पुणे :- महात्मा गांधीजीनी दिलेल्या त्रिसूत्रीनुसार दृढता, समर्पण आणि कठोर परिश्रम प्रत्येकाच्या आयुष्यात असणे आवश्यक असतात. याचसोबत मिळालेल्या संधीचे रुपांतर यशात करण्यासाठी विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रमासाठी तयार असले पाहिजे. कामात समर्पण आणि दृढता असल्यास आपले ध्येय आपण निश्चितच पूर्ण करू शकतो असे मत गीता गोयल यांनी व्यक्त केले.
गोयल गंगा इंटरनॅशनल स्कूलमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती साजरा करण्यात आली. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी प्रमुख पाहुणे शिक्षण क्षेत्रात काम करणारे शिक्षक सुरेश शिवठेरे, गोयल गंगा फौंडेशनच्या विश्वस्त गीता गोयल, गोयल गंगा इंटरनैशनल स्कुलच्या संचालिका सोनू गुप्ता, शाळेच्या मुख्याध्यापिका भारती भागवाणी, इतर शिक्षक,पालकही उपस्थित होते. मनोरंजनात्मक पद्धतीने अर्थपूर्ण माहिती सादर करण्याच्या दृष्टीने ‘निसर्गाची काळजी’ या विषयावर नाटकांचे आयोजन करण्यात आले होते याशिवाय गांधीजींच्या आठवणीना उजाळा देत भजनांचे देखील उत्कृष्टपद्धतीने सादरीकरण केले.प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणारे शिवठेरे यांनी गोयल गंगा इंटरनैशनल स्कुचे विद्यार्थ्यां अभ्यासापासून खेळापर्यंत ज्या हिरारीने भाग घेवून उत्तम कामगिरी करतात ते वाखाण्यासारखे आहे. अशी भावना बोलून दाखवली. यानिमित्ताने विद्यार्थ्यांना जागरुकता आणि संवेदनशीलता निर्माण करण्यासाठी शाळेच्या परिसरांत रक्तदान शिबिराचे देखील आयोजन करण्यात आले होते. ही शाळा महात्मा गांधी यांच्या तत्वांवर आधरली असून आमचा त्यावर विश्वास आहे आणि आम्ही त्याचे पालनही करतो असे मत यानिमित्ताने सोनू गुप्ता यांनी मांडले.