पुण्यातील विद्यार्थ्यांनी साजरा केला कॉलेज आयडॉल आणि मिस्टर अॅन्ड मिस युनिव्हर्सिटी चा १६ वा सीझन
पुणे-
कॉलेज आयडॉल आणि मिस्टर आणि मिस युनिव्हर्सिटी २०१८ गूड लूक पॅजेंट हे आशियामधील प्रथम इव्हेंट इन्स्टिट्यूट एनआयईएमतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ब्युटी पॅजेंट, टॅलेन्ट हंट तसेच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा यथोचित आदरसत्कार करण्याचेही एक व्यासपीठ असून, हा चमचमता सोहळा नेहरू मेमोरियल हॉल येथे पार पडला. सर्वोत्तम फॅशन, संगीत आणि अशा अनेक गोष्टी असलेल्या ह्या कार्यक्रमामध्ये शर्वरी जमेनिस, पियुष मल्होत्रा, नंदन गिजारे, दिनिआर पटेल, झीशान खान आणि नीतू भाटिया ह्या नावाजलेल्या परीक्षकांनी कॉलेज आयडॉलचे परीक्षण केले, तर मिस्टर आणि मिस युनिव्हर्सिटीसाठी वैष्णवी राव, मिन्नी रोहिला, आरजे इरा, संदीप धर्मा, टेरेन्स अँथोनी, चेतन अग्रवाल, जितेश पाटील, डॉ।होशी भिवंडीवाला आणि डॉ।राजीव झवेरी यांनी परीक्षण केले.