ओतुर – दि.२१ (संजोक काळदंते)
“कळी उमलताना” या उपक्रमा अंतर्गत डिसेंन्ट फाऊंडेशन च्या वतीने मंगळवारी(दि.२१)श्री संत गाडगे महाराज विद्यालय ओतूर (ता.जुन्नर) येथे किशोरवयीन मुलींसाठी वैयक्तिक स्वच्छतेबाबत जाणीव जागृती कार्यक्रम व सॅनिटरी नॅपकिन चे मोफत वाटप करण्यात आले.
यावेळी डॉक्टर सविता फलके, डॉक्टर सुनीता वेताळ व डॉक्टर पुष्पलता शिंदे यांनी मुलींना मार्गदर्शन केले
किशोरवयीन मुलींना वैयक्तिक स्वच्छतेबाबत, मुलींमध्ये वाढत्या वयात होणाऱ्या नैसर्गिक बदलाबाबत, त्यांच्यातील संभ्रमाबाबत तसेच सॅनेटरी नॅपकिनच्या वापराबाबत जाणीव जागृती करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी संत गाडगे महाराज विद्यालय, चैतन्य विद्यालय व सावित्रीबाई फुले कन्या विद्यालय या शाळेतील सातवी व आठवीच्या वर्गातील चारशे विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या.
याप्रसंगी अनुलोमचे भाग जनसेवक राहूल दातखिळे, मुख्याध्यापिका मंगल बोऱ्हाडे मॅडम , मुख्याध्यापिका घोडके मॅडम , ठोकळ सर , आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डिसेंन्ट फाऊंडेशनचे संस्थापक जितेंद्र बिडवई यांनी केले सूत्रसंचलन अहिनवे सरांनी केले तर आभार प्रदर्शन उकीर्डे मॅडम यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन डिसेंन्ट फाऊंडेशन चे प्रकल्प समन्वयक गणेश सुर्यवंशी यांनी केले.