पुणे-राष्ट्रपिता महात्मा गांधीजी व माजी पंतप्रधान भारतरत्न स्व. लालबहाद्दूर शास्त्रीजी यांच्या जयंतीनिमित्त आज काँग्रेस भवन, पुणे येथे दोन्ही महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.चिंचवड येथील गुरुदेव सेवा मंडळातर्फे गांधीजींच्या आवडत्या भजनांचा कार्यक्रम आज काँग्रेस भवन येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी “वैष्णव जन तो”या भजनासह अनेक लोकप्रिय भजनांनी उपस्थितांची दाद मिळविली .आणि माजी आमदार उल्हास पवार यांनी अनेक किस्से ,प्रसंग सांगून त्यात रंगत भरली .आगळ्यावेगळ्या भावुक वातावरणातच राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या “गांधी जयंती सप्ताहाचे” उद्घाटन दीपप्रज्वलन करून करण्यात आले.
यावेळी शहराध्यक्ष रमेश बागवे, माजी आमदार उल्हास पवार, माजी उपमहापौर आबा बागुल ,बाळासाहेब अमराळे ,अजित दरेकर ,द.स पोळेकर ,राजेंद्र भुतडा ,प्रा. वाल्मिकी जगताप ,नीता परदेशी AICC अल्पसंख्याक सेलचे पदाधिकारी असिफ मोहम्मद ,सतीश पवार लेखक डॉ. श्री. वि. वि. घाणेकर तसेच वरिष्ठ पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी डॉ. श्री. वि. वि. घाणेकर लिखित “महात्मा गांधी हेच दहशतवादास उत्तर” या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांनी आयुष्यभर खादीचा प्रचार आणि प्रसार केला. गांधी जयंतीपासून पुढे महिनाभर दरवर्षी काँग्रेस भवन, पुणे येथे खादी ग्रामोद्योग संस्थांतर्फे खादी कपड्यांचे विक्री केंद्र उघडण्यात येते. दरवर्षीप्रमाणे आजही गांधी जयंतीच्या औचित्याने या केंद्राचे उदघाटन करण्यात आले.






