Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

८३१३ कोटी रुपयांचा हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो प्रकल्प टाटा – सिमेन्स कंपनी उभारणार

Date:

पुणे-पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून राबवण्यात येणारा पुणे मेट्रो मार्ग – १
हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो प्रकल्प आज दि. ०३/१०/२०१८ रोजी दुपारी २.०० वाजता मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांचे उपस्थितीत टाटा व सिमेन्स कंपनीस सार्वजनिक खाजगी भागीदारी (DBFOT) तत्वावर
मंत्रालय, मुंबई येथे प्रदान करण्यात आला. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त व मुख्य
कार्यकारी अधिकारी श्री. किरण गित्ते यांनी टी. यु. टी. पी. एल. (टाटा) समुहाचे . संजय उबाळे व सिमेन्स
कंपनीचे सुनील माथुर यांना प्रकल्प प्रदान पत्र सुपूर्द केले.
हिंजवडी येथील माहिती व तंत्रज्ञान क्षेत्राला चालना मिळणारा प्रकल्प आहे. तसेच यातून प्रदूषण मुक्ती
व वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे. एकूण २३ कि.मी. लांबी असलेल्या ह्या प्रकल्पाची किंमत अंदाजे
८३१३ कोटी रुपये आहे. केंद्र शासनाच्या नवीन मेट्रो धोरणाअंतर्गत व खासगीकरणाच्या माध्यमातून प्रस्तुत
प्रकल्पाचे संकल्पन करण्यात आले आहे. केंद्र व राज्य शासनाच्या आर्थिक साह्यातून व टाटा – सिमेन्स यांच्या
खाजगी गुंतवणुकीतून या प्रकल्पाची उभारणी करण्यात येणार आहे. पुढील तीन वर्षात या प्रकल्पाचे काम पूर्ण
होवून टाटा – सिमेन्स कंपनीस पुढील ३५ वर्ष मुदतीसाठी प्रकल्प चालवण्यासाठी संकल्पन करा, बांधा,
गुंतवणूक करा, चालवा व हस्तांतरित करा (DBFOT) या तत्वावर देण्यात आला आहे.
या कार्यक्रमास. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  व  पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष बापट, राज्याचे मुख्य सचिव . डी. के. जैन,
अपर मुख्य सचिव (वित्त) यु.पी.एस.मदान, अपर मुख्य सचिव श्री. प्रवीण परदेशी (मुख्यमंत्री कार्यालय),
प्रधान सचिव डॉ. नितीन करीर (नगर विकास विभाग – १), महानगर आयुक्त व मुख्य कार्यकारी अधिकारी
श्री. किरण गित्ते (पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण) तसेच टाटा समूहाचे ग्रुप चेयरमन श्री. नटराजन
चंद्रशेखरन, व टाटा अरोस्पेसचे श्री. बनमाळी अग्रवाल व सिमेन्स समूहाचे ग्लोबल सी.इ.ओ. श्री. राल्फ
हेसलबेचर, व सिमेन्स फाईनास्नचे ॲन्थोनी कॅनिसीयो आदी मान्यवर उपस्थित होते.

एलिव्‍हेटेड मेट्रो लाइनला हिंजेवाडी राजीव गांधी इंफोटेक पार्कपासून सुरूवात होईल आणि हा मार्ग बालेवाडीमधून शिवाजीनगरपर्यंत जाईल. हिंजेवाडी हे पुण्‍याचे जलदगतीने विकसित होत असलेले आयटी औद्योगिक केंद्र आहे आणि या केंद्राने ४,००,००० हून अधिक लोकांना रोजगार दिला आहे. २३.३ किमीचा मार्ग आणि २३ स्‍टेशन्‍स असलेला हा २०१७च्‍या नवीन मेट्रो रेल्‍वे धोरणानंतर भारतातील पब्लिक-प्रायव्‍हेट-पार्टनरशिप (पीपीपी) मॉडेलवरील पहिला मेट्रो प्रकल्‍प आहे. जून २०१९ मध्‍ये या प्रकल्‍पाच्‍या बांधकामाला सुरूवात होणार आहे आणि तीन वर्षांच्‍या कालावधीत हा प्रकल्‍प पूर्ण होईल. टाटा प्रोजेक्‍ट्स हे या सहयोगाला पाठिंबा देणारे ईपीसी भागीदार असतील.

टाटा सन्‍सच्‍या इन्‍फ्रास्‍ट्रक्‍चर, डिफेन्‍स व ऐरोस्‍पेस विभागाचे अध्‍यक्ष श्री. बानमाली अग्रवाल म्‍हणाले, ”हा प्रकल्‍प दीर्घकालीन व मोठे इन्‍फ्रास्‍ट्रक्‍चर प्रकल्‍प सादर करण्‍याच्‍या आमच्‍या कौशल्‍य आणि क्षमतांना सादर करतो. आमच्‍या भागीदारांच्‍या सहयोगासह आम्‍हाला निर्धारित वेळेत प्रकल्‍पाच्‍या अपेक्षा व आवश्‍यकतांची पूर्तता करण्‍याचा विश्‍वास आहे. पुणे मेट्रो भविष्‍यात पुणेकर करणा-या प्रवासामधील बदलाला सादर करते. या प्रकल्‍पामुळे आर्थिक लाभांसोबतच या मार्गावर रोजगाराच्‍या देखील संधी निर्माण होईल.”

सिमेन्‍स लिमिटेडचे व्‍यवस्‍थापकीय संचालक व मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्री. सुनिल माथुर म्‍हणाले, ”सिमेन्‍स १५० वर्षांहून अधिक काळापासून इलेक्‍ट्रीफिकेशन व ऑटोमेशन क्षेत्रांमध्‍ये भारतासोबत सहयोगी राहिली आहे. कंपनी आपले स्थिर तंत्रज्ञान, सखोल सोल्‍यूशन कौशल्‍य, जागतिक प्रकल्‍पांचा अनुभव आणि प्रबळ स्‍थानिक उत्‍पादन उपस्थितीच्‍या माध्‍यमातून भारताच्‍या दीर्घकालीन विकासगाथेमध्‍ये योगदान देत आहे. आम्‍हाला या प्रकल्‍पाच्‍या अंमलबजावणीसाठी टाटा ग्रुपसोबत सहयोगी भागीदार असण्‍याचा आनंद होत आहे. या प्रकल्‍पाचा पुणेकरांच्‍या जीवनाच्‍या दर्जावर सकारात्‍मक परिणाम होईल.”

सिमेन्‍स फायनान्शियल सर्विसेस (एसएफएस) भारतातील व्‍यापक क्षमतेसह जगभरातील इन्‍फ्रास्‍ट्रक्‍चर प्रकल्‍पांमध्‍ये गुंतवणूक करते. पीपीपीच्‍या माध्‍यमातून सिमेन्‍स शहरांना त्‍यांचे इन्‍फ्रास्‍ट्रक्‍चर सोल्‍यूशन्‍स पूर्ण करण्‍यामध्‍ये आणि स्‍मार्टर, अधिक स्थिर परिवहन नेटवर्क्‍स निर्माण करण्‍यामध्‍ये मदत करते.

टीआरआयएल अर्बन ट्रान्‍सपोर्ट बाबत

टीआरआयएल अर्बन ट्रान्‍सपोर्ट प्रा. लि. या टाटा ग्रुप कंपनीची पब्लिक-प्रायव्‍हेट-पार्टनरशीप मॉडेलअंतर्गत शहरी परिवहन प्रकल्‍पांचा विकास व अंमलबजावणीसाठी स्‍थापना करण्‍यात आली. कंपनी रस्‍ते, शहरी परिवहन, इलेक्‍ट्रीक व्‍हेइकल्‍स व स्‍मार्ट शहरांवर लक्ष केंद्रित करेल.

सिमेन्‍स फायनान्शियल सर्विसेस बाबत

सिमेन्‍स फायनान्शियल सर्विसेस ही सिमेन्‍सची फायनान्सिंग शाखा आहे.सिमेन्‍स एजी (बर्लिन व म्‍युनिच) ही जागतिक तंत्रज्ञान कंपनी आहे. ही कंपनी गेल्‍या १७० वर्षांपासून अभियांत्रिकीमधील सर्वोत्‍तमता, नाविन्‍यता, दर्जा विश्‍वसनीयता आणि आंतरराष्‍ट्रीयतेसाठी ओळखली जाते. कंपनी जगभरात सक्रिय असून इलेक्‍ट्रीफिकेशन, ऑटोमेशन व डिजिटलायझेशन या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करते. ऊर्जा-कार्यक्षम, संसाधने वाचवणा-या तंत्रज्ञानाची जगातील सर्वात मोठी उत्‍पादक असलेली सिमेन्‍स ही कार्यक्षम पॉवर जनरेशन व पॉवर ट्रान्‍समिशन सोल्‍यूशन्‍सची आघाडीची पुरवठादार कंपनी आहे आणि क्षेत्रासाठी इन्‍फ्रास्‍ट्रक्‍चर सोल्‍यूशन्‍स, ऑटोमेशन, ड्राइव्‍ह व सॉफ्टवेअर सोल्‍यूशन्‍समधील अग्रणी कंपनी आहे. आपल्‍या सार्वजनिकरित्‍या नोंदणीकृत उपकंपनी सिमेन्‍स हेल्‍थीनिअर्स एजीसह कंपनी कम्‍प्‍युटेड टोमोग्राफी व मॅग्‍नेटिक रिझॉनन्‍स इमेजिंग सिस्‍टम्‍स सारख्‍या वैद्यकीय इमेजिंग उपकरणांची आघाडीची पुरवठादार कंपनी आहे आणि लॅबारेटरी डायग्‍नोस्टिक्‍स व क्लिनिकल आयटीमधील अग्रणी कंपनी आहे. ३० सप्‍टेंबर २०१७ रोजी संपलेल्‍या आर्थिक वर्ष २०१७ मध्‍ये सिमेन्‍सने ८३.० बिलियन युरो महसूल आणि ६.२ बिलियन युरो निव्‍वळ उत्‍पन्‍न प्राप्‍त केले. सप्‍टेंबर २०१७च्‍या अखेरपर्यंत कंपनीचे जगभरात जवळपास ३७७,००० कर्मचारी होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

गणेशोत्सव आता महाराष्ट्र महोत्सव:पुण्यात गणेश मंडळांकडून जल्लोष

पुणे: कसबा विधानसभेचे आमदार हेमंत रासने यांच्या मागणीनुसार आज...

पुणे-नाशिक औद्योगिक महामार्ग प्रकल्प तीन वर्षात पूर्ण करणार

शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे मुंबई, दि. १० : पुणे-नाशिक...

‘बालभारती’ची नवीन सुसज्ज इमारत लवकरच:शिक्षण राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर

मुंबई, दि.१० : ‘बालभारती’ची मुख्य इमारत अत्यंत कमकुवत झाल्यामुळे...

हिंजवडीकरांच्या समस्या सोडविण्यासाठी नियोजनाचा बृहत आराखडा सादर करा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई,दि.१०- पुण्यातील हिंजवडी आयटी पार्क परिसरात वाहतूक कोंडी, अतिक्रमण,...