Home Blog Page 3070

पाटबंधारे च्या ‘वादळा’ने महापालिकेची ‘नौका’ भरकटली

पुणे-तिकडे बॉलीवूड मध्ये आलेल्या ‘तनुश्री ‘ नावाच्या वादळाने रथी महारथींच्या मुखवटे उडून जावू पाहत असताना ;इकडे  कालवा दुरुस्तीला तो फुटण्याची वेळ पाहता काय ? असा सवाल मनात घेऊन च पाटबंधारे विभागाने उठविलेल्या पाणीकपातीच्या वादळात अखेर महापालिकेतील सत्ताधाऱ्यांसह प्रशासनाची नौका भरकटली कि काय अशी शंका घेण्याजोगी स्थिती दिसते आहे . सत्ताधिकारी पदाधिकारी,अधिकारी ,आणि पालकमंत्री,जलसंपदा मंत्री  यांच्यात कोणताही ताळमेळ नसल्याचे स्पष्ट झाले .एकूणच पाणीकपातीच्या बाबत सत्ताधारी नगरसेवकांमध्ये हि गोंधळाचे वातावरण दिसून येते आहे.खुद्द स्मार्ट पुण्याच्या  आयुक्तांना आपण पाणी किती घेतो याचे मोजमाप प्रत्यक्षात जावून तपासण्याची  वेळ येवून ठेपली आहे . काही पदाधिकारी कपात वगैरे काही नाही सांगत आहेत ,काही मौन पाळून आहेत ,तर काही आम्ही कपात होऊ देणार नाही असे सांगत आहेत . आणि विरोधी पक्षांनी तर आंदोलनाचा धडाका लावला आहे .

खरोखर धरणात पाणी कमी आहे काय ?  खडकवासला धरणक्षेत्रातील धरणे भरली तेव्हा किती पाणी एकूण साऱ्या धरणात होते ? आणि किती दिवसात किती पाणी कमी झाले ?गेल्या वर्षी धरणे भरली तेव्हा किती पाणी होते ? आणि ते कशा पद्धतीने- नियोजनाने सोडले गेले ? या सर्व प्रश्नांचा अभ्यास करायला त्यांना पाटबंधारे खात्याने वेळ दिलेला दिसत नाही .

आजच्या मितीला गेल्या वर्षाच्या तुलनेत पावणेदोन टीएमसी पाणी धरणांतून कमी झालेले नसून ते नियोजनपूर्वक गायब करण्यात आल्याची माहिती येथे मिळते आहे . आणि याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला तर पाटबंधारे खात्याचे मोठ्ठे मासे गळाला लागतील असाही दावा करण्यात येतो आहे . महापालिका राजकारण आणि पाटबंधारे खात्याचे राजकारण याकडे दुर्लक्ष करून  नियोजन केले तरीही पुण्याच्या पाण्यात कपात केल्याशिवाय व्यवस्थित कारभार हाकता येईल अशी स्थिती असताना हि वादळ आले आणि नौका भरकटली असे चित्र तयार झाले आहे . आता यापुढे पुणेकरांना मात्र या वादळात गुरफटवून टाकण्याचा प्रयत्न होऊ नये म्हणजे झाले . अन्यथा या वर्षी गायब झालेल्या पाण्याचा हिशेब पुढच्या वर्षी का होईनात सीबीआय मार्फत होऊ शकतो असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही .

आगामी वर्ष ‘कुक्‍कूटपालन वर्ष’ साजरे करणार- पशुसवंर्धन मंत्री जानकर

0

पुणे, दिनांक 12- येत्‍या 1 जानेवारी ते 31 डिसेंबर पर्यंत राज्‍य शासनाच्‍या वतीने  ‘कुक्‍कूटपालन वर्ष’ साजरे करण्‍यासाठी प्रयत्‍न केले जातील, असे सांगून शेतक-याचा मुलगा उद्योगपती व्‍हायला हवा, अशी अपेक्षा पशुसंवर्धन, दुगधव्‍यवसाय विकास व  मत्‍स्यव्‍यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी व्‍यक्‍त केली.

जागतिक अंडीदिनानिमित्‍त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी खासदार साबळे, पशुसंवर्धन आयुक्‍त कांतीलाल उमाप, अतिरिक्‍त आयुक्‍त डॉ. डी. एम. चव्‍हाण, सह आयुक्‍त डॉ. धनंजय परकाळे, डॉ. गीता धर्मट्टी, डॉ. प्रसन्‍न पेडगावकर, भाऊसाहेब ढोरे, सचिन काकडे, संजय शेडगे आदी उपस्थित होते.

पशुसंवर्धन मंत्री जानकर म्‍हणाले, पोषणाच्‍या बाबतीत आईच्‍या दुधानंतर अंड्यामधील  प्रथिनांचा  क्रमांक लागतो. अंड्यातील प्रथिने ही दूध व मांस यापेक्षा पचनास हलकी असतात आणि सर्व वयोगटातील लोकांना सहज पचतात. आंध्र प्रदेश, तेलंगाणामध्‍ये शालेय पोषण आहारात अंड्यांचा समावेश करण्‍यात आला आहे. राज्‍यातही अंड्यांची सोय करण्‍यात येईल. राज्‍यामध्‍ये सध्‍या दीड कोटी अंडी उत्‍पादन होते. राज्‍याची अंड्यांची गरज तीन कोटींची आहे, उर्वरित अंडी आंध्र प्रदेश, तेलंगाणा राज्‍याकडून विकत घेतली जातात. राज्‍यामध्‍येच अंडी उत्‍पादन वाढवण्‍याची मोठी संधी असून शेतक-यांनी कुक्‍कूट पालनाकडे वळावे, असे आवाहन त्‍यांनी केले. सन 2022 पर्यंत शेतक-यांचे उत्‍पन्‍न दुप्‍पट करण्‍याचे  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे स्‍वप्‍न आहे.  पशुसंवर्धन, कुक्‍कूटपालन या व्‍यवसायामध्‍ये हे उत्‍पन्‍न चारपट करण्‍याची क्षमता असल्‍याचेही त्‍यांनी सांगितले.

खासदार अमर साबळे यांनी खाण्‍यामध्‍ये अंड्यांचे प्रमाण वाढण्‍याची अपेक्षा व्‍यक्‍त केली. कुक्‍कूटपालन, सेंद्रीय खाद्य निर्मिती, विक्री व्‍यवस्‍थापन याचे नियोजन केल्‍यास अंडीविक्रीसाठी जागतिक बाजारपेठ खुली असल्याचे सांगितले.  अरब देशांचे इंडो-अरब फोरम लवकरच स्‍थापन करण्‍यात येणारअसून त्‍या माध्‍यमातून 28 देशांमध्‍ये अंड्यांची जास्‍तीतजास्‍त विक्री होऊ शकते,असेही ते म्‍हणाले.

आयुक्‍त कांतीलाल उमाप यांनी प्रास्‍ताविक केले.मानवी आहारात अंड्यांच्‍या पोषणमुल्‍याचे महत्‍त्व जनतेपर्यंत पोहोचवणे आणि कुक्‍कूट पालन व्‍यवसायाला चालना देऊन ग्रामीण भागात स्‍वयंरोजगाराच्‍या संधी उपलब्ध करण्‍यासाठी जागतिक अंडी दिन साजरा केला जात असल्‍याचे त्‍यांनी सांगितले. अंडे हे शाकाहारी असल्‍याने प्रत्येकाने आहारात समावेश करण्‍यास हरकत नसल्‍याचेही ते म्‍हणाले.

यावेळी डॉ. गीता धर्मट्टी यांनी पोषण आहारातील अंड्यांचे महत्‍त्व या विषयावर मार्गदर्शन केले. डॉ. प्रसन्‍न पेडगावकर, भाऊसाहेब ढोरे, सचिन काकडे, संजय शेडगे यांनीही आपले मनोगत व्‍यक्‍त केले. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज, महात्‍मा फुले, सावित्रीबाई फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या प्रतिमांचे पूजन करण्‍यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आशीष जराड यांनी तर आभार डॉ. डी. एम. चव्‍हाण यांनी मानले. कार्यक्रमास डॉ. राऊतमारे, डॉ. शमीम शेख, डॉ. विश्‍वास भागवत यांच्‍या विद्यार्थी, नागरिक मोठ्या संख्‍येने उपस्थित होते.

नाना पाटेकर यांच्यासह चौघा जणांवर गुन्हा दाखल ;महिला कॉंग्रेसचे नाना पाटेकर विरोधात निदर्शने

0

पोलीसांनी काय केले ? महिला आयोगाच्या विचारणे नंतर ..पोलीस कारवाई

मुंबई: अभिनेत्री तनुश्री दत्ताच्या समर्थनात आता मुंबईतील महिला कॉंग्रेस रस्त्यावर उतरली आहे. कॉंग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी थेट ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या विरोधात निदर्शने करत त्यांना अटक करण्याची मागणी केली आहे. मुंबईतील ओशिवरा पोलिस स्टेशनबाहेर महिला कार्यकर्त्यांनी आंदोलन करुन नाना पाटेकर यांच्या अटकेची मागणी केली. अभिनेते नाना पाटेकर यांनी गैरवर्तन केल्याचा आरोप तनुश्री दत्ताने केल्यानंतर नाना पाटेकर यांच्यासह चौघा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तनुश्री दत्ताने तब्बल 5 तास जवाब नोंदवल्यानंतर आयपीसी कलम 354 (छेडछाड) आणि 509 (महिलेस लज्जा उत्पन्न होईल अशाप्रकारचे कृत्य करणे) अन्वये अभिनेता नाना पाटेकर, हॉर्न ओके प्लीज चित्रपटाचे दिग्दर्शक राकेश सारंग, कोरिओग्राफर गणेश आचार्य आणि निर्माते सामी सिद्दीकी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. तनुश्री दत्ताच्या लेखी तक्रारीची दखल घेत राज्य महिला आयोगाने नाना पाटेकर यांना नोटीस बजावली होती. तनुश्रीच्या तक्रारीत उल्लेख असलेल्या नाना पाटेकरांसोबत गणेश आचार्य, सामी सिद्दीकी, राकेश सारंग यांना आयोगाने नोटीस बजावली असून 10 दिवसात आपले म्हणणे आयोगाकडे मांडण्याचे निर्देश दिले आहेत.या शिवाय पोलिसांनी या प्रकरणी काय केले असा सवाल महिला आयोगाने 2 दिवसांपूर्वी उपस्थित केला होता .

‘विज्ञानशोधिका’ आयोजित प्रश्नमंजुषा स्पर्धेत विखे पाटील मेमोरियल स्कूलला प्रथम क्रमांक

0

पुणे : भारतीय विद्याभवनच्या मुक्तांगण विज्ञानशोधिका केंद्रातर्फे आयोजित आंतरशालेय प्रश्नंजुषा स्पर्धेत विखे पाटील मेमोरियल स्कूलला प्रथम क्रमांक मिळाला. कलमाडी हायस्कूला द्वितीय, तर दिल्ली पब्लिक स्कूलच्या संघाला तृतीय क्रमांक मिळाला. विजेत्या संघांना रोख रक्कम, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. विखे पाटील मेमोरियल स्कूलने यंदाचा फिरता करंडक आपल्याकडे ठेवला.

प्राथमिक फेरीत एकूण 35 संघ या स्पर्धेत सहभागी झाले होते. त्यातील सहा संघांनी अंतिम फेरी गाठली. गणित, विज्ञान आणि तंत्रज्ञानाशी संबंधित पाच राऊंड या स्पर्धेची अंतिम फेरी रंगली. लीप अ‍ॅण्ड स्केलचे प्रशांत जोशी यांनी या प्रश्नमंजुषा स्पर्धेचे संयोजन केले. मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्राचार्य माधुरी शाह यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पारितोषिके देण्यात आली. यावेळी विज्ञानशोधिका केंद्राचे संचालक अनंत भिडे, उपसंचालिका नेहा निरगुडकर, भारती बक्षी, स्पर्धेच्या समन्वयिका ऋतुजा चिकाटे, भाग्यश्री लताड आदी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांनी लहानपणापासून गणित, विज्ञान सखोलपणे समजून घेत समाजाभिमुख काम करण्यावर भर द्यावा. समस्या सोडवणारे संशोधक करण्याचा प्रयत्न करावा, असे मत माधुरी शाह यांनी व्यक्त केले. अनंत भिडे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. भाग्यश्री लताड यांनी सूत्रसंचालन केले. तेजस चिंबाळकर याने आभार मानले.

व्हॅस्कॉनच्या विंडरमेअर व गुडलाइफ-काटवी प्रकल्पांनी गोल्डन ब्रिक अॅवॉर्ड्स 2018 मध्ये जिंकले सन्मान

0

लक्झरी व बजेट हौसिंग प्रकल्पांसाठी या शहरातील विकसकाचा आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरव

 पुणे : व्हॅस्कॉन इंजिनीअर्स लि. (BSE Scrip ID VASCONEQ) या एका विश्वासार्ह व नामवंत विकसकाने दुबईमध्ये नुकत्याच झालेल्या ‘गोल्डन ब्रिक अॅवॉर्ड्स 2018’मध्ये, कोरेगाव पार्क येथील  ‘विंडरमेअर’ प्रकल्पासाठी व काटवी येथील ‘गुडलाइफ’ प्रकल्पासाठी दोन पुरस्कार जिंकले आहेत. व्हॅस्कॉनच्यागुडलाइफ-काटवीप्रकल्पाला बजेट हौसिंग प्रोजेक्ट ऑफ द इयर (रिजनल) आणि विंडरमेअरच्या ग्लोडन जॅकेट अॅडला ब्लॅक इंक अॅवॉर्ड प्रिंट मीडिया अॅड डिझाइन पुरस्कार मिळाला.

व्हॅस्कॉन इंजिनीअर्सचे व्यवस्थापकीय संचालक सिद्धार्थ वासुदेवन यांनी सांगितले, आंतरराष्ट्रीय स्तरावर व्हॅस्कॉनला मिळालेले हे प्रतिष्ठेचे पुरस्कार मिळाल्याचा आम्हाला अतिशय आनंद होत आहे. तीन दशकांहून अधिक परंपरा असलेली व्हॅस्कॉन उत्कृष्टतेप्रति बांधिलकी व ग्राहकांना पैशांचे योग्य मूल्य देणे यासाठी प्रसिद्ध आहे. हे पुरस्कार म्हणजे इतक्या वर्षांत आम्ही संपदित केलेल्या विश्वासाची, तसेच दर्जेदार व प्रेरक वातावरण निर्माण करण्यासाठी आम्ही सातत्याने करत असलेल्या प्रयत्नांची पावती आहे.”

भारतीय विकसक, बांधकाम कंपन्या, आर्किटेक्ट, रिअल इस्टेट व पायाभूत सुविधा क्षेत्रांतील डिझाइनर्स व प्रोफेशनल यांच्या योगदानाची दखल घेण्यासाठी व त्यांचा सन्मान करण्यासाठी, तसेच या क्षेत्रांत कार्यरत असणाऱ्या कंपन्यांचे सर्वोच्च यश साजरे करण्यासाठी गोल्डन ब्रिक अॅवॉर्ड्स दिले जातात.

 व्हॅस्कॉन इंजिनीअर्स लिमिटेडविषयी

व्हॅस्कॉन इंजिनीअर्स ही पुणे येथे मुख्यालय असलेली एक प्रमुख नोंदणीकृत रिअल इस्टेट कंपनी आहे. कंपनीला भारतातील 30+ शहरांतील निवासी, औद्योगिक, आयटी पार्क, मॉल व मल्टिप्लेक्स, रुग्णालये व कम्युनिटी वेल्फेअर सेंटर्स अशा क्षेत्रांतील, ईपीसी व स्वतःचे प्रकल्प असे, 50 दशलक्ष चौरस फूट क्षेत्राचा समावेश असलेले 200+ प्रकल्प पूर्ण करण्याचा 30 वर्षांचा अनुभव आहे. आगामी काळात, ईपीसी व अफोर्डेबल हौसिंग श्रेणी यावर लक्ष केंद्रित करण्याचे उद्दिष्ट आहे.

 

‘प्रत्येक स्त्रीने स्वतःतील उर्जा ओळखावी’ – अतिरिक्त आयुक्त शीतल उगले

0

पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाचे शानदार उद्घाटन

पुणे-प्रत्येक स्त्री मध्ये उर्जा असते. तिला सन्मान मिळायलाच हवा. मात्र केवळ नवरात्रापुरतेच हे मर्यादित न राहता संपूर्ण वर्षभर स्त्रीचा सन्मान व्हायला हवा. स्त्री ने देखील स्वतःतील उर्जा ओळखावी. घर सांभाळून बाहेरही कर्तृत्व गाजवावे. घर हे पती-पत्नी अशा दोघांचे असते. घर, समाज आणि देश हा देखील स्त्री आणि पुरूष दोघांचा असतो. घरातील मुलगा आणि मुलगी यांना समान वागवा. आणि याची सुरूवात प्रत्येकाने आपापल्या घरापासून करावी असे आवाहन पुणे महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त शीतल उगले यांनी आज केले. 19व्या पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाचे उद्घाटन करताना त्या बोलत होत्या. शिवदर्शन येथील श्री लक्ष्मीमाता मंदीर परिसरात संपन्न झालेल्या या कार्यक्रमात त्यांच्या हस्ते ‘माहेर’ मासिकाच्या कार्यकारी संपादक सुजाता देशमुख, महाराष्ट्र आर्थिक विकास महामंडळाच्या उपाध्यक्षा मीनल मोहाडीकर आणि भोर येथील राज्य शासनाच्या उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करणार्‍या शीतल चव्हाण यांना ‘तेजस्विनी’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. 5 हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते.

प्रारंभी महेश पाटील व सँडी ग्रुप यांनी गणेश वंदना आणि कलापद्मच्या कांचन रायकर व सह कलावंतांनी देवी स्तुती सादर केली. महिला महोत्सवाच्या पाककला स्पर्धांचे आयोजन करणार्‍या अंजली पुरानीक यांना यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर देवीची सामुहिक आरती होऊन दीपप्रज्वललाने महिला महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी पुणे नवरात्रौ महोत्सवाचे संयोजक नगरसेवक व माजी उपमहापौर आबा बागुल उपस्थित होते.

पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाच्या अध्यक्षा जयश्री बागुल यांनी सर्वांचे स्वागत करून प्रास्ताविक केले. त्या म्हणाल्या महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा व त्यांच्यातील आत्मविश्वास वाढावा यासाठी महिलांसाठी हे व्यासपीठ सुरू झाले. गेल्या 19 वर्षात विविध स्पर्धांमध्ये हजारो महिला सहभागी झाल्या त्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

सत्काराला उत्तर देताना माहेर मासिकाच्या कार्यकारी संपादक सुजाता देशमुख म्हणाल्या की, प्रत्येक महिलेने आपल्याला जे आवडते ते करण्यावर भर द्यावा. त्यातून खूप मोठे समाधान मिळते. जगताना हव्यास न बाळगता जेवढे आवश्यक तेवढेच स्वतः जवळ ठेवावे. आवडीचे काम केल्यामुळे प्रत्येकीचे आयुष्य समृद्ध होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्र आर्थिक विकास महामंडळाच्या उपाध्यक्षा मीनल मोहाडीकर म्हणाल्या की, आपली आवड ओळखून  त्याचीच निवड करा आणि मग त्यासाठी आपल्याला सवडही मिळेल. प्रत्येक महिलेने आपल्यातील शक्ती ओळखली पाहिजे. उद्योजक होण्यासाठी मिळालेली संधी दवडू नका. ध्येय, विक्री व्यवस्थापन व टीम वर्क या गुणांच्या आधारे महिला निश्चित यशस्वी उद्योजक होऊ शकतील अशा त्या म्हणाल्या.

भोर शासकीय उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करणार्‍या शीतल चव्हाण म्हणाल्या की, वडिलांसमवेत जात राहिले आणि काम शिकत राहिले. अपघातात निधन पावलेल्या व्यक्तींचे शवविच्छेदन करताना मनात येत राहतं की यांना वेळीस वैद्यकीय मदत मिळाली असती तर हे जीव वाचले नसते का? सध्या रस्त्यात अपघात झाला तर लोक मदतीला जात नाही हे चुकीचे आहे, असे सांगून माणसाने माणूसकी टिकवली पाहिजे असे आवाहन त्यांनी शेवटी केले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राजक्ता कोळपकर यांनी केले. महोत्सवाच्या उपाध्यक्षा निर्मला जगताप यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमास महिलांची मोठी गर्दी होती. यानंतर महोत्सवातर्फे ‘खेळ पैठणीचा’ संपन्न झाला. हा महोत्सव यशस्वी होण्यासाठी दीपा बागुल, छाया कातुरे यांच्यासह आदींनी परिश्रम घेतले.

समृद्धीला रेल्वेमध्ये नोकरी देण्यासाठी प्रयत्न करू -पालकमंत्री बापट

0

पुणे  : जुना बाजार परिसरात होर्डिंग्ज पडून मृत झालेल्या शिवाजी परदेशी यांच्या कुटुंबियांची पालकमंत्री गिरीश बापट यांनी भेट घेतली. परदेशी यांची मुलगी समृद्धी हिला रेल्वेमध्ये नोकरी देण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन पालकमंत्री बापट यांनी दिले.

या दुर्घटनेत शिवाजी यांचा मृत्यू झाला तर त्यांच्या पत्नीचा आदल्या दिवशी मृत्यू झाला. ही घटना दुर्देवी आहे. पण यातून सावरले पाहिजे. या कठीण प्रसंगात आम्ही सर्व कार्यकर्ते या कुटुंबियांच्या पाठीमागे भक्क्मपणे उभे राहू.  परदेशी यांची  मुलगी समृद्धी आता सतरा वर्षाची आहे तर मुलगा समर्थचे वय आता चार वर्ष आहे. समृद्धीला रेल्वे मध्ये नोकरी लागल्यास या कुटुंबाचा चरितार्थ व्यवस्थित चालेल. पण यासाठी  किमान आणखी एक वर्ष थांबावे लागेल. यासाठी खासदारांच्या मार्फत पाठपुरावा करण्याचे आश्वासन  यावेळी बापट यांनी दिले. परदेशी यांची आई आजारी असल्याने तिच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांच्या औषधोपचाराचा खर्च करणार असल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे राज्य शसनाकडून मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. शासनाची मदत मिळेपर्यंत कुटुंबाच्या दैनंदिन गरजा भागविण्यासाठी मदत देणार असल्याचे ही त्यांनी सांगितले.

‘आयस्क्वेअरआयटी’च्या प्रियांकाला पुणे विद्यापीठाकडून तीन सुवर्णपदके

0
पुणे : होप फाउंडेशन संचलित हिंजवडी येथील इंटरनॅशनल इन्स्टिटयूट ऑफ इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी (आयस्क्वेअरआयटी) महाविद्यालयातील विद्यार्थिनी प्रियांका सिंग हिने संगणक अभियांत्रिकी विद्याशाखेत प्रथम येत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून तीन सुवर्णपदके पटकावली. विद्यापीठाच्या वतीने विविध शाखांतील गुणवंत विद्यार्थ्यांची यादी नुकतीच जाहीर केली. मुंबई विद्यापीठाच्या अखत्यारीत असलेल्या रत्नागिरी येथील फिनोलेक्स अकॅडेमी ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजी (एफएएमटी) महाविद्यालयानेही अनेक सुवर्णपदके मिळवली, तर येथील ६५ गुणवंत विद्यार्थी विद्यापीठीय गुणवत्ता यादीत झळकले आहेत.
प्रियांका सिंग हिने संगणक अभियांत्रिकी विद्याशाखेत ८५.३३% गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. ‘डॉ. डी. वाय पाटील’, ‘चि. अमित बहुले’ व ‘जी. एच. रायसोनी’ अशी तीन सुवर्ण पदके तिला मिळाली. तसेच ह्या वर्षीचे कातोनो रमस पुरस्कृत रोख पारितोषिक देखील प्रियांकाने पटकावले. ह्या घवघवीत यशामागे मी केलेले अथक परिश्रम, तसेच माझे पालक, मित्र व शिक्षकांचा माझ्यावर असलेला विश्वास व त्यांनी वेळोवेळी केलेले सहकार्य हा आहे; ह्या यशाचे श्रेयदेखील ह्याच सर्व लोकांचे आहे असे मनोगत प्रियांकाने ह्यावेळी व्यक्त केले. सध्या प्रियांका पदव्युत्तर शिक्षण घेत आहे, पदव्युत्तर शिक्षणानंतर ‘संगणकीय अभियांत्रिकी’ विद्याशाखेतच संशोधन करण्याचा तीचा मानस आहे.
अरुणा कटारा म्हणाल्या, “शैक्षणिक गुणवत्तेची प्रतिभा उंचावायची असेल तर योग्य पोषण व विविध स्तरीय संधी विद्यार्थांना उपलब्ध दिल्या पाहिजेत, असा विश्वास फिनोलेक्स कंपनी समूह व होप फौन्डेशन आणि रिसर्च सेंटरचे संस्थापकीय अध्यक्ष प्रल्हाद छाब्रिया यांनी ‘आयस्क्वेअरआयटी’ आणि ‘एफएएमटी’ या संस्थांच्या स्थापनेवेळी व्यक्त केला होता. तो विश्वास या दोन्ही संस्था सार्थ ठरवत आहेत, याचा अभिमान वाटतो. येथील विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकताहेत, ही आम्हा सर्वांसाठी आनंदाची बाब आहे.”

दिवाळी होईपर्यंत पाणी कपात नको – अतिरिक्त आयुक्त निंबाळकर

0

पुणे- दिवाळी होईपर्यंत पुण्याच्या पाणीकपातीचा निर्णय राबवू नये अन्यथा नागरिकांच्या मोठ्या रोषाला सामोरे जावे लागेल असा खणखणीत इशारा महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी जलसंपदा खात्याला दिला आहे .
आज निंबाळकर यांनी लेखी पत्र पाठवून हा इशारा दिला आहे . आज सकाळी खडकवासला धरण येथून पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या 2 मोटारी बंद करण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर या पत्राला महत्व प्राप्त झाले आहे .
राजेंद्र निंबाळकर यांनी हे पत्र खडकवासला पाटबंधारे विभागाचे मुख्य अभियंता यांच्या नावे पाठविले आहे .4 ऑक्टोबर २०१८ रोजी मुंबईत झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीचा आणि त्यानंतर पाटबंधारे खात्याने दिलेल्या पत्राचा संदर्भ देवून त्यांनी या पत्रात म्हटले आहे की ,4 ऑक्टोबरच्या बैठकीत १३५० एमएल डी पाण्या ऐवजी महापालिकेने केवळ ११५० एम एल डी पाणी धरणातून उचलावे असे मार्गदर्शन करण्यात आले होते . त्यानुसार नियोजन आम्ही करत आहोत आणि वेळापत्रक हि करत आहोत . मात्र दिवाळी होईपर्यंत कपात लागू करू नये ,अन्यथा नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल .दिवाळी झाल्यावर आम्ही ११५० एम एल डी एवढे पाणी उचलू आणि तसे नियोजन राबवू या साठी वेळापत्रक बनविण्यात येते आहे .

पाणी कापल्याचं माहिती नाही, मंत्री ,काय झक मारायला झाला काय ?(व्हिडीओ)

पुणे-पोलीस बंदोबस्तात आख्या पुण्याचं पाणी कापलं ,आणि जलसंपदा खात्यचे मंत्री असलेले शिवसेनेचे विजय शिवतारे म्हणतात ‘माहिती घेतो ‘ मग मंत्री काय झाक मारायला झालात काय ? असा सडेतोड सवाल आज महापालिकेतील विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष चेतन तुपे पाटील यांनी केला .
आज पुण्याचं पाणी खडकवासल्यातून कापल्याचा आरोप करत राष्ट्र वादीने महापालिकेच्या प्रवेशद्वारावरील पायऱ्यांवर ठिय्या मारत जोरदार घोषणाबाजी केली . बाप्पू पठारे,सुभाष जगताप ,नंदा लोणकर, नारायण लोणकर, नितीन कदम ,रवींद्र माळवदकर,सुमन पठारे,भैय्या जाधव ,सुनील टिंगरे ,रुपाली चाकणकर ,बंडू गायकवाड आदी राष्ट्रवादीचे नगरसेवक ,कार्यकर्ते, मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते .
यावेळी माध्यमांशी बोलताना चेतन तुपे पाटील ,म्हणाले या मंत्र्यांना पत्रकारांनी विचारल्यावर समजले ,कि पुण्याचं पाणी पोलीस बंदोबस्तात कापले आहे. आणि याबाबत ते माहिती घेतो असे म्हणाले .सणासुदीच्या दिवसात ,पूर्वकल्पना न देता अचानक पणे पुण्याचं पाणी सकाळी कापण्यात आलं हे धक्कादायक आहे. पालकमंत्री आणि पाटबंधारे यांनी निट नियोजन केलं नाही त्यामुळे ऑक्टोबर महिन्यात पाणी कपातीची ऐतिहासिक वेळ या भाजपवर पाणी असताना येवून ठेपली . खरे तर पाणी धरणात आहे . पाऊस झालेला आहे . असेही ते म्हणाले .

पुण्यातील विद्यार्थ्यांनी साजरा केला कॉलेज आयडॉल आणि मिस्टर अॅन्ड मिस युनिव्हर्सिटी चा १६ वा सीझन

0
पुणे-
कॉलेज आयडॉल आणि मिस्टर आणि मिस युनिव्हर्सिटी २०१८ गूड लूक पॅजेंट हे आशियामधील प्रथम इव्हेंट इन्स्टिट्‌यूट एनआयईएमतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ब्युटी पॅजेंट, टॅलेन्ट हंट तसेच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा यथोचित आदरसत्कार करण्याचेही एक व्यासपीठ असून, हा चमचमता सोहळा नेहरू मेमोरियल हॉल  येथे पार पडला. सर्वोत्तम फॅशन, संगीत आणि अशा अनेक गोष्टी असलेल्या ह्या कार्यक्रमामध्ये शर्वरी जमेनिस, पियुष मल्होत्रा, नंदन गिजारे, दिनिआर पटेल, झीशान खान आणि नीतू भाटिया ह्या नावाजलेल्या परीक्षकांनी कॉलेज आयडॉलचे परीक्षण केले, तर मिस्टर आणि मिस युनिव्हर्सिटीसाठी वैष्णवी राव, मिन्नी रोहिला, आरजे इरा, संदीप धर्मा, टेरेन्स अँथोनी, चेतन अग्रवाल, जितेश पाटील, डॉ।होशी भिवंडीवाला आणि डॉ।राजीव झवेरी यांनी परीक्षण केले.

महिंद्राने दाखल केले 1,700 किलो पेलोड क्षमतेचे भारतातील पहिले पिक-अप वाहन(व्हिडीओ)

0

पुणे: महिंद्रा अँड महिंद्रा लि. या गेली 20 वर्षे भारतातील पिक-अप श्रेणीमध्ये आघाडीवर असलेल्य कंपनीने आज, लोकप्रिय बोलेरो पिक-अप या व्यावसायिक वाहनांमध्ये सुधारणा केलेले महा स्ट्राँग, महा बोलेरो पिक-अप हे नवे वाहन दाखल केले. उत्तम अर्थार्जनाची मूलभूत गरज लक्षात घेत, महा बोलेरो पिक-अपमध्ये 1,700 किलो इतकी या श्रेणीतील सर्वाधित पेलोड क्षमता आहे. नव्या महा बोलेरो पिक-अप वाहनांमध्ये पूर्णतः नवा अंतर्भाग असेल व रूंद को-ड्राइव्हर सीटबरोबरच, आरामदायी आसनव्यवस्था असेल.

“महा” या नावाप्रमाणेच, नव्या बोलेरो पिक-अपमध्ये 9 फूट (2765 मिमी) – या क्षेणीतील सर्वाधिक लांबीचा अति-लांब कार्गो डेक समाविष्ट आहे. हा डेक 1,700 किलो या सर्वाधिक पेलोड वाहण्याच्या क्षमतेसाठी पूरक आहे. महा बोलेरो पिक-अपमध्ये डबल बेअरिंग अॅक्सल, सक्षम 9-लीफ सस्पेन्शन व भार वाहण्याच्या वाढीव क्षमतेला आधार मिळण्यासाठी रूंद 15 इंच, 12 पीआर टायर आहेत.

ग्राहकांच्या सर्वाधिक सुरक्षेच्या दृष्टीने, या वाहनामध्ये ट्विन टँडम बूस्टल एलएसपीव्ही ब्रेक्स आहेत आणि सक्षम बॉडी व चासिस आहेत. नॅशनल परमिटद्वारे देशभर हेव्ही लोड वाहून नेण्यासाठी ही वैशिष्ट्ये साजेशी आहेत. महा स्ट्राँग, महा बोलेरो पिक-अप उत्पादनांमध्ये विविध बॉडी स्टाइल्स, कार्गो बॉक्स लेंथ आणि विविध ग्राहकश्रेणी व त्यांच्या गरजा यानुसार 1,300 किलो, 1,500 किलो व 1,700 किलो पेलोड क्षमता आहेत.

सणासुदीनिमित्त, महा स्ट्राँग, महा बोलेरो पिक-अप फ्लॅट-बेड अतिशय रास्त दरामध्ये उपलब्ध असून, तिची किंमत 6.66 लाख रुपयांपासून (एक्स-शोरूम, पुणे) आहे.

महा बोलेरो पिक-अप उत्पादनांच्या नव्या वैशिष्ट्यांविषयी बोलताना, महिंद्रा अँड महिंद्रा लि.चे सेल्स व मार्केटिंग, ऑटोमोटिव्ह प्रमुख वीजय नाकरा म्हणाले, “20 वर्षांहून अधिक कालावधी बाजारातील आघाडीची कंपनी म्हणून, पिक-अप श्रेणीतील दर्जा उंचावणे व ग्राहकांना सर्वोत्तम मूल्य देणे, हा आमचा प्रयत्न राहिला आहे. महा स्ट्राँग, महा बोलेरो पिक-अप अर्थार्जनाची उत्कृष्ट क्षमता देऊ करते व या वाहनाची पेलोड क्षमता 1,700 किलो इतकी सर्वाधिक आहे आणि त्यामध्ये 9 फूट (2765 मिमी) लांबीचा कार्गो बॉक्स आहे. या महा बोलेरो पिक-अपमुळे महिंद्राच्या सक्षम व दणकट डीएनएचे मूलभूत मूल्य आणखी वाढेल, तसेच मेंटेनन्ससाठी कमी खर्च करावा लागणार असल्याने अर्थार्जनाची क्षमता वाढेल व ब्रँडला आणखी उंची प्राप्त होईल”.

महा स्ट्राँग, महा बोलेरो पिक-अपमध्ये य श्रेणीतील सर्वोत्तम “इंडिया का नं. 1 पिकअप का वादा योजना” उपलब्ध असून, ही योजना 2 वर्षे मोफत मेंटेनन्स व 4 वर्षांनी 4 लाख रुपये बायबॅक हमी देते. यामुळे अर्थार्जनाची क्षमता वाढते व ग्राहकांना मनःशांती मिळते.पिक-अप श्रेणीमध्ये 62% बाजारहिस्सा (वायटीडी सप्टेंबर 2018) असलेल्या महिंद्राने विश्वासाच्या पायावर आपल्या ग्राहकांशी गहिरे नाते निर्माण केले आहे. उत्पादनांची गुणवत्ता, त्यांचा दणकटपणा, अर्थार्जनाची क्षमता, मेंटेनन्सचा कमी खर्च व सर्वात महत्त्वाचे म्हणजे, महिंद्रा ब्रँडची विश्वासार्हता व या श्रेणीतील सर्वाधिक पुनर्विक्री मूल्य, यामुळे हे शक्य झाले आहे. आज, मालवाहतुकीच्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी महिंद्राकडे विविध पिक-अप वाहने आहेत आणि बोलरो-पिक-अप या प्रमुक ब्रँडचे 10 लाखांहून अधिक समाधानी ग्राहक आहेत. महिंद्रा पिक-अप श्रेणीतील अनेक पहिल्यावहिल्या बाबींसाठी नावाजली जाते, मग ते पहिले फ्लॅट-बेड कार्गो पिक-अप असो, पहिले डबल केबिन पिक-अप असो, पहिले एसी पिक-अप असो, पहिले सीएनजी पिक-अप वाहन असो किंवा पहिले मायक्रो हायब्रिड पिक-अप वाहन.

महिंद्रा या ब्रँडशी गहिरे नाते प्रस्थापित करत असताना, ग्राहकांच्या जीवनावर सकारात्मक परिणाम करणे व त्यांना जीवनात अधिकाधिक प्रगती व नफा मिळवण्यासाठी मदत करणे, हे उद्दिष्ट आहे. आज, महिंद्राचे विक्री व सर्व्हिसचे सक्षम जाळे देशभर पसरलेले आहे व त्याचा लाभ महा बोलेरो पिक-अप ग्राहकांना घेता येणार आहे.

 महिंद्राविषयी

20.7 अब्ज डॉलर उलाढाल असलेल्या या कंपन्यांच्या समूहाचा नेहमीच प्रयत्न असतो की, वाहतूक सुविधांमध्ये नावीन्य आले पाहिजे, ग्रामीण भागात भरभराट झाली पाहिजे, शहरातील जीवनशैली सुधारली पाहिजे आणि व्यवसायाची कार्यक्षमता वाढली पाहिजे. त्यामुळे लोकांना चालना मिळून त्यांचा विकास होईल. समूह भारतात युटिलिटी व्हेइकल्स, माहिती तंत्रज्ञान, वित्तीय सेवा व व्हेकेशन ओनरशिप यामध्ये आघाडीच्या स्थानी आहे व व्हॉल्युमच्या बाबतीत जगातील सर्वात मोठी ट्रॅक्टर कंपनी आहे. कृषिव्यवसाय, एअरोस्पेस, कम्पोनंट्स, सल्ला सेवा, संरक्षण, ऊर्जा, औद्योगिक उपकरणे, लॉजिस्टिक्स, रिअल इस्टेट, स्टील, रिटेल, व्यावसायिक वाहने व दुचाकी व्यवसायांतही अग्रेसर आहे. मुंबईत मुख्यालय असलेल्या महिंद्रामध्ये 100 देशांत अंदाजे 240,000 कर्मचारी आहेत.

दृष्टीहीन खेळाडूंच्या भारत विरूध्द श्रीलंका 20-20 मर्यादित षटकांची 8 सामन्यांची मालिका

0
पुणे,11 ऑक्टोबर 2018 : क्रिकेट असोसिएशन फॉर दि ब्लाईंड ऑफ महाराष्ट्र ही संस्था दृष्टिहीन खेळाडूंच्या शालेय स्तरीय क्रिकेट स्पर्धेपासून ते विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धेेपर्यंतचे आयोजन वेळोवेळी करत आली असून,ही संस्था क्रिकेट असोसिएशन फॉर दि ब्लाईंड इन इंडिया व वर्ल्ड ब्लाईंड क्रिकेट असोसिएशन या संस्थांशी संलग्न आहे. दि.15/10/2018 रोजी पुण्याच्या नेहरू स्टेडियम येथे भारत विरूध्द श्रीलंका यांच्यातील 8 सामान्याच्या मालिकेतील 20-20 स्वरूपातील मर्यादित षटकांचा पहिला सामना खेळवला जाणार असून,दुसरा सामना दि.16/10/2018 रोजी मुंबई येथील इस्लाम जिमखाना मरीन लाईन येथे खेळवला जाणार आहे.या 8 सामन्यांच्या मालिकेतील पहिले दोन सामने हे महाराष्ट्रात खेळवले जाणार असल्यामुळे,या दोन्ही शहरांमध्ये दृष्टीहीन क्रिकेट सामने पाहण्याबाबत जनसामान्यांमध्ये मोठी उत्सुकता असून,पुण्यातील सामन्याचे लाईव्ह टेलिकास्ट हे आयसीसी केबल नेटवर्क यांच्याकडून विनामुल्य केले जाणार आहे.तसेच ब्लाईंड क्रिकेट इन इंडिया भारत श्रीलंका 2018 या युट्युब चॅनेलच्या माध्यमातून सर्व लोकांना हे सामने पाहता येणार आहेत.या सर्व सामन्यांसाठी भारतीय संघामध्ये महाराष्ट्राचे एकूण 3 खेळाडू खेळणार असून,त्यामध्ये पुणे-बारामती-अमोल करचे,परतवाडा अमरावती-अनिल बेलसरे,कातली वर्धा-प्रविण करलुके अशा 3 खेळाडूंचा समावेश संघामध्ये आहे.या मालिकेचा अंतिम सामना हा कलकत्ता येथे दि.27/10/2018 रोजी खेळवला जाणार आहे.
 
दृष्टीहीन क्रिकेट खेळ हा प्रामुख्याने आवाजावर खेळला जात असून या खेळासाठी वापरला जाणारा चेंडू हा कठिण प्लॅस्टिकचा असतो,त्यामध्ये आवाजासाठी सायकलमध्ये वापरले जाणारे बॉल बेरींग/छर्रे वापरून हा चेंडू बनविला जातो.हा चेंडू खेळताना सरपटी/अंडरआर्म पध्दतीने फलंदाजाकडे टाकला जात असून,यासाठी आवश्यक आलेली खेळपट्टी ही सर्वसामान्य क्रिकेटसाठी वापरल्या जाणार्‍या खेळपट्टीप्रमाणेच तिचा वापर या खेळासाठी केला जातो.हा खेळ खेळण्यासाठी सर्वसामान्य नियमांमधील काही नियमांमध्ये बदल करून हा खेळ खेळवला जातो.क्रिकेटच्या या खेळामधील खेळाडूंची विभागणी 3 पध्दतींमध्ये केली जाते.बी-1 कॅटेगरी-एकूण 4 खेळाडू 100 टक्के अंध,बी-2 अंशत: दृष्टीहीन 2.60 इतक्या अंतरावरील नजर असणे आवश्यक -एकूण 3 खेळाडू आणि बी-3 कॅटेगरी- एकूण 4 खेळाडू अल्पदृष्टी-(3.60 मीटर इतक्या अंतरापर्यंतची नजर आवश्यक) अशा पध्दतीने मैदानावर एकूण 11 खेळाडू हा क्रिकेटचा खेळ खेळत असून संघांमध्ये प्रत्येक कॅटेगरीमधील एक-एक खेळाडू हा अतिरिक्त खेळाडू म्हणून असून 14 खेळाडू व 1 कोच व 1 मॅनेजर असा एकूण 16 जणांचा संघ केला जातो.
 
क्रिकेट असोसिएशन फॉर दि ब्लाईंड ऑफ महाराष्ट्र ही संस्था मागील दहा वर्षांपासून प्रामुख्याने महाराष्ट्राच्या खेळाडूंसाठी विशेषत: काम करीत असून,संस्था सुरू झाल्यापासून ते आजपर्यंत राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय व विश्‍वचषक या स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या एकूण 7 खेळाडूंचा समावेश या भारतीय संघामध्ये झाला असून यापुढेही दृष्टीहीन क्रिकेटचा दर्जा वाढवून भारतीय संघामध्ये महाराष्ट्राच्या अधिकाधिक खेळाडूंचा समावेश होण्यासाठी ही संस्था खेळाडूची अधिक तयारी करून जास्तीत जास्त खेळाडूंचा समावेश होण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मेहनत घेणार आहे.तसेच या स्पर्धेसाठी सोनी पिक्चर्स नेटवर्क व रूद्राक्ष इव्हेंटचे प्रायोजकत्व,सहकार्य लाभत असून या चॅनेलच्या माध्यमातून आर्थिक पाठबळ मिळत असल्यामुळे संस्थेस सदर स्पर्धा घेण्यास मदत होत आहे.हा आठ सामन्यांची मालिका ही क्रिकेट असोसिएशन फॉर दि ब्लाईंड इन इंडिया व वर्ल्ड ब्लाईंड क्रिकेट असोसिएशन या सर्वांच्या संयुक्त विद्यमाने खेळवली जाणार आहे.
 
या सर्व ठिकाणी होणार्‍या या सामन्याचे उद्घाटन दि,.15/10/2018 रोजी नेहरू स्टेडियम पुणे येथे श्री सुनंदन लेले,वरिष्ठ क्रीडा समीक्षक यांच्या हस्ते होणार असून याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून चित्रपटसृष्टीतील दिग्दर्शक,अभिनेते,पटकथा लेखक प्रवीण तरडे व सिनेकलाकार सुरेश विश्‍वकर्मा,मिस्टर वर्ल्ड महेंद्र चव्हाण व उद्योगपती व सामाजिक नेते विठ्ठलशेठ मणियार हे उपस्थित राहणार आहेत.तसेच पारितोषिक वितरण समारंभ हा दि.15/10/2018 रोजी दुपारी 2 वाजता महाराष्ट्राचे माजी कर्णधार मिलिंद गुंजाळ व महाराष्ट्राचे माजी कर्णधार शंतनू सुगवेकर यांच्या हस्ते पार पडणार आहे.

आदर्श ओम छेत्री, सुहाना सैनी, इमॉन अधिकारी, सयानी पांडा यांना विजेतेपद

0

पुणे- सुदेश शेलार मेमोरियल फाऊंडेशन व डेक्कन जिमखाना यांच्या संलग्नतेने व टेबल टेनिस फेडरेशन ऑफ इंडिया, महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस संघटना यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या 6व्या सुदेश शेलार मेमोरियल करंडक-11स्पोर्ट्स राष्ट्रीय मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत सब  जुनियर मुलांच्या गटात आदर्श ओम छेत्री तर मुलींच्या गटात सुहाना  सैनी   यांनी आणि कॅडेट मुलांच्या गटात इमॉन अधिकारी तर मुलींच्या गटात सयानी पांडा यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत विजेतेपद पटकावले.

श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे बालेवाडी येथील वेटलिफ्टिंग हॉलमध्ये पार पडलेल्या या स्पर्धेत विजेतेपदासाठीच्या सब जुनियर मुलांच्या गटात संघर्षपुर्ण लढतीत दिल्लीच्या आदर्श ओम छेत्रीने तामिळनाडूच्या विश्वा दिनदयालन याचा 4-3(13-11, 10+12, 11-4, 11-8, 6-11, 6-11, 11-4) असा पराभव करत विजेते पदाला गवसणी घातली. आदर्श हा बालभारती स्कुल, नोएडा येथे 7वी इयत्तेत शिकत असून अंशूल गर्ग अकादमी येथे प्रशिक्षक अंशूल गर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो. मुलींच्या गटात हरीयाणाच्या सुहाना सैनी  हीने कर्नाटकच्या अनर्गया मंजूनाथचा 4-0(13-11, 11-7, 11-4, 11-4) असा एकतर्फी पराभव करत विजेतेपद पटकावले. 12वर्षीय सुहाना हि स्कॉलर्स रॉजर सिनियर सेकंडरी शाळेत 9वी इयत्तेत शिकत असून चेन्नई टेबल टेनिस फाऊंडेशन येथे प्रशिक्षक आर आर राजेश यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते.

कॅडेट गटात पश्चिम बंगालच्या खेळाडूंनी विजेतेपद राखले. मुलांच्या गटात पश्चिम बंगालच्या इमॉन अधिकारीने महाराष्ट्र ब च्या गौरव पंचमचा 4-1(11-8, 6-11, 4-11, 11-6,11-4) असा सहज पराभव करत विजेतेपद पटकावले. इमॉन हा नैहाटी नरेंद्र विद्यानिकेतन शाळेत 6वी इयत्तेत शिकत असून नैहाटी युथ असोसिएशन येथे प्रशिक्षक मिहीर घोष आणि तापस सरकार यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो. त्याचे या वर्षातील हे दुसरे विजेतेपद आहे. तर मुलींच्या गटात पश्चिम बंगालच्या सयानी पांडाने पश्चिम बंगालच्याच नंदिनी साहाचा 4-0(11-6, 14-12, 11-5, 11-6) असा एकतर्फी लढतीत सहज पराभव करत विजेतेपद पटकावले. 11 वर्षीय सयानी कोलकाता येथे हिंद मोटर अकादमी येथे अमिताभो साहा रामामोहन यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते तर मिशन स्कुल येथे पाचव्या इयत्तेत शिकत असून तीचे या वर्षातील हे चौथे विजेतेपद आहे.

स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या खेळाडूंना करंडक पारितोषिक देण्यात आले. आदर्श छेत्री, दिव्यांश श्रीवास्तव, स्नेहा भोवमीक,यशांश मलिक सौम्यदीप सरकार, पृथा व्हर्टिकर, सना डिसुझा, गौरव पंचगम, रेगान अलबुकर, इमॉन अधिकारी या खेळाडूंना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण सत्यम प्लसचे संस्थापक निकुंज झवेरी, आठ वेळेचे राष्ट्रीय विजेते व अर्जुन पुरस्कार विजेते कमलेश मेहता, माजी अंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय टेबल टेनिस खेळाडू व्ही. चंद्रशेखर,  राष्ट्रीय खेळाडू व अर्जुन पुरस्कार विजेत्या मोनालिसा मेहता, माजी राष्ट्रीय टेबल टेनिस खेळाडू एस. रामास्वामी, नांदेड जिल्हा टेबल टेनिस संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. स्पर्धा संचालक राजेश शेलार आणि एमएसटीटीएचे सहसचिव प्रकाश तुळपुळे, स्मिता बोडस, सुचेता शेलार, विक्रम गुरजर, जतीन माळी, राहुल क्षिरसागर आदी मान्यवर उपस्थित होते.

स्पर्धेचा सविस्तर निकाल- सब जुनियर मुले- उपांत्य फेरी

विश्वा दिनदयालन(तामिळनाडू) वि.वि सौम्यदीप सरकार(पुर्व बंगाल) 9-11, 11-5, 12-10, 9-11, 11-8, 11-7;

आदर्श ओम छेत्री(दिल्ली) वि.वि दिव्यांश श्रीवास्तव(उत्तर प्रदेश) 13-11, 11-2, 9-11, 11-9, 11-7.

अंतिम फेरी– आदर्श ओम छेत्री(दिल्ली) वि.वि विश्वा दिनदयालन(तामिळनाडू) 4-3(13-11, 10+12, 11-4, 11-8, 6-11, 6-11, 11-4)

 सब जुनियर मुली- उपांत्य फेरी

अनर्गया मंजूनाथ(कर्नाटक) वि.वि स्नेहा भोवमीक(पश्चिम बंगाल)11-5, 11-8, 5-11, 12-10, 9-11, 8-11, 11-9;

सुहाना  सैनी  (हरीयाणा) वि.वि यशस्विनी घोरपडे(कर्नाटक)7-11, 11-9, 11-9, 10-12, 5-11, 11-5, 11-6.

अंतिम फेरी- सुहाना  सैनी  (हरीयाणा) वि.वि अनर्गया मंजूनाथ(कर्नाटक) 4-0(13-11, 11-7, 11-4, 11-4)

 

कॅडेट मुले- उपांत्य फेरी

गौरव पंचम(महाराष्ट्र ब) वि.वि अदलाखीया देव(तेलंगणा)  10-2, 11-5, 11-7, 11-5;

इमॉन अधिकारी(पश्चिम बंगाल) वि.वि बालामुर्गन मुथा(तामिळनाडू) 11-1, 11-9, 11-9.

अंतिम फेरी- इमॉन अधिकारी(पश्चिम बंगाल) वि.वि गौरव पंचम(महाराष्ट्र ब) 4-1(11-8, 6-11, 4-11, 11-6,11-4)

 

कॅडेट मुले- उपांत्य फेरी

सयानी पांडा(पश्चिम बंगाल) वि.वि सना डिसुझा(महाराष्ट्र) 8-11, 11-7, 11-5, 11-9;

नंदिनी साहा(पश्चिम बंगाल) वि.वि निहारीका कुमार(कर्नाटक) 8-11, 11-4, 11-7, 11-7.

अंतिम फेरी– सयानी पांडा(पश्चिम बंगाल) वि.वि नंदिनी साहा(पश्चिम बंगाल) 4-0(11-6, 14-12, 11-5, 11-6)

साखर संकुलासमोरील शिवसेनेचे झोपडी निवास आंदोलन दुसऱ्या दिवशीही सुरुच

0
आयुक्तांची आंदोलकांशी चर्चा तोडगा न निघाल्याने आंदोलन चिघळण्याच्या मार्गावर
पुणे – गेले दोन दिवस साखर संकुलासमोर सुरु असलेले ‘झोपडी निवास आंदोलन’ चिघळण्याच्या मार्गावर आहे. आज दिनांक 11ऑक्टोबर गुरुवार रोजी साखर आयुक्त संभाजी कडूपाटील यांनी शिष्टमंडळाशी चर्चा केली असता कोणताही ठोस निर्णय न झाल्याने शेतकऱ्यांच्या हाती अद्याप केवळ आश्वासनच मिळत असल्याने आंदोलन याहीपेक्षा तीव्र केले जाईल असा इशारा शिवसेनेचे बीड जिल्हाप्रमुख सचिन मुळूक व माजलगाव शिवसेनेचे आप्पासाहेब जाधव यांनी दिला आहे.
एन.एस.एल.शुगर्स लि.युनिट ।।। संचलित जय महेश साखर कारखाना पवारवाडी ता.माजलगाव, जि.बीड व्यवस्थानाने ऊस बीलाची रक्कम अद्याप दिली नसल्याने शेकडो शेतकऱ्यांचे कुटुंब रस्त्यावर आले आहे. जय महेश साखर कारखान्याच्या पिळवणूकीच्या विरोधात आज दुसऱ्या दिवशीही आंदोलन सुरु ठेवले आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पासाहेब जाधव यांच्या नेतृत्वाखाली या आंदोलनाला शेतकऱ्यांचा दुसऱ्या दिवशीही मोठा प्रतिसाद मिळत आहे. जय महेश साखर कारखान्याने ऊस बिलाची रक्कम दिली नसल्याने शेतकरी उघड्यावर पडले आहेत. या प्रश्नाकडे लक्ष वेधून घेण्यासाठी गेल्या दोन दिवस पुण्यातील साखर संकुलासमोर ‘झोपडी निवास आंदोलन’ हे अभिनव आंदोलन सुरु आहे. या आंदोलनास शेतकऱ्यांकडून मोठा प्रतिसाद मिळत असला तरी प्रशासनाकडून मात्र ठोस आश्वासन किंवा कोणतीही हमी दिली जात नसल्याने हे आंदोलन भविष्यात अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.
दरम्यान आज साखर आयुक्त संभाजी कडूपाटील यांनी आंदोलनातील शिष्ट मंडळाशी चर्चा केली मात्र या चर्चेतून शेतकऱ्यांच्या हाती काही ठोस लागले नसल्याने हे आंदोलन अधिक चिघळण्याची चिन्हे दिसत असून शिवसेनेचे पदाधिकारी आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. शेतकऱ्यांच्या पदरात ठोस आश्वासन व हमी पडल्याशिवाय आंदोलन थांबणार नसल्याचा इशारा शिवसेनेचे बीड जिल्हाप्रमुख सचिन मुळूक व अप्पासाहेब जाधव यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. या आयुक्तांशी चर्चा दरम्यान शिष्टमंडळात सचिन मुळूक, आप्पासाहेब जाधव, राजश्रीताई जाधव, सिता शेंडगे, मुंजाबा जाधव, रत्नाकर कदम, माऊली शेंद्रे, मतिंद्र शिंदे, गोविंद शेंडगे आदींची उपस्थिती होती. तसेच या आंदोलनास संजय महाद्वार, सुशिल पिंगळे, रामराजे सोळंके, बाळासाहेब मेंडके, अॅड.दत्ता रांजवण, दासु बादाडे, संदीप माने, सय्यद, मुंजाबा जाधव, रत्नाकर कदम, लक्ष्मण सोळंके, रामदास ढगे, फारुक सय्यद, महादेव लंगडे, रामेश्वर काशिद, कचरु बढे, बळीराम भले, राहुल कोल्हे, ज्ञानेश्वर खराडे, विजय नाईकनवरे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच शिवसैनिक यांनीही यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी  जय महेश साखर कारखान्याची मालमत्ता विक्री वरील स्थगिती उठवली असून साखर आयुक्तांनी बीड जिल्हाधिकारी यांना या आदेशाचे पत्रही काढले आहे. स्थगिती जरी उठवली असली तरी चालेल परंतू कारखान्याने शेतकऱ्यांच्या एफ.आर.पी.ची रक्कम मिळाल्याशिवाय शिवसेना या आंदोलनातून माघार घेनार नाही. असा इशारा शिवसेनेचे बीड जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांनी तर हे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा आप्पासाहेब जाधव यांनी दिला आहे.