Home Blog Page 3071

दूध उत्पादकांसाठी मोफत चर्चासत्र, कार्यशाळा, प्रदर्शन व प्रकल्प भेटीचे आयोजन

0
पुणे : महाराष्ट्रातील दूध उत्पादक दुधाशी संलग्न व्यवसायात यावा व त्याला सर्वप्रकारची तांत्रिक व इतर माहिती मिळावी यादृष्टीकोनातून महाराष्ट्र दूध परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये विविध विषयांवरील कार्यशाळा, चर्चासत्रे होणार असून अत्याधुनिक मशीनरींचे प्रदर्शनही भरविण्यात आले आहे. येत्या शुक्रवार ते रविवार दरम्यान (12 ते 14 ऑक्टोबर) ही परिषद होत असून राज्याचे दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन होणार आहे, अशी माहिती आनंद गोरड यांनी दिली.
 
महाराष्ट्र दूध परिषद सर्वांसाठी मोफत असून पिंपरीतील ऑटो क्लस्टर एक्झिबिशन सेंटरमध्ये होत असून तिचे उद्घाटन शुक्रवारी दुपारी 12 वाजता होणार आहे. याप्रसंगी खासदार राजू शेट्टी, आमदार बच्चू कडू, संयोजक विष्णूकाका हिंगे, कुलदीप शर्मा, राजेंद्र कोकणे, डॉ. टी. के.वल्ली, कांतीलाल उमाप, ए. व्ही. गुप्ते आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
 
दूध परिषदेच्या पहिल्या दिवशी शुक्रवारी लघु डेअरी प्रकल्प उभारणी, दूध प्रक्रिया, दुग्धजन्य पदार्थ उत्पादन, गुणनियंत्रक व मशिनरीची देखभाल आणि दुभत्या जनावरांचे आरोग्य व्यवस्थापन व शास्त्रीय पध्द्तीने संगोपन या विषयांवरील कार्यशाळा होणार आहे. शनिवारी दुभत्या जनावरांचे आरोग्य व्यवस्थापन व शास्त्रीय पध्द्तीने संगोपन आणि पनीर, खवा उत्पादन व मिठाई उद्योग याविषयावर चर्चासत्र होणार आहे. दुग्ध व्यवसाय मार्गदर्शन व आदर्श डेअरी फार्म व दुग्धजन्य पदार्थ उत्पादन प्रकल्पास भेट दिली जाणार आहे. रविवारी दही, लस्सी, ताक, चक्का, श्रीखंड, आम्रखंड उत्पादन व मिठाई उद्योगाविषयी चर्चासत्र होणार आहे. अधिकाअधिक दूध उत्पादकांनी या दूध परिषदेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आनंद गोरड यांनी केले आहे.

पाणी कपातीचं भुत खोटं हि राजकीय स्टंटबाजी -सभागृहनेता भिमाले (व्हिडीओ)

0

पुणे- पाणी कपात बिपात काही नाही अशी भूमिका घेत ,या संदर्भात विरोधी पक्ष करीत असलेली आंदोलने म्हणजे निव्वळ राजकीय स्टंटबाजी बाजी आहे असे स्पष्टीकरण आज महापालिकेतील सभागृहनेता श्रीनाथ भिमाले यांनी केलं .
आज पुण्याच्या पाणीपुरवठ्यात कपात करायची म्हणून खडकवासला धरणातून पुण्याला पाणी देणारे दोन पंप बंद करण्यात आल्याच्या वृत्ताचाही त्यांनी इन्कार केला ..पहा आणि ऐका नेमके त्यांनी काय म्हटले आहे .

पुण्याचं पाणी- मंत्री शिवतारेंची गोची -म्हणाले ,१३५० पेक्षा जास्त पाणी पुण्यानं घेऊ नयेच (व्हिडीओ)


पुणे : कालवा समितीच्या बैठकीत पालिकेस 1150 एमएलडी पाणी मंजूर झाले असतानाही पालिका खडकवासला धरणातून जादा पाणी घेत असल्याचे निदर्शनास येताच पाटबंधारे विभागाकडून आज पालिकेस दिले जाणारे पाणी कमी करण्यासाठी 2 पंप बंद करण्यात आल्याच्या बातमीने गदारोळ उठविला  आणि याचवेळी महापालिकेत आलेल्या जलसंपदामंत्री विजय शिवतारे यांनी पत्रकार परिषद घ्यावी कि घेवू नये ? या पेचात न पडता पत्रकार परिषद घेतली .
काय म्हणाले ,मंत्री शिवतारे
1)आज सर्व अधिकारी कालवा फुटी प्रकरणी हायकोर्टात ,तिथे त्यांना फोन घेता येत नाही ,पण मी अशाप्रकारे पुण्याच पाणी कमी केलंय काय याची माहिती घेतो .
2)पुण्याने १३५० एमएल डी पर डे पेक्षा  जास्त पाणी कुठल्याही परिस्थितीत उचलू नये .
3)खरे तर पुण्याला ४० लाख लोकांना ८.2 टीएमसी एवढ्याच पाण्याची आवश्यक्यता आमी १३५० एम एलडी पर डे म्हणजे १४ ते साडे चौदा टीएमसी पाणी देतो ,मग १६५० टीएमसी पाणी हवंय कशाला ?
4)शिस्त हवीच ,नियम पाळायला हवेत ,आणि जागतिक धोराहून अधिक पाणी वापरता कामा नये .
5)खरे तर धरणे बांधली तेव्हा ,ती शेती साठी बांधली गेली ,आता लोकसंख्या वाढली तर लोकांना पाणी देणेही आवश्यक आहेच .
6)शिवसेना पाणीकपात करू नये म्हणून मोर्चे काढते आणि तुम्ही शिवसेनेचे मंत्री एकप्रकारे पुण्याची पाणी कपात मान्य करता हि दुटप्पी भूमिका नाही काय ? या प्रश्नावर म्हणाले , टीआरपी साठी प्रश्न नकोत ,मी पाणी कपातीचे समर्थन करत नाही .पण पाणी जपून वापरलेच पाहीजे.

रिटेलमधील परकीय गुंतवणुकीविरोधातील रथ यात्रेचे पुण्यात स्वागत

0

संपूर्ण क्रांती रथ यात्रेद्वारा देशभरातील रिटेल व्यापाऱ्यांमध्ये जनजागृती

पुणे, दि. 10 : अमेझॉन, वॉलमार्टसारख्या बहुराष्ट्रीय कंपन्या एफडीआयच्या माध्यमातून रिटेल व्यवसायात गुंतवणूक करीत आहेत. त्यामुळे देशातील रिटेल व्यापारी उध्वस्त होणार आहे. याचा विरोध म्हणून काॅन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (कैट)च्या वतीने देशभर संपूर्ण क्रांती रथ यात्रा काढण्यात आली. हा यात्रा रथ पुण्यात दाखल झाला असून त्याचे स्वागत पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघातर्फे करण्यात आले.

सिंहगड रस्त्यावरील परिणय मंगल कार्यालयात पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघ आणि कैट यांच्या वतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित व्यापाऱ्यांना रिटेल व्यवसायातील अडचणी व परकीय गुंतवणुकीमुळे उद्भवणाऱ्या संभाव्य संकटांबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. याप्रसंगी कैटचे प्रभारी वीरेंद्र सिंह वालीया, पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाचे अध्यक्ष सचिन निवंगुणे, पश्चिम विभागीय प्रभारी अजित सेटिया, दिलीप कुंभोजकर, अमरसी कारीया, सुनिल गेहलोत, नवनाथ सोमसे, अजित चंगेडीया, सारंग राडकर, रामभाऊ दोडके, नितीन पंडित, उमेश यादव, भोनाराम चौधरी, कमलेश शहा, विनोद चौधरी, मिश्रीलाल चौधरी, ढगलाराम चौधरी, सोनुसिंह राजपूत आदी उपस्थित होते.

वॉलमार्ट सारख्या बहुराष्ट्रीय कंपन्या किरकोळ क्षेत्रात आल्यास भारतीय रिटेल व्यापारी धोक्यात येऊ शकतो. याविषयी किरकोळ व्यापाऱ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी संपूर्ण क्रांती रथ यात्रा चे आयोजन केले आहे. ही यात्रा देशभरात २२ हजार किमी चा प्रवास करत २८ राज्ये १५० ते २०० शहरातून प्रवास करणार आहे. 15 डिसेंबर रोजी ही रथ यात्रा दिल्लीत दाखल होईल. 16 डिसेंबरला देशभरातील रिटेल व्यापारी दिल्लीत येणार असून परकीय गुंतवणुकीच्या विरोधात मोठा मोर्चा निघणार आहे, असे वीरेंद्रसिंह वालिया म्हणाले.

अमेझॉन, वॉलमार्ट सारख्या बहुराष्ट्रीय कंपन्या रिटेल व्यापाऱ्यासमोर बलाढ्य शत्रू म्हणून उभ्या आहेत. या कंपन्या परदेशातून कमी टक्के व्याजाने भांडवल उभे करून भारतामध्ये गुंतवणूक करत आहेत. आम्हला शासनाकडून कुठल्याही प्रकारची मदत मिळत नाही. किरकोळ व्यापाऱ्यांचा व्यवसाय बंद पडण्याच्या मार्गावर आहे. हे आमच्यावरील मोठे संकट आहे. या संकटाविरोधात आम्ही एकत्र येऊन समर्थपणे लढा उभारणार आहोत. येणाऱ्या दिवाळी सणाला ज्या आंतरराष्ट्रीय  कंपन्या आम्हाला योग्य दरात माल देणार नाहीत त्या कंपन्यांवर आम्ही बहिष्कार टाकण्यात येईल. स्वदेशी कंपन्यांना माल  खरेदीसाठी प्राधान्य दिले जाईल, असे सचिन निवंगुणे यांनी सांगितले.

स्विगी, झोमॅटो, फुडपांडा आणि उबरइटसह ऑनलाईन अन्नपदार्थ पुरवणाऱ्या ११३ आस्थापनांना बजावल्या नोटीसा

0

मुंबई :-स्विगी, झोमॅटो, फुडपांडा आणि उबरइट अशा ऑनलाईन  अन्नपदार्थ ग्राहकांना पुरवण्याऱ्या ११३ आस्थापना या विनापरवाना सुरू असल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत अशी  माहिती अन्न व औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांनी येथे दिली .

ई कॉमर्स आणि ऑनलाईन खरेदी विक्रीच्या क्षेत्रात आता अन्नपदार्थही ऑनलाईन पद्धतीने मिळण्यास सुरूवात झाली आहे. मात्र या ऑनलाईन ऍप आणि संकेतस्थळांच्या माध्यमातून अन्नपदार्थ पुरवण्याऱ्या कंपन्यांच्या आस्थापना विनापरवाना आणि अनारोग्य परिस्थितीत सुरू असल्याची बाब अन्न व औषध प्रशासनाच्या पाहणीतून समोर आली आहे. यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना अन्न व औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांनी  दिल्या. बृहन्मुंबई विभागात केलेल्या या पाहणीत प्रशासनाने ११३ आस्थापना या विनापरवाना सुरू असल्याचे शोधून काढले आहे. अशा आस्थापनांना नोटीसा देण्यात आल्या आहेत.

गेल्या काही दिवसात ऑनलाईन वस्तूंप्रमाणे ऑनलाईन अन्नपदार्थ ऑर्डर करून ते घरपोच मिळवण्याची सुविधा काही कंपन्यांनी देण्यास सुरूवात केली आहे. मात्र अशा खाद्यपुरवणाऱ्या आस्थापनांमधून कोणत्या प्रकारे खाद्य निर्मिती केली जाते, त्यांसाठी विविध परवानगी घेतल्या गेल्या आहेत का अशा पद्धतीचा सखोल अभ्यास आणि तपासणी २१ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या काळात बृहन्मुंबई विभागात करण्यात आली.

अन्न व औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांच्या सूचनेनुसार व अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्त पल्लवी दराडे  यांच्या मार्गदर्शखाली अन्न व औषध प्रशासनाचे दक्षता विभागाचे सहआयुक्त सुनील भारद्वाज यांनी अन्न सुरक्षा अधिकारी यांच्यासोबत ही कारवाई केली. या मोहिमेत २१ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या कालावधीच एकूण ३४७ आस्थापनांना भेटी देण्यात आल्या. त्यात ११३ आस्थापना अन्न सुरक्षा माणद कायद्यांअंतर्गत परवाना आणि नोंदणी नसताना सुरू असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. यात स्विगी, झोमॅटो, फुडपांडा आणि उबरइट अशा ऑनलाईन ऍपद्वारे आणि साईटद्वारे ग्राहकांना अन्नपदार्थ पुरवण्याऱ्या कंपन्यांचाशी संबंधित आस्थापनांचा समावेश आहे. या मोहिमेत या कंपन्या विनापरवाना आणि अनारोग्य वातावरणात सुरू असल्याचे समोर आल्याने त्यांना स्टॉप बिझनेस नोटीस देण्यात आली आहे. यात ८५ आस्थापना या स्विगी, ५० आस्थापना झोमॅटो, ३ आस्थापना फुडपांडा आणि २ आस्थापना या उबरइट या ऑनलाईन ऍपधारक संलग्न आहेत.

त्यामुळे अशा आस्थापनांवर अन्न सुरक्षा माणदे कायदा अंतर्गत अन्न व औषध प्रशासनाकडून कायदेशीर नोटीस देण्यात आली असून त्यांच्या उत्तरानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.

मानसी किर्लोस्कर यांची संयुक्त राष्ट्रांच्या (यूएन) भारतातील पहिल्या यंग बिझनेस चॅम्पियन म्हणून नियुक्ती

0

पुणे-‘किर्लोस्कर सिस्टिम्स लिमिटेड’च्या कार्यकारी संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मानसी किर्लोस्कर यांची संयुक्त राष्ट्रांच्या (यूएन) भारतातील शाश्वत विकास ध्येये (सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स – एसडीजी) कार्यक्रमाच्या पहिल्या ‘यंग बिझनेस चॅम्पियन’ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. संयुक्त राष्ट्रांनी शाश्वत विकासाचे ध्येय गाठण्यासाठी निश्चित केलेल्या कार्यक्रमाला भारतात चालना देण्याची जबाबदारी मानसी किर्लोस्कर यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.

उदयोन्मुख तरुण व्यवसाय नेतृत्व असलेल्या मानसी किर्लोस्कर यांच्याकडे शाश्वत विकास ध्येयधोरणांवरील संवादाचा आणि व्यवसाय जबाबदाऱ्यांचा आपल्या सहकाऱ्यांमध्ये विस्तार करण्याची, तसेच या कामी इतर तरुण उद्योजकांना स्वयंसक्रिय बनवण्यासाठी प्रेरणा देण्याची अद्वितीय क्षमता आहे. याखेरीज विकासात उद्योगाच्या भूमिकेवर लक्ष केंद्रित करुन संयुक्त राष्ट्रांसमवेत हवामान बदल, प्लास्टिकमुक्ती, घनकचरा व्यवस्थापन आणि महिला सक्षमीकरण या विषयांवरही त्या काम करणार आहेत. ‘यूएन-इंडिया बिझनेस फोरम’च्या (यूएनआयबीएफ) उद्दिष्ट्यांना चालना देण्यातही त्या महत्त्वाची भूमिका बजावतील.

संयुक्त राष्ट्रांसोबत त्यांची पहिली यंग बिझनेस चॅम्पियन म्हणून काम करण्याची संधी मिळणे हा माझ्यासाठी स्फूर्तिदायक बहुमान असल्याची भावना व्यक्त करुन मानसी म्हणाल्या, “शाश्वत विकास ध्येधोरणे (एसडीजी) हा कार्यक्रम उद्योगांना भारताच्या भावी विकासात सहभागी होण्याची अनोखी संधी आहे. शाश्वत विकासाला गती देण्याचे सुप्त सामर्थ्य उद्योगांमध्ये आहे. माझ्या कामातून मी नवउद्योगांतील नोकरदार अथवा मालक अशा सर्व तरुण नेतृत्वांमध्ये हाच संदेश पोचवणार आहे.”

मानसी यांच्या नियुक्तीचे स्वागत करताना भारतातील संयुक्त राष्ट्राचे निवासी समन्वयक युरी अफनासेव म्हणाले, “ही नियुक्ती करताना मला आनंद होत आहे. शाश्वत विकास ध्येयांना चालना देण्यात एखादे तरुण व्यवसाय नेतृत्व किती समर्पित असू शकते, याचे मानसी उत्तम उदाहरण आहेत. पृथ्वी अधिकाधिक शाश्वत राहावी या उद्दिष्ट्यात उद्योगांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेबाबत आम्ही मानसी यांच्या मदतीने प्रबोधन घडवू.”

शिवदर्शन येथील श्री लक्ष्मीमाता मंदिरात विधीवत घटस्थापना

0

पुणे : शारदीय नवरात्री निमित्त शिवदर्शन येथील श्री लक्ष्मीमाता मंदिरात अश्विन शुद्ध प्रतिपदेच्या मुहूर्तावर पुणे नवरात्रौ महोत्सवाचे अध्यक्ष, नगरसेवक आबा बागुल आणि सौ. जयश्री बागुल यांच्या हस्ते विधीवत घटस्थापना करण्यात आली. श्री. होतीलाल शर्मागुरुजी आणि श्रीकांत रामचंद्र दंडवतेगुरुजी यांनी पौरोहित्य केले. सनई चौघडा वादनाचे मंगल स्वर आणि बँडवर वाजविलेली भक्ती गीते अशा वातावरणात हा सोहळा झाला. यावर्षी देवीसाठी सोन्याचा मुकूट आणि सोन्याची साखळी बनविण्यात आली. बागुल यांच्या हस्ते आज हे दागिने देवीला अर्पण करण्यात आले. सकाळपासून भाविक दर्शनासाठी येत होते. नवरात्रीनिमित्त मंदिर आणि परिसराची नेत्रदीपक सजावट करण्यात आली आहे.

टेबल टेनिस स्पर्धेत मनुष शाह याला दुहेरी मुकुट ; मुलींच्या गटात प्राप्ती सेनला विजेतेपद

0
पुणे-सुदेश शेलार मेमोरियल फाऊंडेशन व डेक्कन जिमखाना यांच्या संलग्नतेने व टेबल टेनिस फेडरेशन ऑफ इंडिया, महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस संघटना यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या 6व्या सुदेश शेलार मेमोरियल करंडक-11स्पोर्ट्स राष्ट्रीय मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत  जुनियर मुलांच्या गटात गुजरातच्या मनुष शाह याने महाराष्ट्र ब च्या रेगन अलबुकर  याचा तर मुलींच्या गटात पश्चिम बंगालच्या प्राप्ती सेन हीने मध्य प्रदेशच्या अनुषा कुटुंबळे हीचा पराभव करत विजेतेपद पटकावले. 

श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे बालेवाडी येथील वेटलिफ्टिंग हॉलमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत जुनियर मुलांच्या गटात अतितटीच्या झालेल्या लढतीत गुजरातच्या मनुष शाहने महाराष्ट्र ब च्या रेगन अलबुकर याचा 4-3(11-8, 5-11, 7-11, 11-8, 12-10, 4-11, 7-11) असा पराभव करत या गटातील विजेतेपदासह स्पर्धेत दुहेरी मुकुटाचा मान मिळवला. युथ गट सहव्या मानांकीत मनुषने अव्वल मानांकीत हरीयाणाच्या जित चंद्राचा पराभव करत विजेतेपद पटकावले. मनुष हा नवरत्न शाळेत 12वी इयत्तेत वाणिज्य शाखेत शिकत असून दिशा डायनामीक अकादमी येथे प्रशिक्षक शैलेश गोसेन यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो.
 
मुलींच्या गटात विजेतेपदासाठीच्या लढतीत  पश्चिम बंगालच्या प्राप्ती सेनने मध्य प्रदेशच्या अनुषा कुटुंबळे हीचा 4-2(14-12, 11-3, 9-11, 3-11, 11-7, 11-3)असा पराभव करत विजेतेपदाला गवसणी घातली. युथ गटात प्राप्तीने उपविजेतेपद पटकावले. प्राप्ती हि केंद्र विद्यालया आयआयएम शाळेत सातवी इयत्तेत शिकत असून नारकेल दंग साधारण समिती येथे प्रशिक्षक जयोन्तोकुमार पुशीलाल यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते. तिचे या गटातील या वर्षातील हे दुसरे विजेतेपद आहे.
 
स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या खेळाडूंना करंडक पारितोषिक देण्यात आले. स्पर्धेचे पारितोषिक वितरण आठ वेळेचे राष्ट्रीय विजेते कमलेश मेहता आणि अर्जुन पुरस्कार विजेत्या मोनालिसा मेहता, मध्यप्रदेश टेबल टेनिस संघटनेचे जयेश आचार्य यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्पर्धा संचालक राजेश शेलार आणि एमएसटीटीएचे सहसचिव प्रकाश तुळपुळे आदी मान्यवर उपस्थित होते.
 
स्पर्धेचा सविस्तर निकाल-जुनियर गट मुले- उपांत्य फेरी
रेगन अलबुकर(महाराष्ट्र ब) वि.वि पयास जैन(दिल्ली) 4-3(5-11, 6-11, 7-11, 11-9, 11-8, 11-7, 11-7)
मनुष शाह(गुजरात) वि.वि दिपीत पाटील(महाराष्ट्र अ)  4-1(11-4, 10-12, 11-8, 11-7, 11-9)
अंतिम फेरी- मनुष शाह(गुजरात) वि.वि रेगन अलबुकर(महाराष्ट्र ब) 4-3(11-8, 5-11, 7-11, 11-8, 12-10, 4-11, 7-11)
 
जुनियर गट मुली- उपांत्य फेरी
प्राप्ती सेन(पश्चिम बंगाल) वि.वि मनुश्री पाटील(महाराष्ट्र ब) 4-0(11-9, 11-9, 11-3, 11-5)
अनुषा कुटुंबळे(मध्य प्रदेश) वि.वि निकिता सरकार(पुर्व बंगाल) 4-1(6-11, 11-9, 11-4, 11-1, 11-7)
अंतिम फेरी- प्राप्ती सेन(पश्चिम बंगाल) वि.वि अनुषा कुटुंबळे(मध्य प्रदेश) 4-2(14-12, 11-3, 9-11, 3-11, 11-7, 11-3)

महाराष्ट्र शासनाचे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर

0

विजय फणशीकर आणि रमेश पतंगे यांना
लोकमान्य टिळक जीवनगौरव पत्रकारिता पुरस्कार
–         मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

मुंबई, दि. 10 : पत्रकारितेच्या क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यासाठी महाराष्ट्र शासनाच्यावतीने दिला जाणारा 2016 आणि 2017 साठीचा लोकमान्य टिळक जीवनगौरव पत्रकारिता पुरस्कार हा अनुक्रमे दैनिक हितवादचे संपादक विजय फणशीकर आणि साप्ताहिक विवेकचे संपादक रमेश पतंगे यांना जाहीर करण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केली.
राज्य शासनाच्यावतीने विकास वार्तांकनासाठी पत्रकारांना दिल्या जाणाऱ्या विविध पुरस्कारांचीही घोषणा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. विकास वार्तांकनासाठी 2016 साठीचा राज्यस्तरीय बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार हा दै. पुढारी, रत्नागिरीचे राजेश जोष्ठे यांना तर 2017 साठीचा हा पुरस्कार लुमाकांत नलावडे, दै. सकाळ, कोल्हापूरचे बातमीदार यांना जाहीर करण्यात आला. मुंबईत लवकरच होणाऱ्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.
1 लाख रुपये आणि सन्मानचिन्ह असे लोकमान्य टिळक जीवनगौरव पत्रकारिता पुरस्काराचे स्वरुप आहे. तर 51 हजार रुपये, प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह असे इतर सर्व पुरस्कारांचे स्वरुप आहे.
राज्य शासनामार्फत दिल्या जाणाऱ्या ज्या विविध पुरस्कारांची मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली ते पुरस्कार खालीलप्रमाणे
वर्ष-2016 –
बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार (मराठी) (राज्यस्तर) राजेश जोष्ठे, दै. पुढारी, रत्नागिरी.
अनंत गोपाळ शेवडे पुरस्कार (इंग्रजी) (राज्यस्तर) – कांचन श्रीवास्तव, विशेष प्रतिनिधी, डीएनए, मुंबई
बाबूराव विष्णू पराडकर पुरस्कार (हिंदी) (राज्यस्तर) – विजयकुमार सिंह (कौशिक), मुख्य संवाददाता, दै. भास्कर, मुंबई

मौलाना अबुल कलाम आझाद पुरस्कार (उर्दू) (राज्यस्तर) – महंमद अब्दुल मुख्तार (आबेद), प्रतिनिधी, दै. गोदावरी ऑब्झर्वर, नांदेड
यशवंतराव चव्हाण पुरस्कार शासकीय गट (मराठी) (मा.वज.) (राज्यस्तर) – वर्षा फडके-आंधळे, वरिष्ठ सहायक संचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय, मुंबई

पु. ल. देशपांडे उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा पुरस्कार (राज्यस्तर) कपिल श्यामकुंवर प्रतिनिधी, एबीपी माझा, यवतमाळ

तोलाराम कुकरेजा उत्कृष्ट वृत्तपत्र छायाचित्रकार पुरस्कार (राज्यस्तर) शैलेश जाधव
छायाचित्रकार, दै. महाराष्ट्र टाइम्स, मुंबई

केकी मूस उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार शासकीय गट (मा.व ज.) (राज्यस्तर) प्रज्ञेश कांबळी, छायाचित्रकार, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय, मुंबई

सोशल मीडिया पुरस्कार (राज्यस्तर) प्रफुल्ल सुतार, ई – सकाळ, कोल्हापूर

स्वच्छ महाराष्ट्र जनजागृती पुरस्कार (राज्यस्तर) विशाल कदम, शहर प्रतिनिधी, दै. तरूण भारत, सातारा.

दादासाहेब पोतनीस पुरस्कार, नाशिक विभाग- सूर्यकांत नेटके, बातमीदार, दै. सकाळ, अहमदनगर- (51 हजार रुपये मानचिन्ह व प्रशस्तीपत्र व्यतिरिक्त रुपये 10 हजार दै.गांवकरीने पुरस्कृत केले आहेत.)

अनंतराव भालेराव पुरस्कार, औरंगाबाद विभाग (लातूरसह) डॉ. सीतम सोनवणे, उपसंपादक, दै. लोकमत, लातूर

आचार्य अत्रे पुरस्कार, मुंबई विभाग -मारूती कंदले, प्रतिनिधी, ॲग्रोवन, मुंबई

नानासाहेब परूळेकर पुरस्कार, पुणे विभाग – ज्ञानेश्वर बिजले, प्रतिनिधी, दै. सकाळ, पुणे

शि. म. परांजपे पुरस्कार, कोकण विभाग – माधव डोळे, ब्युरोचीफ, दै. सामना, ठाणे

ग. गो. जाधव पुरस्कार, कोल्हापूर विभाग – संजय वालावलकर, प्रतिनिधी, दै. पुढारी, सिंधुदूर्ग

लोकनायक बापूजी अणे पुरस्कार, अमरावती विभाग – अनुप गाडगे, प्रतिनिधी, दै. दिव्य मराठी, अमरावती

ग. त्र्यं. माडखोलकर पुरस्कार, नागपूर विभाग – मंगेश राऊत, वरिष्ठ वार्ताहर, दै. लोकसत्ता, नागपूर

वर्ष-2017 –

बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार (मराठी) (राज्यस्तर) -लुमाकांत नलावडे, बातमीदार दै. सकाळ, कोल्हापूर

अनंत गोपाळ शेवडे पुरस्कार (इंग्रजी) (राज्यस्तर) – मनीष सोनी, विशेष प्रतिनिधी, दै. हितवाद, नागपूर

बाबूराव विष्णू पराडकर पुरस्कार(हिंदी) (राज्यस्तर) – राजकुमार सिंह, मुख्य प्रतिनिधी, दै. नवभारत टाइम्स, मुंबई

मौलाना अबुल कलाम आझाद पुरस्कार(उर्दू) (राज्यस्तर) – खान कुतुबुद्दिन अब्दुल माजीद, दै. इन्कलाब, मुंबई

यशवंतराव चव्हाण पुरस्कार शासकीय गट (मराठी) (मा. व ज.) (राज्यस्तर) डॉ. किरण मोघे, जिल्हा माहिती अधिकारी , नाशिक

पु.ल.देशपांडे उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा पुरस्कार (राज्यस्तर) – कन्हैय्या खंडेलवाल, न्यूज 18 लोकमत, हिंगोली

तोलाराम कुकरेजा उत्कृष्ट वृत्तपत्र छायाचित्रकार पुरस्कार (राज्यस्तर) – दत्तात्रय खेडेकर, छायाचित्रकार, दै. लोकमत, मुंबई

केकी मूस उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार शासकीय गट (मा.व ज.) (राज्यस्तर) – मनीष झिमटे, छायाचित्रकार, अमरावती

सोशल मीडिया पुरस्कार (राज्यस्तर) – संतोष आंधळे, वरिष्ठ संपादक, माय मेडिकल मंत्रा, मुंबई

स्वच्छ महाराष्ट्र जनजागृती पुरस्कार (राज्यस्तर) – मल्लिकार्जुन सोनवणे, दै. यशवंत, उस्मानाबाद

दादासाहेब पोतनीस पुरस्कार, नाशिक विभाग – अमोल पाटील, वार्ताहर, दै. दिव्य मराठी , धुळे – 51 हजार रुपये(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र, व्यतिरिक्त रुपये 10 हजार दै.गांवकरीने पुरस्कृत केले आहेत.)

अनंतराव भालेराव पुरस्कार, औरंगाबाद विभाग (लातूरसह) – जितेंद्र विसपुते, उपसंपादक, दै. पुढारी औरंगाबाद

आचार्य अत्रे पुरस्कार, मुंबई विभाग – जमीर काझी, वरिष्ठ प्रतिनिधी, दै. लोकमत, मुंबई

नानासाहेब परूळेकर पुरस्कार, पुणे विभाग – प्रमोद बोडके, बातमीदार, दै. सकाळ, सोलापूर

शि.म.परांजपे पुरस्कार, कोकण विभाग – जान्हवी पाटील, वार्ताहर, दै. तरूण भारत, रत्नागिरी

ग.गो.जाधव पुरस्कार, कोल्हापूर विभाग – अभिजीत डाके, जिल्हा प्रतिनिधी, दै. ॲग्रोवन, सांगली

लोकनायक बापूजी अणे पुरस्कार, अमरावती विभाग- अनिल माहोरे, जिल्हा प्रतिनिधी, दै. पुण्यनगरी, अकोला

ग.त्र्यं.माडखोलकर पुरस्कार, नागपूर विभाग – खेमेंद्र कटरे, जिल्हा प्रतिनिधी, दै. महाराष्ट्र टाइम्स ,गोंदिया

2016 व 2017 च्या पुरस्कारांसाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक ब्रिजेश सिंह यांच्या अध्यक्षतेखालील पुरस्कार निवड समितीत 2016 साठी पत्रकार राजीव कुलकर्णी, प्रवीण मुळ्ये, पांडुरंग मस्के, राजकुमार सिंग, निलेश खरे, रमाकांत दाणी, राहुल पांडे, बबन वाळके, नितीन तोटेवार यांचा तर  2017 च्या निवड समितीत पत्रकार विजय सिंह, क्लॅरा लुईस, सिद्धेश्वर डुकरे, उमेश कुमावत, भालचंद्र पिंपळवाडकर, शैलेंद्र तनपुरे, सत्यजित जोशी, विलास तोकले, कृष्णा शेवडीकर यांचा समावेश होता.

विद्यार्थ्यांनी केली ‘सॅटेलाईट’ची निर्मिती

0
 
पुणे-डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सॅटेलाईटची प्रतिकृती निर्माण केली, ड्रोनच्या सहाय्याने त्याचे यशस्वी प्रक्षेपण केले आणि आकाशात विविध ठिकाणच्या उंचीवरील पर्यावरणीय नोंदी घेतल्या.
पुणेकर एज्युकेशन आणि सुरेश नाईक कबसेट मिशनच्या सहकार्याने या अभिनव उपक‘माचे आयोजन करण्यात आले होते. सॅटेलाईटची निर्मिती प्रकि‘या, त्याची जोडणी, ग‘ाउंड स्टेशन, डेेटा सेंटर, निरीक्षणे नोंदविणे याची माहिती दोन दिवसांच्या कार्यशाळेत देण्यात आली.
इस्रोचे माजी संचालक सुरेश नाईक यांनी मार्गदर्शन केले. नाईक यांनी चंद्र व मंगळावरील मोहिमेची माहिती दिली. सोसायटीच्या नियामक मंडळ व परिषदेचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे, संचालक डॉ. सुनील भंडगे, डॉ. सविता केळकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, संशोधन करण्याची आवड आणि नवनिर्मितीचा आनंद मिळावा या उद्देशाने उपक‘माचे आयोजन करण्यात आले होते अशी माहिती मु‘याध्यापिका लीना तलाठी यांनी दिली.
एकूण सहा सॅटेलाईट बनविण्यात आली. आकाशात ती ३० मीटर उंचीपर्यंत उडविण्यात आली. विविध उंचीवर तापमान, प्रकाशाची तीव‘ता, हवेतील आर्द्रता यांच्यात होणार्‍या बदलांची निरीक्षणे संगणकावर नोंदविण्यात आली. गोळवलकर विद्यालयातील २५ आणि आरएमडी इंटरनॅशनल स्कूलमधील पाच विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

नृत्यनाट्य अविष्कार कार्यक्रमात उलगडणार ज्ञानदेवांचे अभंग आणि जीवनपट

0
पुणे : 
भारतीय विद्या भवन‘ आणि ‘इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत ‘नाचू अभंगाचे रंगी’ संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींच्या अभंगाचा नृत्यनाट्य अविष्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा  ५७ वा कार्यक्रम शुक्रवार दिनांक १२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता होणार आहे.
 ‘कलापिनी’ (तळेगाव दाभाडे) निर्मित आणि ‘सृजन नृत्यालय’ प्रस्तुत हा कार्यक्रम ‘भारतीय विद्या भवनचे ‘सरदार महादेव बळवंत नातू सभागृह‘, सेनापती बापट रोड येथे होणार आहे, अशी माहिती ‘भारतीय विद्या भवन’चे मानद सचिव प्रा. नंदकुमार काकिर्डे यांनी पत्रकाद्वारे दिली.
 
 कार्यक्रमाची संकल्पना लेखन, दिग्दर्शन आणि नृत्यरचना मीनल कुलकर्णी यांचे आहे. संगीत दिग्दर्शन विनायक लिमये यांनी केले असून, नेपथ्य आणि प्रकाशयोजना केदार अभ्यंकर यांची आहे. कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे. 
 

मीनल कुलकर्णी या सृजन नृत्यालयाच्या संस्थपाक- अध्यक्ष आहेत. त्यांनी गुरु स्वाती दैठणकर यांच्या कडून शिक्षण घेऊन ‘भरतनाट्यम अलंकार’ पदवी प्राप्त केली आहे.

१९९५ मध्ये ‘सृजन नृत्यालय भरतनाट्यम डान्स अकॅडमी’ ची सुरुवात झाली.  २० वर्ष ही संस्था  भारतीय नृत्याचे शिक्षण देत आहे.
हे संतश्रेष्ठ श्री ज्ञानदेवांच्या जीवनावर आधारित न्रूत्यनाट्य आहे. ज्ञानदेवांच्या अभंगावरील न्रूत्यरचना व त्याबरोबरच त्यांचा जीवनपट उलगडणारे नाट्यपूर्ण प्रसंग या नृत्यनाट्याद्वारे सादर करण्यात येणार आहेत, असे मीनल कुलकर्णी यांनी सांगितले.

” सायकल चालवा इंधन वाचवा ” सायकल रॅली

0

पुणे-पूना कछि जैन युवा मंडळाच्यावतीने ”  सायकल चालवा इंधन वाचवाहा सामाजिक संदेश समाजात पोहचविण्यासाठी सायकल रॅलीचे आयोजित करण्यात आली होती . रेसकोर्सजवळील एम्प्रेस गार्डन येथील या सायकल फेरीस नगरसेवक प्रशांत जगताप यांच्याहस्ते ध्वज उंचावून या सायकल रॅलीस सुरुवात करण्यात आली . या सायकल फेरीमध्ये मोठ्या संख्येने श्री पूना कछि जैन युवा मंडळाचे सदस्य सहभागी झाले होते . यावेळी श्री पूना कछि जैन युवा मंडळाचे अध्यक्ष जिग्नेश फुरीया , उपाध्यक्ष सोनल देढिया , सचिव हिरेन गाला , सहसचिव पियुष घंगर  , निलेश देढिया , किरण गाला , धीरज गाला , हिरेन गादा , किंजल गाला , पथिक शाह आदी मान्यवर उपस्थित होते .

हि सायकल रॅली एम्प्रेस गार्डन येथून सुरुवात होऊन  माणकेशा रोड , कौन्सिल हॉल चौक , पूना क्लब , तारापोर रोड , कोयाजी रोड , बिशप शाळा रोड , पुणे सोलापूर महामार्ग  यामार्गे काढून एम्प्रेस गार्डन येथे समाप्त करण्यात आली .

या  सायकल रॅलीमध्ये इंधन वाचवा सायकल चालवा या विषयावर समाज जनजागृतीपर घोषवाक्य स्पर्धा घेण्यात आली . यामध्ये सायकल चालवा , पृथ्वी वाचवा , सायकल चालविणे हा उत्तम व्यायाम आहे , प्रदुर्षण थांबवा , सायकल चालवा , कार चालवून लठ्ठ होण्यापेक्षा सायकल चालवून तंदुरुस्त रहा अशा घोषवाक्य स्पर्धाचे फलक सायकलचालकांनी लावले होते . यावेळी उत्कृष्ट घोषवाक्य तयार करणाऱ्यांना बक्षिसांचे वाटप करण्यात आले . सर्वाना अल्पोपहार देण्यात आला

सिक्‍कीमचे माजी राज्‍यपाल डॉ. पाटील यांच्‍या हस्‍ते व्‍यंगचित्रकार राजेंद्र सरग यांचा सत्‍कार

0

पुणे  – व्‍यंगचित्र क्षेत्रात केलेल्‍या कार्याचा गौरव म्‍हणून व्‍यंगचित्रकार व  पुण्‍याचे जिल्‍हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांचा सिक्‍कीमचे माजी राज्‍यपाल  डॉ. श्रीनिवास पाटील यांच्‍या हस्‍ते शाल, श्रीफळ आणि स्‍मृतिचिन्‍ह देऊन विशेष सन्‍मान करण्‍यात आला.

दिवा प्रतिष्‍ठान आणि कराडवैभव चॅरिटेबल फाऊंडेशनच्‍या संयुक्‍त विद्यमाने राज्‍यातील दिवाळी अंकांच्‍या संपादकांचे एक दिवशीय अधिवेशन व स्‍व. यशवंतराव चव्‍हाण राज्‍यस्‍तरीय दिवाळी अंक पुरस्‍कार वितरण कार्यक्रम सातारा जिल्‍ह्यातील कराड येथे संपन्‍न झाला.

दिवाळी अंक हे मराठी भाषेचे अनोखे वैशिष्‍ट्य असून या अंकांचे महत्‍त्‍व आणि गोडी कायम राहण्‍यासाठी प्रयत्‍न करावेत, असे आवाहन डॉ. पाटील यांनी केले.  यावेळी आमदार आनंदराव पाटील, दिवा प्रतिष्‍ठानचे अध्‍यक्ष विजय पाध्‍ये, चंद्रकांत शेवाळे, अॅड. धनंजय सिंहासने, शिवाजी धुरी, दीपक अरबुणे हे उपस्थित होते.

डॉ. पाटील यांनी दिवाळी अंकांचे महत्‍त्‍व विशद करतांना सांगितले की, मराठी ही एकमेव अशी भाषा आहे की ज्‍या भाषेचे साहित्‍य संमेलन होते, नाट्य संमेलन होते, काव्‍य संमेलन होते. एखाद्या सणानिमित्‍त विशेष अंक प्रकाशित करण्‍याची शंभर वर्षांहून अधिक जुनी परंपरा मराठी भाषेत आहे. टीव्‍ही, इलेक्‍ट्रॉनिक माध्‍यमांच्या आक्रमणातही दिवाळी अंकांचे महत्‍त्व आणि गोडी अबाधित राहिली पाहिजे, यासाठी आवश्‍यक ते प्रयत्‍न केले जावेत. दिवाळी अंक वाचकांची सेवा करण्‍याचे काम करेल असा विश्‍वासही त्‍यांनी व्यक्‍त केला.  दिवाळी अंकांमध्‍ये समाजाचे मन दिसते, असे नमूद करुन डॉ. पाटील यांनी जाहिरात ही एक कला असून ती मिळवणे हे कौशल्‍यपूर्ण काम असल्‍याचे सांगितले.

डॉ. पाटील यांच्‍या हस्‍ते धुंडीराज जोशी, मेधा जोग, विष्‍णू शेटकर या वाचकांचा तसेच सुनील गायकवाड, प्रभाकर दिघेवार यांचा दिवा पुरस्कार देऊन गौरव करण्‍यात आला. राजाभाऊ देशपांडे, आण्‍णासाहेब जाधव, ज्‍येष्‍ठ पत्रकार अभिनंदन थोरात, अरुण सावळेकर, श्रीकांत हिडकल, उदय किरपेकर, डॉ. योगेश कुमार, मीनल ढापरे यांचाही यावेळी सन्‍मान करण्‍यात आला. प्रारंभी स्‍व. यशवंतराव चव्‍हाण यांच्‍या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्‍वलन करण्‍यात आले. सूत्रसंचालन प्राचार्य गणपतराव कणसे यांनी केले. कार्यक्रमास ज्ञानेश्‍वर जराड, महेंद्र देशपांडे, भारतभूषण पाटकर, विवेक मेहेत्रे, डॉ. स्‍नेहसुधा कुलकर्णी, शारदा धुळप, सन्‍ना मोरे, विजय सामंत, उल्‍हास पाटकर,  मारुती विश्‍वासराव, राजेंद्र गोसावी, दगडू चौधरी, गौरव कुलकर्णी, शिवाजीराव यादव, शहाजीराव जगदाळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

दुपारच्‍या सत्रात ‘दिवाळी अंक काल, आज आणि उद्या’ या विषयावर परिसंवाद झाला. यामध्‍ये डॉ. स्‍नेहसुधा कुलकर्णी, महेंद्र देशपांडे, डॉ. बसवेश्‍वर चेणगे, विनायकराव जाधव, जिल्‍हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग, महादेव साने  यांनी भाग घेतला. सूत्रसंचालन सुनील गायकवाड यांनी केले. कार्यक्रमास रसिकांचा उत्‍स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

मराठवाडा चॅरिटेबल ट्रस्टतर्फे दोनशे झाडांचे संरक्षक जाळीसह वृक्षारोपण

0
पिंपरी । प्रतिनिधी :
मराठवाडा जनविकास संघ संचलित मराठवाडा चॅरिटेबल ट्रस्ट एकसंघ समिती पिं.चि.शहर, संत भगवान बाबा मंदिर ट्रस्ट व समस्त ग्रामस्थ याच्या संयुक्त विद्यमाने सावरगाव घाट दसरा मैदान (ता. पाटोदा जि.बीड) येथे सुमारे दोनशे झाडांचे सुरक्षा जाळीसह वृक्षारोपण करण्यात आले. यामध्ये 10 फुट उंचीची झाडे लावण्यात आली. लावण्यात आलेल्या या वृक्षांचे ट्रस्टच्यावतीने संगोपन करण्यात येणार आहे.
  यावेळी आमदार भीमराव धोंडे, श्री संत भगवानबाबा मंदिर ट्रस्टचे सुदाम सानप पाटील, जिल्हा परिषद सदस्य रामदास बडे, पंचायत समिती सदस्य काकासाहेब लांबरुंड, मराठवाडा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष अरुण पवार, सरपंच राम सानप, सरपंच भागवत वारे, उपसरपंच इंदर सानप, उपसरपंच संजय शिरसाट, इंजि बडे, रवींद्र केकान, छगन सानप, मुरली मुकादम, तुळशीदास बापु आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन संदेश सानप, संतोष सानप, ग्रामपंचायत सदस्य नारायण सानप, बाबासाहेब खाडे, भीमराव सानप, बाबासाहेब सानप, शिवाजी सानप, संदीप सानप, बापूसाहेब सानप, माजी सरपंच राम सानप, रामा सानप, अजिनाथ सानप, अर्जुन सानप, विठ्ठल सानप, महेश सानप, माधव मनोरे, वामन भारगांडे, दत्तात्रय धोंडगे, अनिसभाई पठाण, नामदेव पवार, व्यंकटेश जगदाळे, अमोल पाटील, शंकर तांबे, शिवाजी सुतार, ह.भ.प. राजाभाऊ मोरे, ह.भ.प. गर्जे महाराज, विजय सोनवणे, आश्रुबा पालवे, सतीश आव्हाड युवराज घोळवे , एकनाथ सानप, महादेव बनसोडे, डॉ.दिनेश गाडेकर यांनी केले. प्रास्ताविक संदेश सानप यांनी, तर आभार सरपंच राम सानप यांनी मानले.
मराठवाडा जनविकास संघामार्फत गेल्या 7 वर्षापासून वृक्षारोपण, वृक्ष संगोपन आणि पर्यावरणाविषयी जनतेमध्ये जनजागृती केली जात आहे. आतापर्यंत तब्बल अकरा हजार वृक्षांचे बॅरीकेट जाळीसह वृक्षारोपण करण्यात आले आहे. यातील सर्व झाडे कशी जिवंत राहतील, यासाठी प्रत्येक महिन्याला 200 कार्यकर्त्यासह आढावा बैठक घेतली जाते व प्रत्येकाला वृक्षारोपण केलेल्या भागाची जबाबदारी दिली जाते. वृक्षासाठी मोफत पाणी पुरवठा, वृक्षाभोवतीचे गवत काढणे, साफसफाई आदी कामे केली जातात, असे मराठवाडा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष अरुण पवार यांनी सांगितले.

त्या दिवसांत विद्यार्थीनीनी वैयक्तिक स्वच्छतेची काळजी घ्यावी…..मंजुश्री खर्डेकर

0
पुणे-विद्यार्थीनींनी आता आपल्या मासिक पाळी बद्दल व त्यांच्या त्या दिवसांतील समस्यांवर नि:संकोचपणे बोलले पाहिजे व त्या दिवसांना वर्ज्य न मानता स्वतःच्या स्वच्छतेबाबत जागरुक राहिले पाहिजे असे मत नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांनी व्यक्त केले.मासिकपाळी म्हणजे निसर्गाने स्त्रीवर नवनिर्मितीची मोठी जबाबदारी टाकली आहे. त्यामुळे त्याचा संकोच न बाळगता स्रीला त्याचा अभिमान वाटला पाहिजे असे ही त्या म्हणाल्या.या काळात त्यांच्यात होणाऱ्या शारीरिक व मानसिक बदलाबाबत घरी आईने तर शाळेत वर्गशिक्षिकेने त्यांना माहिती देणे गरजेचे असून त्याकाळात मुलींनी घाबरून जाण्याचे कारण नाही असेही मंजुश्री खर्डेकर म्हणाल्या .
लायन्स क्लब ऑफ पुणे कोथरूड ने ऑक्टोबर सेवा सप्ताहांतर्गत आयोजित केलेल्या सॅनेटरी नॅपकीन वाटप कार्यक्रमात त्या बोलत होत्या.एरंडवण्यातील पं दीनदयाळ उपाध्याय शाळेतील १५० विद्यार्थीनींना सॅनेटरी नॅपकीन किट तसेच त्याच्या विल्हेवाटी साठी वेगळ्या डब्यांचे वाटप करण्यात आले.क्लबचे अध्यक्ष गजेंद्र दांगट म्हणाले ” सेवा सप्ताह साजरा करताना समाजातील वंचितांना विविध प्रकारच्या आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी आम्ही प्रयत्नशील असून ताथवडे उद्यानात रक्तातील साखरेची तपासणी,सहकार उद्यानात रक्तदान शिबिर यासह विविध कार्यक्रमाचे आयोजन करुन लायन्स क्लब ने सामाजिक बांधिलकी जपतानाच आरोग्यविषयक कार्यक्रमातून निरोगी व सुदृढ समाज निर्माण करण्याचा संकल्प केला आहे.यावेळी लायन अभय शास्त्री,लायन गणेश बरके,गिरीश गणात्रा,सुनीता चिटणीस,दीनदयाळ शाळेच्या मुख्याध्यापिका एलिझाबेथ काकडे व इतर मान्यवर उपस्थित होते.यावेळी डॉ मनाली कुलकर्णी यांनी वैयक्तिक स्वच्छतेबाबत विद्यार्थीनींना मार्गदर्शन केले.त्या काळात शारीरिक स्वच्छता कशी ठेवायची,पॅड चा वापर कसा करायचा? त्याची विल्हेवाट कशी  करायची ह्याची माहिती त्यांनी दिली.
शक्य झाल्यास दिवसातून दोनदा स्नान करावे.तसेच काही त्रास झाल्यास घरातील महिलेस त्याची माहिती द्यावी असे ही त्या म्हणाल्या. यावेळी लायन अभय शास्त्री व नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांच्या हस्ते शाळेस किट व नॅपकीन संकलनासाठी वेगळे डबे भेट देण्यात आले.
गजेंद्र दांगट यांनी प्रास्ताविक केले तर एलिझाबेथ काकडे यांनी स्वागत व आभार प्रदर्शन केले.