|
पुणे– शिक्षणाच्या माध्यमातुन मुलींना सक्षम बनविण्याबरोबरच लीला पूनावाला फाउंडेशनने (एलपीएफ) पर्यावरण संरक्षणाची जाणीव करूण देणारा कार्यक्रम हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. ह्या अंतर्गत एका हरित कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
लीला पूनावाला फाउंडेशन (एलपीएफ) ग्रीन इनिशिएटिवचा उद्येश्य विद्यार्थीनींमध्ये पर्यावरणाविषयी जनजागृती आणने आहे जेणेकरूण आपल्या देशाची भावी पिढी पर्यावरणाचे महत्व समजु शकेल.
एलपीएफ पीस ऍंबेसेडर २०१६ च्या एका बॅचने या कार्यक्रमाचा प्रारंभ केला ह्यावेळी त्यांचे मार्गदर्शन एलपीएफचे प्रमुख फिरोज पूनावाला यांनी केले. कार्यक्रमामध्ये वृक्षारोपणा बरोबरच त्यांच्या संवर्धणाबद्दल देखील माहिती देण्यात आली.
पुण्याच्या ४ शाळा अंजुमन उर्दू स्कूल, अंजुमन इंग्लीश स्कूल, चैतन्य इंग्लीश स्कूल आणि सेंट क्लेयरस स्कूल बरोबरया प्रकल्पाची सुरूवात केली गेली. देवहरि, नेवाली, तुलसी, ग्वारपाठा – (कोरफड ) आणि ओक्सालिस सारखी रोपटी ह्यावेळी लावण्यात आली.