.वि.प्रमोद मरकळे 11/9,11/3,11/8
नचिकेत देशपांडे वि.वि.सुजित प्रधान 8/11,11/6,11/7,18/16
रौनक आपटे वि.वि.विलास पळशीकर 11/5,11/4,11/5
ओंकार कडूकर वि.वि.पुष्कर परले 11/7,11/9,11/3
गुरू नाडगौडा वि.वि.संजय पटेल 11/3,11/9,11/6
डिसेंन्ट फाऊंडेशन च्या वतीने ओतूर मध्ये किशोरवयीन मुलींसाठी मार्गदर्शन
माळशेज घाटातील दरडींमुळे होणारे अपघात थांबणार कि नाही …. पुन्हा दरड कोसळुन टेम्पोचे नुकसान चालक जखमी
नगर – कल्याण महामार्गावरील माळशेज घाटात बोगद्याजवळ मंगळवारी(दि.२१) पहाटे दोनच्या सुमारास पुन्हा दरड कोसळली दगडाच्या ढिगा-याखाली टेम्पोचे नुकसान होऊन या टेम्पोचा चालक जख्मी झाला आहे.दरड हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. शिवाय खबरदारीचा उपाय म्हणून येथील वाहतूक पूर्णतः बंद ठेवण्यात आली आहे.किमान दोन दिवस घाट बंद राहण्याची शक्यता आहे.
दरडीखाली एक टेम्पो अपघात ग्रस्त झाला आहे. त्यातील चालक अमोल दहिफळे,(रा.मोहटादेवी,ता.पाथर्
होते मोदी म्हणून ..नाहीतर ताई तुम्ही कोण …. (व्हिडीओ)
पुणे-नरेंद्र मोदी होते म्हणून तुम्ही निवडून आलात ..नाही तर पाला पाचोळ्या सारखा उडून गेला असता .. असा स्पष्ट आरोपवजा सल्ला
महापालिकेच्या मुख्य सभेत वाजपेयींना श्रद्धांजली वाहताना राष्ट्रवादीचे नगरसेवक सुभाष जगताप यांनी एका नगरसेविकेला दिला …वाजपेयींच्या नेतृत्वाचे कौतुक तर राष्ट्रवादीच्या नगरसेवक सुभाष जगताप यांनी केले … पण … यावेळी ..कधीही न बोलणाऱ्या नगरसेविका अनुसया चव्हाण यांनी ..जगताप यांच्या कोणत्या वाक्यांना का आक्षेप घेतला ..आणि सभागृहनेते श्रीनाथ भिमाले ..यांनी चव्हाण ताईना ..शांत रहा ..असे सांगूनही ..’थांबा तुम्ही मला बोलू द्या ..असे चव्हाण ताई का म्हणाल्या … त्यानंतर नेमके काय घडले ते ..या ध्वनिचित्रफितीत पहा आणि ऐका …..





