पुणे : ‘महाराष्ट्र गांधी स्मारक निधी’तर्फे सलग ९ व्या वर्षी आयोजित ‘राष्ट्रपिता महात्मा गांधी’ सप्ताहात परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘शेतकऱ्यांसाठी अच्छे दिन कधी ? हा या परिसंवादाचा विषय आहे. गांधीभवन कोथरूड येथे हा परिसंवाद बुधवार, दिनांक ३ ऑक्टोबर सायंकाळी ६ वाजता आयोजित करण्यात आला आहे.
परिसंवादामध्ये आमदार बच्चू कडू (प्रहार संघटना), पाशा पटेल (अध्यक्ष कृषी मूल्य आयोग), अजित नवले (सचिव, शेतकरी सुकाणू समिती) यांचा सहभाग असणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.कुमार सप्तर्षी (अध्यक्ष, महाराष्ट्र गांधी स्मारक निधी) उपस्थित राहतील.
अप्पा अनारसे, रवी लाटे, सचिन पांडुळे हे संयोजक आहेत.
शेतकऱ्यांच्या हमीभाव, पाणी-वीज आणि खते यांसारख्या मूलभूत सोयी सुविधांचा अभाव या आणि अनेक प्रश्नांनी बेजार झालेल्या शेतकर्यांना सुखाचे दिवस कधी येणार? या प्रश्नाचा वेध या कार्यक्रमात घेतला जाणार आहे.
सर्व बाजूंनी महत्त्वाच्या मुद्यांवर होणार्या या चर्चेत जास्तीतजास्त समविचारी सहकार्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.