डॉ. प्रकाश आमटे आणि डॉ. मंदाकिनी यांच्या सामाजिक कार्यातून प्रेरित झालेले लोकबिरादरी मित्रमंडळ ट्रस्ट, पुणे हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्पाच्या कामाचा प्रसार करण्याबरोबरच पुणे स्थानिक समस्यांवर तोडगा काढण्यासाठी शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये देणे समाजाचे ही भावना निर्माण करीत आहे. २०११ पासून संस्थेने अनेक उपक्रम राबविले आहेत. त्यामध्ये वाहतूक जनजागृती, गरिबांसाठी कपड्यांचे संकलन, प्राण्यांसाठी फन फेअर विथ पॉंज अँड टेल्स, आंबेगाव तालुक्यातील आदिवासी, कातकरी मुलींना प्रशिक्षण असे विविध उपक्रम राबविले जात आहेत. अश्या उपक्रमांच्या निमित्ताने जास्तीत जास्त युवकांच्या सहभगाला प्रोत्साहन देणे, त्यांच्यातील विशेष क्षमतांना व्यासपीठ देणे, युवकांच्या व्यक्तिमत्व विकासाला वाव देणे आणि त्यांच्याच समाजोपयोगी कल्पनांना मूर्त रूप देणे हे लोक बिरादरी मित्रमंडळ पुणे ची उद्दिष्टे आहेत.
पुन्हा एकदा ‘आठवणीतलं पुणं…येत्या रविवारी
डॉ. प्रकाश आमटे आणि डॉ. मंदाकिनी यांच्या सामाजिक कार्यातून प्रेरित झालेले लोकबिरादरी मित्रमंडळ ट्रस्ट, पुणे हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्पाच्या कामाचा प्रसार करण्याबरोबरच पुणे स्थानिक समस्यांवर तोडगा काढण्यासाठी शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये देणे समाजाचे ही भावना निर्माण करीत आहे. २०११ पासून संस्थेने अनेक उपक्रम राबविले आहेत. त्यामध्ये वाहतूक जनजागृती, गरिबांसाठी कपड्यांचे संकलन, प्राण्यांसाठी फन फेअर विथ पॉंज अँड टेल्स, आंबेगाव तालुक्यातील आदिवासी, कातकरी मुलींना प्रशिक्षण असे विविध उपक्रम राबविले जात आहेत. अश्या उपक्रमांच्या निमित्ताने जास्तीत जास्त युवकांच्या सहभगाला प्रोत्साहन देणे, त्यांच्यातील विशेष क्षमतांना व्यासपीठ देणे, युवकांच्या व्यक्तिमत्व विकासाला वाव देणे आणि त्यांच्याच समाजोपयोगी कल्पनांना मूर्त रूप देणे हे लोक बिरादरी मित्रमंडळ पुणे ची उद्दिष्टे आहेत.
२४ व्या पुणे नवरात्रौ महोत्सवाचे १० ऑक्टोबर रोजी उद्घाटन होणार (व्हिडीओ)
अरूण वाकणकर मेमोरियल करंडक पुरूष टेनिस स्पर्धेत जगदीश सुंदर याला विजेतेपद ; रोहित शिंदे व ज्ञानेश्वर पाटील यांना दुहेरीचे विजेतेपद
पुणे- गेम ऑन ईव्हेंटस् यांच्या तर्फे व पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए)यांच्या मान्यतेखाली अरूण वाकणकर मेमोरियल करंडक पुरूष टेनिस 2018 स्पर्धेत हौशी गटात जगदीश सुंदर याने आर्यन हुड याचा 7-6(9) असा टायब्रेकमध्ये पराभव करत विजेतेपद पटकावले.
डेक्कन जिमखाना कोर्टवर येथे पार पडलेल्या या स्पर्धेत दुहेरी गटात रोहित शिंदे व ज्ञानेश्वर पाटील या जोडीने जॉय व पृथ्वीराज पाटील यांचा 8-4 असा पराभव करत दुहेरी गटाचे विजेतेपद पटकावले.
स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या खेळाडूंना करंडक पारितोषिक देण्यात आले. स्पर्धेचे पारितोषिक वितरण गेम ऑन ईव्हेंटस्चे संचालक सुनिल लुल्ला यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मंदार वाकणकर उपस्थित होते
स्पर्धेचा सविस्तर निकाल: हौशी गट: अंतिम फेरी:
जगदीश सुंदर वि.वि आर्यन हुड 7-6(9)
‘विवेकानंद विद्यालय’ विद्यार्थ्यांची आझम मशिदीला सदिच्छा भेट
पुणे :गांधी जयंती निमित्त २ ऑक्टोबर स्वामी विवेकानंद विद्यालय ( बिबवेवाडी ) विद्यार्थ्यानी ‘मस्जिद-ए-आझम’ मशिदीला सदिच्छा भेट दिली. ‘आबेदा इनामदार वरिष्ठ महाविद्यालया’च्या ‘राष्ट्रीय सेवा योजना’ विभागाच्या विध्यार्थ्यांनी या भेटीचे आयोजन केले.
‘रोटरी क्लब पुणे लोकमान्यनगर’ ने या उपक्रमात पुढाकार घेतला. ‘आबेदा इनामदार वरिष्ठ महाविद्यालया’च्या प्राचार्य शैला बुटवाला यांनी स्वागत केले.सामाजिक सलोखा आणि परस्पर बंधू भाव वाढीस लागावा या हेतूने ही भेट आयोजित केली गेली१० ते १६ वर्ष वयोगटातील सुमारे ४० विद्यार्थी आणि शिक्षक या भेटीत सहभागी झाले होते. डॉ. आफताब आलम (राष्ट्रीय सेवा योजना विभाग अधिकारी ), खालिद अर्षद, उस्मा शेख, मंदार कुलकर्णी, प्रदीप आवटे उपस्थित होते.
‘एसयुवरस्पेंड्स’ कॅम्पेन दाखल करण्यासाठी मास्टरकार्डशी केली आयसीआयसीआय बँकेने भागीदारी
मुंबई: आयसीआयसीआय बँकेने आगामी सणासुदीदरम्यान, आपल्या मास्टरकार्ड क्रेडिट व डेबिट कार्डांचा वापर करणाऱ्या ग्राहकांना लाभ देण्याच्या दृष्टीने ‘स्पेंड अँड विन’ कॅम्पेन दाखल करण्यासाठी मास्टरकार्डशी भागीदारी केल्याची घोषणा आज केली. ‘एसयुवरस्पेंड्स’ ही कॅम्पेन, ऑक्टोबर 1, 2018 ते नोव्हेंबर 10, 2018 या कालावधीत मास्टरकार्ड क्रेडिट व डेबिट कार्डांवर सर्वाधिक खर्च करणाऱ्या आघाडीच्या प्रत्येकी 10 जणांना लाभ देणार असून, त्यामध्ये ‘ऑस्ट्रेलियन ओपन 2019’ मधील महिला व पुरुष यांचे अंतिम सामने लाइव्ह पाहण्यासाठी मेलबर्नची 3 दिवस, 2 रात्र अशी ट्रिप जिंकण्याची संधी, सौजन्य मास्टरकार्ड, समाविष्ट आहे.
ग्राहकांना टेनिस ग्रँड स्लॅमसाठी जाण्याची विशेष संधी देणारी ही भारतातील पहिलीवहिली कॅम्पेन आहे. ही कॅम्पेन मुंबई येथे, ऑक्टोबर 1, 2018 रोजी, लोकप्रिय भारतीय टेनिसपटू महेश भूपती व अंकिता रैना आणि क्रीडाप्रेमी यांच्या उपस्थितीत आयोजित केलेल्या कार्यक्रमात दाखल करण्यात आली. तसेच, या निमित्ताने मास्टरकार्ड व आयसीआयसीआय बँक यांचे अधिकारीही उपस्थित होते.
आयसीआयसीआय बँकेचे जनरल मॅनेजर व ग्रुप हेड – अनसिक्युअर्ड लेंडिंग, कार्ड्स अँड पेमेंट्स सोल्यूशन्स, सुदिप्त रॉय म्हणाले, “ऑस्ट्रेलियन ओपन 2019चा अंतिम सामना मेलबर्न येथे लाइव्ह पाहण्याचा थरार अनुभवण्याची संधी आमच्या ग्राहकांना देण्यासाठी मास्टरकार्डबरोबर भागीदारी करणारी पहिली बँक असल्याचा आम्हाला आनंद वाटतो. ग्राहकांसाठी जागतिक दर्जाचा व क्रीडा क्षेत्रातला अविस्मरणीय अनुभव सादर करण्यासाठी दोन वैशिष्ट्यपूर्ण ब्रँडचा प्रयत्न या सहयोगाच्या निमित्ताने करण्यात आला आहे. आगामी सणासुदीदरम्यान, आमच्या कार्डांचा वापर करून खर्च करण्यास ग्राहकांना उत्तेजन देण्यासाठी ‘एसयुवरस्पेंड्स’ कॅम्पेन आदर्श आहे.”
मास्टरकार्डचे दक्षिण आशियासाठीचे अकाउंट मॅनेजमेंटचे वरिष्ठ उपाध्यक्ष विकास वर्मा म्हणाले, “भारतातील सर्वात लोकप्रिय खेळांमध्ये टेनिसचा समावेश आहे आणि ऑस्ट्रेलियन ओपन ही एक प्रमुख जागतिक टेनिस स्पर्धा आहे. मास्टरकार्ड कार्डधारकांना मेलबर्न येथे ऑस्ट्रेलियन ओपन लाइव्ह पाहण्याचा प्राइसलेस अनुभव देण्यासाठी आयसीआयसीआय बँकेशी भागीदारी करताना आम्हाला अतिशय आंनद होत आहे. डिजिटल पेमेंट्सना चालना देण्याच्या दृष्टीने आणि ग्राहकांना खेळीमेळीच्या व आरामदायी वातावरणात सहभागी करून घेण्याच्या दृष्टीने खेळांशी संबंधित भागीदारी करणे मास्टरकार्डसाठी फायदेशीर ठरले आहे.”
या ट्रिपमुळे विजेत्यांना प्राइसलेस अनुभव मिळणार आहे. तसेच, टेनिस विश्वातील दिग्गजांना भेटण्याची, मेलबर्न पार्कमध्ये डिनर करण्याची आणि 26 व 27 जानेवारी 2019 रोजी खेळल्या जाणाऱ्या पुरुष व महिला यांच्या अंतिम सामन्यामध्ये प्रीमिअम श्रेणीचे तिकीट मिळण्याची संधी मिळणार आहे.
तसेच, आयसीआयसीआय बँक मास्टरकार्ड क्रेडिट व डेबिट कार्डांद्वारे सर्वाधिक खर्च करणाऱ्या पुढील 1000 जणांना सवलतीच्या कालावधीदरम्यान केलेल्या खर्चावर 2000 रुपये कॅशबॅक मिळेल. ही कॅशबॅक मिळण्यास पात्र ठरण्यासाठी ग्राहकांनी सवलतीच्या कालावधीमध्ये किमान 30,000 रुपये खर्च करणे गरजेचे आहे.
आयसीआयसीआय बँक मास्टरकार्ड क्रेडिट व डेबिट कार्डधारकांना 08030636570 यावर मिस्ड कॉल देऊन कॅम्पेनसाठी नोंदणी करता येऊ शकते.
मास्टरकार्ड ऑस्ट्रेलियन ओपनसाठी अधिकृत पेमेंट पार्टनर आहे. ऑस्ट्रेलियन ओपनचा अंतिम सामना पाहण्याची संधी मिळणे, हा अविस्मरणीय अनुभव आहे. हॅपी स्लॅम या नावाने ओळखल्या जाणाऱ्या ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेची टेनिस खेळाडूंना व चाहत्यांना चातकासारखी प्रतीक्षा असते. ऑस्ट्रेलियन ओपनसाठी प्रायोजकत्व देण्याचे मास्टरकार्डचे यंदाचे हे तिसरे वर्ष असून, आजवरची सर्वाधिक आनंदी स्लॅम बनवण्यावर मास्टरकार्डचा प्रामुख्याने भर आहे.
ही कॅम्पेन म्हणजे, ग्राहकांना उत्कृष्ट सेवा देण्यासाठी आयसीआयसीआय बँकेने हाती घेतलेल्या नव्या उपक्रमांचा एक भाग आहे. यामध्ये जागतिक ब्रँडच्या सहयोगाने निरनिराळ्या क्रेडिट व डेबिट कार्डांचा समावेश आहे. बँकेने होस्ट कार्ड इम्युलेशन (एचसीई) तंत्रज्ञानाच्या मदतीने काँटॅक्टलेस कार्ड दाखल करण्याच्या बाबतीत आघाडी घेतली आहे. या तंत्रज्ञानामुळे, बँकेच्या मोबाइल अॅपमध्ये कार्डे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने साठवून ठेवता येतात. त्यामुळे, ग्राहकांना मोबाइल फोनद्वारे दुकानांत पेमेंट करता येऊ शकते. ग्राहकांसाठी पूर्व-मंजूर ऑनलाइन क्रेडिट कार्ड दाखल करणारी ही पहिलीच बँक असून, ऑनलाइन व्यवहार करण्यासाठी कार्डाचा वापर तातडीने करता येऊ शकतो.
आयसीआयसीआय बँकेविषयी: आयसीआयसीआय बँक लि. (NYSE:IBN) ही एकत्रित संपत्तीच्या बाबतीत भारतातील सर्वात मोठी खासगी बँक आहे. जून 30, 2018 पर्यंत बँकेची एकूण एकत्रित संपत्ती 160.5 अब्ज डॉलर होती. आयसीआयसीआय बँकेच्या उपकंपन्यांमध्ये भारतातील आघाडीच्या खासगी विमा, संपत्ती व्यवस्थापन व सिक्युरिटीज ब्रोकरेज कंपन्यांचा समावेश आहे आणि देशातील सर्वात मोठ्या खासगी इक्विटी फर्मचा समावेश आहे. बँक भारतासह 17 देशांत कार्यरत आहे.
दादापुत्र मावळातून एन्ट्री मारणार ….
पुणे-राष्ट्रवादीचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांचा मुलगा पार्थ पवार मावळ लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढणार असल्याची चर्चा आहे. आगामी लोकसभा निवडणूकांची सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने सुद्धा लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरु केली असून, येत्या ६ आणि ७ ऑक्टोबरला लोकसभा मतदारसंघनिहाय बैठका घेण्यात येणार आहे. या बैठकीत स्थानिक पातळीवर नेत्यांचा कानोसा घेतला जाणार आहे. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी चर्चा केल्यानंतरच अध्यक्ष शरद पवार उमेदवारांबाबत अंतिम निर्णय घेतील असे बोलले जाते . मावळ लोकसभा मतदारसंघात अनेक प्रयोग करूनही राष्ट्रवादी कॉँग्रेसला यश मिळत नसल्याने आता राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आपला मुलगा पार्थ पवार यांना येथून लढविण्याची तयारी केली असल्याची चर्चा आहे. मात्र अशा राजकीय चर्चा घडवून आणल्या जातात. गेल्या निवडणुकीतही शरद पवार शिरूर व इतर मतदारसंघातून चाचपणी करीत असल्याच्या चर्चा मध्यमातून केल्या जात होत्या. अनुकूल वातावरण तयार करणे व पक्षांतर्गत गट-तट प्रभाव कमी करण्याचा प्रयत्न केला जातो.
महाराष्ट्रात व्यक्तीनिष्ठ आधारित प्रमुख राष्ट्रवादी व शिवसेना हे २ राजकीय पक्ष आहेत. महाराष्ट्रात शिवसेनेची तिसरी पिढी सध्या कार्यरत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसची सूत्रे शरद पवार, खासदार कन्या सुप्रिया सुळे, आमदार पुतण्या अजित पवार या पवार कुटुंबातील व्यक्तिंकडेच आहे. आता तिसरी पिढी सध्या कार्यरत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या तिसर्या पिढीतील दोन युवक राजकारणात आपले नशीब आजमावण्याचा प्रयत्न करीत आहेत. सध्या या दोघांवरच राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. पार्थ अजित पवार आणि रोहित राजेंद्र पवार हे दोन युवक आहेत. पार्थ हे अजित पवार यांचे जेष्ठ चिरंजीव आहेत. तर रोहित हे शरद पवार यांचे ज्येष्ठ बंधू आप्पासाहेब यांचे नातू आहेत. रोहित पवार हे सध्या पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत; तर पार्थ पवार हे उद्योजक आहेत. त्यांचे परदेशात व्यवस्थापन शास्त्राचे शिक्षण झाले आहे. पार्थ दादा पवार युवा मंच महाराष्ट्रच्या माध्यमातून सामाजिकदृष्ट्या कार्यरत आहेत. राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ अजित पवार यांनी त्याचे मामा पद्मसिंह पाटील यांच्या प्रचारासाठी तुळजापूर येथे गेल्या लोकसभा निवडणुकीत प्रचारात सहभाग घेऊन पदयात्रा काढली. या निमिताने राजकारणात सक्रीय झाल्याचेसमोर आले होते. पार्थ पवार अनेक दिवसांपासून शरद पवारांसोबत राजकीय कार्यक्रमांमध्ये हजेरी लावत होते. काही दिवसांपूर्वीच त्यांनी नागपुरात विधिमंडळाचे कामकाज पाहण्यासाठी हजेरी लावली होती. पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य रोहित राजेंद्र पवार यांनी आगामी विधानसभा निवडणूक अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड मतदारसंघातून लढविण्याचा निर्णय घेण्याचा प्रयत्न करीत आहेत मात्र त्यांचे सासरे हडपसर मतदारसंघातून लढविण्याचा आग्रह करीत आहेत. पक्षातील काही पदाधिकारी खडकवासला विधानसभा मतदारसंघातून लढविण्याचा आग्रह करीत आहेत. अशी चर्चा पक्षात आहे. अजित पवार यांनी मी बारामती मतदारसंघाशिवाय इतर कोणत्याही मतदारसंघात उभा राहणार नाही, अशी घोषणा दोन महिन्यांपूर्वी बारामती तालुक्यातील पणदरे येथील एका जाहीर सभेत बोलताना केली होती; त्यामुळे रोहित पवार यांना सुरक्षित मतदारसंघ शोधावा लागत आहे. अजित पवार यांचे पुत्र पार्थ यांचा राजकारणात प्रवेश होऊ शकतो, असे सूतोवाच अजित पवार यांनी खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना केले होते. ‘आताची पिढी मोठी झाली असून, त्यांचे निर्णय घेण्यास ते सक्षम आहेत. राजकारणात काम करताना स्थानिक कार्यकर्त्यांचे मत विचारात घेतले जाते. माझ्या मुलांनी राजकारणात येऊ नये, असे मी मध्यंतरी म्हणालो होतो, परंतु जग आता बदलत आहे. मी कोणावर निर्णय लादणार नाही, कुणी आपल्या करियरचा निर्णय घेत असेल तर मी रोखू शकत नाही,” असे सांगत अजित पवार यांनी पार्थच्या राजकारणातील प्रवेशाचे संकेत दिले. मावळ लोकसभा मतदारसंघातून गेल्या वेळी शिवसेनेतून राष्ट्रवादीमध्ये आलेले राहुल नार्वेकर लढले होते; परंतु ते तिसर्या क्रमांकावर राहिले होते. या वेळी लोकसभा निवडणूक निकराने लढवायचा निर्धार राष्ट्रवादीने केला असल्याने पार्थ पवार यांना मैदानात उतरविण्याचा निर्णय होऊ शकतो. पिंपरी-चिंचवड हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिलेला आहे. या शहरावर स्वतः अजितदादा पवार यांनी १५ वर्षांहून अधिक काळ अधिराज्य गाजवले आहे. परंतु, २०१४ पासून अजितदादांच्या पिंपरी-चिंचवडमधील राजकीय वर्चस्वाला धक्का बसला आहे. हे सर्व पक्षातील अंतर्गत गटबाजीमुळे झाले. मावळ लोकसभा मतदार संघात पिंपरी-चिंचवडचा परिसर येतो. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी या परिसराचे अनेक वर्ष लोकसभेत प्रतिनिधित्व केले आहे. 2009 पर्यंत शहराचा भाग बारामती लोकसभा मतदार संघात येत होता. त्यानंतर पुर्नरचना झाल्यानंतर मावळ लोकसभा मतदार संघाची स्थापना झाली आहे. 2009 मध्ये शिवसेनेकडून गजानन बाबर आणि 2014 मध्ये श्रीरंग बारणे निवडून आले आहेत.मावळ हा मतदारसंघ पुणे आणि रायगड अशा दोन जिल्ह्यांत विभागला गेला आहे. पुण्यातील चिंचवड, मावळ आणि पिंपरी हे तीन विधानसभा मतदारसंघ यात येतात. येथे राष्ट्रवादीची ताकद २०१४ पैकी मोठ्या प्रमाणात होती. तरीही २००९ आणि २०१४ या दोन्ही निवडणुकांत येथे पक्षाला विजय मिळाला नाही. मावळ लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघांपैकी चार मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत. याशिवाय पिंपरी-चिंचवड, पनवेल या दोन मोठ्या महापालिकांसह लोणावळा, तळेगावदाभाडे या नगरपालिका आणि ग्रामपंचायती भाजपने काबिज केलेल्या आहेत. त्यामुळे या मतदारसंघात भाजपची राजकीय स्थिती भक्कम आहे. तरीही भाजपची सर्व मदार पिंपरी-चिंचवड शहरावर असणार आहे. या मतदारसंघातून भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप हे निवडणुकीच्या मैदानात असतील अशी चर्चा आहे तर राष्ट्रवादीचे शहारध्यक्ष संजोग वाघेरे यांचे एकमेव नाव मावळच्या मतदारसंघात चर्चेत आहे. या मतदारसंघात भाजपखालोखाल राष्ट्रवादीची ताकद आहे. लोकसभा मतदारसंघांची २००८ मध्ये पुनर्ररचना झाली. या पुनर्रचनेनुसार २००९ मध्ये लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या. पुनर्ररचनेत मावळ लोकसभा मतदारसंघ पिंपरी-चिंचवडपासून ते रायगड जिल्ह्यातील समुद्र किनाऱ्यापर्यंत विस्तारला आहे. या मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. त्यामध्ये रायगड जिल्ह्यातील पनवेल, कर्जत, उरण आणि पुणे जिल्ह्यातील मावळ, चिंचवड आणि पिंपरी हे विधानसभा मतदारसंघ येतात. २००९ आणि २०१४ अशा दोन निवडणुका भाजप व शिवसेनेने एकत्र लढविल्या. या दोन्ही निवडणुकीत मावळ लोकसभा मतदारसंघ शिवसेनेकडे होता. दोन्ही वेळेस या मतदारसंघावर शिवसेनेचा भगवा फडकला आहे. मावळ लोकसभा मतदार संघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला दारुण पराभवाला सामोर जावं लागल्यानंतर आता अजित पवार यांच्या कार्यपद्धतीवरच प्रश्न चिन्ह उपस्थित केले होते. पिंपरी चिंचवड तत्कालीन शहराध्यक्ष योगेश बेहल यांनीच दादांचे निर्णय चुकले असं सांगत दादांना घराचा आहेर दिला होता. आगामी निवडणुकीत स्वतः अजितदादांचे पुत्र मैदानात उतरल्यास राष्ट्रवादीचे सर्व नेते एकदिलाने पक्षाचेच काम करतीलच असे नाही. दुसरीकडे या मतदारसंघात भाजप प्रथम क्रमांकावर असल्याने अजितदादांचे पुत्र मैदानात आल्यास विजयासाठी झुंजावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.
… वाहून गेलेल्या संसाराला मिळाला हातभार ! अश्विनी कदम मित्र परिवारातर्फे संसारोपयोगी साहित्यांचे वाटप
शासकिय वसतिगृहांची पाहणी करून अहवाल सादर करावा-जिल्हाधिकारी नवल किशोर राम
पुणे दि.3- जिल्हयातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या वसतीगृहांची पाहणी करून अहवाल सादर करावा. अन्नाचा दर्जा. पाणी, शैक्षणिक सुविधा इ. बाबींची पाहणी करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिल्या.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा मागासवर्गीय वसतीगृह समन्वय समितीची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील, जिल्हा समाजकल्याण अधिकारी विशाल लोंढे, अशासकीय सदस्य बाळासाहेब खुणे आदी शासकीय अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी नवल किशोर राम म्हणाले, वस्तिगृहांची तपासणी करण्यासाठी समिती गठीत करण्यात यावी. या समितीने शासकिय वसतीगृहातील निवास व्यवस्था, भोजन, पाणी व्यवस्था, इतर शैक्षणिक सुविधांची पाहणी करून पुढील बैठकीत अहवाल सादर करावा.
विद्यार्थ्यांना त्रास होणार नाही तसेच गैरसोय होणार नाही याबाबत दक्षता घेण्यात यावी. अशासकीस सदस्यांसोबत व्यक्तीश: वसतीगृहांची पाहणी व तपासणी करणार असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले.
खाजगी इमारतीमध्ये कार्यान्वित असलेली शासकीय वसतीगृहे शासकीय जागेमध्ये कार्यान्वित करण्याबाबतचा जमीन उपलब्धतेच्या माहितीसह विस्तृत प्रस्ताव सादर करण्याचे र्निदेश जिल्हाधिकारी राम यांनी दिले.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राज्यामध्ये मागासवर्गीय मुला-मुलींसाठी शासकीय वसतीगृहे चालविली जातात. मागासवर्गीयांची शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक उन्नती तसेच राहणीमान, समाजातील इतर घटकांप्रमाणे त्यांना जीवन जागता यावे तसेच त्यांना सर्व प्रकारचे शिक्षण व उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने शासकीय वसतीगृह योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत प्रवेशित विद्यार्थ्यांना निवासाची व भोजनाची मोफत व्यवस्था, पुस्तके, वह्या, व इतर शैक्षणिक साहित्य इत्यादी सोयी सुविधा पुरविण्यात येतात.
जिल्हा समाज कल्याण अधिकारी विशाल लोंढे यांनी पुणे जिल्ह्यात 21 शासकीय वसतीगृहे असून त्यात मुलींची 9 व मुलांची 12 वसतीगृहे असल्याचे सांगितले.
सरपोतदार करंडकावर पुणे विद्यार्थी गृहाची मोहोर
८३१३ कोटी रुपयांचा हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो प्रकल्प टाटा – सिमेन्स कंपनी उभारणार
पुणे-पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून राबवण्यात येणारा पुणे मेट्रो मार्ग – १
हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो प्रकल्प आज दि. ०३/१०/२०१८ रोजी दुपारी २.०० वाजता मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांचे उपस्थितीत टाटा व सिमेन्स कंपनीस सार्वजनिक खाजगी भागीदारी (DBFOT) तत्वावर
मंत्रालय, मुंबई येथे प्रदान करण्यात आला. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त व मुख्य
कार्यकारी अधिकारी श्री. किरण गित्ते यांनी टी. यु. टी. पी. एल. (टाटा) समुहाचे . संजय उबाळे व सिमेन्स
कंपनीचे सुनील माथुर यांना प्रकल्प प्रदान पत्र सुपूर्द केले.
हिंजवडी येथील माहिती व तंत्रज्ञान क्षेत्राला चालना मिळणारा प्रकल्प आहे. तसेच यातून प्रदूषण मुक्ती
व वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे. एकूण २३ कि.मी. लांबी असलेल्या ह्या प्रकल्पाची किंमत अंदाजे
८३१३ कोटी रुपये आहे. केंद्र शासनाच्या नवीन मेट्रो धोरणाअंतर्गत व खासगीकरणाच्या माध्यमातून प्रस्तुत
प्रकल्पाचे संकल्पन करण्यात आले आहे. केंद्र व राज्य शासनाच्या आर्थिक साह्यातून व टाटा – सिमेन्स यांच्या
खाजगी गुंतवणुकीतून या प्रकल्पाची उभारणी करण्यात येणार आहे. पुढील तीन वर्षात या प्रकल्पाचे काम पूर्ण
होवून टाटा – सिमेन्स कंपनीस पुढील ३५ वर्ष मुदतीसाठी प्रकल्प चालवण्यासाठी संकल्पन करा, बांधा,
गुंतवणूक करा, चालवा व हस्तांतरित करा (DBFOT) या तत्वावर देण्यात आला आहे.
या कार्यक्रमास. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष बापट, राज्याचे मुख्य सचिव . डी. के. जैन,
अपर मुख्य सचिव (वित्त) यु.पी.एस.मदान, अपर मुख्य सचिव श्री. प्रवीण परदेशी (मुख्यमंत्री कार्यालय),
प्रधान सचिव डॉ. नितीन करीर (नगर विकास विभाग – १), महानगर आयुक्त व मुख्य कार्यकारी अधिकारी
श्री. किरण गित्ते (पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण) तसेच टाटा समूहाचे ग्रुप चेयरमन श्री. नटराजन
चंद्रशेखरन, व टाटा अरोस्पेसचे श्री. बनमाळी अग्रवाल व सिमेन्स समूहाचे ग्लोबल सी.इ.ओ. श्री. राल्फ
हेसलबेचर, व सिमेन्स फाईनास्नचे ॲन्थोनी कॅनिसीयो आदी मान्यवर उपस्थित होते.
एलिव्हेटेड मेट्रो लाइनला हिंजेवाडी राजीव गांधी इंफोटेक पार्कपासून सुरूवात होईल आणि हा मार्ग बालेवाडीमधून शिवाजीनगरपर्यंत जाईल. हिंजेवाडी हे पुण्याचे जलदगतीने विकसित होत असलेले आयटी औद्योगिक केंद्र आहे आणि या केंद्राने ४,००,००० हून अधिक लोकांना रोजगार दिला आहे. २३.३ किमीचा मार्ग आणि २३ स्टेशन्स असलेला हा २०१७च्या नवीन मेट्रो रेल्वे धोरणानंतर भारतातील पब्लिक-प्रायव्हेट-पार्टनरशिप (पीपीपी) मॉडेलवरील पहिला मेट्रो प्रकल्प आहे. जून २०१९ मध्ये या प्रकल्पाच्या बांधकामाला सुरूवात होणार आहे आणि तीन वर्षांच्या कालावधीत हा प्रकल्प पूर्ण होईल. टाटा प्रोजेक्ट्स हे या सहयोगाला पाठिंबा देणारे ईपीसी भागीदार असतील.
टाटा सन्सच्या इन्फ्रास्ट्रक्चर, डिफेन्स व ऐरोस्पेस विभागाचे अध्यक्ष श्री. बानमाली अग्रवाल म्हणाले, ”हा प्रकल्प दीर्घकालीन व मोठे इन्फ्रास्ट्रक्चर प्रकल्प सादर करण्याच्या आमच्या कौशल्य आणि क्षमतांना सादर करतो. आमच्या भागीदारांच्या सहयोगासह आम्हाला निर्धारित वेळेत प्रकल्पाच्या अपेक्षा व आवश्यकतांची पूर्तता करण्याचा विश्वास आहे. पुणे मेट्रो भविष्यात पुणेकर करणा-या प्रवासामधील बदलाला सादर करते. या प्रकल्पामुळे आर्थिक लाभांसोबतच या मार्गावर रोजगाराच्या देखील संधी निर्माण होईल.”
सिमेन्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सुनिल माथुर म्हणाले, ”सिमेन्स १५० वर्षांहून अधिक काळापासून इलेक्ट्रीफिकेशन व ऑटोमेशन क्षेत्रांमध्ये भारतासोबत सहयोगी राहिली आहे. कंपनी आपले स्थिर तंत्रज्ञान, सखोल सोल्यूशन कौशल्य, जागतिक प्रकल्पांचा अनुभव आणि प्रबळ स्थानिक उत्पादन उपस्थितीच्या माध्यमातून भारताच्या दीर्घकालीन विकासगाथेमध्ये योगदान देत आहे. आम्हाला या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी टाटा ग्रुपसोबत सहयोगी भागीदार असण्याचा आनंद होत आहे. या प्रकल्पाचा पुणेकरांच्या जीवनाच्या दर्जावर सकारात्मक परिणाम होईल.”
सिमेन्स फायनान्शियल सर्विसेस (एसएफएस) भारतातील व्यापक क्षमतेसह जगभरातील इन्फ्रास्ट्रक्चर प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करते. पीपीपीच्या माध्यमातून सिमेन्स शहरांना त्यांचे इन्फ्रास्ट्रक्चर सोल्यूशन्स पूर्ण करण्यामध्ये आणि स्मार्टर, अधिक स्थिर परिवहन नेटवर्क्स निर्माण करण्यामध्ये मदत करते.
टीआरआयएल अर्बन ट्रान्सपोर्ट बाबत
टीआरआयएल अर्बन ट्रान्सपोर्ट प्रा. लि. या टाटा ग्रुप कंपनीची पब्लिक-प्रायव्हेट-पार्टनरशीप मॉडेलअंतर्गत शहरी परिवहन प्रकल्पांचा विकास व अंमलबजावणीसाठी स्थापना करण्यात आली. कंपनी रस्ते, शहरी परिवहन, इलेक्ट्रीक व्हेइकल्स व स्मार्ट शहरांवर लक्ष केंद्रित करेल.
सिमेन्स फायनान्शियल सर्विसेस बाबत
सिमेन्स फायनान्शियल सर्विसेस ही सिमेन्सची फायनान्सिंग शाखा आहे.सिमेन्स एजी (बर्लिन व म्युनिच) ही जागतिक तंत्रज्ञान कंपनी आहे. ही कंपनी गेल्या १७० वर्षांपासून अभियांत्रिकीमधील सर्वोत्तमता, नाविन्यता, दर्जा विश्वसनीयता आणि आंतरराष्ट्रीयतेसाठी ओळखली जाते. कंपनी जगभरात सक्रिय असून इलेक्ट्रीफिकेशन, ऑटोमेशन व डिजिटलायझेशन या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करते. ऊर्जा-कार्यक्षम, संसाधने वाचवणा-या तंत्रज्ञानाची जगातील सर्वात मोठी उत्पादक असलेली सिमेन्स ही कार्यक्षम पॉवर जनरेशन व पॉवर ट्रान्समिशन सोल्यूशन्सची आघाडीची पुरवठादार कंपनी आहे आणि क्षेत्रासाठी इन्फ्रास्ट्रक्चर सोल्यूशन्स, ऑटोमेशन, ड्राइव्ह व सॉफ्टवेअर सोल्यूशन्समधील अग्रणी कंपनी आहे. आपल्या सार्वजनिकरित्या नोंदणीकृत उपकंपनी सिमेन्स हेल्थीनिअर्स एजीसह कंपनी कम्प्युटेड टोमोग्राफी व मॅग्नेटिक रिझॉनन्स इमेजिंग सिस्टम्स सारख्या वैद्यकीय इमेजिंग उपकरणांची आघाडीची पुरवठादार कंपनी आहे आणि लॅबारेटरी डायग्नोस्टिक्स व क्लिनिकल आयटीमधील अग्रणी कंपनी आहे. ३० सप्टेंबर २०१७ रोजी संपलेल्या आर्थिक वर्ष २०१७ मध्ये सिमेन्सने ८३.० बिलियन युरो महसूल आणि ६.२ बिलियन युरो निव्वळ उत्पन्न प्राप्त केले. सप्टेंबर २०१७च्या अखेरपर्यंत कंपनीचे जगभरात जवळपास ३७७,००० कर्मचारी होते.
….अन पालकमंत्री एकटे पडले (व्हिडीओ)
पुणे- पालकमंत्री म्हटले कि कार्यकर्ते ,पदाधिकारी, नगरसेवक यांचा लवाजमा ..असा काही प्रकार आता उरला नसावा असे भासेल असा प्रसंग काल म. गांधी जयंती दिनी दिसून आला . पुणे स्टेशन येथील म. गांधी पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी भाजपने आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या वेळेनजीकची वेळ राष्ट्रवादीच्या येथील मौन आंदोलनाची होती. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी येथे होती .भाजपचे खासदार शिरोळे ,शहराध्यक्ष गोगावले यांनी आपल्या वेळेत कार्यक्रम सुरु तर केला . पण नंतर महापौर आणि महापालिका आयुक्त सौरव राव देखील येवून येथे भाजपच्या कार्यक्रमात अगदी राष्ट्रवादीच्या मोठ्या संख्येने आलेल्या आंदोलकांच्या पुढ्यात सहभागी झाले. आणि ते सारे निघूनही गेले आणि नंतर आले पालकमंत्री बापट … अन मग त्यांना झालेला उशीर, एकटे पडलेले बापट .. असे चित्र दिसले ..पण बापट यांनी एकट्याने का होईनात ..बापूजींना मनोभावे नमन केले ..आणि आले तसे निघून गेले … पहा हा व्हिडीओ …
कॉंग्रेस भवनात भक्तीभावाने म.गांधी आणि लालबहादूर शास्त्री जयंती साजरी
पुणे-राष्ट्रपिता महात्मा गांधीजी व माजी पंतप्रधान भारतरत्न स्व. लालबहाद्दूर शास्त्रीजी यांच्या जयंतीनिमित्त आज काँग्रेस भवन, पुणे येथे दोन्ही महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.चिंचवड येथील गुरुदेव सेवा मंडळातर्फे गांधीजींच्या आवडत्या भजनांचा कार्यक्रम आज काँग्रेस भवन येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी “वैष्णव जन तो”या भजनासह अनेक लोकप्रिय भजनांनी उपस्थितांची दाद मिळविली .आणि माजी आमदार उल्हास पवार यांनी अनेक किस्से ,प्रसंग सांगून त्यात रंगत भरली .आगळ्यावेगळ्या भावुक वातावरणातच राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या “गांधी जयंती सप्ताहाचे” उद्घाटन दीपप्रज्वलन करून करण्यात आले.
यावेळी शहराध्यक्ष रमेश बागवे, माजी आमदार उल्हास पवार, माजी उपमहापौर आबा बागुल ,बाळासाहेब अमराळे ,अजित दरेकर ,द.स पोळेकर ,राजेंद्र भुतडा ,प्रा. वाल्मिकी जगताप ,नीता परदेशी AICC अल्पसंख्याक सेलचे पदाधिकारी असिफ मोहम्मद ,सतीश पवार लेखक डॉ. श्री. वि. वि. घाणेकर तसेच वरिष्ठ पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी डॉ. श्री. वि. वि. घाणेकर लिखित “महात्मा गांधी हेच दहशतवादास उत्तर” या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांनी आयुष्यभर खादीचा प्रचार आणि प्रसार केला. गांधी जयंतीपासून पुढे महिनाभर दरवर्षी काँग्रेस भवन, पुणे येथे खादी ग्रामोद्योग संस्थांतर्फे खादी कपड्यांचे विक्री केंद्र उघडण्यात येते. दरवर्षीप्रमाणे आजही गांधी जयंतीच्या औचित्याने या केंद्राचे उदघाटन करण्यात आले.











