लक्झरी व बजेट हौसिंग प्रकल्पांसाठी या शहरातील विकसकाचा आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरव
पुणे : व्हॅस्कॉन इंजिनीअर्स लि. (BSE Scrip ID VASCONEQ) या एका विश्वासार्ह व नामवंत विकसकाने दुबईमध्ये नुकत्याच झालेल्या ‘गोल्डन ब्रिक अॅवॉर्ड्स 2018’मध्ये, कोरेगाव पार्क येथील ‘विंडरमेअर’ प्रकल्पासाठी व काटवी येथील ‘गुडलाइफ’ प्रकल्पासाठी दोन पुरस्कार जिंकले आहेत. व्हॅस्कॉनच्या ‘गुडलाइफ-काटवी’ प्रकल्पाला बजेट हौसिंग प्रोजेक्ट ऑफ द इयर (रिजनल) आणि ‘विंडरमेअर’च्या ग्लोडन जॅकेट अॅडला ब्लॅक इंक अॅवॉर्ड प्रिंट मीडिया अॅड डिझाइन पुरस्कार मिळाला.
व्हॅस्कॉन इंजिनीअर्सचे व्यवस्थापकीय संचालक सिद्धार्थ वासुदेवन यांनी सांगितले, “आंतरराष्ट्रीय स्तरावर व्हॅस्कॉनला मिळालेले हे प्रतिष्ठेचे पुरस्कार मिळाल्याचा आम्हाला अतिशय आनंद होत आहे. तीन दशकांहून अधिक परंपरा असलेली व्हॅस्कॉन उत्कृष्टतेप्रति बांधिलकी व ग्राहकांना पैशांचे योग्य मूल्य देणे यासाठी प्रसिद्ध आहे. हे पुरस्कार म्हणजे इतक्या वर्षांत आम्ही संपदित केलेल्या विश्वासाची, तसेच दर्जेदार व प्रेरक वातावरण निर्माण करण्यासाठी आम्ही सातत्याने करत असलेल्या प्रयत्नांची पावती आहे.”
भारतीय विकसक, बांधकाम कंपन्या, आर्किटेक्ट, रिअल इस्टेट व पायाभूत सुविधा क्षेत्रांतील डिझाइनर्स व प्रोफेशनल यांच्या योगदानाची दखल घेण्यासाठी व त्यांचा सन्मान करण्यासाठी, तसेच या क्षेत्रांत कार्यरत असणाऱ्या कंपन्यांचे सर्वोच्च यश साजरे करण्यासाठी गोल्डन ब्रिक अॅवॉर्ड्स दिले जातात.
व्हॅस्कॉन इंजिनीअर्स लिमिटेडविषयी
व्हॅस्कॉन इंजिनीअर्स ही पुणे येथे मुख्यालय असलेली एक प्रमुख नोंदणीकृत रिअल इस्टेट कंपनी आहे. कंपनीला भारतातील 30+ शहरांतील निवासी, औद्योगिक, आयटी पार्क, मॉल व मल्टिप्लेक्स, रुग्णालये व कम्युनिटी वेल्फेअर सेंटर्स अशा क्षेत्रांतील, ईपीसी व स्वतःचे प्रकल्प असे, 50 दशलक्ष चौरस फूट क्षेत्राचा समावेश असलेले 200+ प्रकल्प पूर्ण करण्याचा 30 वर्षांचा अनुभव आहे. आगामी काळात, ईपीसी व अफोर्डेबल हौसिंग श्रेणी यावर लक्ष केंद्रित करण्याचे उद्दिष्ट आहे.